Friday, March 6, 2020

कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.

अकोले,ता . ६: अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला चिटकून असलेला अकोला तालुका डोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.  कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेस पाचनई पर्यंत येत असतात.

पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांची पायपिट करीत पाचनई गाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्ये डोंगर उतरुन पाचनईला येता येते.
पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे.
कलाडगडाचा डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्‍या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बर्‍यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकर्‍यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्‍याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पायर्‍या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगडमाळशेज घाटमोरोशीचा भैरवगडनानाचा अंगठासाधल्या घाटाजवळचा नकटा डोंगरकोंबडा डोंगरआजोबाचा भव्य डोंगरकुमशेतची लिंगीघनचक्करचे पठारघनचक्कर भैरवगडकुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.

या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.
समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्‍या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.
कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगडरतनगडकायाबाईभैरवगडहरिश्चंद्रसिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरीमलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगडभिंगलवाडी तसेच कावनाई आडपहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाटमेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.


गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवून     
सह्याद्रीचे रांगड रुपसह्याद्रीचा राकटपणासह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. 
रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.
भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छाशारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो. 

भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.

मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.

पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.

भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.

साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ादरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.

या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्‍याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंगमदनअलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगडमदनगडराजगडकन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.

गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.

इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाईरत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.

याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशयप्रवरा नदीपाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.

गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.

गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.

रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.

अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.

येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्‍या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकk


No comments:

Post a Comment