Friday, September 30, 2011










 पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या कास तलावानजीकच्या पठारावर रानफुले फुलण्यास प्रारंभ झाला आहे. या पठारावर पावसाळ्यानंतर साधारण सप्टेंबरमध्ये १५ ते २० दिवस रंगीबेरंगी रानफुले आढळतात. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे कासचे पठार फुलण्याला सुरवात झाली आहे. सातारा- कास या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पठारावर सध्या हा निसर्गाचा चमत्कार पाहावयास मिळतो. निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे. सध्या निळ्या, पांढऱ्या, गुलाबी रंगाच्या छटा असलेली फुले या परिसरात उमलू लागली आहेत. त्यापैकी निळ्या रंगांच्या फुलांचे प्रमाण अधिक, तर गुलाबी रंगांची फुले कमी प्रमाणात फुलली आहेत. रानफुलांमुळे अधूनमधून निळी आणि पांढरी छटा दिसते. तेरडा, पिंडा, गेंद, सीतेची आस, मिकी माऊस, आमरी, सोनटिकली, विंचवी, कंदील पुष्प आदी रानफुले आढळत आहेत. 

1 comment: