अकोले (शांताराम काळे ), ता . २५:सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे ते रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्य पातळीवर प्रयत्न करीत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणाला २१ दिवस घरात बसण्याचे आव्हान केले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करोनाला नाकरण्यासाठी आज आपण घरात बसून आरोग्यची गुढी उभारून आलेल्या संकटावर मत करू या मी घरातच आहे तुम्हीही घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले ते पत्रकारांशी बोलत होते . आज गुढीपाडवायच्या दिवशी त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत गुढी उभारून तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी , ग्रामसेवक , सरपंच , ओलीस यांच्याशी संपर्क साधून तालुक्याच्या बाबत आढावा घेतला यावेळी त्यांच्यासम वेत सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे , उपसभापती दत्तात्रय देशमुख , सरपंच गणपत देशमुख उपस्थित होते प्रसंगी बोलताना ते म्हणाले कोरोना विरुद्ध लढाई हि प्रशासनापूर्ती मर्यदित राहिली नसून हि लढाई नागरिकांनी उत्स्फूर्त पणे स्वीकारली आहे . आरोग्य , महसूल व पोलीस खाते आपल्याला मोलाची साथ करीत आहेत काही जागृत नागरिक पत्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती प्रशासनाच्या लक्ष्यात आणून देत आहे . मात्र त्याला काही लोक अपवाद आहे लातो के भूत बातोसे नाही मानते त्याप्रमाणे त्यांच्यावर पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे . तालुक्यातील तहसीलदार , पोलीस अधिकारी , आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका काम करीत आहे त्यांना मदत व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर किमान २१ दिवस घराबाहेर पडू नये , तुमच्या गावात पुणे मुंबई व इतर भागातून तुमचे नातेवाईक अथवा नोकरीनिमित्त बाहेर गेलेले येत असतील तर त्यांची नोंद आरोग्य विभागाकडे करून त्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्या ते तुमच्या सर्वांच्या हिताचे राहील असा सल्लाही पिचड यांनी दिला .काही ठिकाणी गर्दी हटायला तयार नाही.लोक प्रशासन, पोलिसांसोबत वाद घालतांना दिसत आहेत.जणू काही ते आपले शत्रू आहेत. अजूनही लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळालेले दिसत नाही. आपल्या घरीच रहाणे सर्वांसाठी किती सुरक्षित आहे हे कधी लक्षात येणार आमच्या !!! अजूनही वेळ गेलेली नाही.प्रशासनाला सहकार्य करा.नाहीतर कोणत्याही क्षणी कोरोना आपल्या घराच्या दरवाज्यावर येऊन टकटक करेल... पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. सावध व्हा. अनावश्यक रस्तावर येऊच नका.आपला जीव आणि आपलं कुटुंब आपणच सुरक्षित ठेवा.आरोग्याची गुढी उभारून कोरोनाला पराभूत करा पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. सोबत फोटो
No comments:
Post a Comment