Wednesday, May 18, 2011



पर्यावरणाचा मूलमंत्र जोपासत अधिकाऱ्याची एकसष्टी साजरीPrint
राजूर, १८ मे/वार्ताहर
आदिवासी शेतकऱ्यांना शेतीमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा सुवर्णमध्य साधून सेंद्रीय शेती करण्याचा, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र देऊन एकसष्टी साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोले तालुक्यातील चिचोंडी येथे पार पाडला. आदिवासी सेवक व शेतकऱ्यांना या वेळी रोपांचे वाटप करण्यात आले.
चंद्रकांत बांगर यांच्या सत्काराचे निमित्त साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास भंडारदरा जलाशय पाणलोटक्षेत्रातील ९ गावांमधील रहिवासी, सामाजिक संस्था, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
चिचोंडी गावात प्राथमिक शिक्षक गणपत बांगर गुरूजी यांनी शैक्षणिक कार्य करताना आपल्या मुलांना पोलीस खात्यात भरती करून आदर्श अधिकारी बनविले. त्यामुळेच चंद्रकांत बांगर यांनी पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर गावी येऊन पारंपरिक, परंतु आधुनिकतेची जोड देऊन शेती फुलवली. सेंद्रीय शेती पद्धती वापरून तांदळाचे २०० पोती उत्पादन मिळवून आदिवासी शेतकऱ्यांना दिशा दिली. शेतीतील या कामगिरीमुळेच त्यांच्या सत्कारास मोठी हजेरी होती. पं. स. सदस्य दिलीप भांगरे, सुरेश गभाले, अरूण माळवे, सुनील सारूक्ते, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कैलास शहा, ललित चोथवे, महेश अवसरकर, शांताराम काळे, प्राचार्या मंजूषा काळे, देवीदास शेलार, प्राचार्य दिलीप रोंगटे, सुरेश घाटकर, राजेंद्र जाधव, आदिवासी सेवक गोपाळा गभाले, विजय भांगरे, संजय यादव आदींचा त्यात समावेश होता.
पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब बांगर यांनी या वेळी बोलताना आईची माया, वडिलांचे प्रेम व मार्गदर्शन यामुळेच मी आज उभा आहे. मुंबईत माझी ओळख त्यांचा भाऊ नव्हे, तर मुलगा अशीच आहे, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रकांत बांगर यांनी तुमच्या प्रेमाच्या शिदोरीवर आदिवासी समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रफुल्ल बांगर यांनी आभार मानले.   

No comments:

Post a Comment