डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला. पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match नाही झाला.... १ पर्याय संपला... मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये) दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं Beauty parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला. पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident मध्ये ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ... ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body) तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही) माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी जीवदान द्या.
हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!
Forwarded .... लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला. पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match नाही झाला.... १ पर्याय संपला... मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये) दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं Beauty parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला. पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident मध्ये ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ... ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body) तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही) माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी जीवदान द्या.
हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!
Forwarded ....
No comments:
Post a Comment