खंडूशेणफड दांडगे हे अंध जालना जिल्ह्यातील भोकरदन
तालुका व पारसशाहू राजा येथील राहणारे वृद्ध आपली पत्नी कौसाबाई शेण फड
हिला आपली आधाराची काठी बनवून गावोगावी फिरून भिक मागून आपली उपजीविका
चालवत आहे . दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात चितळ वेढा गावात ग्रामस्थांच्या भेटीला
ते येत असतात . अंध व अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही
बदललेला नाही.
त्यामुळे समाजाच्या मूळ प्रवाहात अपंग वंचित राहतात.मात्र येथील ग्रामस्थ
आपले संस्कार जपत या अंध खंडू व त्याच्या पत्नीला नातेवाईक समजून गोड जेवण देऊन
त्यांचा पाहुणचार करतात . गेली एक तपापासून या गावाच्या भेटीला मजल दरमजल
करीत ते येतात .
दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते. आयुष्य हे जर गाणं असेल, तर दृष्टी हा त्या गाण्याचा ताल आहे, ठेका आहे, ज्यांच्याशिवाय हे गाणं अतिशय उत्तम गायकाने गायलं असून सुध्दा बेचव व बेरंगी ठरू शकतं. काही व्यक्तींना ही भेट देण्यात निसर्गच कमी पडतो, तर काहींना ही शक्ती गंभीर अपघातामुळे, इजेमुळे किंवा आजारामुळे गमवावी लागते. आयुष्यामधील प्रत्येक क्षण ही त्यांच्यासाठी एक लढाई असते, ज्यात त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी बघण्याची सुध्दा संधी मिळत नाही. लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळताना, जी दहा मिनीटे आपण इतरांना पकडण्यासाठी केविलवाणी खटपट करतो, हेच त्यांच्यासाठीअख्ख आयुष्य असतं. आपण त्यांच्या दुःखाची खोली मोजू शकतच नाही, हे खरं असलं तरी अशा अनेक व्यक्ती व संख्या आहेत ज्या त्यांना हरप्रकारची मदत करण्यासाठी, व त्यांच्या आतला प्रकाश पुन्हा उजवण्यासाठी कार्यरत आहेत.तेच कार्य आध्यत्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे चितळ वेढा गाव करीत आहे मारुती अर्जुन आरोटे , सरपंच सागर आरोटे , सेवानिवृत्त शिक्षक उमाजी भा गवत गुरुजी ,रामनाथ आरोटे ,व ग्रामस्थ कार्य करतात . खंडू ला मुले सांभाळत नाही मात्र कौसाबाई त्यांची चांगली काळजी घेतात . दारिद्र्य रेषा खाली कार्ड नसल्याने कोणतीच सवलतत्यांना मिळत नाही घरी शेतीवाडी आहे, पण मुले करतात त्याचा या दोन वृद्धाना फायदा नाही . त्यामुळे मिळेल ती भिक पदरात पाडून आपले गुजराण करणारे खंडू व कौसाबाई आलिया भोगासी आसवे सादर म्हणून खुश आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला अर्पण केलेल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी, निवारा या गोष्टीला घटनात्मक महत्व दिले आहे. त्याला अनुसरुन राज्यकर्ते कामही करतात. घटनेचा उदार दृष्टीकोन ठेऊन सामाजिक कल्याणाच्या योजनेचा विस्तार करुन विविध लोकपयोगी योजना राबविल्या जातात.

No comments:
Post a Comment