Tuesday, December 24, 2013
Friday, June 7, 2013
नगर जिल्ह्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भंडारदरा परिसरात तुरळक
पाऊस झाला आहे. धरणातील पाणी साठ्याने ही तळ गाठला असून मोठ्या पावसाची
येथील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यांनी शेतीच्या
मशागतीची कामे सुरु केली आहेत.तसेच या परिसारत काजव्याचा महोत्सव सुरु असून
तो पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. रात्रीच्या अंधारात
लाखोंच्या संखेने उडणारे काजवे पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. या परिसरातील
ही छायाचित्रे टिपली आहेत नगर सकाळचे छायाचित्रकार मंदार साबळे यांनी.
फोटो गॅलरी
|
Wednesday, June 5, 2013
लक्ष लक्ष काजवे...नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला आले
आहे...! आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात
'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट
सुरु आहे... आपण निशब्द...कल्पना करा... काय अदभूत देखावा दिसत असेल ना
हा..!
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो. आणि सूरही आहे. पण त्यांची भाषा अवगत नसल्याने हे सारे आपल्याला ऐकू येत नसावे. जणू काही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवनगाणे गाताहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातेय. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात स्वत:ला हरवून बसतो.
ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाश फुले मुक्त हस्ते उधळीत असल्याचा विचार मनात चमकून जातो. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदणं झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे, हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे पाहताना मग काळोखाची, हिंस्र स्वापदांची, सरपटणा-या प्राण्यांची मनाला एरवी वाटणारी भीती कुठल्या कुठे पळून गेलेली असते.
काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणार-या, बागडणा-या या 'अग्निसख्याला' दोन मोठे डोळे असतात. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरु होते. सुरुवातीला त्यांची संख्या नगण्य असते. म्हणजे पुढे जून महिन्याच्या मध्यापर्यंत तर त्यांच्या संख्येत भूमिती पद्धतीने वाढ होत प्रचंड मोठी भर पडते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. तेव्हा तर या भागातील या अनोख्या काजवा महोत्सवाचा तर ख-या अर्थाने 'क्लायमॅक्स' होतो!
अंडी, अळी, कोश असा जीवनप्रवास करणा-या काजव्याच्या अळीचे दोन आठवड्यांत प्रौढावस्थेत रुपांतर होते. काजवा निशाचर आहे. म्हणूनच तो रजनीसखाही आहे. जगभरात काजव्यांच्या जवळपास दोन हजार जाती आहेत. 'कोलिओऑप्टेरो' नावाच्या भुंग्याच्या कुळात काजव्यांचा समावेश केला जातो. अळीतून प्रौढावस्थेत जातो तेव्हा काजवा स्वयंप्रकाशी बनतो. त्यांची लांबी दोन ते अडीच सेंटीमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या किटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. तुलनेने माद्या काहीशा सुस्त असतात. मऊ, मृदुकाय खाद्य काजव्यांना आवडते किंवा चालते. तर बेडूक, कोळी यासह काही पक्ष्यांचे काजवे हे खाद्य आहे. निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराचे रंगांचे काजवे दिसून येतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा असे रंग काजवे उधळतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग ५१० ते ६७० नॅनोमीटर असतो.
मे-जून महिन्याचे हे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असल्याचे अभ्यासक सांगतात. आपल्या जोडी दाराला आकर्षित करण्यासाठी हा कीटक चमचम करीत असतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचे जीवनचक्र थांबते. काजव्यांची ही वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरुपाची वर्दी देतात, असे स्थानिक आदिवासी मानतात. मोसमी पाऊस दाखल झाला की, पुढे तो चांगलाच जोर धरतो, नंतर त्याचे रौद्र तांडव सुरु होते. या रपाट्या पावसामुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते... तशी ही मयसभादेखील संपून जाते. जगभरातल्या जीवशास्राच्या अभ्यासकांपेक्षा या काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी यांनाच जास्त भुरळ घातल्याचे दिसते. जेम्स रिल या सुप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकाने 'रात्रीच्या मातीत पेरलेल्या सोनबीया...' असे काजव्यांचे मोठे चपखल शब्दांत वर्णन केलेय. मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांनी काजव्याचा मंद प्रकाश उगीच सतावतोय, अशी लाडीक तक्रार एका कवितेत केलीय. 'अंधारच मज हवा, काजवा उगा दाखवतो दिवा' असे ते लिहून जातात. भंडारदरा परिसरातील रमणीय निसर्गातील अनोख्या जलोत्सवापूर्वीचा मनाला मोहिनी घालणारा काजवा महोत्सव आवर्जून पाहावा, एकदा तरी अनुभवावा असाच...

Wednesday, May 22, 2013
राजूर (वार्ताहर ) अकोले तालुका पर्यटन विकास व्हावा म्हणून
आमदार मधुकरराव पिचड प्रयत्नशील असून पर्यटन विकासासाठी त्यांनी आदिवासी
विकास विभगाकडून अकरा कोटी ला मंजुरी घेऊन निधीही प्राप्त करून गेटला आहे
त्यापैकी कळसुबाई व हरिचंद्र गडाच्या विजेसाठी दोन कोटींच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे .
महाराष्ट्राची शिखरस्वामिनी कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड
ही नगर जिल्हय़ातील दोन्ही पर्वतशिखरे लवकरच विजेच्या प्रकाशाने उजळून
निघणार आहेत. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या शिखरांच्या विद्युतीकरणास
नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. कळसुबाई हे सह्य़ाद्रीच्या
पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर. १ हजार ६१६ मीटर उंचीच्या या शिखराच्या
माथ्यावर कळसुबाईचे छोटेखानी मंदिर आहे. परिसरातील आदिवासींची ही देवी
श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविकांची येथे वर्दळ असते. नवरात्रीच्या नऊ
दिवसांत भक्तांच्या गर्दीने कळसुबाईचे शिखर फुलून जाते. शिखराची वाट अवघड
नसली तरी दमछाक करणारी आहे. वाटेवर जागोजागी पायऱ्या करण्यात आल्या असून,
काही ठिकाणी लोखंडी शिडय़ाही लावल्या आहेत. माथ्यावर पोहोचल्यानंतर तेथून
दिसणारे सृष्टिवैभव पाहून चित्तवृत्ती प्रसन्न होतात. वर्षभर गिरिप्रेमींना
हे शिखर साद घालत असते. शिखराच्या पायथ्याशी देवीचे एक मंदिर आहे. प्राचीन इतिहासाचा समृद्ध वारसा असणाऱ्या हरिश्चंद्रगडाला निसर्गप्रेमींच्या जीवनात आगळेवेगळे स्थान आहे. उंचच उंच पर्वतरांगा, त्यावरची डोंगरशिखरे, दोनअडीच हजार फूट उभा तुटलेला अंतर्वक्र कोकणकडा, संपन्न वन्यजीवन, प्राचीन कलेचा वारसा जोपासणारी लेणी, मंदिरे या सर्वामुळे या गडाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. योगी चांगदेवांनी आपल्या शिष्यांसह वर्षभर या गडावर वास्तव्य केले होते. त्याच काळात त्यांनी येथे 'तत्त्वसार' या ग्रंथाची रचना केली. गडावर अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेले हरिश्चंद्रश्वराचे मंदिर आहे. परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीला गडावर मोठी यात्रा भरते. या गडावर वर्षभर दुर्गप्रेमींची ये-जा असते. अनेक पर्यटक गडावर असणाऱ्या गुहांमध्ये मुक्काम करतात.
या दोन्ही पर्वतशिखरांवर वीज नेण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती. अकोले तालुक्यातील १० कोटी रुपयांच्या पर्यटनविषयक कामांना राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यात या दोन्ही गडांच्या विद्युतीकरणाच्या कामाचा समावेश आहे. १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून कळसुबाई शिखरावर वीज नेण्यात येणार आहे. तसेच येथे ७६ लाख रुपये खर्च करून भक्तनिवासही उभारण्यात येणार आहे. हरिश्चंद्रगडाच्या विद्युतीकरणासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच हे दोन्ही गड प्रकाशाने उजळून निघणार आहेत. गडावर वीज नेण्याच्या निर्णयाचे भाविक तसेच स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी पर्यावरणवाद्यांना ही बाब कितपत रुचेल याबद्दल साशंकता आहे.
Subscribe to:
Posts (Atom)