वैशाख महिना सुरू होताच सहयाद्री पर्वतरागांमध्ये विविध रानमेव्यांच्या फळांमध्ये गोडवा येऊ लागतो. या गोडव्यातून करवंद, आवळं, फणस, काजु, जांभुळ, तोरणं, आंबा या डोंगर फळांची चव चाखायला मिळते. करवंदाच्या जाळयांमध्ये घुसून करवंद खाण्याचा आनंद काही औरच असतो.
तुरट गोड काजूचा आंबा, फिक्कट खोड आवळं, तोंड जांभळी रंगानं रंगून टाकणारी जांभळं, गोड गावठी फणस, मोठया कोईचा आंबा खाण्यासाठी भीमाशंकर, आहुपेकडे यावे लागेल. भीमाशंकरजवळील म्हतारबाचीवाडी येथील एकाच फणसाच्या झाडाला सुमारे तीनशे फणस लागले आहेत. हे फणसाचे झाड अतिशय जुने आहे. रस्त्याने जाताना शाळकरी मुले रानात तोडून आणलेला हा रानमेवा विकताना दिसतात. मिळालेल्या पैशातून शाळेचे साहित्य खरेदी करण्यासाठी
आदिवासी मुले हे काम करीत असतात.
No comments:
Post a Comment