Sunday, January 20, 2013

bhandardara vikas

राजूर (वार्ताहर)आदिवासी विकास योजनेच्या माध्यमातून अकोले तालुक्यासाठी विविध विकास कामासाठी ६३ कोटी निधी उपलब्ध असून मार्च अखेर हा निधी खर्च करावा असे सागतानाच  सरकारवर येथील गरीब आदिवासी शेतकर्याचे उपकार आहेंत ,भंडारदरा धरणातून आम्हाला  एक थेंब पाणी नको परंतु आम्ही उपलब्ध केलेल्या पाण्य्तून आदिवासी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेती व पिण्यासाठी उपसासिंचन योजनांना परवानगी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारवर दबाव आणू असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांनी भंडारदरा येथे बोलताना केले  शेंडी (भंडारदरा )येथे १२५ आदिवासी मुलींचे वस्तीग्रह ,ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत १५ लाख रुपयाच्या कॉंक्रिट करणाचे उधघाटन व राष्ट्रीय पेय जल योजनेच्या ६२ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार मधुकरराव पिचड यांच्या शुभहस्ते झाला .यावेळी वैभव पिचड ,अशोकराव भांगरे ,अर्थ,बांधकाम विभगाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे ,यशवंत आभाळे ,मीनानाथ पांडे,वसंतराव मनकर ,जिल्हा परिषद सदस्य सौ सुनिता भांगरे,सभापती श्रीमती अंजनाताई बोंबले ,दिलीपराव भांगरे,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड ,सरपंच सौ संगीता भांगरे,विजय भांगरे ,दिलीप बागडे उपस्थित होते .प्रस्थ्विक प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड यांनी केले प्रसंगी अशोकराव भांगरे यांनी पर्यटन वाढून त्यामाध्यमातून रोजगार निर्माण व्हाव्हा व केरळ राज्य सारखे कृषी पर्यटन झाल्यास आदिवासी शेतकऱ्याला हातला काम मिळेल ,भंडारदरा पाणलोट क्षेत्रतिल ९ गावांना उपसासिंचन माध्यमातून पाणी मिळावे .पिचड साहेबांनी भंडारदरा गावासाठी विकास कामाला निधी मिळून दिला त्यबद्दल श्री.पिचड यांचे आभार मानले.प्रसंगी बोलताना आमदार मधुकरराव पिचड म्हणाले आदिवासी सामाज्याने शिक्षण घ्यावे म्हणून आदिवासी योजनेतून मोठा निधी उपलब्ध झाला असून मुली शिकल्या तर त्या संपूर्ण समाज व कुटुंब साक्षर करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा त्यप्रमाणे आदिवासी सामाज्यानी कार्य करावे असेही पिचड  म्हणाले केळी रूम्हन्वादी ,कोहने ,मवेशी ,या आश्रमशाळा इमारतीसाठी प्र्तेय्की ३कोटी ६५ लाख तर पैठण,केळीकोतुल ,घाटघर यांना ४कोटी ८७लाख रुप्य्ये असे २६ कोटी उपलब्ध करण्यात आले असून ब्रिटीशकालीन रतनवाडी,कुमशेत रस्ता वनविभाग करणार आहे.पर्यटन विकासासाठी पर्यटन मंत्री छगन भुजबळ याच्यशी चर्चा करून निधी उपलब्ध केला जाईल तर माणिकडोह धरणास मंजुरी अंतिम टप्यात असल्याचे ते म्हणाले   पर्यटन महोत्सव शिवजयंती दिवशी पट्टा किल्ला येथे घेऊन वैभव ने शिवाजी महाराज पुतळा तयार करण्यासाठी दिला असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब उपस्थित राहतील   सूत्रसंचालन संदीप डगळे यांनी तर आभार दिलीप भांगरे यांनी मानले ...शांताराम काळे 
2 attachments — Download all attachments   View all images   Share all images  
DSCN1739.jpg DSCN1739.jpg
773K   View   Share   Download  
DSCN1746.jpg DSCN1746.jpg
745K 

No comments:

Post a Comment