Friday, March 27, 2015
Wednesday, March 4, 2015
खंडूशेणफड दांडगे हे अंध जालना जिल्ह्यातील भोकरदन
तालुका व पारसशाहू राजा येथील राहणारे वृद्ध आपली पत्नी कौसाबाई शेण फड
हिला आपली आधाराची काठी बनवून गावोगावी फिरून भिक मागून आपली उपजीविका
चालवत आहे . दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात चितळ वेढा गावात ग्रामस्थांच्या भेटीला
ते येत असतात . अंध व अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही
बदललेला नाही.
त्यामुळे समाजाच्या मूळ प्रवाहात अपंग वंचित राहतात.मात्र येथील ग्रामस्थ
आपले संस्कार जपत या अंध खंडू व त्याच्या पत्नीला नातेवाईक समजून गोड जेवण देऊन
त्यांचा पाहुणचार करतात . गेली एक तपापासून या गावाच्या भेटीला मजल दरमजल
करीत ते येतात .
दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते. आयुष्य हे जर गाणं असेल, तर दृष्टी हा त्या गाण्याचा ताल आहे, ठेका आहे, ज्यांच्याशिवाय हे गाणं अतिशय उत्तम गायकाने गायलं असून सुध्दा बेचव व बेरंगी ठरू शकतं. काही व्यक्तींना ही भेट देण्यात निसर्गच कमी पडतो, तर काहींना ही शक्ती गंभीर अपघातामुळे, इजेमुळे किंवा आजारामुळे गमवावी लागते. आयुष्यामधील प्रत्येक क्षण ही त्यांच्यासाठी एक लढाई असते, ज्यात त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी बघण्याची सुध्दा संधी मिळत नाही. लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळताना, जी दहा मिनीटे आपण इतरांना पकडण्यासाठी केविलवाणी खटपट करतो, हेच त्यांच्यासाठीअख्ख आयुष्य असतं. आपण त्यांच्या दुःखाची खोली मोजू शकतच नाही, हे खरं असलं तरी अशा अनेक व्यक्ती व संख्या आहेत ज्या त्यांना हरप्रकारची मदत करण्यासाठी, व त्यांच्या आतला प्रकाश पुन्हा उजवण्यासाठी कार्यरत आहेत.तेच कार्य आध्यत्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे चितळ वेढा गाव करीत आहे मारुती अर्जुन आरोटे , सरपंच सागर आरोटे , सेवानिवृत्त शिक्षक उमाजी भा गवत गुरुजी ,रामनाथ आरोटे ,व ग्रामस्थ कार्य करतात . खंडू ला मुले सांभाळत नाही मात्र कौसाबाई त्यांची चांगली काळजी घेतात . दारिद्र्य रेषा खाली कार्ड नसल्याने कोणतीच सवलतत्यांना मिळत नाही घरी शेतीवाडी आहे, पण मुले करतात त्याचा या दोन वृद्धाना फायदा नाही . त्यामुळे मिळेल ती भिक पदरात पाडून आपले गुजराण करणारे खंडू व कौसाबाई आलिया भोगासी आसवे सादर म्हणून खुश आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला अर्पण केलेल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी, निवारा या गोष्टीला घटनात्मक महत्व दिले आहे. त्याला अनुसरुन राज्यकर्ते कामही करतात. घटनेचा उदार दृष्टीकोन ठेऊन सामाजिक कल्याणाच्या योजनेचा विस्तार करुन विविध लोकपयोगी योजना राबविल्या जातात.

Sunday, January 18, 2015
Saturday, August 2, 2014
Friday, April 18, 2014
अकोले ,ता . १८: महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची कुलदेवता व पंढरी
असलेल्या " येडूबाई देवी " च्या जत्रेत लाखो भिल्ल समाज बांधव व भाविकांनी
दर्शन घेतले तर नवसपूर्ती म्हणून कोंबड्या व हजारो बकरांची आहुती देण्यात
आली . यावेळी देवीचा जयजयकार करत अंगावर असूड मारत , कापूर जाळत , लोटांगण
घेत भिल्ल समाजाने गडावर जाऊन एकच जल्लोष केला .महाराष्ट्रातील भिल्ल
समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुखं ,सवांद ,लग्न कार्य
,न्यायनिवाडा यासाठी भिल्ल बांधव आपला मुक्काम वाढवतात यात्रेचे वैशिष्टे म्हणजे एकमेकांना
जगायला बळ व उर्जा मिळते अखिल भिल्ल समाजाचे आराध्यदैवत असल्याने वर्षभरात
इथल्या जत्रेला हजेरी लावली नाही असा भिल्ल बांधव विरळच अकोले येथील अगस्ती
आश्रमात भरणाऱ्या यात्रला होणाऱ्या गर्दी इतकीच गर्दी इथे पाहायला मिळते एरवी शांत ,
निवांत अंधाराच्या कुशीत पहुडलेले मुळा खोरे यात्रेच्या निमित्ताने चार सहा
दिवस सारखे जागते राहते .महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून लोक इथे येतात
अकोले तालुक्यातील पिपंळ दरीच्या येडूबाई गडाचा परिसर ,महाराष्ट्र भरातून हजारोच्या संख्येनी जमलेले भिल्ल बांधव त्यांच्या शेतांमध्ये पडलेल्या राहुट्या जागा मिळावी म्हणून ३ दिवस अगोदरच आलेले त्यांचे सर्व कुटुंब व जत्रेत नवस पुरती साठी गडाच्या खाली असलेल्या " वाघाई व गाडीवान "या देवतासमान असणाऱ्या मंदिरासमोर एक हजारपेक्षा अधिक मुलांनीमार्फत (मुस्लिम समाजाचे लोक )बकारांची देण्यात आलेली आहुती ,निघालेली पारंपारिक वाद्य डफ , हलगीच्या निनादात व तालावर म्हटली जाणारी पारंपारिक देवीची महती सागणारे खड्या आवाजात म्हटली जाणारी पारंपारिक" गवने "हजारोच्या संख्येने निघालेल्या काठ्या , व त्यासोबत देवीचा गडावर चालवलेला नैवैध्य , त्याच वेळी ४० एकरपरिसरात तीन दगडावर पेटवलेल्या चुली व त्यावर शिजणारे मटन हे दृश्य म्हणजे भिल्ल समाजाची येडूबाई विषयी असलेली श्रद्धा व त्याला अहुतीची असणारी काळी किनार असे दृश्य पाहायला मिळाले . अकोल्यापासून ३२ किलोमीटर वर असणारे पिपंऴदरी गाव तिथे गडावर येडूबाई चे १८५० पासूनचे सर्वे नंबर ५८ मध्ये मंदिर आहे . या मंदिराची दर चैत्र पोर्णिमे च्या दुसर्या दिवशी येथे जत्रा व यात्रा भरते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे ४ वाजता नानासाहेब रंधे यांच्या हस्ते देवीला अभिषेक करून होते. सकाळी ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर ८. ३० ला मुकुट ,चोळी , पातळ व अलंकार मांडव डहाळ्या व पारंपारिक वाद्याच्या गजरात गडावर जाऊन देवीला पोशाख नेसविला जातो . दुपारी २ वाजता गोंधळ व देवीच्या आरती व गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी ४ वाजता देवीची काठी निघते त्याला देवीचा छबिना म्हणतात या काठीची मिरवणूक पिंपऴ दरी गावातून निघते यावेळी वाद्य वाजवून काठी नाचवली जाते तर नवसपूर्ती साठी अंगावर असूड मारणे , गडापर्यंत लोटांगण घालणे , देवीचे अंगात येउन गडावर हाई। हाई करीत गडावर धावत जाने आदी परंपरा भिल्ल समाज जपतो तर मुलाचा नवस असेल तर यावेळी नवसपूर्ती करण्यात येते तीन दिवस भिल्ल समाज देवीच्या ओव्या व गीते म्हणतात त्यामुळे भक्तिमय वातावरण तयार होते . सायंकाळी ५ वाजता छबिना च्या काठ्या मंदिराच्या कळसाला लागल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरवात होते कोंबड्या बोकड घेऊन भक्त व नवसपूर्ती वाले वाघाई व गाडीवान या दिशेने जाऊन तिथे नवसपूर्ती फेडण्यासाठी सुमारे एक हजार बोकडांची व कोंबड्यांची आहुती दिली गेली . यावेळी बकराच्या ओरडण्याचा आवाज आसमंतात गेला हे पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते . त्यानंतर भिल्ल समाजाच्या चुली पेटल्या व यावेळी तमाश्या कलावंतानी हजेरी लाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले . या येडूबाई मंदिराच्या बाबत भिल्ल समाज व ग्रामस्थ यांच्यात मतभेद आहे . गडावर शासनाने पायऱ्या ,वीज द्यावी हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे अशी मागणी दिलीप बर्डे व सुभाष पवार यांचे मत आहे मात्र शासन याबाबीकडे दुर्लक्ष्य करीत आहे गडाची जागा वनक्षेत्रात येत असून ती मंदिराल देऊन कायमस्वरूपी तिचा विकास व्हावा असेही भिल्ल समाजाचे पुढारी म्हणतात . देवस्थानचे विश्वस्थ रामदास पंधे बाबा यांनी मंदिर उभारणीसाठी व सोयी सुविधांसाठी सरकार व समाज यांनी मदत करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे . तर सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला खरात , जनाभाऊ जाधव , सखुबाई जाधव यांनी हजार बकरे व कोंबड्यांचा बळी देण्याऐवजी हा नवस फेडताना बकरे सोडून त्याचा लिलाव करून ती रक्कम देवस्थान विकास व भिल्ल समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिल्यास हत्या होणार नाही . व सामाजिक काम होईल . मात्र भिल्ल समाजाचे दिलीप बर्डे चंदू बर्डे यांनी हि प्रथा बंद होणार नाही आम्ही देवीला बळी देत नाही भिल्ल समाज वाघाई व गाडीवानला बोकड देऊन जल्लोष करतात . देवीला भाजी भाकरीचा नैवद्य दिला जातो याबाबत कुणीही अडचण अणु नये व आमच्या धार्मिक भावना बिघडू नये असे भिल्ल समाजाचे म्हणणे आहे . सोबत फोटो - akl18p1 akl18p2 akl18p3 akl18p4

Thursday, April 17, 2014

Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)