Wednesday, January 30, 2013

राजूर (वार्ताहर) अकोले तालुक्याचे भूमिपुत्र आदिवासी ,दलित,इतर मागासवर्गीय व बहुजन समाजाचे आधारवड कै .यशवंतराव भांगरे याचा ३१वा पुण्यस्मरण दिन आज होत आहें .ते सतत १५ वर्षे अकोल्याचे आमदार होते शरद पवार पासून यशवंतराव चव्हाण पर्यंत त्यंचे स्नेह भावाचे सबंध होते .अकोले तालुक्याचा विकास व्हाव्हा या तळमळीतून अगस्ती सहकारी साखर कारखाना ,अगस्ती शिक्षण संस्था यांची मूर्थ म्हेढ रोवली ते अजात  शत्रू वेक साधे भोळे व पारदर्शक व्यक्तिमत्व सर्व दूर परिचित आहे.
                                  आभाळाएवढ मन , अतथ्यशीलता  व  अगत्य याला मोजायला  कळसुबाईची मोजपट्टी थिटी ठरावी . माणसामध्ये देव पाहणारा आणि   राजकारणापलीकडे  समाजकारण करणारा ,वर्तनात भंडारदर्याच्या नितळ पाण्याचा पारदर्शीपणा जपणारा चाळीसगाव डांगणचाच नव्हे तर उभ्या नगर जिल्ह्याच्या भाबडा वतनदार म्हणून ज्यांनी लौकिक प्राप्त  ते अकोले तालुक्याचे भूमिपुत्र दिवंगत नेते यशवंतराव सखाराम भांगरे यांचे वर्णन म्हणजे 'यासम हा' असेच करावे लागले.
                                  वारसाने वतनदारी अथवा मालमत्ता मिळते . परंतु ती टिकवून ठेवून आपल्या  कर्तुत्वाची अमित चाप पाडणे प्रत्येकालाच जमत नाही .मात्र हे काम यशवंतराव भांगरे यांनी केले . चुलते गोपाळराव यांच्यानंतर तालुक्याचे आमदार म्हणून तीनदा मान त्यांना मिळाला . तथापि 'उतणार नाही , मातणार नाही ' हे असीम निष्ठेचे समाजसेवेचे व्रत त्यांनी  जपले आणि  श्वासापर्यंत    ते निभावले .
                             
     अजातसूत्र , निगव्री आणि भाबडेपणा जपणाऱ्या यशवंतराव भांगरे यांनी १९६२ सालची विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यांचे मान्सामान्सांचे नाते अधिक   व्यापक बनले  . आपल्या समाजसेवेचे परीघ त्यांनी अधिक व्यापाक बनविला . तत्कलीन केंद्रिय मंत्री यशवंतराव  चव्हाण यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली आणि त्या काळच्या मुख्यमंत्र्यांकडे  आपल्या आदिवासी बांधवांच्या समस्यांची मांडणी त्यांनी केली .
                                    खासगी सावकारशाही म्हणजे स्थानिकांचा आंत घेणारा प्रश्न त्यांनी विधानसभेत 'तारांकित प्रश्न 'बनविला .विधानसभेत त्यवर चर्चा झाली .खासगी सावकारशाही ला छेद देण्यासाठी "पालेमोड योजना "तेव्हा अस्थित्वात आली आणि आदिवाशीच्या शिरावरचा मोठा बोजा खांदयावर आणण्याचे काम त्यंनी केले .१९६७ साली त्यांन सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले .मात्र त्यांनी त्य्बाबत कधीही नाराजी व्यक्त केली नाही .आपल्या विरोध्कावारही प्रेम करणारा माणूस अशी त्यंची सामभोधना होत असे १९७२ साली पुन्हा ते निवडून आले त्यवेळी प्रवरा नदीवर त्यांनी पूल बांधला त्यवेळी यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. १९७७ सालच्या आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत अनेक दिग्गज पडले मात्र या बुमिपुत्राला अकोल्याच्या जनतेनी निवडून दिले ते मनानी मोठे व निर्मळ होते बी.के देशमुख कामुनिष्ट पक्ष्यचे उमेदवार होते व भांगरे कॉंग्रेसचे उमेदवार त्यवेळी फारशी साधने नवती सायकलवर प्रवास असे .त्यवेळी विडी कामगार जॆनुधिन शेख डागण भागात प्रचार कणसाचा करून आले .शेंडी येथे आल्यवर जेवण कुठे घेणार हा प्रश्न होता त्यवेळी आमदार भांगरे तेथून जात होते त्यंनी  अस्थेणी चौकशी केली व त्यांना जेवण दिले .विरोधकांच्या सायकली अकोल्याकडे जाताना विळा कणसाचे झेंडे केव्हाच गळून पडले होते माणुसकीचे झेंडे मनात उभारले गेले होते आणि विनाय्शिल्तेने एक धगधगते राजकीय व्यास्पिठ्ठी जिंकले होते तीच पद्धत आज हि अशोकराव भांगरे आचरणात आणत आहेंत .विरोधक आपले मित्र समजून ते त्यंचे कुटुंब काम करतात .भांगरे कुटुंबियाचे हे आदर तिथे कायम टिकून आहे.अकोल्याच्या मातीशी इमान राखणारा भूमिपुत्र ३१ जानेवारी १९८२ रोजी काळाच्या पडद्याआड गेला आज त्यांची ३१ वि स्मरण यात्रा आज हि अशोकराव भांगरे व त्यंचे कुटुंबीय चालू ठेऊन एक आदर्श निर्माण करीत आहेत ,..........

No comments:

Post a Comment