खासदार वाकचौरेंनी दिले विद्यार्थ्यांना धडे
खासदार वाकचौरेंनी दिले विद्यार्थ्यांना धडे
प्रतिनिधी । राजूर
केवळ भौतिक सुविधांची निर्मिती महत्त्वाची नसून होऊ घातलेला विकास त्याच तोलामोलाने पुढे नेणे आवश्यक आहे. यासाठी भावी पिढी सक्षम व सुसंस्कारित घडवणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे तालुक्यातील विद्यालयांना गुरुवारपासून (10 जानेवारी) भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देताना त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून माहिती घेत आहेत. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची त्यांनी तीन पथके स्थापन केली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करीत आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांतून स्वागत होत आहे.
खासदारांनी जनतेप्रती आपली जबाबदारी पार पाडताना संसदेत प्रo्न मांडून समस्यांची सोडवणूक करणे, स्थानिक विकास कामे मार्गी लावणे, केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, अशा स्वरूपाच्या कामांची अपेक्षा असते. मात्र, खासदार वाकचौरे यांनी हे सर्व करत असतानाच भावी पिढीला भविष्यातील संधीची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने कामे करता येतील, त्यासाठी शिक्षणाच्या कोणत्या अटी आहेत, पात्रतेसाठी स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने दिल्या पाहिजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड घालवणे, ध्येय साध्य करताना सामान्य विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी कशा दूर करता येतील, त्यासाठी सकारात्मक विचार कसे ठेवावेत आदींबाबत वाकचौरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थीही मंत्रमुग्ध होऊन आत्मसात करीत आहेत.
या उपक्रमासाठी 'प्युअेल' कंपनीचे पथकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. राजूर येथील सर्मथ कन्या विद्यालय, लिंगदेव येथील साने गुरुजी विद्यालय, केळुंगण येथील जयभवानी माता विद्यालय, कळसूबाई विद्यालय, मान्हेरे येथील आर्शमशाळा, शेणी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यालय आदी ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. अकोले तालुका हा लोकसभेला नाशिकला जोडला होता .मात्र संबधित खासदार यांनी तालुक्याकडे लक्ष दिले नाही मात्र तालुक्याचे भूमिपुत्र आपण जिथे जन्मलो तेथील सामाज्यचे काही तरी देणे लागतो या भव्नेतून अ "आपला माणूस आपल्यसाठी "काम करीत आहे त्यंच्या या कार्य्मामुळे विधार्थी हि त्यंच्या प्रेमात पडले आहे .कन्या विध्य्लाय राजूर च्या मुलीनी त्यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या सुभेछ्या तर दिल्याच परंतु आमची काळजी घेणार पहिले खासदार असून आम्हाला जीवनात काय?करायचे हे मार्गदर्शन केले त्यमुळे आमचे भविष्य आम्हाला समजले त्यमुळे तुमच्या आम्ही नेहमी संपर्कात राहू असे वचनही दिले तर या उपक्रमाबद्दल पालक वर्गणीही समाधान व्यक्त केले .संस्था कोणत्या राजकीय पुढारी व कार्यकार्त्यची त्यापेक्षा विधार्थी केंद्र बिंदू मानून त्याला योग्य मार्गदर्शन हि भूमिका लोक्प्र्ठीनिधीकडे अभावानीच दिसते त्यमुळे दूर दृष्टिकोनाचा नेता,लोकप्रतिनिधी म्हणून खासदार भाऊसाहेब वाक चौरे जनतेच्या स्मरणात राहतील ...शांताराम
No comments:
Post a Comment