Friday, September 14, 2018
Wednesday, August 29, 2018
Monday, March 5, 2018
खऱ्या सोन्यापेक्षाही झळाळी लाभलेल्या सोनाबाई
खऱ्या सोन्यापेक्षाही झळाळी लाभलेल्या सोनाबाईराजूर, ता . ६:- - खऱ्या सोन्यापेक्षाही झळाळी लाभलेल्या सोनाबाई अपघातात दोन्ही हात मोडलेल्या जिद्दी सौ.सोनाबाई विठ्ठल भांगरे रा.पिंपळदरावाडी ता. अकोले जिल्हा अहमदनगर यांचे शिक्षण जेमतेम २ री पर्यंतच झालेले. वयाच्या १८ व्या वर्षी त्या लग्नानंतर सासरी पिंपळदरावाडी येथे आल्या. लहानपणापासूनच शेतात आई वडिलांना मदतीची सवय व पडेल ते कष्ट उचलण्याची सवय यामुळे त्यांना पतीच्या घरी स्थिरावण्यास जास्त वेळ लागला नाही. सोमाबाई यांना ४ आपत्य त्यातील ३ मुली व १ मुलगा याप्रमाणे त्यांनी मुलांचाही योग्य संस्कार व प्रेरणा देऊन सांभाळ केला. पुढे त्या गावातच सुरु असलेल्या बायफ संस्थेच्या (सन १९९७ साली) संपर्कात आल्या. मुळातच समाज सेवेची आवड व प्रेमळ स्वभाव त्यामुळे त्यांनी गरीब आदिवासी व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांना संघटीत केले. त्यांचे स्वयम सहाय्यता समूह बनविले. त्यांना नियमित बचतीची व बँकेशी व्यवहार करण्याची सवय लावली. संघटन कौशल्य व जबरदस्त इच्छा शक्ती यांच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या व आजूबाजूच्या गावांमध्ये सुमारे २०-२५ स्वयम सहाय्यता समूहांची स्थापना केली. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देत राहिल्या त्यांच्या दर्जेदार व कौशल्यपूर्ण निसर्गाविषयी ज्ञानामुळे त्यांनी बायफच्या मदतीने अनेक उपक्रम यशस्वी राबविले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी गावाचे शिवाऱ्यात असलेले झरे त्यांनी दुरुस्त करण्यासाठी महिलांच्या समूहांना प्रेरित केले. व बायाफच्या मदतीने २ झरे संरक्षक भिंती व टाक्या बांधून पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित केले. त्यामुळे आज गावातील लोकांना, वाटसरूंना, प्राणी-पक्षी यांना स्वच्छ व निर्मळ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. नुकतेच या कामांना आंतरराष्ट्रीय स्थरावरून अमेरिका येथून आलेल्या रेबेका डेरझेक्स यांनी भेट देऊन सोनाबाईंचे विशेष आभार व कौतुकही केले. त्यांनी सुचवलेले व लोकसहभाग व बायफच्या मदतीने निर्माण केलेले गावातील पहिल्या वहिल्या वळण बंधाराचे काम आज १५-२० एकर क्षेत्र ओलिताखाली आणून दिले. या कामासाठी महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून श्रमदान व सहभाग देण्यासाठी प्ररित केले. सुमारे २०००० रु. गुंतवून तयार केलेला वळण बंधारा सर्वात कमी खर्चाचा व बहुउपयोगी ठरला आहे. यामध्ये सोनाबाई यांनी सुचवलेली बंधाऱ्याची जागा मोठी जमेची बाजू ठरली. कोणाच्याही शेतीचे नुसकान न करता राबवला गेलेला हा उपक्रम सोनाबाईंचे निसर्गाविषयी असलेले ज्ञान व समज सिद्ध करते. या पाण्याचा वापर आता टोमॅटो, वांगी, मिरची, वाल, कांदा, कोबी अशी भाजीपाला पिके घेण्यासाठी व भात, भुईमुग यासारखी खरीप हंगामातील महत्वपूर्ण पिके घेण्यासाठी शेतकरी शेती करत आहे. सोनाबाई यांनी स्वतःच्या कल्पनेतून साकारलेले आजून एक कार्य म्हणजे आपल्या समूहातील महिलांना प्रेरित करून गावातील पहिली उपसा जलसिंचन योजना होय. या योजनेत सुमारे ६००-७०० मीटर अंतरावरून पाणी आणले व सुमारे १० कुटुंबाना उपयोगात आले आहे. या उपसा जलसिंचन योजनेमुळे या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले व त्यांना आता गाव सोडून बाहेरगावी मोल मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत नाही. त्यांनी पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात केली आहे. उपसा जलसिंचन योजनेमुळे त्यांना स्थायी रोजगार आपल्याच शेतात व गावात उपलब्ध झाला आहे. सुमारे ५०-६० हजार रु. निव्वळ उत्पादनात वाढ झाली आहे. सोनाबाईंच्या पुढाकाराने व प्रेरणेने समूहातील ५ महिलांच्या घरी सुधारित पद्धतीचा बायोगॅस बसविला गेला आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबाचे जळावू लाकूड फाटा गोळा करण्याचे व त्यासाठी होणारी पायपीठ कायमची थांबली आहे. स्वयम सहाय्यता समूहातील महिलांना हाताशी घेऊन त्यांनी प्रत्येकीचे किचन/ स्वयंपाक गृह सुंदर व सुलभ केले आहे. स्वयंपाकासाठी ओटा, धूर बाहेर जाण्यासाठी व सूर्यप्रकाश आत यावा यासाठी धुराडी व काचेचे कौल, पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे म्हणून जीवनड्रॉप चा वापर, फिल्टरचा वापर, भांडे ठेवण्यासाठी रॅकचा वापर, स्वयंपाक गृहात रात्री स्वयंपाक नीट करता यावा यासाठी सौरदिव्यांचा वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी दर्जेदार परसबाग लागवड व त्यातून सात्विक व पौष्टिक आहार प्रत्येक परिवाराला उपलब्ध करून देणे. भाजीपाला व फळझाडे लागवड, शास्वत शेतीसाठी गांडूळखत निर्मिती सुधारित पद्धतीने भात लागवड, शेतीच्या पाण्यासाठी विहीर खोदाई व नवीन विहिरींची निर्मिती, शेतीपुर्वक जोड धंदा, कुकुटपालन असे अनेक दिशादर्शक उपक्रम त्यांनी महिलांमार्फत आदिवासींच्या उन्नतीसाठी बायफच्या सहकार्याने राबवले आहे. निस्सीम समाजसेवा, प्रेमळ स्वभाव व जगाच्या कल्याणा असावे सादर! या उक्तीप्रमाणे सदैव्य समाजासाठी दिशादर्शक राहिलेल्या व नावाप्रमाणेच सोन्याप्रमाणेच आपल्या कार्यकौशल्याने चमकणाऱ्या सोनाबाईंना वंदन व भावी कार्यास शुभेच्छा. मध्यंतरी शेतात काम करतांना त्यांचे दोन्ही हात एका अपघातात मोडले होते. घरावर मोठे संकट आले होते त्यातून त्यांनी उमेद न हारता मात केली. व परत जोमाने कामाला लागल्या. आजही मोडलेल्या हाताने कामे करणे अवघड जाते. कारण दोन्ही हात मनगटातून मोडले होते. सोबत फोटो - rju ६p ७,८
Subscribe to:
Posts (Atom)