[सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दोन दिवस खेड्यात घरी जाण्याचा योग आला...सर्वजण जमले –रात्रीची जेवणं चालू होती आणि अचानक लाईट गेली—अंधारात बँटरी पण सापडेना म्हणून बाईनं पटकन चुलीवरील बत्ती पेटवली-आणि बतीच्या उजेडात जेवताना भिंतीवरील आमच्या त्या हलत्या सावल्या पाहून मी 30 वर्ष भूतकाळात गेलो..]
*गावच्या घरातील घासलेटचा दिवा*
*आहेर वसंतराव दिनकर[जादुगार सर] प्रस्तुत-:मो-:9423387988*
*चिमणी/कंदील... ...9423387988...*
*महावितरण ची वीज आमच्या गणोरे गावात पोहचली होती,पण आमच्या घरात ती येईल इतकं आमचं भाग्य नव्हतं...घरचं दारिद्र्य आमच्या पाचवीलाच पुजलेलं.. माझ्या लहानपणी आम्ही धाब्याच्या [म्हणजे मातीच्या भिंती अन त्यावर लाकडी फळ्या टाकून त्यावर टाकलेलं मातीचच छप्पर] अशा घरात रहायचो.....घरासमोर मात्र मोठ्ठं अंगण असायचं...*
*आई-वडील दोन्ही विडी कामगार....आमची शाळा पाचला सुटायची...शाळा सुटली कि,मी टोपल्यात काय आहे नाही ते पहिलं खावून घ्यायचो...अन पहिलं काम असायचं दिवा-बत्तीची तयारी करणं.....*
*दिवा म्हणजे तरी काय असायचा--:काचेची रिकामी दारूची बाटली अन तिच्या झाकणाला एक छिद्र पाडून त्यात बाटलीत तळापर्यंत जाईल इतकी मोठी सुताची किंवा कापडाची वात...!!*
*मातीच्या चुलीच्या कोपऱ्यावर थोडा उंचावर जर्मलच्या डब्यावर ठेवलेला हा दिवा,चुलीत फुंकर मारायची काळवंडलेली पितळी फुकणी, भांडी धरायची लोखंडी सांडशी आणि डब्याशेजारी फुलछाप काडीपेटी,लाकदाडाच्या दोन तीन सोबण्या,आणि इतर गोष्टींचा नेहमी असलेला पसारा आणि दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात कोपऱ्यात दोन पायांच्या मध्ये बरोबार अंगठ्ठ्याने काठवत दाबून धरजेवण बनवणारी आमची बाई हे चित्र आजही मनात कोरलेलं आहे*
*हा दिवा आम्हाला स्वच्छ घासून पुसून त्यात घासलेट[आत्ताच रॉकेल]टाकून वातीची कोजळी साफ करून ठेवावा लागायचा....बाई कामावरून सहा वाजेपर्यंत यायची,आण तिच्या हाताने तो दिवा लावायची......*
*गावातील बरेच जन त्या दिव्याला चिमणी म्हणायचे....का ते मला आजपर्यंत माहित नाही..अन मी पण कधी कुणाला इचारलं नाही....ह्या दिव्याला वरती अडकवयाला आम्ही त्याला एक तारेची वक्राकार कडी बनवायचो...काही घरात हि चिमणी पत्र्याच्या डब्यापासून बनवलेली असायची...*
*रातच्याला स्वयपाकाला कधी कधी चूल जाळ धरायची नाही मग माझी आई बत्तीतत्ल बुचभर रॉकेल चुलीतल्या काड्या-कुड्यावर टाकायची मग चुलीत जाळ व्हायचा....हे नेहमीच ठरलेलं असायचा------*
*शाळेत असताना सूर्यग्रहण पाहण्यासाठी –फोटोफिल्म,....किंवा वेल्डीगवाल्यांची काच हवी असायची....गावात कुणांक तरी एखादी काळी काच असायची त्यातून सूर्यग्रहण पाहण्यासाठी लाईन लागायची----यावर उपाय*
मग..?????
*आम्ही एखादी काच उपलब्ध करून ती दिव्याच्या कोजळीवरसपाट धरून घट्ट काळी करायचो...अन मग ती तयार झालेल्या काचेतून सूर्यग्रहण पाहायचो...गावच्या मित्रांच्या बुद्धीला तेव्हा तोड नव्हती...समस्येवर उपाय काढणं यात आमचा हातखंडा असायचा.*
*हा घासलेट चा दिवाही कधी कधी दगा द्यायचा.दिव्यातलं रॉकेल संपलं की सारी रात्र अंधारात काढावी लागायची.....तेव्हा हे घासलेट म्हणजे आजचं रॉकेल—टी वाय शिंदे आणि सावळेराम सखाराम दातीर यांच्याच दुकानात महिन्याकाठी पाच लिटर मिळायचं—त्यासाठी राशन कार्ड दाखवावं लागायचं...*
*चुलीच्या ठेवलेला हा दिवा,...लपकणाऱ्या दिव्याच्या उजेडात जेवण बनवणारी आमची बाई—आणि तेन्दुच्या पानाच्या विड्या वळणारा माझा बाप हे चित्र आजही स्पष्ट दिसतंय....या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या उजेडात आमच्या आय्यांच्या सावल्या भिंतीवर नेहमी लहान-मोठ्ठ्या व्हायच्या त्यामुळे आईची उंची नेमकी किती..???..हे आम्हाला शेवटपर्यंत कळालचं नाही....*
*या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या उजेडात सर्वांची जेवणं व्हायची....सर्व सावल्यां भिंतीवर एकमेकात मिसळून जायच्या--नंतर हाच दिवा आम्हाला अभ्यासासाठी उजेडाची साथ करायचा...*
*शाळा सुटल्यावर गावपट्टीत खेळताना किंवा एखाद्याच्या बांधावरून जाताना काही जण गुरे राखण करून घरी येताना कुठतरी पायात काटा मोडायचा...मग हातच्या मधल्या बोटाने तोंडातून थुंकी घेवून ती जागा साफ करायची व मग हा पायात खुडलेला काटा या चिमणीच्या उजेडात तासनतास काढत बसायचा उद्योग चालायचा...*
*एखाद्या छोट्या डब्यावर ती चिमणी ठेवून आम्ही अभ्यास करायचो,,,,,,डब्यावर दिवा ठेवला कि, डब्याच्या बाहेर कडेन बरोबर एक गोल काळी सावली तयार व्हायची---त्याच्या बाहेर आमची अभ्यासाची वह्या/पुस्तकं असायची...!!*
*रानातील ,वस्तीवरील लोकांकडे पण घराघरात हि चिमणी/बत्ती असायचीच....पण गोठ्यातील जनावरांना वाऱ्या-वावधानात ,पावसात चारा-पाणी करण्यासाठी किंवा गाईची धार काढण्यासाठी उजेड म्हणून या चिमणीचा वापर करणे धोक्याचे असायचे...एकदा वस्तीवरील एका शिंदे च्या माणसाकडून कडून जनावरांना वैरण काढताना दिवा खाली पडला अन उभी व्हळई धगधत पेटली...*
*यावर उपाय म्हणून आमच्या गुरुवारच्या बाजारात कंदील यायला लागले....चिमणी प्रमाणेच कंदिलात पण वात घालावी लागायची...त्यात पण रॉकेल घालायचं हे आमच्यासाठी त्यावेळी मोठं काम असायचं... या कंदिलाला बाहेरून काच असल्यामुळे वार्या-पावसात या कंदिलाचा उजेड जाण्याची किंवा कंदील विझण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या कंदिलाचा उपयोग अशा वार्या-पावसात मोठ्याप्रमाणात केला जायचा*
*आमचा मात्र कितीतरी दिवस अभ्यास चिमणीच्या उजेडात चालू होता....बाप त्याचं काम उरकलं कि झोपायचा ---माझा अभ्यास चालूच राहायचा...मग बाप माझ्या आईला म्हणायचा-:*
*”दिव्याची वात थोडी कमी कर गं...मला झोप येत नाहीये...”*
*मग बाई दिव्याची वात थोडी कमी करायची....*
मग मी बाईला म्हणायचो-:
*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...””*
*बाई पुन्हा दिव्याची वात थोडी मोठी करायची....*
बाप पुन्हा म्हणायचा----

..मग मी पुन्हा म्हणायचो –
*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...”*

*आमची बाई रात्रभर दिव्याची वात “खाली-वर.....वर-खाली” असं करत राहायची आमच्या दोघांच्या मध्ये ती त्या दिव्यासारखी जळत राहयची*
--- भाग-2 ---
*अंगणात बसून अभ्यास करायचा तर तिथे चिमणीचा उपयोग नसायचा....वाऱ्याच्या थोड्याशा झुळुकीने हि हि बत्ती/चिमणी विझायाची...पुन्हा पुन्हा पेटवायला लागायची--- यावर उपाय म्हणून माझ्या बापाने मग गुरुवारच्या बाजारातून एक कंदील विकत आणला..*
*कंदिलाची काच पुसणे हा तसा मोठा अवघड प्रकार.....रात्रभर कंदील जळत असल्याने---काचेवर त्या ज्योतीमुळे काळी कोजळी जमायची....ती काचेच्या आत कापड घालून पुसून स्वच्छ करावी लागायची....अशा वेळी बऱ्याच वेळा हात कापला जायचा...कापलेला भाग तसाच तोंडात घालून रक्त पिवून काच पुसण्याचं आमचं कसब दिवसेंदिवस वाढत गेलं....आणि काच लख्ख होवू लागली......!!*
*हा कंदील बऱ्याच वेळा मित्रांकडे अभ्यासाला जायला उपयोगी पडायचा...रात्रीच्या वार्यात कंदील विझत नसायचा... कंदिलाच्या सभोवताली बसून आम्ही मित्र अभ्यास करायचो...अभ्यास करताना या कंदिलाची एक गोष्ट आमच्या लक्षात आली कि--:*
*कंदिलाच्या जेवढं जवळ जाऊ तेवढी माझी सावली सावली मोठी व्हायची.....आणि जेवढे लांब जाऊ तेवढी माझी सावली लहान व्हायची.....कंदिलाच्या प्रकाशात हा खेळ बराच वेळ चालायचा....*
*हातात एक काठी आणि कंदील घेऊन गावातील/मळ्यातील लोक रात्री शेतावर,खळ्यात धान्याचं राखण करण्यासाठी जायचे.....घरापासून जवळच असलेल्या शेतात माळा राखण्यासाठीही गावातील बरेच जण कंदिलाचा उपयोग करत...*
*खतोड्याच्या मळ्यातील सुभा ....धाम्बोडी फाट्यावरील काही लोक इतरांच्या शेतात/मळ्यात शेळ्यां,मेंढ्यांचा तळ ठोकायचे,तेव्हा या शाळकऱ्याच्या घरून रात्री कंदिलाच्या उजेडात तळापर्यंत भाकरी यायच्या....कंदिलाच्या प्रकाशात वाटचाल करत तळावर जेवण्याचे दिवसही आता सरलेले आहेत*
*त्या काळी गणोऱ्यात रात्रीच्या वेळी खळवाडी वर पिच्चर असायचे---“एक गाव बारा भानगडी...सांगत्ये ऐका...चोरीचा मामला...सुशीला....आई कुणा म्हणू मी..??...थांब लक्ष्मी कुंकू लावते....” अशा पिच्चरच्या दवंडी गावात रानावनात पोहोचायच्या...मग रात्रीची जेवण लवकर उरकून हि मंडळी----:*
*-----:मळ्यातून,खतोडवाडी,.शिंदेवाडी,..पाटावरून ...पिंपळगावमधून बैलगाडीने लोक पिच्चर पाहण्यासाठी येत....बैलगाडीतून प्रवास करताना हमखास उपयोगी पडणारा हा कंदील,दोन बैलांच्या मध्ये जो जू असायचा त्याला अडकवलेला असायचा..... चांदण्या रात्रीच्या त्या प्रवासात खळंम खुळम्म असा बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाजात तो कंदील हि मागे पुढे हलायचा....*
*त्या हलत्या उजेडात रात्रीच्या वेळी रस्ता दाखवण्याचं काम तो कंदील इमाने इतबारे करायचा.... कंदील अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारा सर्वांचा सोबती होता*
*आता आमच्या गनोऱ्यात...वाडीवस्तीवर...शेतात..मळ्यात...महावितरणची वीज पोहचलीय......*
पण...???????
*गावच्या भूमीत,अन घरच्या अंगणात या चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत करत कुणी गायक, राजकारणी, समाजकारणी, पोलिस, चित्रकार, जादुगार,सैनिक,उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि उच्च पदावर गेले..... ग्रामीण भागातील आमच्या आनंदी पर्वातील हा कंदील अडगळीला गेला....*
*त्याची काच केव्हाच फुटून पडली...काही वर्षांनी दिवाळीची स्वच्छता करताना काच नसलेला हा कंदील तुम्हाला माळ्यावर/अडगळीत सापडेल----तेव्हा आमच्या जमान्यात हा एक ‘”कंदील”’ होता असं आपल्या लेकराबाळांना सांगावं लागेल*
[पोष्ट वाचून तुम्हाला तुमच्या बालपनाचा काचेचा ,पत्र्याच्या डब्याचा दिवा समोर दिसाया लागल्यास,किंवा तसा काही फील मिळाल्यास हि पोष्ट आपल्या मित्रपरिवार आणि इतर काही ग्रुपवर जरूर फोरवर्ड करावी..व इतरांनाही लॉकडाऊन च्या काळात आपल्या बालपणातील दिव्याची आठवण देवून बालपणाचा आनंद मिळवून द्यावा..]
तुमचाच
शब्दांकनकर्ता -:
*आहेर वसंतराव दिनकर*
*जादुगार सर*
*अकोले,अहमदनगर*
*मो-:9423387988*

No comments:
Post a Comment