दशरथ खाडे,भंडारदरा
दि.३-८-२०२१
भंडारदरा परिसरात भात आवणी
भंडारदरा(वार्ताहर)भंडारदरा ता.अकोले परिसरात गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु असुन भात आवणी करण्यास सुरुवात केली आहे.
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आदिवासी बांधव राहतात.येथील शेतक-याच्या जमिनी डोंगर माथ्यावर अधिक प्रमाणात आहेत.
येथील शेतक-यांचे भातपिक हे महत्वाचे असुन त्यामध्ये काळभात,इंद्रायणी या विविध भातपिके येथील शेतकरी घेतात.जवळपास सहा महिने भातपिकाचे उत्पन्न घेण्यास लागतात.त्यातही वेळेत पाऊस झाला तर पिक चांगले येते. पाऊस वेळेत आला नाही तर भातपिकही पुरेसे होत नाही.या पिकात कष्ठ जास्त असुन उत्पन्नही कमी आहे.
.............................................................
No comments:
Post a Comment