Wednesday, January 9, 2013
राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते आपल्याकडे देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ मोठ्या प्रमणात लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत .परदेशात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण तरुणीपासून गावाकडे रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या निरक्षर खेडूतापर्यंत येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन वृद्धीसाठी ,विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध असलेल्या अकोलेसारख्या तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन संस्कृती म्हणून जे काय असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे. अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी कळसुबाई तिलाच बिलगून असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची अज्यास्र पर्वत रांग .दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा ,पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड ,आणि निरनिराळ्या ऋतूत निसर्गाच्या सोहळ्याचे दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात धडकी भरविणारा आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश् वर ,टाहकरी ,शिध्देश्वर ,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा सारखे जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे भंडारदरा ,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा फिरणारी पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी कितीतरी .....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी होतं ,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते या जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते ते म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची पारणे फेडते . वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश फुले उधळीत असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो . पान २-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची सोय असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या बक्षी गव्हाला कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित प्रयत्न आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ शकेल

| 165963_297529893677844_1532792014_n.jpg 60K View Share Download |
| 248122_278793668884800_785888078_n.jpg 59K View Share Download |
| 396819_297531140344386_1296413035_n.jpg 8K View Share Download |
| 532592_297529397011227_1547551602_n.jpg 121K View Share Download |
| 406266_297530867011080_596290816_n.jpg 109K View Share Download |
| 483931_297528770344623_1953136240_n.jpg 176K View Share Download |
| 553898_297530183677815_1295831983_n.jpg 144K View Share Download |
| 600904_278793578884809_745380916_n.jpg 38K View Share Download |
| 283637_297530703677763_1558550608_n.jpg 25K View Share Download |
| 577146_196144307186560_733894797_n.jpg 182K View Share Download |
| 314122_278793705551463_238120318_n.jpg 20K View Share Download |
| 542896_278794132218087_678979655_n.jpg 16K View Share Download |
| 582164_297530950344405_2107554930_n.jpg 111K View Share Download |
| 559306_297529530344547_2138290761_n.jpg 15K View Share Download |
Wednesday, January 2, 2013
राजूर (वार्ताहर )आदिवासी विभागासाठी २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात ४५२६.६७ कोटीची तरतूद करण्यात आली असून यापैकी ७५ टक्के रक्कम डिसेंबर अखेर खर्ची टाकण्यचा निर्णय जिल्हधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत झाला आहे असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड यांनी केले आहे .१७४१२चे.किलो मिटर क्षेत्रफ़ल असलेला अहमदनगर जिल्हा असून लोकसंख्या ४०.८९ लक्ष पैकी ३.०३लक्ष आदिवासी लोकसंख्या आहे .त्यात अकोले तालुक्याची आदिवासी लोकसंख्या १.२२लक्ष इतकी आहे .जिल्ह्यात प्रामुख्यानी महादेव कोळी ,ठकार ,भिल्ल .पारधी ह्या आदिवासी जाती आहेंत ,आदिवासी उपयोजना क्षेत्रात १२३ गावे माडा क्षेत्रात ८तर मिनी माडा २५ गावे आहेंत .आदिवासी उपयोजना अंतर्गत सन २०११-१२या वित्तीय वर्षात मार्च अखेर टीएसपी २५४६ लक्ष व ओटीएसपी १४९५.५३लक्ष असा एकूण सरासरी ९६ टक्के खर्च झाला आहे तसेच सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात टीएसपी अंतर्गत २९९४.४७लक्ष व ओटीएसपी अंतर्गत १५३२.२०लक्ष तरतूद उपलब्ध असून सर्व विभागांना माहे डिसेंबर २०१२ अखेर ७५टक्के खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेंत असेही प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड यांनी सांगितले ..राजूर प्रकल्पा अंतर्गत २५ शासकीय १५ अनुदानित आश्रम शाळा व २१आदिवासी मुलामुलीचे शासकीय वस्तीग्रह कार्यरत असून आज सध्यस्थितीत आश्रम शाळांमध्ये १३४८९ विधार्थी तर वस्तीग्र्हमध्ये १७३७मुले मुली शिक्षण घेत आहे . आदिवासी समाजासाठी विकेस २७५ (१)नुकलीयस बजेट योजनेंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात ,तसेच तेलपंप व एचडी पीई पाईप पूरवठ योजना राबवण्यात येत असून त्यमुळे आदिवासी समाजाचा आर्थिक स्थर उंचावत आहे.तसेच पारधी सामाज्यासाठी विशेस आराखडा असून त्यात प्रमुख्य्नी घरकुल योजना राबवण्यात येत असून स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत जमिनीचीही त्यांना वाटप करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शासनाने आदिवासी मुला मुलांसाठी इंग्रजी माध्यम आश्रमशाळा सुरु केल्या असून तसेच नामाकीत पब्लिक स्कूल मध्ये आदिवासी विधार्थ्यंसाठी सोय केली आहे त्यांचेवर शासन १००टक्के खर्च सदर संस्थाना देत आहे .आदिवासी विधार्थ्यांसाठी १०वि नंतर महा विधालय ,तंत्रशिक्षण ,कृषी अभियांत्रिकी ,वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्य वृत्ती योजना चालू आहे .आदिवासी वाड्या पाड्यातील ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत रस्ते ,समाजमंदिरे बाधण्यात येत आहेंत .त्याच प्रमाणे आदिवासी कुटुंबाना ग्यास ,महिला बचत गटांना रुपये १०,००० पर्यत आर्थिक सहाय्य देण्यात येते त्याच प्रमाणे ग्रेड ३व ४ बालकांचे पालकांना बुडीत मजुरी देण्याची योजनाही राबविण्यात येते .सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात नुक्लीयस बजेट अंतर्गत अनुक्रमे संगणक प्रशिक्षण ,वाहनचालक ,ताडपत्री पुरवठा ,शिवण यंत्र पुरवणे ,शेती अवजारे पुरविणे ,टिन पन्हाळी पत्रे पुरवठा करणे ,वैध्कीय अभियान्त्र्की परिक्षा पूर्व प्रशिक्षण देणे इ .योजना प्रस्थवित आहेंत .तर क्वश्य्ल्य विकास अंतर्गत अकुशल लाभार्थ्यंचे कव्श्य्ल्य विकशित करण्याच्या दृष्टीकोनातून विविध प्रकारचे प्रशिक्षण ,मोबाईल रिपेरिंग ,वीज तंत्र ,गवंडी काम ,वेल्डिंग ,कार पेंटर ,रंगारी काम,लोहारकाम ,कलाकुसरीचे दागिने तयार करणे ,पॉली हाउस मधील शेती करण्याचे प्रशिक्षण ,शेत तळ्यातील मत्स्य व्यवसाय ,बंधीस्थ शेळी पालन ,रोपवाटिका तयार करणे ,मार्केटिंग ,इत्यदी असे ६० विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्थ्वीत असून त्याचप्रमाणे विकेस अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन ,विहिरीत बोर घेणे ,परसबाग लागवड ,टूब वेल बसविणे ,किचन गार्डन आणि स्ट्रोब री नर्सरी उभारणे ,गांडूळ व सेंद्रिय खत तयार करण्याचे प्रशिक्षण ,दर्जेदार फाल्भाजीपाल्यासाठी शेड नेटची उभारणी करणे अशा विविध प्रकारच्या योजना प्रस्थ्वीत असून या कामासाठी शासन ,आदिवासी विकास मंत्री ,आमदार मधुकरराव पिचड यांचे मार्गदर्शन मिळते असे हि प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड म्हणाले
Saturday, December 29, 2012
आदिवासींची होळी
सातपुड्याच्या बलाढ्य पर्वतरांगेने वेढलेल्या बिलगावातल्या (ता.धडगाव, जि.नंदुरबार) माळावर भलीमोठी होळी रचली आहे. दोन थाळ्याचा मोठमोठमोठ्याने गजर सुरु होतो. डफ- डमरू अन खंजिरी या चर्मवाद्यांच्या साथीला पायात बांधलेले चाळ, कमरेला गुंडाळलेल्या घुंगरमाळाच्या आवाजातून निर्माण होणा-या नादमधूर संगीताच्या तालावर पारंपरिक वेशभूषा केलेले आणि मुखवटे घातलेले आदिवासी होळीभोवती फेर धरून बेभान होऊन नाचताहेत......
बुंध्या आणि बाव्यांनी नाचताना आकार घेतलेल्या वर्तुळाच्या आत राई, घोडीवाला, निस्क्या आणि उग्रवण्या व व-हाडी यांच्यातले युद्ध रंगले आहे! सातपुडाच्या अजस्र पर्वतरांगांच्या कुशीतल्या द-याखो-यातील रानवाटा तुडवित तेथे जमलेल्या शेकडो आदिवासींसह देश-परदेशातून आलेले पाहुणे आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेचा हा चित्तवेधक आविष्कार ' याची देही याची डोळा... ' अनुभवताहेत.....
नर्मदा खो-यातील आदिवासींमधील पावरी, बिलाली, तडवी, पाडवी, वसावे या जमाती मूर्तीपूजा मानत नाहीत. त्यामुळे त्यामागुन येणारे कर्मकांड आणि इतर थेरांना येथील आदिवासींच्या जीवनात काडीचेही स्थान नाही. मात्र असे असले तरी त्यांचे भरण - पोषण करणा-या निसर्गाविषयी त्यांच्या अंतःकरणात नेहमीच कृतज्ञेचा भाव असतो. कोणत्याही अदृश्य शक्तींवर विश्वास न ठेवणारे आदिवासी बांधव निसर्ग देवतेची मनोभावाने उपासना करतात. येथील श्रद्धाळू आदिवासींच्या जीवनात अग्नीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निसर्गदेवतेचे आपत्य आणि पंच महाभूतांपैकी एक असलेल्या अग्निविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होळीच्या दिवशी सारे आदिवासी आबालवृद्धांसह एकत्र जमतात. अतिशय उत्साही वातावरणात साजरा होणारा हा केवळ एक सण उरत नाही तर आदिवासी लोककला आणि संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडविणारा तो सांस्कृतिक उत्सवच होतो.
येथील आदिवासी मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असलेल्या या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. आपल्याकडे मोठ्या धामधुमीत साजरे होणारे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे त्यांच्या गावी नाहीत. देवदिवाळीसारखा एखादा - दुसरा सण असतो. परंतु होळीच्या सणाचे आदिवासींच्या जीवनात आगळेच महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी लोक अतिशय आनंदभराने हा सण साजरा करतात. मूर्तिपूजेचे थोतांड आणि कर्मकांडाला थारा न देणा-या आदिवासी जमातींच्या काही श्रद्धा आणि परंपरा मात्र होळी उत्सवात जरूर गुंफल्या आहेत.
वर्षभरात कोणी आजारी झाले एखादा बाका प्रसंग आला की, कुटुंबातील मुखिया [प्रमुख] अग्नीला साक्षी ठेवून नवस करतो. नवसाची फेड करण्यासाठी म्हणून कुटुंबातील लहान मोठा पुरुष पारंपरिक वेशभूषा करून उत्सवात सामील होतात. एखाद्या थोरल्या माळावर मोठी होळी रचली जाते. जंगलाचे राजे असलेल्या आदिवासींचे त्यांचे भरण-पोषण करणा-या जंगलावर भारी प्रेम असते. होळीसाठी निर्दयीपणाने ते वृक्षांची कत्तल करीत नाहीत. वाळलेल्या झाडांची तसेच निरुपयोगी लाकडे होळीला आणली जातात. अत्यंत पवित्र झाडाचे स्थान असलेल्या उंचच उंच बांबूची काठी होळीच्या मध्यभागी उभी करतात.
डोंगर कपारीतल्या वाड्या-पाड्यांवरून ढोलवाले नाचाणा-यांचे जत्थेच्या जत्थे तेथे दाखल होतात. एका जत्थ्यात २५ पासून ५० जणांचा समावेश असतो. प्रत्येक जत्थ्यातील पात्रे सारखीच असतात. परंतु त्यांची वेशभूषा आणि सजावट अत्यंत देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तिला एक आदिवासी संस्कृतीचा अस्सल बाज असतो.
बुंध्या, बावा, निस्क्या, उग्रवण्या, राई आणि घोडीवाला ही या पथकातील प्रमुख पात्र. राईच लग्न घोडीवाल्याशी ठरलेलं असतं. लग्नाला जमलेली व-हाडी मंडळी आनंदाने नाचत असतात. परंतु निस्क्या या खलनायकी पात्राला हे लग्न मान्य नसतं. म्हणून तो या लग्नात सारखी विघ्न आणीत असतो. राई आणि तिला साथ देणारी व-हाडी मंडळी यातून मार्ग काढीत पुढे जात राहतात. या टिचभर कथानाकाभोवती हा नृत्य-संगीताचा आविष्कार फिरत राहतो. राईची भूमिका पुरूषच करतात. नृत्य पथकांत स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अनेक तरूण मुली आपापल्या परीने विशिष्ट पद्धतीने होळीभोवती फेर धरून नाचत राहतात.
राईच्या लग्नात निस्क्याचं विघ्न आणि त्यामुळे त्यांच्यात युद्ध सुरु असताना संख्येने जास्त असलेले व-हाडी मंडळीतील बुंध्या आणि बावाभोवती गोल रिंगण करून नाचत राहतात. सर्व बुंध्यांनी डोक्यावर मोरपिसांची छानदार टोपी घातलेली असते. कमरेभोवती गुंडाळलेल्या पटकु-यावर घुंगरमाळा बांधलेल्या असतात.त्यचा नादमधुर आवाज सुरु असतो. हातात डफ, डमरू व खंजीरीसारखे चर्मवाद्य अथवा बासरी (पवा) असते. सर्वांगावर विविध रंगांचे गोल चितारलेले असतात. तर बावांनी बांबूपासून तयार केलेल्या उंच टोपीला रंगीबेरंगी कागदांनी सजविलेले असते. कमरेभोवती भोपळे गुंडाळलेले असतात. आणि गळ्यात रुद्राक्ष आणि इतर मोठ्या मण्यांच्या माळा घातलेल्या असतात. अष्टगंधांच्या रेषांनी सारे अंग रंगविलेले असते. निस्क्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या हातात तलवारी धनुष्यबाण भाला यासारखी आयुध असतात. हा नाच चालू असताना उग्रवण्या हे पात्र प्रेक्षकांकडून कलेचं मोल वसूल करण्यात गुंतलेले असते.
निस्क्या उग्रवण्या, राई घोडीवाला या पात्रांनी अत्यंत देखणे मुखवटे घातलेले असतात. बावा आणि बुंध्या नाचताना कमरेला असे झटके देतात की त्यातून कमरेभोवती गुंडाळलेल्या घुंगरमाळा आणि भोपळ्यामधील बियांचा नादमधुर आवाज ऐकायला येतो पात्रांची वेशभूषा त्यांची सजावट आणि अत्यंत वेगवान हालचालीसह देहभान विसरून नाचणारे आदिवासी त्याला ढोल,थाळ्या तसेच इतर वाद्यांची मिळालेली साथ त्यामुळे स्थानिक बायाबापडे आणि लहान पोरासोरांसह हा उत्सव अनुभवण्यासाठी मुद्दामहून आलेले लाओ जिओ (इटली ) ब्रॅडमन (लंडन ) यांच्यासारखे परदेशी पाहुणे तसेच प्रांतीय अस्मितेची जोखड बाजूला सारून विविध राज्यांतून आलेले स्त्रिया पुरुषदेखील या उत्सवात सामील होऊन आदिवासींच्या साथीने ताल धरतात, नाचू लागतात. शेकडोंच्या संख्येने जमलेले लोक विस्मयचकित मुद्रेने लोकनृत्य संगीताचा आनंद लुटत असतात. सर्व वाद्यामध्ये ढोलावर आदिवासींचे विशेष प्रेम जडलेले आहे. ते इतकं की ढोल वाजू लागला की, आदिवासींच्या जणू अंगात येतं मागच्या महिन्यात एका गावात 'तारे जमीन पर ' हा हिंदी सिनेमा आणला होता. सिनेमा सुरु असताना कुठेतरी ढोल वाजू लागला. एकेक करीत सारी तरणी पोर तिकडे नाचायला गेली, असे हे त्याचे वेडे ढोलप्रेम ! मनोरंजनाची कृत्रिम साधनं येथील आदिवासींपर्यंत अजून पोचलेली नाहीत. परंतु त्यापुढे जाउन 'इको फ्रेंडली' पद्धतीनं जगणा-या आदिवासींना ही कृत्रिम साधनं भुरळ घालू पाहत नाहीत, हेही वास्तव हटकून सामोरं येतं. त्यातूनच होळीसारख्या उत्सवाच म्हणा किंवा त्यांच्या ढोलप्रेमाचं त्यांच्या जीवनातील महत्त्वदेखील अधोरेखित होतं.
रात्री १० वाजता नृत्योत्सवास सुरुवात झालेली असते. पहाटे होळी ढणाढणा पेट घेते, तेव्हा तर या उत्सवाचा क्लायम्याक्स होतो! पथकातील सारेजण अंगात वारं संचारल्यागत नाचू लागतात. रात्रभर नाचाल्यामुळे थकवा आल्याचा लवलेश कुठ दिसत नाही. प्रत्येक पथकाचं आपलं वेगळं रिंगण. ते रिंगण भले अन ते भले ! बेभान होऊन नाचणा-यांच्या अंगातून घामाच्या सहस्त्रधारा पाझरत राहतात. परंतु मोहाच्या फुलांच्या रसाची 'झिंग' अजूनही उतरलेली नसते!
सकाळी सूर्योदयाच्या साक्षीने या नृत्योत्सवाची अखेर होते. रात्रभर ढोल बडविल्याने ना ढोलकऱ-यांची बोटं दुखू येतात.... ना नाचणा-यांचे पाय थकतात. ना पाहणा-यांचे कान, डोळे तृप्त होतात. आगळावेगळा सांस्कृतिक उत्सव पाहायला मिळाल्याचा आनंद पाहुण्यांच्या चेह-यावर विलसत असतो. जागरणामुळं येणारा थकवा, कंटाळा कुठल्या कुठे पळून गेलेला असतो.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या लोककलाकारांच्या कलेला दाद देतात. प्रत्येक ढोलाक-याला पुढे बोलावून पाहुणे मंडळीच्या हस्ते त्यांचा सत्कार करून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. कला- संस्क्रूतीच्या जपवणुकीबरोबरच न्याय हक्कांसाठी लढत राहण्याचे आवाहन आणि निर्धार मेधाताई व्यक्त करतात. 'झिंदाबाद ', ' लढेंगे, जितेंगे...!' च्या घोषणा सातपुड्याच्या पर्वतरांगेत घुमतात. जमलेले आदिवासी आता डोंगर कपा-यात वसलेल्या वाड्या-पाड्यांच्या दिशेने चालू लागतात. काही मैलांची पायपीट करून द-याखो-या तुडवत त्यांना त्यांच्या घरट्याकडे पोचायचे असते...

Subscribe to:
Posts (Atom)