राजुर वार्ताहार दि.8/5/11 वीज कंपनीचा अजब कारभार चिचोंडी गावात पहायला मिळाला असून चिचोंडी परिसराला वीज पुरवठा करणारे रोहीम (डी .पी) पूर्णपणे फुटकी असून काही बीजेचे रंबाव पड्ण्याच्यातयारीत असून अंतिम घटका मोजीत आहेत राजुर येथील वीज मंडळाच्या आधिकार्यांना कळ्वूनही व भंडारदरा विभागाचे इंजिनिअर श्ची .अली यांना प्रत्यक्ष दाखवून ते ही डिपी दुरूस्त करीत नसल्याने चिचोंडी ग्रामस्थ आता वीज कंपनीच्या मुख्य अभिमंत्यांनाच निवेदन पाठवीनार असल्याचे समजते.
चिचोंडी, ता-अकोले येथील गावात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर वीज पुरवठ्यासाठी असणारी डिपीचे बॉक्स फुटलेले असून तारांवरील प्ल्यास्टीकचे आवरन निघूण गेले आहे.त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजुर वीज कार्यालयाच्या सहायक अभियंता कुलकरर्णी यांना सांगुनही त्यांनी कानावर हात ठेवले आहे.तर भंडारदरा येथील वीज मंडळाचे इंजिनीअर श्ची.अली हे माहित असूनही मटोरिअल नसल्याचे सांगुण याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. यासंर्दभात ग्रामस्थ भंडारदरा येथील वीज मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे. सरपंच ,उप सरपंच,सामाजिक कार्यकर्ते (चंद्रकांत बांगर , सुरेश गभाले , ललित पवार आदि.)यांनी नाराजी व्यक्त केमी आहे . शांताराम काळे
No comments:
Post a Comment