Sunday, January 13, 2013

राजूर (वार्ता हर )प्रत्येक माणसाच्या अंत:करणामध्ये दैवी अंश आहे, या उपनिषदांतील सिद्धांतावर स्वामी विवेकानंदांची श्रद्धा होती आणि त्या ईश्वरी अंशाला जागे करणे तसेच जगामध्ये होणाऱ्या ईश्वरी आविष्काराचा आदर करणे कसे आवश्यक आहे, हाच त्यांचा भाषणांचा हेतू असे प्रतिपादन डॉक्टर गजानन दादा शास्री यांनी राजूर येथे बोलताना केले .राजूर येथे श्री स्वामी समर्थ संस्था व संताजी मित्रमंडळ प्रतिष्टान यांच्या सयुंक्त विध्येमाने युगपुरुष स्वमिविवेकानंद यांची १५०वि जयंती संताजी चौक येथे संपन्न झाली .यावेळी बुलढाणा येथील प्रशिद्ध कीर्तनकार डॉक्टर गजानन दादा शास्त्री महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी कन्या विध्य्लाय ,मधुकरराव पिचड माध्यमिक विध्य्लाय ,कनिष्ट महाविध्य्लाय सर्व क्रीडा मंडळ,सामाजिक संस्था ,वीज कंपनीचे सह्यक कार्यकारी अभियंता सचिन पवार ,पत्रकार संघाचे अद्य्क्ष श्रीनिवास एलमामे ,सचिव शांताराम काळे ,देविदास शेलार ,भरतराव सावंत ,श्रीराम पन्हाळे नामदेव घाटकर ,उपस्थित होते प्रस्थ्विक पत्रकार शांताराम काळे यांनी केले .प्रसंगी बोलताना डॉक्टर शास्री म्हणाले स्वामी विवेकानंद हे युग पुरुष होते स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलुमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथी सुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली.विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ""माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
स्वामी विवेकानंद ख्रिश्चन धर्मावर टीकाही करतात आणि दुसऱ्या बाजूला येशू ख्रिस्तांविषयी अतिशय आदरानेही बोलतात. ख्रिस्ताने ग्रीस आणि रोम यांचा विध्वंस केला, असेही स्वामीजी दाखवून देतात. येशू ख्रिस्त आणि ख्रिश्र्चन धर्म यांच्याविषयी स्वामीजींनी जे काही म्हटले आहे, त्याचा संदर्भ सोडून विचार केला तर त्या म्हणण्यात विरोधाभास आहे असे दिसेल. त्यांनी ही विधाने कधी केली आहेत आणि कशाच्या संदर्भात केली आहेत, हे तर पाहणे गरजेचे आहेच, पण ते कोणासमोर बोलत होते, त्या श्रोत्यांची वैचारिक, आध्यात्मिक पातळी कोणती होती आणि त्यांनी ती विधाने कोणत्या परिस्थितीत केली आहेत? हेही पाहणे गरजेचे आहे.असेही शास्री म्हणाले विधार्थ्यानी रोज आपल्या आई,वडलांचे दर्शन घ्यावे व महिलांनी "आनंद मयी ,च्यैतन्यमयि ,सत्यमयी ,परमेह हा मंत्र म्हणावा यावेळी जगताना कसे हस्त्मय व आनंद मय जगवे याची उदाहरणे दिली २ तास हे व्य्ख्यान चालू होते सूत्र संचालन किरण भागवत तर आभार उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मानले ....शांताराम काळे 

No comments:

Post a Comment