राजुर(वार्ताहर) दि.8/5/11 '' डोगरची काळी मैना दोन रुपयाला आठ्वा '' असे ओरडत आदिवासी पाडयातील शाळकरी
मुले भंडारदरा परिसरात व कोल्ह्रार-घोटी रस्त्यावर दिसू
लागल्याने त्यामुळे खरया अर्थाने डोंगरची काळी मैना बाजारात आली आहे.
अकोले तालुक्यतील पश्चिम भागातील आदिवासी पट्टा उन्हाळ्यात रोजगार शोधण्यसाठी भाकरीचा चंद्र शोधण्यसाठी गावो-गावी भटकत असताना त्यांची शाळ्करी मुले सुट्टीचा आनंद लुट्ण्याएवजी करवंदाच्या काटेरी झुडपात घुसुन करवंदे ,आवळे ,कैर्या गोळा करुण सकाळी सात वाजताच भंडारदरा,राजुर,कोतुळ,समशेरपूर आदि भागात जाऊन हातात टोकरया घेऊन ''साहेब घ्या दोन रुपयाला आठवा डोंगरची काळी मैना तीन रुपयाला चार कैर्या (राघु)असे म्हणत दिवसभरात पंन्नास शंभर रुपयांची कमाई करुन
समाधानाने घरी परततांना दिसत होते.या संर्दभात ईयत्ता आठवीत शिकत असलेल्या संतोष झडे ,हौसाबाई परते या मुलांना विचारले असता तुम्ही या पैसाचे काय करता ? त्यामधून आम्ही कपडे ,वहृया शालेय साहित्य विकत घेतो व उरलेले पैसे पालकांना देतो त्यामुळे घर खर्चाला हात भार लागतो त्यांचे हे बोलने एकून पर्यटकही प्रभावीत होतात.त्यामुळे दोन रुपयाचे दहा रुपयेही मुलांना मिळ्तात.भंडारदरा जलाशयातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.वातानूकुलीत गाड्या ऊभ्या राहील्या की मुले डेंगरची काळी मैना असा आवाज देतात व पर्यटकांना आर्कर्षीत करतात व त्या ''आहिरेंची मने जिंकून नाहिरेंना मिळालेला आनंद हा स्वर्गीय आनंदच होय असे त्यांच्या चेह्र्यावरचे भाव सांगून जातात. आदिवासी मानसे रोजगारासाठी पायपीट करतात तर त्यांची मूलेही जंगंलातील करवंदे गोळा करुण त्यांच्या प्रपंचाला हाथभार लावतात
-शांताराम काळे.
No comments:
Post a Comment