अकोले ता. ३१: मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या 'आज्या' पर्वताच्या पायथ्याशी निसर्गसंपदाने नटलेले कुमशेत" हे टुमदार गाव वसले आहे. गावठाण, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी, अशा सहा वाड्यांचे कुमशेत. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, जमीन खडकाळ असल्याने सगळे पाणी वाहून जायचे. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात गावासाठी टँकर ठरलेला नि रोजगारासाठी दाही दिशा भटकंती करणारे गावकरी, अशी स्थिती. मात्र, सतत दुष्काळाच्या झळा सोसणान्या कुमशेतची ओळख आता पाणीदार गाव' अशी झाली आहे.
महिला, ग्रामस्थांचा सामाजिक कामात सहभाग, कृषी, वन विभागाचा सकारात्मक दृष्टिकोन, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग, नैसर्गिक साधनसंपत्तीचा करून हे वापर आदिवासी खेडे सेंद्रिय शेतीमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक गावकरी बांबू उद्योग, आठमाही शेती करू लागले.
गावशिवारात कृषी विभागाकडून तर विभागाचे
कुमशेत कृषी विभागाने बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेले पाणी.
*
शेतशिवर अभियानातून कृषी विभाग व वन विभागाची कामे झाली. पाण्याची समस्या दूर झाली. शेतशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढला. कुमशेत पर्यटन खेडे म्हणून नावारूपास येईल. , सयाजी अस्वले सरपंच कुमशेत*
डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडविले. माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे पाण्याची काळजी मिटली. शिवाय येथील शेतकरी उन्हाळी पिके घेऊ लागले. येथील शेतीउत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. रासायनिक खते वापरली जात नाहीत. शेतीउत्पादना रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली.येथील कोकणकडा पर्यटकांचे आकर्षण आहे.ट्रेकर्स येथील आज्या पर्व तावर येऊन दोन दिवस राहतात त्यातून स्थानिकांना रोजगार मिळतो
, "कृषी विभागाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे शिवारात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. गावातील महिलांचा तनिष्का ग्रुप स्थापन करून छोटे-मोठे उद्योग सुरू केले. बंधार्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडा तून दोन लाखांची मदत झाली. हा गाळ खडकाळ माळरानावर टाकला. कसदार जमीन तयार झाली. आम्ही सकाळ चे आभारी आहोत असे सरपंच सयाजी अस्वले म्हणाले .
मात्र आज गावच्या समस्या डोंगर एव्हढ्या आहेत.धारेरावचे मंदिर सुंदर पिचड यांच्या स्थानिक निधीतून बनवले मात्र आज रस्ता नाही,आरोग्य उपकेंद्र नाही,शाळेला दहा किलोमिटर शिर पूंजे आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो.उच्च शिक्षणाची सोय नसल्याने राजूर ला जावे लागते.अतिवृष्टी मध्ये घरे पडले ,बांध फुटले,जनावरे दगावली,खावटी नाही.तर रेंज नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करता येत नाही.संपर्क तुटल्याने व बस नसल्याने आजारी माणसांना व गरोदर महिलांना डोली करून न्यावे लागते अशी व्यथा इथि ल ग्रामस्थांनी मांडल्या सोबत फोटो.
No comments:
Post a Comment