राजूर
(वार्ताहर )पांजरे गावातील आदिवासी अबाल वृद्धांनी बालविवाह करणारनाही व
गावात,नातेवाईकांना करू देणार नाही व बालकांना मजुरी करू न देता त्यांना
शिक्षण देऊ अशी सामुदायिक शपथ गेतली यावेळी मोठ्या संख्येनी पालक ,विधार्थी
,ग्रामस्थ ,महिला,शिक्षक व सरकारी कर्मचारी उपस्थित होते .बालविवाह
कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी ,म्हणून अकोले तहसीलदार ,व सामाजिक संस्था
प्रयत्न करीत असून मुख्याध्य्पक सरसावले आहे. त्य्च्याच एक भाग म्हणून
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले पांजरे गावात सकाळी ९ वाजता माध्यमिक
विध्य्लाय पांजरे,जिल्हा परिषद शाळा ,व ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढली
यावेळी मोठ्या संख्येनी आदिवासी समाज ,उपस्थित होता.यावेळी श्रीसमर्थ
माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालय राजूर च्या प्राचार्या .सौ.मंजुषा काळे
,माजी मुख्यध्यपिका सौ.माधवी मुळे ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत
बांगर,पत्रकार शांताराम काळे ,पत्रकार कैलास शाह ,मुख्यध्यापक पांडुरंग
लांडगे ,मुख्यध्यापक बाळू दराने ,तलाठी सुकदेव कांबळे सरपंच युवराज उघडे
उपसरपंच कालू उघडे ,पोलिस पाटील लक्ष्मन उघडे गुंजाळ बी.दि.दशरथ उघडे
लीलाबाई उघडे ,बुधाबाई उघडे उपस्थित होते .प्रसंगी बोलताना प्राचार्या
सौ.मंजुषा काळे म्हणाल्या पुरुष प्रधान संस्कृती आत्ता विसरा महिलांनी व
मुलीनी आत्ता निर्णय प्रक्रियात येउन बाल विवाह होत असतील तर थांबवा
त्यसाठी महिलांनी शिकले पाहिजे त्यानंतर संघटीत होऊन संघर्ष करून बालविवाह
,बालमजुरी यासाठी कंबर कसून लढा द्यावा शासन व प्रशासन तुमच्या मागे खंबीर
पने उभे राहील असेही त्या म्हणाल्या .सरपंच युवराज उघडे यांनी व
मुख्यध्यापक पांडुरंग लांडगे यांनी पांजरे गावात व परिसरात बालविवाह होणार
नाहीत याची ग्वाही दिली .तर चौकट ......(शासनाचा हा कार्यक्रम असताना व
ग्रामविकास अधिकारी बालविवाह प्रतिबंधक समितीचा अध्यक्ष असताना हे अधिकारी
मात्र कार्यक्रमाकडे फिरकले नाही त्यमुळे सरपंच व उप्स्थ्तीतानी बालविवाह
समिती नियुक्त केली )तर महिला व ग्रामस्थांना सौ.मंजुषा काळे यांनी
....आम्ही गावकरी प्रतिज्ञा करतो कि ,आमच्या कुटुंबातील ,नातेवाईक ,गावातील
कोणत्याही १८ वर्षाखालील मुलीचे व २१ वर्षाखालील मुलाचा विवाह होऊ देणार
नाही.गावातील प्रत्येक मुलगा व मुलगी पदवीधर झाल्यावर च त्यांचे लग्न
करू.गावातील १८ वर्षाखालील कोणत्याही मुलाला किवा मुलीला
बालमजुरीला,शेतीच्या मजुरीला शाळा सोडून जाऊ देणार नाही अशी शपथ दिली
टाळ्यांच्या गजरात हि प्रतिज्ञा पूर्ण झाली प्रास्तविक पांडुरंग लांडगे
यांनी सूत्र संचलन पी.ए .बेंद्रे यांनी आभार बी.दि.राहणे यांनी मानले
DSCN2266.jpg 249K View Share Download |
DSCN2267.jpg 246K View Share Download |
DSCN2262.jpg 240K View |
No comments:
Post a Comment