पत्रकारांमधील जिज्ञासा हरवत चालली आहे. ज्ञान मिळविण्यासाठी जिज्ञासा हवी, संकुचित होऊ नका. मला काय त्याचे ही भावना ठेऊ नका, ग्रामीण पत्रकारावर समाजाची मोठी जबाबदारी आहे. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची आच पत्रकाराला हवी. मुलभुत बाबींकडे दुर्लक्ष नको या शब्दात ‘लोकसत्ता’चे माजी सहायक संपादक अरविंद व्यं.गोखले यांनी दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, वी. रा. उगले, सुकृत खांडेकर, दौंड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष एम. जी. शेलार, आप्पा काळे. यांच्यासह दौंड, इंदापूर, बारामती पुरंदर, शिरूर, हवेली तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. दौंड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार वी. रा. उगले यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्त व पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना गोखले म्हणाले, पत्रकाराने अभ्यास करून मांडणी करणे आवश्यक आहे. बातमी चालत येत नसते. बातमीपर्यंत पोहोचायचे असते. चांगल सोप लिहिण अवघड आहे. त्यासाठी जे जे चांगल ते वाचल पाहिजे. उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना एस. के. कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांची भाषाशैली समर्पक, सोपी, चपखल, सरळ पाहिजे. तुकारामाची गाथा, मनाचे श्लोक न वाचता लिखाण करणे म्हणजे शब्द सामर्थ व संग्रहाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख एैशा नरा असा केला की त्याचे चारित्र्य व चरित्र उभे राहते. मराठी भाषेची दिशा ठरवण्याच काम पत्रकार करू शकतात. आपल्या परिसराचा चौफेर अभ्यास करा. आजच्या प्रश्नासाठी, वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी लेखणी वापरा. त्यांचा हुंदका, त्यांची वेदना, त्यांचे आश्रू जाणून घ्या, समाजाला भेडसावणारे प्रश्न कवेत घ्या. बातमीसाठी डोळे उघडे ठेवा. भाषा शुद्ध वापरायची, लिहायचा सराव करा. शुद्ध भाषा याचा अर्थ ग्रामीण व बोली भाषेतील व चपखल शब्द वापरायचे नाहीत असे नाही. छोटय़ा छोटय़ा गावात सेंद्रिय खते, पाणी बचत, असे प्रयोग करणारी कर्तबगार माणसे असतात. त्यांची दखल घ्या. एक धागा सापडला तर मोठी बातमी सापडते. त्यासाठी आभ्यासातून दृष्टी तयार करा. त्यामुळे जिथे जाऊ तिथे बातमी दिसेल. या मातीतील प्रश्न व माणूस यांना बातमीचा केंद्र बिंदू करा. वाट चुकलेल्याकडे जा. संवेदनाशिल बना,समरस व्हा.
यावेळी बोलताना सुकृत खांडेकर म्हणाले, पत्रकार हा सरकार व जनता या मधील दुवा असला पाहिजे. लोकशाही प्रशासन व पत्रकार यांची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. तसे दृश्य आज दिसत नाही. महाराष्ट्रातील ५४ वृत्तपत्रांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत. यांची दखल सुवर्णमहोत्सवी वर्षांत महाराष्ट्र सरकारने घेतली नाही ही खेदाची बाब आहे. सध्याचे चित्र भेसूर आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचार चिड आणणारे आहेत. अश्या परिस्थितीत वृत्तपत्रच सामान्यांना आधार वाटत आहे.
पत्रकारांनी मर्यादेतच भान ठेवून वास्तव लपवल जाणार नाही असे लिखाण करणे आवश्यक आहे. वी. रा. उगले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. एम. जी. शेलार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सावता नवले यांनी केले. आभार आप्पा काळे यांनी मानले.

No comments:
Post a Comment