Friday, July 30, 2021

धुक्यात हरवली घाटघर गाव

अकोले ता. ३१: मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या 'आज्या' पर्वताच्या पायथ्याशी निसर्गसंपदाने नटलेले कुमशेत" हे टुमदार गाव वसले आहे. गावठाण, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी, अशा सहा वाड्यांचे कुमशेत. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, जमीन खडकाळ असल्याने सगळे पाणी वाहून जायचे. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात गावासाठी टँकर ठरलेला नि रोजगारासाठी दाही दिशा भटकंती करणारे गावकरी, अशी स्थिती. मात्र, सतत दुष्काळाच्या झळा सोसणान्या कुमशेतची ओळख आता पाणीदार गाव' अशी झाली आहे.

महिला, ग्रामस्थांचा सामाजिक कामात सहभाग, कृषी, वन विभागाचा सकारात्मक दृष्टिकोन, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग, नैसर्गिक साधनसंपत्तीचा करून हे वापर आदिवासी खेडे सेंद्रिय शेतीमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक गावकरी बांबू उद्योग, आठमाही शेती करू लागले.

गावशिवारात कृषी विभागाकडून तर विभागाचे

कुमशेत कृषी विभागाने बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेले पाणी.
*
शेतशिवर  अभियानातून कृषी विभाग व वन विभागाची कामे झाली. पाण्याची समस्या दूर झाली. शेतशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढला. कुमशेत पर्यटन खेडे म्हणून नावारूपास येईल. , सयाजी अस्वले सरपंच कुमशेत*

डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडविले. माजी आमदार वैभव पिचड  यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे पाण्याची काळजी मिटली. शिवाय येथील शेतकरी उन्हाळी पिके घेऊ लागले. येथील शेतीउत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. रासायनिक खते वापरली जात नाहीत. शेतीउत्पादना रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली.येथील कोकणकडा पर्यटकांचे आकर्षण आहे.ट्रेकर्स येथील आज्या पर्व तावर येऊन दोन दिवस राहतात त्यातून स्थानिकांना रोजगार मिळतो

, "कृषी विभागाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे शिवारात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. गावातील महिलांचा तनिष्का ग्रुप स्थापन करून छोटे-मोठे उद्योग सुरू केले. बंधार्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडा तून दोन लाखांची मदत झाली. हा गाळ खडकाळ माळरानावर टाकला. कसदार जमीन तयार झाली. आम्ही सकाळ चे आभारी आहोत असे सरपंच सयाजी अस्वले म्हणाले .
मात्र आज गावच्या समस्या डोंगर एव्हढ्या आहेत.धारेरावचे मंदिर सुंदर पिचड यांच्या स्थानिक निधीतून बनवले मात्र आज रस्ता नाही,आरोग्य उपकेंद्र नाही,शाळेला दहा किलोमिटर शिर पूंजे आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो.उच्च शिक्षणाची सोय नसल्याने राजूर ला जावे लागते.अतिवृष्टी मध्ये घरे पडले ,बांध फुटले,जनावरे दगावली,खावटी नाही.तर रेंज नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करता येत नाही.संपर्क तुटल्याने व बस नसल्याने आजारी माणसांना व गरोदर महिलांना डोली करून न्यावे लागते अशी व्यथा इथि ल ग्रामस्थांनी मांडल्या सोबत फोटो.

अभिजात निसर्ग सौंदर्य साम्रा द

अकोले, ता.३०: अभिजात निसर्गसौंदर्य चारी बाजूने सह्याद्रीचे शिखरे,आशिया खंडात दुसरी सांधण दरी असणारे साम्रद गाव ७५० लोकवस्तीचे स्वतंत्र ग्रामपंचायत बारा महिने इथे पर्यटकांचा राबता असतो.चंद्र प्रभा बांडे या गावच्या महिला सरपंच आहेत.पावसाळ्यात चार महिने धुके तर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट .बांडे,मुठे, रगडे, सोडनर,भांगरे या आडनावाची लोक इथे राहतात.या गावाचं वैशिष्ट म्हणजे हे गाव पर्यटनाच्या माध्यमातून इंटरनेट दिसते.भंडारदरा,घाटघर व सांधण व्हॅली ला येण्यासाठी स्थानिक तरुणांना मोबाईलवर फोन येतात दोन दिवसाचे बुकिंग करून राहण्यासाठी व सांधण दरी त्यांचा आकर्षणाचा विषय असतो . इथील तरुण पर्यटन व्यवसायातून आपला रोजगार निर्माण करतात जेवण, नास्था,राहणे या सर्वांचे पॅकेज ठरविले जाते.मग त्यांना चुलीवरची रान भाजी,कोंबडी,अंडी, व शांकाहरी जेवण दिले जाते मोकळ्या मैदानात गावाजवळच टेन्ट उभारले जातात.मग सर्व गावाला काम मिळते .पूर्वी रोजगारासाठी इथी ल महिला तरुण रोजगारासाठी नारायणगाव ,नाशिक,ठाणे भागात जात असत मात्र अलीकडे त्यांना  पर्यटनातून रोजगार मिळाला आहे.तसे हे जिल्ह्याचे शेवटचे गाव शेजारी खेटून मुरबाड,शहापूर तालुका लागतो.गौवळ्यांचा डोंगर,रतनगड,शिप नरीचा डोंगर,मोटाचा डोंगर  चारी बाजूने असलेले हे साम्रद गाव अती पर्जन्य वृष्टी तसेच सामर  दैत्याची पाऊले इथे असल्यामुळेसाम्रद हे नाव गावाला पडले अशी रामायण काळातील अख्याईका आहे.त्यामुळे गावात रामनवमी ,एकादशी,हनुमान जयंतीला हरिनाम सप्ताह बसतो. कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात असल्यामुळे विकासाची कामे ठप्प आहेत .तर जिल्हा नियोजनातून  चराची वाडी येथे साडे बारा लाख रुपयाचे वीज उपकेंद्राचे काम प्रस्ताव पाठविण्यात येऊन तो मंजूर झाला मात्र नंतर राजकारण आडवे आल्यामुळे ते काम थांबले त्यामुळे काही वा वीज पोहचली नाही.रस्ता फुटला आहे .त्यामुळे दोन वर्षापासून बस गावात येत नाही.खाजगी जीपने आदिवासींना प्रवास करावा लागतो. चंद्र प्रभा बांडे (सरपंच) गावात पर्यटनातून रोजगार मिळाला मात्र आरोग्यसेवा,बस,शिक्षण,वीज,याची मोठी अडचण आहे.सरकारने पर्यटनातून ग्रामविकास योजना इथे राबवावी.
योगिता सोडनर (सदस्या) गावात रेंज नसल्याने संपर्क तुटल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय अडचणीत सापडला आहे.तर रस्ते पूर्ण खराब झाल्याने बस येत नाही.
साम्रद गावात अभयारण्य असल्यामुळे पांढरा वाघ या परिसरात मे महिन्यापासून येतो अनेक ग्रामस्थांनी त्याला पाहिले मात्र त्याची भीती वाटत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अशक्य तर अतिवृष्टीमुळे भातपिके खराब झाल्याचे शेतकरी मारुती बांडे म्हणाले.सोबत फोटो.