अकोले, ता.३०: अभिजात निसर्गसौंदर्य चारी बाजूने सह्याद्रीचे शिखरे,आशिया खंडात दुसरी सांधण दरी असणारे साम्रद गाव ७५० लोकवस्तीचे स्वतंत्र ग्रामपंचायत बारा महिने इथे पर्यटकांचा राबता असतो.चंद्र प्रभा बांडे या गावच्या महिला सरपंच आहेत.पावसाळ्यात चार महिने धुके तर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट .बांडे,मुठे, रगडे, सोडनर,भांगरे या आडनावाची लोक इथे राहतात.या गावाचं वैशिष्ट म्हणजे हे गाव पर्यटनाच्या माध्यमातून इंटरनेट दिसते.भंडारदरा,घाटघर व सांधण व्हॅली ला येण्यासाठी स्थानिक तरुणांना मोबाईलवर फोन येतात दोन दिवसाचे बुकिंग करून राहण्यासाठी व सांधण दरी त्यांचा आकर्षणाचा विषय असतो . इथील तरुण पर्यटन व्यवसायातून आपला रोजगार निर्माण करतात जेवण, नास्था,राहणे या सर्वांचे पॅकेज ठरविले जाते.मग त्यांना चुलीवरची रान भाजी,कोंबडी,अंडी, व शांकाहरी जेवण दिले जाते मोकळ्या मैदानात गावाजवळच टेन्ट उभारले जातात.मग सर्व गावाला काम मिळते .पूर्वी रोजगारासाठी इथी ल महिला तरुण रोजगारासाठी नारायणगाव ,नाशिक,ठाणे भागात जात असत मात्र अलीकडे त्यांना पर्यटनातून रोजगार मिळाला आहे.तसे हे जिल्ह्याचे शेवटचे गाव शेजारी खेटून मुरबाड,शहापूर तालुका लागतो.गौवळ्यांचा डोंगर,रतनगड,शिप नरीचा डोंगर,मोटाचा डोंगर चारी बाजूने असलेले हे साम्रद गाव अती पर्जन्य वृष्टी तसेच सामर दैत्याची पाऊले इथे असल्यामुळेसाम्रद हे नाव गावाला पडले अशी रामायण काळातील अख्याईका आहे.त्यामुळे गावात रामनवमी ,एकादशी,हनुमान जयंतीला हरिनाम सप्ताह बसतो. कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात असल्यामुळे विकासाची कामे ठप्प आहेत .तर जिल्हा नियोजनातून चराची वाडी येथे साडे बारा लाख रुपयाचे वीज उपकेंद्राचे काम प्रस्ताव पाठविण्यात येऊन तो मंजूर झाला मात्र नंतर राजकारण आडवे आल्यामुळे ते काम थांबले त्यामुळे काही वा वीज पोहचली नाही.रस्ता फुटला आहे .त्यामुळे दोन वर्षापासून बस गावात येत नाही.खाजगी जीपने आदिवासींना प्रवास करावा लागतो. चंद्र प्रभा बांडे (सरपंच) गावात पर्यटनातून रोजगार मिळाला मात्र आरोग्यसेवा,बस,शिक्षण,वीज,याची मोठी अडचण आहे.सरकारने पर्यटनातून ग्रामविकास योजना इथे राबवावी.
योगिता सोडनर (सदस्या) गावात रेंज नसल्याने संपर्क तुटल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय अडचणीत सापडला आहे.तर रस्ते पूर्ण खराब झाल्याने बस येत नाही.
No comments:
Post a Comment