अकोले, ता . १७:पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रंग म्हणजे च बालाघाट या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबणीत वसलेला जलाशय म्हणजेच विल्सन डॅम(भंडारदरा )सरता ग्रीष्म आणि वर्ष ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात काजव्यांचे पुंजके या झाडावर वास्तव्याला असतात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे धारण नगरपासून १७५ किलोमीटर अंतरावर आहे नाशिक पुणे -ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवशीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण
भंडारदराच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते . रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे याच नदीवर खाली भंडारदरा जलाशय बांधले आहे . धरणापासून साधारण १२ किलोमीटर आत गेल्यावर पांजरे नावाचे छोटेखानी गाव इथून कळसुबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते पांजरेवरून उद्धवने व पुढे घाटघरला जाता येते पांजरे घाटघर हि गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात घाटघरच्या घटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यन्त रमणीय असतो . तर घाटघर येथे जलविधुत प्रकल्प हि उभारण्यात आला आहे .स्थान :घाटघर धरण.
सरासरी वार्षिक पाऊस : ५००० मी.मी. पेक्षा अधिक .
महत्तम उत्पादनक्षमता : २५० मेगावॅट.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला २२ कि.मी.अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यांची हद्द संपते. घाटघरचा कोकणकडा पाहण्यासारखा आहे. ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते. हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंचच उंच सरळ उभा कोकणकडा, दूरवर दिसणारा शहापूर तालुक्याचा भूभाग, कड्याला लागूनच असलेला जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणा-या गाड्या सारेच मनोहारी, विलोभनिय. घाटघर या ठिकाणी पावसाळ्यात ५००० मी.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो.
महत्तम उत्पादनक्षमता : २५० मेगावॅट.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला २२ कि.मी.अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यांची हद्द संपते. घाटघरचा कोकणकडा पाहण्यासारखा आहे. ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते. हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंचच उंच सरळ उभा कोकणकडा, दूरवर दिसणारा शहापूर तालुक्याचा भूभाग, कड्याला लागूनच असलेला जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणा-या गाड्या सारेच मनोहारी, विलोभनिय. घाटघर या ठिकाणी पावसाळ्यात ५००० मी.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो.
कोकणकड्याच्या खोलीचा वापर करून येथे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प जपानच्या जे.बी.आय.सी. या वित्त संस्थेच्या आर्थिक मदतीने साकारण्यात आला आहे. २५० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प हा ‘पंप स्टोरेज’ प्रकारचा आशिया खंडातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. घाटघर येथे बांधण्यात येत आलेल्या ऊर्ध्व धरणातील पाणी डोंगरात खोदलेल्या बोगद्यातून जलविद्युत प्रकल्पात सोडले जाते. या पाण्याच्या आधारे अवाढव्य टर्बाइन फिरून वीज निर्मिती होते व पाणी बोगद्याच्या खालील बाजूला निम्न धरणात सोडले जाते. रात्री ११ नंतर सुमारे ७ तास विजेचा वापर करून चोंडे येथील निम्न जलाशयातील पाणी घाटघर येथील ऊर्ध्व जलाशयात खेचून घेतले जाते. आणि सकाळी व संध्याकाळी विजेच्या कमाल मागणीच्या काळात वीज निर्मिती करण्यात येते.
धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे वास्तव्य केल्याचा आजही खुणा आहेत त्यामुळं इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नवे दिल्याचे दिसून येते बालाघाट डोंगररांगात कोकणकड्यच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे . तर रतनगडाच्या डोंगर माथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचे उगम आहे तिला अमृतवाहिनी म्हणतात याच नदीवर खाली ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे त्याने शम्भरी गाठली आहे. भंडारदरा धारण भरले कि अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो . फेसाळणार्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करून वाहायला लागतात म्हणूनच त्याचे नाव अम्ब्रेला फॉल आहे हिंदी , मराठी , इंग्रजी चित्रपटात या फोलच उपयोग करण्यात आला आहे . राजकपूरच्या राम 'तेरी गंगा मैलीचे सर्व चित्रीकरण इथेच करण्यात आले होते दर वर्षी साधारण १५ ऑगष्ट नंतर अम्ब्रेला फॉल काही महिने पाहता येतो . रतनगड डोंगराच्या पायथ्याशी पुरातन काली अमृतेश्वर शिवालय आहे धारण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो हे हेमाडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वंदता आहे . २४ कि.मी.
रंधा धबधबा
भंडारदरा धरणाच्या पुढे पूर्वेला १० किलोमीटर अंतरावर रंधा फोल या मोठ्या धबधब्याचे दर्शन घडायचे मात्र आता कोडणी ३४ मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प झाल्यामुळे तो धबधबा लुप्त झाला आहे अकोल्यापासून चे अंतर :
भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २०कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागुनच दुस-या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे ‘मैने प्यार किया’, ‘प्रेम’, ‘कुर्बान’, ‘राजू चाचा’ इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांतील थरारक दृश्ये येथे चित्रित झालेली आहेत. भंडारदरा परिसरात निवांत भटकंती कार्याची म्हटले कि , पाच सहा दिवसाचा अवधी लागतो पर्वतरांगेतील अलन्ग , कुलंग , मदन गडासह हरीशचंद्रगड,विश्रामगड , व गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण गावही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत उदाहरणच द्यायचे झाले तर फोफसंडी हे गाव चारही बाजूने उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकांपेक्षा तीन चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्तही तीन चार तास लवकर होतो थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा आठ तासाचा असतो अकोले तालुक्यातून कोतुळ , पळसुंदे (भैरोबा )मार्ग अंबितखिंड एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोफसंडी गावात पोहचता येते फोफसंडीतून थेट माळशेज घाटात पोहचण्यासाठी आता रास्ता झाला आहे . जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड अकोले , समशेरपूर , खिरविरे फाटामार्गे विश्रामगडावर जात येते तिरढे पाचपट पठारावरील पावन ऊर्जा प्रकल्प पाहण्यासारखा आहे डोंगरपठारावर शेकडो पंखे भिरभिरतनाचे दृश्य विलोभनीय असते या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजे मार्गे कुमशेत सारख्या भागाला भेट देणे शक्य आहे . तातोबा डोंगर हा अकोले तालुक्यातील सर्वांचे श्रध्दास्थान आहे. वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने हा भाग पावन झाला आहे. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगाने विकास येथे झाला आहे. अगदी शांत निसर्गरम्य ठिकाण म्हणुन प्रसिद्ध आहे. नदीचा किनारा शांत जागा असल्याने येथे सर्वात जास्त पक्षांचे आवाज ऐकायला भेटतात. पक्षीप्रेमींना खास वेगवेगळ्याप्रकारचे पक्षी पाहण्यासाठीच मी आमंत्रित करतो आहे तर मग कधी येताय तातोबाला आश्रमाला भेट द्यायला तर लोध (कोथळा) (lodh ) हे एका झाडचे नाव असून कोथळे या जंगलात सर्वात मोठे झाड आहे.कळसुबाई कुलन्गगड रतनगड आजोबाचा डोंगर या सर्व शिखरातील शेवटचे शिखर म्हणजे हरीशचंद्रगड अत्यन्त अवघड चढणीचे हे शिखर ठाणे पुणे नगर जिल्ह्यातून या गडाकडे जात येते हरीशचंद्रगडच्या लगत असलेल्यातारामती ,रोहिदास हि शिखरे पाह्यला मिळतात वन्यजीव दर्शनही अनुभवता येते निबिड जंगल उंच डोंगर खोल दऱ्या मुळा नदीचे पात्र अशा व वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी उंबर , जांभूळ ,कारवी पांगारा ,मोहाची झंझाडे अशा वृक्ष वल्ली तर कोल्हा साळुंदी बिबट्या रानडुक्कर विविध प्रकारचे साप सरडे असे वनचर आणि सातभाई भारद्वाज बुलबुल कोकीळ खान्द्या वेद रघु आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात हिवाळ्यात या परिसराचे रुपडे अवर्णनीय असते अनेक प्रकारच्या रानफुलांच्या साड्यांची इथली डोंगरपायथे सजतात सह्यपर्वतच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत उन्हाळ्यात गिरिभ्रमण उन्हाळा पावसाळ्यात संधिऋतूत काजवा महोत्सव पावसाळी प्रयत्न आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे ववर्षभर प्रयत्न करण्यासारखा हा परिसर कधी काली दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गवे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा साराच्या वाट सर्वच्या व्हाल लागल्या आहेत . इतर पर्यटन साठी बाजार पेठांमुळे आलेला बकालपण इथे नाही स्वच्छ पर्यटनामुळे त्च्छड नेचर इथे अनुभवता येते अर्थात इथले पर्यवर्ण स्वछता या बाबी जप
No comments:
Post a Comment