शिकण्याची जिद्द होती पण, शिकता येत नव्हतं.. तहानेनं जीव व्याकूळ होत होता पण लगेच पाणी मिळत नव्हतं.. आरोग्याची हेळसांड होत होती पण जंगल तुडवून दवाखान्यात पोहोचेपर्यंत जीव जात होता.. आयुष्यात याच समस्या कायम राहतील की काय ही भीती होती. मात्र, आता हळूहळू विश्वास वाटायला लागला की, आम्हीही सर्वसामान्यासारखं जगू शकतो.
शहरांपासून कोसो दूर अतिदुर्गम भागात पहाडावर आयुष्य कंठणाऱ्या आदिवासी कोलामांच्या पाडय़ाला भेट दिली, तेव्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या राज्यकर्त्यांवर हसावे की रडावे हेच कळत नव्हते.
यवतमाळ जिल्यातील केळापूर तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीत येणारी माकोडा ही २२-२३ घरांची आणि झरी तालुक्यातील वळपोल ही कोलामांची वस्ती गेल्या कित्येक दशकांपासून अंधारात आहे. कोलामांच्या या पाडय़ाने कधी वीज बघितली नाही, रस्ता बघितला नाही पण, या परिस्थितीतही ते जगत आहेत. जंगलाची वाट तुडवत आणि मध्येच येणारे पहाड ओलांडल्यावर वळपोलच्या कोलाम वाडीत प्रवेश होतो. माणसं या परिस्थितीतही जगू शकतात, असा प्रश्न येथे पाय ठेवल्यानंतर पडतो. पिण्याच्या पाण्यासाठी कोलाम डोक्यावर तीन-तीन घागरी घेऊन अडीच किलोमीटरची पहाडी वाट तुडवत जातात. आबालवृद्ध अशा सर्वानाच पाण्यासाठी अक्षरश: जीवाचे रान करावे लागते पण, त्यांच्या चेहऱ्यावर निराशेची साधी झलकसुद्धा दिसत नाही. या गावातील शिक्षणाचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. कारण गावात शाळाच नाही. दुसऱ्या गावात जाऊन शिकायचे तर चार-पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. कोलाम पाडय़ातील जो एक टक्का वर्ग शिकला आहे त्याचे शिक्षणसुद्धा चौथ्यावर्गापर्यंतच आहे. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून पोट भरणारा हा वर्ग जेव्हा स्वत: काही करायला जातो तेव्हा वनविभाग आडवा येतो. जंगलात राहात असल्यामुळे तेथील बांबू तोडून त्याच्या ताटय़ा तयार करणारे कोलाम बाजारात जाऊन ते विकू शकत नाही कारण वनविभागाचा कायदा त्यांना अडसर ठरतो. मोह, चारोळय़ा, लाख, डिंक यासाठी त्यांना वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. या गावातील समस्यांची जंत्री कधी संपेल असे वाटत नाही पण, त्याविषयी त्यांना अजिबात तक्रार नाही.
माकोडा या गावाच्या आजूबाजूला दोन किलोमीटपर्यंत वीज आहे पण, या गावाने कधी वीज बघितली नाही. कोलामांचा हा पाडा मुख्य रस्त्यापासून फार दूर नाही तरीही या पोडय़ात शिरताना जंगलातूनच जावे लागते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता झाला पण, त्याला रस्ता म्हणायचे का, हा प्रश्न आहे. शाळा आहे ती केवळ चौथ्या वर्गापर्यंत. दोन हातपंप बसवण्यासाठी कधीकाळी या कोलामपाडय़ात अधिकारी आले पण, हे हातपंप सुरू आहेत की नाही याकडे त्यांनी नंतर वळूनही बघितले नाही. एका विहिरीवर कोलाम पाणी भरतात पण, गेल्यावर्षी ही विहीरसुद्धा आटली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून कुठेही जायचे असेल तर हे कोलाम पायीच जंगलाची वाट तुडवत जातात. आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे तर बाहेरगावाहून वाहन आणावे लागते पण, ते सुद्धा रस्त्याअभावी आजारी माणसापर्यंत पोहचू शकत नाही. कापूस आणि ज्वारीच्या शेतीवर जगणारे ही माणसे वीज आल्यानंतर मात्र अत्यंत आनंदीत आहे. आता साप, विंचवाची भीती वाटणार नाही, असे ७० वर्षीय राघूजी टेकाम यांनी सांगितले. गावातील सर्वात जास्त शिकलेल्या सुनील मेश्रामची प्रतिक्रिया म्हणजे, ‘दिव्यात अभ्यास करताना डोळय़ाची आग होत होती. दिलेला गृहपाठ करता येत नव्हता पण, आता वीज आली आणि अभ्यासाचा मार्ग सुकर झाला’. महिन्याला १०० ते १५० रूपयाचे रॉकेल लागत होते आता त्याची बचत झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर होता.
कोलामांच्या पाडय़ातील एक आश्चर्य म्हणजे मोबाईल फोन. या संपूर्ण गावात एक मोबाईल फोन आणि बाजूच्या वीज असलेल्या गावात त्याला चार्ज करून आणायचे. फोन दोन दिवस चार्ज असावा म्हणून करमणुकीसाठी एफएम ऐकायचा पण, आता हेच लोक तासन्तास मोबाईलवर गाणे ऐकताना दिसतात. गावात वीज आल्यामुळे साप, विंचवाच्या भीतीने ७ वाजता अंथरुणावर पडणारी ही मंडळी आता रात्री ११ वाजेपर्यंत जागी असतात. पुंगी आणि पाऊल या दोन वाद्याच्या साथीने ‘येनदातून’ हे नृत्य आदिवासी कोलाम आनंदाच्या प्रसंगी हमखास सादर करतात. स्त्री-पुरुष असा भेद न करता सारेच या नृत्यात सहभागी होतात. या दोन्ही गावातील सुमारे ९५ टक्के लोकांनी यवतमाळ शहर पाहिले नाही.
आमदार खासदारांची नावे त्यांना माहिती नाही. या गावात अधिकारी कधी येतच नाही आणि राज्यकर्ते येतात ते मतांचा जोगवा मागायला पण, तक्रारीचा सूर त्यांच्या तोंडून कधी ऐकायला मिळत नाही. अशा या दोन्ही कोलाम पाडय़ात आता वीज आली आहे. पाठोपाठ इतरही सोयी येतील, या आशेवर या पाडय़ातील कोलाम आहेत

very nice storey
ReplyDelete