अकोले,ता . ६: अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमभागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला चिटकून असलेला अकोला तालुकाडोंगदर्यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्यामधे अनेक दुर्गम दुर्ग असेगिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच दुर्गाच्यासाखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे.मुळा नदीच्या खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे. कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्यालापोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठीअकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेसपाचनई पर्यंत येत असतात. पुणे जिल्ह्यामधील माळशेजघाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्यापायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांची पायपिट करीत पाचनईगाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्येडोंगर उतरुन पाचनईला येता येते. पाचनई हे गावहरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालतकालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्गआहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावरपेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे. कलाडगडाचा डोंगर एकांड्याडोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्या मंगळगंगा या नद्याच्याबेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही.गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडाजाणवतो. गडावर जाणारी वाट बर्यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमनकरण्यासाठी स्थानिक गावकर्यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्याची वाटअसल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्याखोबण्याही आहेत. काही पायर्या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण४० ते ५० मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेलाआहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुनगडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जातायेते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत.गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेषदिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचाभैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वहीमनाला मोहवून टाकते.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गकसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गावअसून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीचीएक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हेसह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणूनओळखले जाते. या कळसूबाईशिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते.कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरीसद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातूनखाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचापायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंचअसून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांचीचढाई चढणार्याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावरपोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठीकुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारीलसुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचाकातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणाराडोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्यावाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्याआहेत. या पायर्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्णआहे. कुलंगगडावरपाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारीपाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुनकळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगडआपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्यालाखुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेणचंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचेभौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते. गडावर अनेकघरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडेमनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एकापुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडेजाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवून सह्याद्रीचेरांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडालाभेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिमअंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्यांनी अतिशय समृद्ध आहे. यागिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. रतनगडाचा किल्लाभंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेलाआहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणूनओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात. भंडारदर्याच्यापरिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षीलाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावरमात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूरकरीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकालस्मरणात राहील अशीच आहे. अहमदनगर आणिनाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्यादक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवरभंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचाफुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडेजातो. भंडारदरा धरणाच्याभिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसेविकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे. मुंबई - आग्रा हामहामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटरअंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढेउजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. यारस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकीगावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे. पुणे-नाशिक याराज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडीअसाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्यापाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसामारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठतायेईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यकआहे. भंडारदर्याच्याखोर्यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघरसाधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटाआहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारीपायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणीभरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडेनिघावे लागते. साधारण दीड दोनतासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडेखोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालतगेल्यावर पायर्या लागतात. या कातळकोरीव पायर्यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबकदरवाजा आहे. या दमछाक करणार्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारातपहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्याया सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. या अनामिककारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो.संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते.त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्याउत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचेउत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठेम्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याचकिल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातूनभन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूलापाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. गडाच्या पश्चिमकडीलकात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशालपर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. यालाराणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणिशिवलींग पहायला मिळते. इथून जवळच गणेशदरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीनडोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा यापरिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. याच्या थोडे पुढेप्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथूनसमोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचेपठार उत्तम दिसते. गडावर मुक्कामाचाबेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजेअंधाराच्या आत खाली पोहोचता येते. गणेश दरवाजातूनशिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत.अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हेअवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधेरतनवाडी मधे पोहोचतो. रतनवाडीमधे एकअद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळीलअमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वरमंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हेमंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत हीरचना वैशिष्ठ पुर्ण आहे. येथून साम्रद साधारण७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँचचालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवूशकk
Friday, March 6, 2020
अकोला तालुकाडोंगदर्यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्यामधे अनेक दुर्गम दुर्ग असेगिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.
अलंग, मदन व कुलंग भटकंती
अलंग, मदन व कुलंग भटकंती
हिरवी धुंदी लेवून न्हाली
डोंगरातील वाट,
गडदुर्गांच्या भटकंतीतून
अनुभवा सह्याद्रीचा थाट !!!
कोणत्या ठिकाणाचे भाग्य केव्हा उजळेल, हे सांगता येत नाही. कधी कोणाचा कुठे जाण्याचा बेत आखला जाईल याचाहि ट्रेकर्सच्या बाबतीत काही नेम नसतो.. चार चाकी नसलं तरी दुचाकी वाहनातून छोट्या-मोठ्या सहलींना जाणं खूप जणांना अप्रूप वाटतं. पण नेहमीच्या ठिकाणांपेक्षा जरा वेगळे आणि इतरांना अपरिचित ठिकाणी जाणे काही जातिवंत भटक्यांना नेहमीच खुणावत असतं. यातून विशाल नाईकवाडी, सुरेश भालेराव, विठ्ठल गोरे व मी राजू ठोकळ असा चौघांचा अचानक बेत ठरला आणि सह्याद्रीतील अकोले तालुक्याच्या कुशीतील दुर्गत्रिकुट अलंग, मदन व कुलंग (AMK) सर करण्याचा निर्णय झाला. गडांवर जाणे फारच जिकीरीचे काम आहे असे ऐकले असल्याने सोबत गाईड म्हणून एकनाथ खडके यांना घाटघर (ता.अकोले) येथून सोबत घेतले. सोबत ट्रेकिंगसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, तीन दिवस पुरेल इतके खाद्य पदार्थ आठवणीने घेतले होते.
दुपारच्या उन्हात आम्ही अलंग गडाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. रस्त्याने सह्याद्रीच्या कुशीतील विविध वृक्ष नजरेस पडत होते. चालण्याचा वेग काही नाविन्यपूर्ण वृक्षांजवळ कमी होत होता. पण अधिक वेळ थांबणे उचित ठरणारे नसल्याने आम्ही तसेच आमचा चालण्याचा वेग वाढवत होतो. काही अंतर चालल्यानंतर पाठीवरील बि-हाड जरा जड वाटायला लागले होते. परंतु सर्वच गरजेच्या वस्तू असल्याने तो भार आम्ही गडाच्या माथ्याकडे पाहत सहन करत होतो. मध्येच गाईड परिसरातील वृक्ष, प्राणी, गावे आदींची माहिती करून देत होतो. सर्व माहिती आम्ही मनात साठवत व काही निरीक्षण करत सह्याद्रीच्या प्रेमात रमत-गमत चालत होतो. सूर्य जसजसा मावळतीकडे सरकत होता तसतसे आम्ही अधिक वेगाने आमची पावले गडाच्या दिशेने टाकत होतो. कारण अलंग गडावर जाण्यासाठी एक सहा-सात फुटांचा कातळकडा (Rock patch) आम्हाला पार करायचा होता. शेवटी आम्ही काहीसा अंधारातच परंतु अधिक सावधगिरीने हा टप्पा पार केला. यात विशालचा अधिक कस लागला. परंतु काहीसा धीर दिल्याने त्यानेही हा टप्पा अलगद पार केला. हा टप्पा पार करत असताना रात्रीच्या स्वयंपाकासाठी वाळलेली लाकडे गोळा करत आम्ही पुढे सरकू लागलो. वाटेत एक दरवाजा लागला परंतु अंधार अधिक असल्याने आम्हाला येथे अधिक निरीक्षण करण्यास संधी मिळाली नाही. येथून पुढचा प्रवास आम्हाला अधिक सावधरीतीने पार करायचा होता कारण उजव्या बाजूला नजर पोहोचणार नाही इतके गगनभेदी कातळकडे तर डाव्या बाजूला हृदयाची स्पंदने धडधड करायला लावणारी खोल दरी होती आणि त्यात सोबतीला अंधार होता. चालताना चुकून पायाखालचा दगड जर सरकला तर तोल जावून दरीत कोसळण्याची भीती यामुळे काहीसे सावध आम्हीं एकमेकाला सुचना करत पुढे सरकत होतो. हातातील विजेरीच्या साहाय्याने आजूबाजूला काही किल्ल्याचे अवशेष आहेत का याचाही शोध मात्र आमच्या नजरेला स्वस्थ बसू देत नव्हता. काही अंतर पार केल्यानंतर दगडातील काही कोरीव गुहा अंधारातच न्याहाळत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी रात्री काहीशा उशिराने आम्ही गडावरील एका गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. पाठीवरील ओझे हलके झाल्याने त्या काळ्याकुट्ट अंधारात आम्ही गुहेची रचना, कोरीव काम, गुहेतील पाण्याची सोय आदींचे निरीक्षण केले. गडावरील हि सर्वात मोठी राहण्यासाठी योग्य असणारी गुहा आहे.
दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. किल्ले भटकंती करताना सूर्योदय पाहणे हा आमचा खास छंद असल्याने आम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेतला. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. यातील काही टाक्यांमध्ये बाराही महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराजवळ एक शिलालेख आपणास दिसतो. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसत असल्याने मनात एक वेगळा आनंद आम्ही साठवत होतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला, पट्टाकिल्ला, बितनगड, उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर वातावरण स्वच्छ असल्याने सहज नजरेत पडत होता. किल्ल्याचा माथा फिरून झाल्यानंतर मदन किल्ल्याकडे जायचे असल्याने आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी येवून आमचे साहित्य आवरले....पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व पुढील प्रवासास सुरुवात केली.
अलंग गडावरील सपाटीची वाट संपल्यानंतर उताराची आणि काहीशी अवघड कातळात कोरलेल्या पाय-यांची वाट लागली. समोरच खाली खोल दरी दिसत असल्याने एक-एक पायरी उतरणे जरा अवघड वाटत होते. पाठीवर ब्याग असल्याने उतरताना मागे लागून पुढे तोल जाण्याचा धोका अधिक होता. त्यामुळे प्रत्येकजण अगदी जीव मुठीत धरून खाली उतरत होता. आम्ही या पाय-या उतरून एका लहान गुहेपर्यंत आलो. येथून पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. येथून पुढच्या पाय-या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडल्या असल्याचे एकनाथ खडके यांनी सांगितले आणि एकच तिडीक आमच्या मस्तकात गेली. परंतु मनातील आग सावरत आम्ही ५० फुटांचे प्रस्तरारोहण करण्यास सज्ज झालो होतो. गाईडने रोप व त्यासाठी आवश्यक असणारी इतर सर्व तयारी पूर्ण केली होती. तसेच काही सूचनाही आम्हाला देत होता. काहींची प्रस्तरारोहणाची पहिलीच वेळ असल्याने अगोदर कोण जाणार याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच विशाल नाईकवाडी सर्वात प्रथम खाली आला. त्याचा प्रवास बघून इतरांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे सुरक्षितपणे सर्वांनी तो कातळकडा पार केला. या पुढे कातळात काही पाय-या लागल्या. त्यांची रचना स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यानंतरच्या गुहेत काही जणांच्या राहण्याची सोय होवू शकेल इतकी जागा दिसली.
अलंगगडाची उतरण संपल्यानंतर गडाच्या मध्यावधी भागातून अगदीच उंच कातळकड्यांच्या जवळून मदन गडाचा रस्ता आम्ही कारवीच्या झाडांमधून शोधत पुढे सरकत होतो. रस्त्यात अनेक कडे कोसळलेले अन काही कोसळण्याच्या अवस्थेत दिसले.....मन अगदीच धस्स होत होते. सह्याद्रीचा हा अनमोल खजिना असा उपेक्षित असल्याने मनावरचे दडपण अधिक वाढत होते. काही अंतर पार केल्यानंतर मदन गडावर जाणा-या कातळातील पाय-यांनी लक्ष वेधले. मग मनात चलबिचल सुरु झाली कधी एकदाचा त्या पाय-या स्वताच्या हातांनी स्पर्श करतो....स्वताच्या श्वासाने पाय-यांचा सुगंध अनुभवतो.....स्वताच्या मनाने येथील इतिहास जाणतो.
अगदीच समोर दिसणारा मदन गड पण प्रत्यक्ष पोहचण्यास आमची काही प्रमाणात दमछाक होत होती. कातळातील सुबक पाय-या वादळ, वारा, ऊन, पाऊस झेलत आजही प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. या पाय-या पाहून झालेला आनंद मनात साठवत पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी अगदीच कुत्सितपणे सुरुंग लावून पाय-या उडवून दिल्याने तयार झालेला सुमारे ५० फुटांचा कातळकडा नजरेस पडला. मदन गडाच्या माथ्यावर जायचे असेल तर या कड्यावर प्रस्तरारोहण करावे लागते. त्याशिवाय गडावर जाणारी दुसरी वाट नाही. येथील प्रस्तरारोहण केल्यानंतर आम्ही गडाच्या माथ्यावर कातळातील काही पाय-या चढून पोहचलो आणि जणू काही स्वर्गात आल्याचा अत्यानंद झाला. गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी शिल्लक राहत असावे असे वाटते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसत होता. मदनगडावरून अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिबंकगड हे किल्ले आम्हा सर्वांचे लक्ष्य वेधत होते. दूर अंतरावरून दिसणारे मदनगडावरील नेढ मात्र गडावरून दिसत नव्हते. गडावर अधिक वेळ न वाया घालवता आम्ही गडावरील टाक्यांतील पाणी पिऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मदनगडाचा अवघड कातळकडा व दगडी पाय-या उतरल्यानंतर आम्ही कुलंग गडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला.
दुपारचा आकाशात तळपणारा आणि दोन दिवस पाठीवरील ओझे घेवून चालत असल्याने येथून पुढचा कडेकपारीतून जाणारा रस्ता पार करत असताना अधिक जिकीरीचे वाटत होते. त्यात वाट घसरणारी असल्याने अधिक सावधगिरी बाळगावी लागत होती. मदन ते कुलंग असे अंतर खूप होते आणि आमच्याकडे वेळ कमी होता. सूर्यास्त होण्याच्या अगोदर आम्हाला कुलंग गडाच्या माथ्यावर पोहोचणे आवश्यक आहे अशा सुचना गाईडने दिल्या होत्या. त्यामुळे अधिक इतरत्र कुठे न थांबता आम्ही सभोवतालचा निसर्ग न्याहाळत अंतर पार करत होतो. शेवटी सूर्य मावळतीकडे कलला होता. सभोवताली अंधार पसरला होता आणि आम्ही कुलंग गडाच्या पाय-या चढायला सुरुवात केली होती. या गडावर कातळात कोरलेल्या पाय-यांची संख्या इतर दोघांच्या तुलनेत अधिक आहे. त्यात या पाय-या चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती. पुढे आल्यानंतर गडावरील दुस-या क्रमांकाचा दरवाजा आजही चांगल्या अवस्थ्येत असल्याने मनाला खूप बरे वाटले. काळाकुट्ट अंधार पडायच्या आत आम्ही गडावरील पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलो. टाक्यांतील पाणी पिऊन सर्व थकवा कुठे गायब झाला आणि मन कसे प्रसन्न झाले हे क्षणार्धात आम्हाला कळले नाही. या प्रसन्न मनाने आम्ही गडावरील गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य असल्याने आम्ही निवांतपणे तेथे विसावलो.
सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा सर्वजण कुलंग गडावरून सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सूर्याच्या दर्शनाने संपूर्ण भटकंती सफल झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होते. यानंतर सर्वांनी गडावरील अवशेष पाहाण्यास सुरुवात केली. कुलंगचा दुसर्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. गुहे जवळ थोडे पुढे पाण्याची २-३ टाकी आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले.
कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळाला. या घळीत वरील बाजूने येणार्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसत होते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका पाहून तीन दिवसांत सह्याद्री आम्हास प्रसन्न झाल्याचा आनंद होत होता.
अलंग, मदन व कुलंगच्या भटकंतीत आम्हाला सह्याद्रीच्या अनोख्या रूपाचे दर्शन झाले. तसेच बऱ्याचश्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपणच सह्याद्रीची योग्य ती निगा राखली तर येणाऱ्या काळातही इतरांना त्याचे हे रूप अनुभवता येईल. सह्याद्रीने आपल्याला भरभरून दिलेले आहेच पण आता मात्र त्याचं काहीतरी देणं लागतो ही भावना लक्षात घेण्यासारखी आहे. आपापल्या परीने आपण जमेल तेवढं सह्याद्रीला आणि येथील निसर्गसौंदर्याला जपायला हवं....का कोण जाणे तुम्हाली बघून इतरही प्रेरित होतील आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
|
कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.
अकोले,ता . ६: अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला चिटकून असलेला अकोला तालुका डोंगदर्यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्यामधे अनेक दुर्गम दुर्ग असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.
याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे. कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेस पाचनई पर्यंत येत असतात.
याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे. कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेस पाचनई पर्यंत येत असतात.
पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांची पायपिट करीत पाचनई गाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्ये डोंगर उतरुन पाचनईला येता येते.
पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे.
कलाडगडाचा डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बर्यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकर्यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पायर्या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.
या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.
समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्या आहेत. या पायर्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.
कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.
गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवून
सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.
भंडारदर्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
भंडारदर्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.
भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.
मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.
पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.
भंडारदर्याच्या खोर्यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.
साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्या लागतात. या कातळकोरीव पायर्यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.
या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.
इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.
याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.
गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.
गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.
रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.
अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.
येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकk
Saturday, February 29, 2020
Subscribe to:
Posts (Atom)










































