Wednesday, January 9, 2013


राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते आपल्याकडे देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ मोठ्या प्रमणात लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत .परदेशात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण तरुणीपासून गावाकडे रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या निरक्षर खेडूतापर्यंत येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन वृद्धीसाठी ,विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध असलेल्या अकोलेसारख्या तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन संस्कृती म्हणून जे काय असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे.     अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी कळसुबाई तिलाच बिलगून असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची अज्यास्र पर्वत रांग .दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा ,पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड ,आणि निरनिराळ्या ऋतूत निसर्गाच्या सोहळ्याचे  दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात धडकी भरविणारा आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश्वर ,टाहकरी ,शिध्देश्वर ,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा सारखे जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे भंडारदरा ,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा फिरणारी पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी कितीतरी .....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी होतं ,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते या जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते ते म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची पारणे फेडते . वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश फुले उधळीत असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो .    पान २-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात  अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल
14 attachments — Download all attachments   View all images   Share all images  
165963_297529893677844_1532792014_n.jpg165963_297529893677844_1532792014_n.jpg
60K   View   Share   Download  
248122_278793668884800_785888078_n.jpg248122_278793668884800_785888078_n.jpg
59K   View   Share   Download  
396819_297531140344386_1296413035_n.jpg396819_297531140344386_1296413035_n.jpg
8K   View   Share   Download  
532592_297529397011227_1547551602_n.jpg532592_297529397011227_1547551602_n.jpg
121K   View   Share   Download  
406266_297530867011080_596290816_n.jpg406266_297530867011080_596290816_n.jpg
109K   View   Share   Download  
483931_297528770344623_1953136240_n.jpg483931_297528770344623_1953136240_n.jpg
176K   View   Share   Download  
553898_297530183677815_1295831983_n.jpg553898_297530183677815_1295831983_n.jpg
144K   View   Share   Download  
600904_278793578884809_745380916_n.jpg600904_278793578884809_745380916_n.jpg
38K   View   Share   Download  
283637_297530703677763_1558550608_n.jpg283637_297530703677763_1558550608_n.jpg
25K   View   Share   Download  
577146_196144307186560_733894797_n.jpg577146_196144307186560_733894797_n.jpg
182K   View   Share   Download  
314122_278793705551463_238120318_n.jpg314122_278793705551463_238120318_n.jpg
20K   View   Share   Download  
542896_278794132218087_678979655_n.jpg542896_278794132218087_678979655_n.jpg
16K   View   Share   Download  
582164_297530950344405_2107554930_n.jpg582164_297530950344405_2107554930_n.jpg
111K   View   Share   Download  
559306_297529530344547_2138290761_n.jpg559306_297529530344547_2138290761_n.jpg
15K   View   Share   Download  

No comments:

Post a Comment