Sunday, October 30, 2011

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज

..१३८० च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरमधे पादुका स्थापन केल्या त्यानंतर शैल यात्रेचेसाधून ते कर्दळी वनात अदृश्य झालेह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनीत्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातूनकुर्हाड निसटली. ती वारूळावर पडलीकुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली  क्षणातच दिव्य प्रकाश पडूनउध्दवासमोर अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज... अबब !काय ते तेजस्वी रूप .त्यांच्या तेजाने सर्वत्र प्रभा फाकली होतीत्यांचे ते नेत्रदीपक रूप उद्धव पाहतच राहिला 
आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले  भय वाटू लागलेतो भीतीने थरथर कापूलागला . आपल्या हातून फार मोठा अपराध घडल्याने आता महाराज आपल्याला भस्म करतील अशी भीती त्याला वाटू लागली .क्षमायाचनेने हात जोडून उभा राहिला . परंतु महाराजांची प्रेमळ नजर पाहताच त्याची भीती क्षणात गेली त्याच्याकडे स्मित करुनस्वामी म्हणालेअसा घाबरू नकोस तू तर फक्त एक निमित्तमात्र आहेस जगाच्या उद्धारासाठी आम्हाला अवतार घ्यायचाच होता.तुझे कल्याण होईल . त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आलेत्यानंतर मंगळवेढे नामक गावासस्वामींनी काही काळ वास्तव्य केले  तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळयावेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला. तेथल्या बावीसवर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमानअसे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केलेप्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखीलभक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत  अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार आहेत . भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनीदर्शन दिले आहेकोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले. तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणालाभगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशीआहे.'' असे अभिवचन त्यांनी दिले . आणि आजही ते आपल्या भक्तांसाठी 
संकटाच्या वेळी धावून येतात . आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातात . त्यांच्या चमत्करांचे आजही लोक अनुभव घेतात . 
त्यांच्या भक्तिमधे असेच मन एकाग्र व्हावे आणि रममाण व्हावे हीच स्वामिंच्या चरणी प्रार्थना .
  

Thursday, October 27, 2011

मातीच्या पणतीचे आनंदगाणे...

दिवाळीत केवळ मातीची पणती उजळायची नसते; आत्मदीप चेतवून ज्ञानाचा, प्रेमाचा प्रकाश प्रत्येक हृदयात पसरवायचा असतो. प्रत्येक चेहऱ्यावर प्रफुल्ल हास्य फुलवायचे असते. समाजाच्या समृद्धतेसाठी प्रार्थना करून कृतज्ञतेचा दीप लावायचा असतो. 

आजी म्हणायची, "पुता, मातीचा दिवा हो, कापसाची वात हो.'' त्या न कळत्या वयात आजीचा हा आशीर्वाद विचित्र वाटायचा. मोठ्ठा बालिष्टर हो, असा आशीर्वाद देण्याऐवजी आजीचा हा काय आचरटपणा, असंही वाटायचं. आणि कळू लागलं तेव्हापासून आजीचा आशीर्वाद कधी पूर्णतः खरा करता येईल, याचा विचार करीत त्या दिशेने धडपड करतो आहे. पणतीमधील वात तेवण्यासाठी वात तेलात बुडालेली असावी लागते आणि त्याच वेळी तिचं एक टोक बाहेरही असावं लागतं. ती वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकत नाही. जीवन हे दिव्याच्या वातीप्रमाणे आहे. तुम्हाला या जगात राहावं लागतं, तरीही त्यापासून अलिप्त राहावं लागतं. तुम्ही जगातील भौतिक गोष्टींमध्येच बुडून गेलात तर तुमच्या जीवनात आनंद आणि ज्ञान येऊ शकणार नाही. याच जगात राहूनसुद्धा भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवू शकला तर आनंद आणि ज्ञानरूपी प्रकाश पडेल. मोठी कसरत आहे खरी, पण या दिवाळीनिमित्त त्या दिशेने आणखी एक पाऊल टाकायला हवं. दिवाळी हा अशा प्रकारे निर्माण झालेल्या ज्ञानप्रकाशाचा उत्सव आहे. तो चांगल्याने वाईटावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव आहे. प्रकाशाने अंधारावर आणि ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेल्या विजयाचा उत्सव आहे. या दिवशी दीपओळी उजळल्या जातात, त्या फक्त घराच्या सजावटीसाठी नव्हे, तर जीवनाबद्दलचे हे सत्य सांगण्यासाठीच. आपणच व्हायचे दीप-वात आणि ज्ञानाचा, प्रेमाचा प्रकाश प्रत्येक हृदयात पसरवायचा आणि प्रत्येक चेहऱ्यावर प्रफुल्ल हास्य चेतवायचे.

सण हा काळानुसार बदलत असतो. त्याचा अर्थ बदलत असतो. परंपरेतील एक धागा पुढच्या "क्षणां'ना आधुनिक करीत जातो. वैदिक काळात सणाला "क्षण', तर उत्सवाला "समन' म्हणत असत. पहिल्यापासूनच दीपावली हा सर्व "क्षणां'चा राजा आहे. धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या हा सण अतिशय महत्त्वाचा. इसवी सनाच्या उदयालाही हा सण साजरा होत होता. इ. स. 50 ते 400 च्या सुमारास कामसूत्रामध्ये वात्स्यायनाने "यक्षयामी' उत्सवाचा उल्लेख केला आहे. हा उत्सव "दीपालिका' म्हणजे दीपावलीचाच मानला जात असे. हर्षाने इ. स. 676 मध्ये लिहिलेल्या "नागानंद' नाटकात "दीपप्रतिपद-उत्सव' वर्णिला आहे. काश्‍मीरमधील "नीलमत पुराण' या ग्रंथात (इ. स. 500 ते 800) दीपमाला उत्सव कसा पाळावा, हे सांगितलं आहे. सोमदेव सूर्य या जैन ग्रंथकाराने आपल्या "यशस्तिलकचंपू' या गद्यकाव्यात मालखेडच्या राष्ट्रकूट राजाच्या काळातील दीपावली उत्सवाचे, तसेच अल्‌ बेरुणी या विदेशी प्रवाशाने इ. स. 1030 मध्ये भारतात होणाऱ्या दिवाळी सणाचे सविस्तर वर्णन केले आहे. आद्य मराठी (इ. स. 1293) "रुक्‍मिणी सैंवर'मध्ये विदर्भातील दीपावलीचं वर्णन केलं आहे. या प्रत्येक काळात एक सूत्र कायम राहिलं, ते म्हणजे प्रेमाच्या प्रकाशाने सारी हृदयं उजळायची.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा हेच दर्शवतो. काही लोकांमध्ये सहनशक्ती असते, तर काहींमध्ये प्रेम, शक्ती, उदारता असते; तर काही जणांमध्ये लोकांना एकत्र करण्याची क्षमता असते. तुमच्यातील सुप्त गुण एखाद्या पणतीसारखे असतात. तुमच्या मनात ज्ञानाची पणती चेतवून ज्ञान मिळवलं तर तुमची सर्व अंगांनी प्रगती होते. वर्तमान जगात हे ज्ञानदीप जेवढे लावाल तेवढे तुम्ही अधिक उजळून निघता. हे उजळून जाणं म्हणजे नवचैतन्याचा अनुभव घेणं. दिवाळी म्हणजे वर्तमान क्षणात राहणं. त्यामुळे भूतकाळातील सर्व दु:खदायक गोष्टी आणि भविष्याबद्दलच्या सर्व काळज्या विसरून वर्तमानात राहा. सध्याच्या ताणतणावाखाली आपण स्वतःलाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वतःलाही पाहून घ्या. केवळ पैसा महत्त्वाचा नाही, त्यासाठी कोणत्याही सिग्नलना न जुमानता सुसाटत जाणं हे अयोग्य होय. आपण कुणाशी व का स्पर्धा करतोय? या दिवाळीच्या प्रकाशात तेही दिसतं का पाहा.

भेटवस्तू आणि मिठाई यांची देवाणघेवाण हीसुद्धा एक सांकेतिक गोष्ट आहे. भूतकाळातील सर्व कटुता विसरून यापुढील काळासाठी नव्याने मैत्रीचा हात पुढं करणं, असा त्याचा अर्थ आहे. कोणताही उत्सव सेवावृत्तीशिवाय अपूर्ण आहे. आपल्याला जे मिळालं आहे, ते आपण दुसऱ्यांनाही वाटलं पाहिजे. कारण, देण्यानेच आपल्याला मिळतं आणि तोच खरा उत्सव. उत्सवाचा आणखी एक अर्थ असा, की सर्व मतभेद विसरून आत्म्याच्या तेजावर तळपणं. समाजातील प्रत्येकाने सुज्ञ व्हायला हवं. तसेच, आनंद आणि सुज्ञपणा सगळीकडे पसरवायला हवा आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा सर्व जण एकत्र येतील, ज्ञानात राहून उत्सव साजरा करतील.

वात होऊन एक टोक बुडण्यापासून सांभाळत स्वतःला उजळून घेण्याचा अर्थ तर कळला, पण आजी आणखी एक सांगायची," मातीचा दिवा हो'. म्हणजे काय? आपण दिवाळीमध्ये जो दिवा लावतो तो मातीचा असतो. मग त्यामध्ये आपण वात लावून, थोडं तेल टाकून मग दिवा लावतो. या मातीच्या दिव्यामागे, वातीमागे आणि तेलामागे आध्यात्मिक कारण आहे. मातीचा दिवा (पणती) प्रतीक आहे या शरीराचं. आपलं शरीर बनलं आहे मातीपासून. वात ही जशी पणतीमध्ये असते, पण तरीही पणतीपासून वेगळी, त्याचप्रमाणे आत्मा या शरीरामध्येच असतो, पण तरीही शरीरापासून वेगळा; पण त्या वातीवर तो दिवा लावायलासुद्धा तेल हे लागतंच. आणि हे तेल आहे ज्ञानाचं प्रतीक. जेव्हा तेल नसतं तेव्हा ज्योत लागू शकत नाही आणि प्रकाश पडू शकत नाही. आज बहुतांशी लोकांना हे ज्ञानरूपी तेल न मिळाल्याने बहुतांशी व्यवहार अंधकारातच होतात आणि म्हणूनच आजकाल आपण आपल्या संबंधांमध्ये दुःख उपभोगतो. तुमच्या हृदयात प्रेमाचा दीप, घरात समृद्धीचा, मनात करुणेचा, तसेच अज्ञानाचा अंधकार घालवण्यासाठी ज्ञानाचा दीप चेतवा आणि जे जे भरभरून मिळालं आहे, त्या समृद्धतेबद्दलच्या कृतज्ञतेचा दीप चेतवा.