Sunday, January 20, 2013

rajur vikas

राजूरला आदिवासींचे आदर्श केंद्र करण्याचा महिला सरपंचांचा प्रयत्न           राजूर (वार्ताहर )आदिवासी ७० गावांचे मुख्य केंद्र असणार्या राजूर गावच्या महिला सरपंच सौ .हेमलाताताई पिचड यांनी राजूर -कोल्हार घोटी रस्त्यवर १५हजारपेक्षा अधिक झाडे लाऊन संपूर्ण महिला वर्गासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.मात्र शासन कर्ते व वन दूत असणारे वनखाते मात्र याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.कळसुबाई-हरिचंद्र  अभयारण्य कार्य्लायासामोर वृक्ष लागवड होत असताना त्या झाडांचे साधे सरक्षण करणे दूरच त्या संधर्भात मार्गदर्शन देखील हे खाते करीत नाही त्यमुळे नाराजी व्यक्त होत आहे.सुंदर गाव ,हरित गाव अशी राजूरची वेगळी ओळख लवकरच निर्माण केली जाईल .यथील शिक्षण व्यवस्था शसक्त व गुंवातापूर्ण व्हावी असा सौ हेमलाताताई पिचड यांचा प्रयत्न आहे.वन ख्त्यासारख्या सरकारी यंत्रणांनी यात सहभाग नोदवावा हि माफक अपेक्षा आहे.
                  आदिवासी समाजाकरिता शासनाने व्यक्तीगत व सामाजिक हिताच्या योजना कार्यन्वित केल्या ; मात्र समाजात व्यसनाधीनता असल्याने त्या योजना चांगल्या प्रकारे उपयोगात येत नव्हत्या . प . पु.गगनगिरी महाराज भक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ,अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करून समाजातील व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न व प्रबोधन सुरु केले . दारूबंदीसाठी मोठी लढाई करावी लागली .यासाठी  हायकोर्टापर्यंत संघर्ष करावा लागला . महिलांच्या , कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने तालुक्यातील बहुसंख्य गावांतील दारूबंदीचे ठराव करून शासनाला सादर केले  आहेत . गृहमंत्री  आर . आर .पाटील यांनी  तर त्याचा ' राज्यातील सर्वात मोठा दारूबंदी ' असा उल्लेख केला होता.
                     आदिवासी भागातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हाव्यात , यासाठी  शेकडो महिला बचातगटांच्या साक्षामिकरणासाठी  अनेक मेळावे घेतले . त्यांना आर्थिक मदत मिळून देणे ,उद्योग - व्यवसाय करण्यासाठी बँकेतून कर्जाची मदत मिळून देणे,पापडासारखे छोटे रोजगारपूरक  व्यवसाय आदिवासी भगात महिलांसाठी सुरु करण्याचा मानस आहे . महिलांचे आरोग्य , शिक्षणाबाबत जाणीव - जागृती निर्माण करण्यासाठी शिबिरे, वर्कशॉप  घेतले जातात.  
                     तरुणांसाठीही विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे,त्यांना एकलव्य संस्थेमार्फत व्यवसाय व नोकरी मिळून देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे . सरपंच या नात्याने राजुर्सारख्या मोठ्या गावाचे आव्हात्मक काम हाती घेतले आहे . या गावाचे राज्यात वेगळी  ओळख निर्माण व्हावी , यासाठी प्रयत्नशील आहे . ग्रामपंचायतींचे कारभार संगणकीकृत करून सर्व कारभार पारदर्शक करण्याचा मनोदय आहे . येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू राहून सर्व ग्रामस्थांना शुद्ध पेयजल नियमित देण्याचा प्रयत्न आहे.

                     वृक्षसंवर्धनाचे काम मोठे आहे . यामध्ये सर्व गावाचे सहकार्य महत्वाचे आहे . आम्ही गावातील घाणीच्या ठिकाणी जेसीबीचा वापर करून शेकडो ट्राक्टर घन फेकली आहे . प्लास्टिक पिशवी ,गुटखा व समाजविघातक गोष्ठी नियंत्रणात आणत   आहोत . सुंदर गाव, अशी राजूरची वेगळी ओळख लवकरच निर्माण केली जाईल , येथील शिक्षणव्यवस्था सुद्रुध व गुणवत्तापूर्ण व्हावी , असा प्रयत्न आहे .
                     
                      राजूर हे आदिवासी भागाचे मध्यवर्ती केंद्र आहे . हे केंद्र आदर्श करण्याचा मानस आहे . यामुळे हा संदेश सर्वत्र पोचून अन्य गावांतही हा आदर्श गिरवला जाईल . एकजूट , समान न्याय व जलद विकास करून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास घेऊन सातत्याने काम पुढे नेले जात आहे . यामध्ये उपसरपंच संतोष बनसोडे , सदस्य व कार्यकर्त्यांची साथ लाभली आहे .
picad tai.jpgpicad tai.jpg
157K   View   Share   Downl

No comments:

Post a Comment