| |
|
पावसाळी पर्यटन
|
|
|
घाटघर : महाराष्ट्राचे चेरांपुंजी! शांताराम काळे सह्यद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं.
|
|
|
पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सह्यद्रीच्या रांगा म्हणजेच बालाघाट. राकट कातळाच्या पिंगट करडय़ा रंगाची ही डोंगररांग.. ऋतुमानाप्रमाणेच तिचं सौंदर्यही बदलत जातं. कधी काळी थंड हवेची ठिकाणं म्हणून पर्यटक इथं भ्रमंती करायचे. आता पावसाळी पर्यटनाची टूमही जोरात आहे. सह्यद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या डोंगररांगा इथल्या जंगलात वाढलेल्या करवंदं, जांभळाच्या जाळ्यांमुळे सुरुवातीला पाचूच्या मण्यांची माळ, उन्हाळ्याच्या मध्यावर तांबूस पोवळ्यासारख्या तर पिकल्यानंतर नीलम रत्नांच्या माळा ल्यायल्यासारख्या दिसतात. सरता ग्रीष्म आणि वर्षां ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके या झाडांवर वास्तव्याला असतात. काजव्यांच्या गुणन पद्धतीने होणाऱ्या प्रजननामुळे काही दिवसांतच झाडांवर जणू अंतराळातील नक्षत्रांचे संमेलन भरल्याचा भास होतो. खरं तर लवकरच येणाऱ्या कृष्ण जलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देत असतात. पावसाला सुरुवात होताच त्यांचं अस्तित्व लुप्त होतं. वर्षां ऋतूला सुरुवात झाली की, इथल्या करडय़ा कातळाचा रंगही बदलू लागतो. संबंध डोंगरावर हिरवाईची शाल पसरायला लागते. जसजसं पावसाचं प्रमाण वाढतं, तसतसं या पर्वतरांगांचं सौंदर्य खुलायला लागतं. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उत्तुंग शिखरांवर विसावतात. पर्वताच्या उतरंडीवर रेंगाळतात. ‘गडद निळे-गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू, चपल चरण, अनिल गण निघाले’ या बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती स्मरतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघराजाची दुलई बाजूला होताच डोंगरांच्या घळईतून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे नजरेस पडतात. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा हे धरण नगरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पुणे-ठाणे जिल्हय़ातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवसीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण. भंडारदराच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते. भंडारदरा (शेंडी), पांजरी, साम्रद, घाटघर, रतनवाडी, मुतखेल ही निर्सगरम्य पर्वतराजीतील दुर्गम गावे अगदी अलीकडच्या दशकात या भागात डांबरी रस्ते झाल्याने पर्यटकांचे पाय इकडे वळू लागले. नागमोडी वळणांच्या घाटदार रस्त्याने जसजसा या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या डोंगरकडय़ांवरून घरंगळणारे मेघ, संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नांमधील गावा.. अशा ओळी ओठांवर तरळतात. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे. धरणांपासून साधारण २० किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरी नावाचे छोटेखानी गाव इथून कळसूबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखराची चढाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून करता येते. मांजरीहून पुढे घाटघरकडे जाता येते. पांजरी, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात. एकदा पाऊस सुरू झाला की, चार ते सहा दिवस अविश्रांत कोसळणं ठरलेलंच. घाटघरच्या कोकणकडय़ांवर उभे राहून खाली डोकावले की, खोल दरीतला उदंचन विद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा, वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्यांचा मंजुळ नाद पर्यटकांना भुरळ पाडतो. कोकणकडय़ाच्या बाजूलाच असलेल्या आश्रमशाळेच्या भिंतीही हिरवळीने रंगविल्यासारख्या दिसतात. घाटघरच्या घाटणदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यंत रमणीय असतो.
भंडारदरा धरण भरलं की, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल.
घाटघरकडून साम्रदमार्गे रतनवाडीकडे जाताना साधारण १ किलोमीटर आडवाटेला सांदण लागते. या सांदणीची रुंदी साधारण ५० फूट असून रतनगड डोंगरातून येणारा ओढा या सांदणीतून वाहतो. या सांदणीतील मोठमोठय़ा शिळा साहसी पर्यटकांना साद घालत असतात. अर्थात पावसाळ्यात या सांदणीत उतरणं धोक्याचंच आहे. उन्हाळ्यात या सांदणीतून भ्रमंती करण्यातली मजाच वेगळी.. या सांदणीची लांबी सुमारे पाऊण ते एक किलोमीटर असून, दोन कडय़ांमधील ही उतरंड थेट ठाणे जिल्हय़ातील शहापूर तालुक्यात उघडते. साम्रद ते रतनवाडीच्या प्रवासात डोंगरमाथ्यावरून कोसळणारे अनेक धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. रतनवाडीच्या अलीकडेच एक धबधबा दूरवरून दिसतो. डोंगराच्या माथ्यावर दिसणारा हा धबधबा एका खडकाच्या दोन्ही बाजूने कोसळत पुन्हा एकत्र होतो. जणू निसर्गाने त्याच्या शोरूममध्ये लावलेलं ते एक नेकलेस असतं, धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्याचा येथे बराच वावर राहिल्याने इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नावे दिल्याचे दिसून येते. या भागात दिसणाऱ्या अनेक धबधब्यांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो, तर काही धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच असतात. त्यामुळे तिथे पर्यटकांचे पाय नक्कीच थबकतात. बालाघाट डोंगररांगांत कोकणकडय़ांच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे. गड सर करताना ट्रेकिंगचाही आनंद मिळतो. मात्र पावसाळ्यात चढणीच्या सर्व वाटा अत्यंत निसरडय़ा होतात. दोन तासांच्या चढाईनंतर शेवटच्या कडय़ांवरच्या शिडीचा आधार घेत गडावर पोहोचता येते. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे. भंडारदरा धरण भरलं की, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल. रतनगड डोंगराच्या पायथ्याशी एक जुनाट हेमाडपंथी शिवालय आहे. भंडारदऱ्याच्या जलाशयाच्या शेपटाकडचा हा भाग. येथे धरण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो. भंडारदरा धरणाच्या भिंतीपासून इथपर्यंतचं अंतर ११ मैलांचं. धरण पूर्ण भरलं की होडीतूनही येथे येता येते. रतनगडच्या अमृतेश्वराचे (रत्नेश्वर) हे हेमाडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वदंता आहे. मंदिराच्या आतील काम आणि आजूबाजूची कोरीव शिल्पे पाहण्यासारखी आहेत. छतालाही कोरीव शिल्पांची सजावट आहे. मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अलीकडे दगडी बांधकामांची देखणी पुष्करणी आहे. विष्णुपुष्करणी नावाच्या या पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या आतल्या बाजूच्या भिंतीतील कोनाडय़ावजा गाभाऱ्यात विष्णू नरसिंह, गणपती आदी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पुष्करणीच्याच एका बाजूला असलेल्या झाडांना विळखा घालून काही वेली वाढल्या आहेत. त्या वेलींच्या फांद्या एकमेकांशी बिलगून नैसर्गिक झुले तयार झाली आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही या झुल्यांवर बसून झुलण्याचा मोह आवरता येत नाही. रतनवाडी ते मुतखेलमार्गे पुन्हा धरणाच्या भिंतीपाशी पोहोचता येते. या ठिकाणी आपली धरण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रवासात मुतखेलजवळच्या डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे पायथ्याशी न पोहोचताच वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना रोखून तर धरतातच आणि अंगावर येणारे तुषार मन रोमांचित करतात. या नागमोडी वळणांच्या प्रवासात काही ठिकाणी एकमेकांना बिलगून उभी असलेली कौलारू घरं इथल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवितात. डोंगरउतरणीवर भातआवणीसाठी केलेल्या अर्धगोल, चौकोनी खाचरांमध्ये साठलेल्या पाण्यात निसर्ग जणू आपलं प्रतिबिंबच न्याहाळत असल्याचा भास होतो. अनेक शेतांतून भातशेतीसाठी घोटाभर पाण्यात मशागत चाललेली दिसते, तर कोठे इरलं अंगावर घेऊन बायाबापडय़ा भातआवणी करीत असतात. अनेक ठिकाणी वीतभर वाढलेली भाताची पिकं जमिनीवर अंथरलेल्या हिरव्याकंच मखमली गालिच्यासारखी दिसतात, वाऱ्याच्या झुळकावर लवलवणारे हे गालिचे पाहताना मनपाखरूही आपल्या नकळत विहरायला लागते.. भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० कि.मी. अंतरावर रंधा फॉल या मोठय़ा धबधब्याचे दर्शन घडायचे, मात्र आता कोंदणी विद्युत प्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा लुप्त झाला आहे. अतिवृष्टीनंतर अथवा धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गानंतर महाराष्ट्राचा हा गिरसप्पा आपलं अक्राळविक्राळ रूप घेऊन प्रकटतो. हा धबधबा पाहायला मिळणं म्हणजे या भागातील पर्यटनातला अलभ्य लाभच. भंडारदरा धरण भरलं की, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल. या धबधब्याजवळ एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषार स्नान घेता येते. इथंही इंग्रजांच्या रसिक कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. अंब्रेला फॉल पाहण्यासाठी धरण भरण्याची वाट पाहावी लागते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टनंतर अंब्रेला फॉल काही महिने पाहता येतो. रंधा फॉल, अंब्रेला फॉल, कळसूबाई शिखर दर्शन, घाटघर उदंचन विद्युत प्रकल्प रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर अशी एकदिवसीय भंडारदरा परिक्रमा करता येते. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. भंडारदरा परिसरात निवांत भटकंती करायची म्हटले की, पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो. पर्वतरांगेतील अलंग, कुलंग, मदनगडसह हरिश्चंद्रगड, विश्रामगड या गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्टय़पूर्ण गावंही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर फोकसंडी हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा) मार्गे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते. फोकसंडीतून थेट माळशेज घाटात पोहोचण्यासाठीही आता रस्ता झाला आहे. जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड. अकोले, समशेरपूर, खिरविरे फाटामार्गे विश्रामगडावर जाता येते. तीरपाडे पाचपट्टा पठारावरील पवन ऊर्जा प्रकल्प पाहण्यासारखा आहे. डोंगरपठारावरील ८० ते ८५ पंखे भिरभिरतानाचे दृश्य विलोभनीय असते. या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजीमार्गे कुमशेतसारख्या दुर्गम आदिवासी भागाला भेट देणे आता सहजशक्य आहे. कळसूबाई, कुलंगगड, रतनगड, आजोबाचा डोंगर या सर्व शिखरांतील शेवटचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाने नुकतीच ३५० वर्षे पूर्ण केली. अत्यंत अवघड चढणीचे हे शिखर ठाणे, पुणे आणि नगर जिल्हय़ातून या गडाकडे जाता येते. नगर जिल्हय़ातील कोतुळ, शिरपुंजी, पाचनईमार्गे हरिश्चंद्रगडाकडे जाता येते. या गडाचे पौराणिक महत्त्वही मोठे आहे. हरिश्चंद्रगडालगतच तारामती, रोहिदास ही शिखरे पाहायला मिळतात. साहसी गिरिभ्रमणाबरोबरच वन्यजीव दर्शनही अनुभवता येते. निबिड जंगल, उंच डोंगर, खोल दऱ्या, मुळा नदीचे पात्र अशा वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी. उंबर, जांभूळ, कारवी, पांगारा, मोहाची झाडे अशा वृक्षवल्लरी तर कोल्हा, साळुंदी, बिबटय़ा, रानडुक्कर, विविध प्रकारचे साप, सरडे असे वनचर आणि सातभाई, भारद्वाज, बुलबुल, कोकिळा, खंडय़ा, वेडा राघू आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात. हिवाळ्यातही या परिसराचं रूपडं अवर्णनीय असतं. अनेक प्रकारच्या रानफुलांनी इथले डोंगर पायथे सजतात. नवरात्रीदरम्यान ही फुले जणू रंगोत्सव साजरा करतात. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. या व्यतिरिक्त इतरही फुलांमुळे सर्व खोरे हिमाचल प्रदेशातल्या फ्लॉवर्स व्हॅलीचे प्रतिबिंब दर्शवितात. सह्यपर्वताच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत. खासगी लॉजपासून ते महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासकीय विश्रामगृहाचे आरक्षण एक आठवडाभर अगोदर इंटरनेटच्या माध्यमातूनही करता येते. उन्हाळ्यात गिरिभ्रमण, उन्हाळा-पावसाळ्याच्या संधिऋतूत काजवा महोत्सव, पावसाळी पर्यटन आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे वर्षभर पर्यटन करण्यासारखा हा परिसर. कधी काळी दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गावे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा सरावाच्या व्हायला लागल्या आहेत. घाटदार, नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वनराई, हिरडा, तेरडा, करवंद, जांभूळ इतर आयुर्वेदिक वनस्पतींबरोबरच काही प्रमाणातील तेंदूपत्ताच्या वनराईने हा परिसर नटला आहे. या वनराईच्या कमानीतून प्रवास करताना निबिड अरण्यभ्रमंतीचा आनंद मिळतो. मात्र इतर पर्यटनस्थळी बाजारपेठांमुळे आलेला बकालपणा इथे नाही. स्वच्छ पर्यटनामुळे इथे अनट्च्ड नेचर इथं अनुभवता येतं. अर्थात इथलं पर्यावरण, स्वच्छता या बाबी जपणं पर्यटकांच्याच हाती आहे. कळ्या हिरव्या नीपांच्या काही उमलल्या पहा सजवती नदीच्या केशरी तीरांना अनलाने भक्षिल्या वनांना गंध भूमीचा नेतील सारंग माग्रे जीवन वर्षण्याच्या चराचर ज्याची आतुरतेनं वाट पाहात होती, तो यक्षाचा दूत असलेला मेघ अखेर बरसला. वृक्षवल्ली ताज्या हिरवेपणानं बहरल्या, तृणांचे कोंब धरित्रीच्या कुशीतून मेघमल्हाराची तान, शिरकमलं उंच करून पाहू-ऐकू लागली, गिरिकंदरांच्या अंगा-खांद्यावरून फेनधवल धारा प्रपातांच्या रूपानं बरसू लागल्या. साहजिकच भटक्यांची पावलं सह्यकडय़ांचा वेध घेण्यास सज्ज झाली. प्रपातांमध्ये भिजताना त्यांचे अंगांग थरकून गेले आणि कृषिकांची धांदल उडाली. मेघवर्षांवाचा आनंदच काही और असतो. सह्यगिरीला साज रानफुलांचा! दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला परिसर अशी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट या भागांची आजवरची ओळख आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव.. तो संपतो न संपतो, तोच सुरू होणारा जलोत्सव.. आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसूबाई- हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे. फुलांची ही दुनियाच अद्भुत अशी आहे. किती किती फुले? त्यांच्या तऱ्हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना.. प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्टय़. काही रात्री फुलतात तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली.. काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकपक्षी! पिवळीधमक सोनकी तर आठ-पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वष्रे मुक्यानेच काढते अन् सप्तपदी भरली की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते. कारवीची फुले निळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसू लागते. कारवीच्या या रंग आविष्कारला सुरुवात झाली की, स्थानिक आदिवासी ‘नीळ आली, नीळ आली’ असे म्हणू लागतात. shantaram.kale@expressindia.com |
|
|
| |
No comments:
Post a Comment