*गोष्ट परीसासारख्या माणसाची....*
*आहेर वसंतराव दिनकर(जादूगार,सर)प्रस्तुत-:मो-:9423387988*
*गणोऱ्या चा परीस...9423387988…*
गावचा आधारवड--: भाग- *1* 2..3...4..5
[ *कै.पंढरीनाथ जिजाबा पा.आंबरे* ]
*अंबामातेची पवित्र नगरी अन आढळा माईचा काठ,या तीरावर वसलेलं गणोरे हे आमचं छोटंसं खेडेगाव..गावच्या चोहोबाजूंनी लाभलेलं निसर्गसौंदर्य ...गावात एकवटलेली बारा बलुतेदार जमात...पण या गावात जन्मलेली हाताच्या बोटावर मोजण्या इतकी,माणसं मात्र परिसा सारखी जगली..! आज गावची लोकसंख्या चार ते साडेचार ह्जार इतकीचं आहे*
*अज्ञान,अंधश्रद्धा आणि दारिद्र्यात पिचलेली माणसं घराघरात होती...अगदी किरकोळ गरजांसाठी संघर्षात जगणारी माणसं गणोऱ्या त एकवटलेली होती...सततचे कष्ट,मेहनत,रक्त आटेस्तोवर काम करून हि संसारात सुबत्ता येत नव्हती....पावसाच्या भरवश्यावर पेरणी करून आक्काशाकडे डोळे लावून बसलेल्या कष्टकऱ्याना तीन महिने काय खायचे याची भ्रांत असायची*
*याच अगतिकतेचा फायदा त्यावेळची सावकार मंडळी घ्यायची...पाऊस पाणी नीट पडला तर ठीक...नाहीतर याच जमिनी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजापायी सावकाराच्या घशात जायच्या...!!*
*हि गोष्ट आहे १९२०-२१ या स्वातंत्र पूर्व काळातली-आंबरे जिजाबा आणि बजुबाई हे आमच्या गणोरे गावचं गरीब जोडपं*
*त्यांना चार मुलं पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग आणि एक मुलगी--बागायती जमीन एक दीड एकर....पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग या चार मुलांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका,मुलं-मुली असं संसाराचा गाडा वाढत गेला—हाताची अन तोंडाची गाठ पडणं [पोट भरणं] मुश्कील होवून बसलं....खाणारी तोंड वाढतच होती.....*
*म्हणून वडिलांणी म्हणजे जिजाबांनी आपला मोठा मुलगा पंढरी याला आमच्या गणोरे गावचा मोहन दादा त्याचे वडील -किसन दळवी यांचा चुलत भाऊ सखाराम दळवी अशा एक दूरचे नातेसंबंध त्यावेळी पुण्याला होते-त्यांच्याकडे काहीतरी कामधंदा करावा म्हणून पंढरीला पुण्याला पाठवून दिले....*
*पंढरी पिळदार आणि चांगला धडधाकट शरीरयष्टीचा...पुण्यात पंढरी ला काय काम द्यायचे..?? असां पाहुण्यांना प्रश्न पडलेला —पंढरीचे शिक्षण चौथी-पाचवी पर्यंत झालेले...पण अक्षर मात्र मोत्यासारखे सुंदर...*
*पण मोठ्ठ्या आशेने पुण्यात आलेल्या पोराला काहीतरी कामधंदा मिळवून दिला पाहिजे म्हणून पाहुण्यांनी पंढरीला एका डाळमिल वाल्याकडे डाळीचे कट्टे उचलणे,त्याच्या थप्प्या लावणे,गाडीत माल भरने,तसा तो खाली हि करणे अशी कामे मिळवून दिली...*
*”चोरी-शिंदळकीची लाज असावी कामाची कासाली लाज” हि आईनं सांगितलेली उक्ती पंढरीच्या तनामनात भरली होती,म्हणून पंढरी हे हमालीचं काम देखिल मन लावून काम करू लागला...*
*त्याचं डाळमिलमध्येचं एक सदाशिव कोंडरे नावाचा,मावळ तालुक्यातील पोरगा पंढरी बरोबर हमालीचं काम करायचा...काम करता करता त्यांची छान मैत्री जमली होती...पण हा सदाशिव निरक्षर होता...पण त्यांची मैत्री अभेद्य होती*
*व्हायचं काय कि,कधी कधी डाळमिल वाल्या मालकाच्या गैरहजेरीत मालाची गाडी यायची मग पंढरीच त्या गाडीचे बिल बनवायचा... गाडी खाली करून घायचा..मालकाने विकलेल्या मालाची बिले अचूक करून द्यायचा...*
*मालकाने त्याची हि हुशारी पाहून एकदा जमाखर्चाची बिले पंढरीला करायला सांगितली-अगदी अचूक तयार केलेली बिले पाहून मालक आश्चर्यचकित झाला..त्यात पंढरीचे अक्षर एकदम सुंदर आणि मोत्यासारखे---या पंढरीच्या कामावर मालकाची मर्जी बसली. आणि डाळमिल वाल्या मालकाने पंढरीचे हमालीचे काम काढून घेतले व आर्थिक व्यवहाराचे काम पंढरीकडे सोपावले*
*आता पंढरीचे अनेक व्यापाऱ्यासोबात संबध येवू लागले..अन पंढरीला या धंद्यातील गणित समजले...माल कासा खरेदी करायचा.??तो मार्केटला कसा पाठवायचा..?? येथपासून ते डाळीची स्वच्छता ...माल भरणे ...ते मालाचा तेरीज ताळेबंद या साऱ्या गोष्टी जमायला लागल्या...पंढरी या कामात पारंगत झाला..!!*
*काही वर्ष काम केल्यानंतर एके दिवशी असंच गप्पा करता करता दादांनी आपला मित्र सदाशिव याला आपण स्वतंत्र डाळीचा व्यवसाय चालू करूया का..??हि कल्पना मांडली—सदाशिवला दादांचं व्यापारातलं कौशल्य एव्हाना कळालं होतचं.त्या रात्री दोघा मित्रांनी भागीदारीत डाळीचा व्यवसाय चालू करायच ठरवलं.दादांची टेकनिकल अक्कल हुशारी आणि सदाशिवचं भांडवल असं भागीदारीत धंदा चालू केला...*
पण काही वर्षातच जोमात चाललेला हा व्यवसाय-:
*तुझ्या भागभांडवला वर हा पंढरी नफा कमावतोय अशी कुणीतरी सदाशिव ला पिन मारली आण हां धंदा मोडीत काढला....*
पण????
*पंढरी आता हार मानणारा नव्हता...इतक्या दिवसाच्या अनुभवाची शिदोरी आणि केलेल्या बचतीच्या जोरावर पंढरीने पुण्यामध्येच एक पाच गुंठे मोकळी जागा असलेल तीन मजली घर भाड्याने घेतले....आणि स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली....*
*मोकळ्या जागेत तूर,मुग,मठ,हरबरा भिजवून वाळत टाकण्याची सोय केली आणि उर्वरित मोकळ्या जागेत हे धान्य भरडून त्यापासून डाळी तयार करण्याचं काम चालू केलं...घरच्या माणसांनी पंढरीला या कामात मदत केली अन अल्पावधीतच पंढरीचा धंदा जोमात सुरु झाला....*
*याच डाळमिलच्या धंद्याच्या जोरावर पंढरीने गनोऱ्याला गावाकडे बऱ्याचश्या शेतजमिनी खरेदी केल्या...व्यापार पण जोरात चालू होता...झालेल्या नफ्यातून गावाकडे जमिनी खरेदी चालूच होती असं करता करता पंढरीची गावाकडे गनोऱ्याला चालीस ते पन्नास एकर जमीन झाली... ...!!..धाकटा भाऊ लक्ष्मण जमीन कसू लागाला...त्याने हि भावाला साथ देत शेती सांभाळली.!!*
*हमाली करणारा पोरगा स्वताच्या स्वकर्तृत्वावर मालदार झाला होता...आता गावाकडे आणि पुण्यात सर्वजण पंढरीला “आंबरे पाटील” म्हणू लागले....लहान भाऊ पंढरीला दादा म्हणत-ते पाहून इतर लोक हि हळूहळू पंढरीला आंबरे दादा म्हणू लागले...अशा पद्धतीने ते नंतर साऱ्या गावाचे पुणेकर/आंबरे पाटील/दादा म्हणून नावारुपास आले*
*एक दिवस दादांना पुण्यात समजल कि दातारांच्या अन काही आंबरेच्या जमिनी शेतकऱ्यांच्या अज्ञानापायी सावकाराने हडप केल्यात ...त्या रात्री दादांना निट झोप आली नाही—सलग आठवडाभर ते या विचाराने या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते...सारा गाव मला दादा म्हणतोय,अन मी मात्र माझ्या या गावातल्या लहान भावंडाच्या जमिनी सावकाराच्या घशात जाताना ऐकतोय....*
*आणि एक दिवस दादांनी पुणं सोडण्याचा निर्णय घेतला....निव्वळ निर्णय घेवून ते थांबले नाहीत—तर आपल्या दोन पुतण्यांच्या ताब्यात डाळमिलचा धंदा सोपवून लगेच बैलगाडीने त्यांनी गावाकडची गणोऱ्याची वाट धरली....!!*
*पुण्यातील मित्र परीवाराने गावापायी स्व:ताचं वाटोळ करून घ्यायला निघाला म्हणून मुर्खात काढलं—पण दादांचा निश्चय पक्का झाला होता.....कारण पुण्यात आता त्यांना सुखाची झोप येणार नव्हती..!!*
*दादांच राहणीमान अगदी साधं होतं-दादांच्या मनावर त्यावेळी कॉग्रेसचा पगडा असल्याने,खादीचं धोतर,त्यावर खादीचाच शर्ट,डोक्याला खादिचीच टोपी,शर्ट वर घालायला कोट देखिल खादीचाच असायचा....इतके ते कॉग्रेसप्रेमी होते*
*कोणत्याही मोठ्ठ्या कामाची सुरुवात हि अगोदर बाळपावलाने होत असते हे दादांना स्वातंत्रपूर्व काळात माहित होते...त्याचीच नांदी म्हणून------:दादांनी गावात आल्या आल्या दादांनी बालपणीचे मित्र-सवंगडी,जवळचे नातेवाईक-काही प्रेमाची माणसं यांच्या सोबत चर्चा केली..आपलं गावाला परत येण्याचं प्रयोजन सांगितल....*
*तेव्हा महाराष्ट्रात कुठ कुठ सोसायट्या सुरु होत होत्या.पण आमच्या गावातील लोकाना याबद्दल काही माहित नव्हत—दादांनी सोसायटीच महत्व समजावून सांगत,सहकरी तत्वावर हि योजना गणोऱ्यात राबवण्याचं मनावर घेतलं....स्व:ता मोठी आर्थिक झळ सोसून परिसरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकऱ्याना नाममात्र फी भरून सभासद करून घेतलं....*
*आणि पहिली सहकारी तत्वावर चालनारी सोसायटी आमच्या गणोरे गावात अस्तित्वात आली.दादांनी गावासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल....आणि येथून त्यांनी गावच्या विकास कार्याला सुरुवात केली..!! आता गरीब शेतकऱ्यांना शेती,बी-बियाणं यासाठी सावकारावर अवलंबून राहावं लागणार नव्हतं...*
*सोसायटीतून अगदी अल्प व्याजदरावर कर्ज मिळण्याची सोय दादांनी करून दिली....गावातील हातावर-मोलमजुरी करणारी श्रमिक जनता यांचेसाठी किराणा माल व धान्य मिळण्याची सोय देखिल सोसायटीतच केली....वर्षाच्या आतच सहकारी तत्वावर एक कापड दुकान देखिल गावात चालू केले.......*
*आता अन्न/वस्त्र/निवारा या लोकांच्या मुलभूत गरजा गावातल्या गावात भागू लागल्या...आणि दादांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या सोसायटी ची ख्याती महाराष्ट्रात दूर दूर पसरली...*
*त्याकाळी गनोऱ्याच्या सोसायटी चा कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी व माहिती करून घेण्यासाठी एकदा मराठवाड्यातील एकशे तीस सधन-श्रीमंत शेतकरी तीन बस-गाड्या करून गणोऱ्याला आले होते..”अतिथी देवो भव:”या उक्तीप्रमाणे तेव्हा सर्वांच्या जेवणाची,चहा-पाण्याची अन मुक्कामची सोय दादांनी आपल्या गणोरे गावात केली होती...हि घटना १९५६ साली घडली..!!*
*पडत-धडपडत विकासाचं पहिलं बालपाऊल पाऊल पडल होतं...आता तोल सांभाळत सांभाळत दादांनी विकासाच्या मार्गावर चालायचं [गावाला न्यायचं]ठरवल होतं.....!!*
क्रमशः....
[पुढील भाग सलग चार दिवस ठीक एक वाजता पोस्ट केले जातील.-]

No comments:
Post a Comment