Saturday, December 6, 2025

वाहतूक कोंडी

अकोले,ता.५:अकोले शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून जसा लोकसंख्येचा आलेख वाढतोय त्याच रेषेत वाहनांची संख्या वाढत आहे .कोल्हार घोटी रस्ता सकाळपासून वर्दळीचा ठरला असून सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे ,कॉलेज,विधालय सर्व शासकीय कार्यालय कोल्हार घोटी रस्त्याला असल्याने तसेच ऊस वाहतूक व मुंबई कडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते तर ट्राफिक पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होताना दिसत आहे . अकोले शहरातील वाहतूक समस्यांमध्ये आस्त व्यस्त पार्किंग , रस्त्यांवरती गाड्या उभा करणे, बेशिस्त वाहन चालन यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यावर प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वनवे एकेरी वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अकोले शहरातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नागरिकांना सातत्याने त्रास होताना दिसतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावरती उसाच्या बैलगाड्या चालत असतात. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने व्यवस्थित लावली नसल्याने सातत्याने अपघात होताना दिसतात. बाजारतळ ते महात्मा फुले चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने उसाच्या बैलगाड्यांना अडथळा निर्माण होतो , त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. महात्मा फुले चौक व बाजार तळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस ची संख्या वाढवणे गरजेचे आहे. चुकीच्या पार्किंगसाठी दंड वसूल होताना दिसत नसल्याने लोक कुठेही गाडी लावतात. पार्किंग साठी व्यवस्थित जागा निश्चित करणे गरजेचे आहे. शहरातील शनी मंदिर परिसरात ही बहुतेक वेळा वाहन कोंडी होताना दिसते. या प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे. वाहतूक शाखेने दंड आकारणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. आठवडे बाजार चे दिवशी बहुतेक दुकाने रस्त्यांवर लावली असतात त्यावर ही नगरपंचायत ने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही. कोट: कोल्हार घोटी एकच मार्ग असल्याने तसेच कारखाना हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती . अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने बैल वाहतूक गाड्या पर्यायी मार्गाने नेल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. अकोले नगरपंचायत ने ही फेरीवाले तसेच रस्त्यावरती बसणाऱ्या दुकानांना आळा घालावा. आत्तापर्यंत एक जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण तीनहजार केसेस दाखल केल्या आहे. त्यांच्याकडून जवळजवळ तीन लाख रुपये दंड वसुली करण्यात आला आहे. प्रमोद बोरसे पोलीस निरीक्षक अकोले

अकोले वाहतूक कोंडी

अकोले,ता.५:अकोले शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून जसा लोकसंख्येचा आलेख वाढतोय त्याच रेषेत वाहनांची संख्या वाढत आहे .कोल्हार घोटी रस्ता सकाळपासून वर्दळीचा ठरला असून सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे ,कॉलेज,विधालय सर्व शासकीय कार्यालय कोल्हार घोटी रस्त्याला असल्याने तसेच ऊस वाहतूक व मुंबई कडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते तर ट्राफिक पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होताना दिसत आहे . अकोले शहरातील वाहतूक समस्यांमध्ये आस्त व्यस्त पार्किंग , रस्त्यांवरती गाड्या उभा करणे, बेशिस्त वाहन चालन यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यावर प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वनवे एकेरी वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अकोले शहरातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नागरिकांना सातत्याने त्रास होताना दिसतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावरती उसाच्या बैलगाड्या चालत असतात. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने व्यवस्थित लावली नसल्याने सातत्याने अपघात होताना दिसतात. बाजारतळ ते महात्मा फुले चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने उसाच्या बैलगाड्यांना अडथळा निर्माण होतो , त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. महात्मा फुले चौक व बाजार तळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस ची संख्या वाढवणे गरजेचे आहे. चुकीच्या पार्किंगसाठी दंड वसूल होताना दिसत नसल्याने लोक कुठेही गाडी लावतात. पार्किंग साठी व्यवस्थित जागा निश्चित करणे गरजेचे आहे. शहरातील शनी मंदिर परिसरात ही बहुतेक वेळा वाहन कोंडी होताना दिसते. या प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे. वाहतूक शाखेने दंड आकारणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. आठवडे बाजार चे दिवशी बहुतेक दुकाने रस्त्यांवर लावली असतात त्यावर ही नगरपंचायत ने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही. कोट: कोल्हार घोटी एकच मार्ग असल्याने तसेच कारखाना हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती . अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने बैल वाहतूक गाड्या पर्यायी मार्गाने नेल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. अकोले नगरपंचायत ने ही फेरीवाले तसेच रस्त्यावरती बसणाऱ्या दुकानांना आळा घालावा. आत्तापर्यंत एक जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण तीनहजार केसेस दाखल केल्या आहे. त्यांच्याकडून जवळजवळ तीन लाख रुपये दंड वसुली करण्यात आला आहे. प्रमोद बोरसे पोलीस निरीक्षक अकोले

आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य ) प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य : लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .

( आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य ) प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य : लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .
--------------------------------------------- ( $ डॉ . सुनील शिंदे : अगस्त्य फीचर्स , अकोले ) दुर्दम्य आस , इच्छाशक्ती ही फार फार मोलाची गोष्ट आहे . मन:शक्ती - मनाचे सामर्थ्य लाख मोलाचे . काही माणसं विजीगीषु वृत्तीची असतात .. म्हणजे सातत्याने विजयी असण्याची - होण्याची ती आस . आयुष्यातील लहानमोठ्या कोणत्याही प्रसंगात , संघर्षात - संकटात अथवा अडथळ्यात अजिबात खचून न जाता - न डगमगता उभं राहण्यासाठी मनाचा खंबीरपणा असावा लागतो . सर्वांनाच नसते ही देण . सर्वांनाच नाही साध्य होत ही बाब .. लोकनायक - लोकनेते सन्मा . पिचड साहेब अशाच दुर्मिळ देण असणाऱ्या मोजक्या लढाऊ बाण्याच्या माणसांप्रमाणे होते . त्यांच्या या वैशिष्ट्याचा पुरेपूर प्रत्यय मी दोन तीन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांक संपादन काळात अनुभवला ! त्यावेळी सलग दोन - तीन महिन्यांच्या काळात त्यांची आणि माझी प्राचार्य डॉ . भास्कर शेळकेंसमवेत अन् प्रसंगी स्वतंत्रपणे वारंवार बैठक व्हायची तेंव्हा हा अनुभव आला . अथकपणे पिचड साहेब कधी पक्ष कार्यालयात , तर कधी संस्था कार्यालयात , तर कधी कॉलेज च्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यालयात ठाण मांडून फीडबॅक घ्यायचे .. माझ्याशी चर्चा करताना अपडेट घेत .. तर कधी ' काय वाटते सर या मुद्द्यावर तुम्हाला ? ..' असे मोठ्या मनाने विचारत ! तर कधी अकोल्यात यायला नाही शक्य झाले तर थेट राजूरला मला आणि प्राचार्य डॉ . शेळके सरांना अंदाज घेत आवर्जून आस्था - आपुलकीने बोलावून घेऊन बातचीत करीत असत . एवढेच नाही तर अकोलेत , कधी नाशिकमध्ये सकाळीच नियोजित वेळेत सुवर्ण महोत्सवी कामानिमित्त उत्साहाने वयाचा विचार बाजूला ठेवून भेटीगाठीसाठी निघायचे आम्हाला घेऊन ! सक्रीय चैतन्याचा हा झपाटा थक्क करणारा .. सातत्याने समाजकारण - राजकारणात समन्वयवादी भूमिका घ्यायची हा त्यांचा कटाक्ष असे . समजूतदारपणामुळेच त्यांनी तालुक्यासह राज्यात माणसे जोडली , जनसंपर्क टिकविला . महाराष्ट्रातील विख्यात समाजवादी विचारवंत , ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि विख्यात वक्ते तसेच प्राध्यापक आदरणीय कै . ग . प्र . प्रधान तथा महाराष्ट्राचे ' प्रधान मास्तर ' यांचे विद्यार्थी म्हणजे आदरणीय लोकनेते , माजीमंत्री मधुकरराव पिचड ! या ओळखीत आणि निर्देशातच सारे काही आले . पिचड साहेब पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चे विद्यार्थी . आदरणीय पिचड साहेबांना ते प्रधान मास्तरांचे शिष्य होते ही बाब कायमच अभिमानास्पद - भूषणावह वाटत आली . प्रभावी वक्तृत्व , वैचारिक मांडणीची वेधक शैली अन् विद्यार्थी प्रश्नांसंदर्भातील तत्कालीन स्थितीत केलेले नेतृत्व यांमुळे मधुकरराव पिचड हे आदरणीय प्रधान मास्तरांचे लाडके ठरले . अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त तसेच कार्यकारी विश्वस्त म्हणून आदरणीय दादासाहेब रुपवतेंच्या प्रभावी संघटन कौशल्याप्रमाणेच दादासाहेबांच्या पश्चात आदरणीय पिचड साहेबांनी आपल्या विलक्षण कार्यशैलीत तसेच मुत्सद्देगिरीने सर्वपक्षीय मोट कार्यकारिणीच्या सातत्यपूर्ण मांडणीत बांधली ही बाब ध्यानी घ्यावी लागेल . १९७४ साली महाविद्यालय सुरु होताना विडी कामगार , रोजगार हमी मजूर , शेतकरी , तालुक्यातील शिक्षक यांच्यासह शिक्षण प्रेमी आणि राजकीय धुरिणांनी जसे अनमोल योगदान नोंदविले त्यास तोड नाही . पिचड साहेब राजूरच्या तत्कालीन दूध डेअरीचे चेअरमन होते . दूध उत्पादकांकडून डेअरीच्या माध्यमातून एक दिवसाच्या दूधाची रक्कम मा . पिचड साहेबांनी महाविद्यालय उभारणी कामात मिळवून दिली . विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ( यु . जी . सी . : नवी दिल्ली ) ग्रँट मंजूर व्हावी यासाठी तत्कालीन राज्य मंत्री मंडळातील मा . पतंगराव कदमांकडे निर्वाणीचा पाठपुरावा करुन महाविद्यालयास अनुदान मिळवून देण्यात मोलाची भूमिका पिचड साहेबांनी पार पाडली . लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक विकास कामांच्या प्रगतीपर वाटचालीत अकोले तालुका एज्युकेशन संस्था आणि अगस्ती महाविद्यालयाची गुणवत्तेची पताका दिमाखात फडकत राहिली आहे . याच परंपरेत सुरु झालेला स्रोत अखंडपणे प्रवाही राहिला असून या ओघात आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या कुशल नेतृत्वाखाली रस्त्यांचे जाळे , सहकारी संस्थाची गती , साखर कारखाना , दुग्ध विकास यंत्रणा , जलक्रांती , बाजार समित्या , धरणे , कालवे , बंधारे , जलविद्युत प्रकल्प अशा अनेकविध स्तरावर विकास गंगा प्रवाहित राहिली आहे . पिचड यांच्या आजवरच्या वाटचालीत आणि कारकिर्दीत : निळवंडे धरणाची गती - निर्मिती , अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती , दूध व्यावसायिक संघ , आदिवासींच्या न्याय्य हक्कांचा संघर्ष , आदिवासी योजनांसंदर्भातील कायदे , भंडारदरा धरण पाण्यावरील हक्काचा लढा - फेरवाटपाची मागणी , चाकबंद आंदोलन , तालुक्यातील अन्य धरणे , बंधारे , कालवे , पिंपळगाव खांड धरण , प्रभावी जलक्रांतीची यशोगाथा , सहकारी संस्थांचे जाळे , शासकीय आश्रमशाळांची प्रभावी मंजुरी , दुर्गम ग्रामीण - आदिवासी वाड्यापाड्यांतील , भागातील रस्ते अशी विविध कामांची साखळीच मजबूत स्वरुपात निर्माण झाली . राजकारण , समाजकारण , सहकार या महत्वपूर्ण क्षेत्रातील कर्तबगारीपलीकडे आणखी एक वेगळा पैलू माजी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या संदर्भात वेधक आणि लक्षणीय आहे , हा पैलू वाचनाचा ! अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि मांडणी स्वीकृत कामकाजाच्या बाबतीत करणे ही पिचड साहेबांची खासियत . अकोले तालुक्यातील शेती , पाणीप्रश्न , धरणे - बंधारे , सहकारी संस्था , मूळ आदिवासींच्या सत्यतेविषयी शासकीय अन् न्यायालयीन संघर्ष यासंदर्भातील पिचड यांनी सातत्याने दिलेला लढा तसेच राज्यातील एकूणच राजकारणात सत्तेत असताना आणि विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना त्यांनी दाखविलेले नैपुण्य राजकीय पटलावर आहे . तथापि सर्वस्वी निराळा असा प्रभावी वाचन वैशिष्ट्याचा पैलू लक्षणीय राहिला . ऐतिहासिक वाङ्गमय तसेच सामाजिक क्षेत्रातील धुरिणांवरील चरित्र - आत्मचरित्रपर पुस्तकांच्या वाचनावर पिचड यांचा अधिक भर आहे . विशेषतः शहाजी राजे , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शंभूराजे ( संभाजी राजे ) , महात्मा जोतीराव फुले , बाळ गंगाधर टिळक , गोपाळ गणेश आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन यासंदर्भातले वाचन मा . पिचड यांनी सातत्याने केले आहे . बाबासाहेबांची घटनेची प्रत अधिक वेधक असल्याचे पिचड यांचे मत होते . आदरणीय डॉ . गोविंद गारे यांनी अथक संशोधनाधारित केलेल्या ग्रंथ लेखनाचे वाचन हे पिचड यांचे लक्षवेधी वैशिष्ट्य . ' स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक ' ' महाराष्ट्रातील आदिवासी जमाती ' आदिवासी वीर पुरुष ' ' सातपुड्यातील भिल्ल ' ' आदिवासी लोककथा ' ही डॉ . गोविंद गारे यांची ग्रंथसंपदा पिचड यांनी वाचलेली . " जगाला माहीत नसलेला क्रांतिकारी वीर राघोजी भांगरेच्या इतिहासाचा संशोधकीय मागोवा गोविंद गारेंनी परिश्रमपूर्वक घेतला आणि मांडला . या ऐतिहासिक संदर्भासह आदिवासी विश्वाच्या एकूणच ऐतिहासिक अभ्यासाच्या वाचनाचा उपयोग मूळ आदिवासी अन् खोट्या आदिवासींच्या प्रश्नावरील लढा देताना झाला .. " ही मधुकरराव पिचड यांची भावना होती . वाचनाने माणूस घडतो , दृष्टी व्यापक होते हे तर सत्यच . सर्वांगीण विकासासाठी वाचन ठरते पूरक . वैचारिक प्रगल्भता बाणते ही बाब लक्षात घ्यावी लागेल . स्वतंत्र विचारशैली विकसित होते . वैचारिक भूमिका डोळसपणे मांडता येणे सुलभ ठरते . कोणताही सामाजिक लढा - संघर्ष हाती घेताना चौफेर वाचनाचा उपयोग - लाभ अथवा दूरगामी यथोचित परिणाम होतो हा पिचड यांचा दखलपात्र अनुभव राहिला . ' आगरकर लेखसंग्रह ' , ' इंडियाज फ्रीडम स्ट्रगल : एपिक ऑफ् सँक्रिफाईस अँड सफरिंग ' , ' परस्यूट ऑफ् आयडियल्स ' , ' लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी ' ( इंग्लिश ) , ' साता उत्तरांची कहाणी ' , ' सत्याग्रही गांधीजी ' ही ग . प्र . प्रधानांची प्रमुख पुस्तके पिचड यांना भावलेली . आवडत्या पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह त्यांच्याकडे होता . अकोले तालुक्यातील लेखकांची आणि संत - साधुचरित व्यक्तिंवर आधारित चरित्रपर पुस्तके देखील पिचड यांच्या वाचनात आवर्जून असतात . उंचखडकचे विख्यात संत यशवंतबाबांवरील साहित्य त्यांना आवडले . गो . नी . दांडेकर , दया पवार यांच्यापासून तर अण्णासाहेब देशमुख यांच्या पुस्तकांपर्यंतचे वाचनही निर्देशिता येईल . सवडीनुसार वाचन करणे नव्हे तर वाचनासाठी सवड काढणे हे पिचड यांचे वैशिष्ट्य ! त्यांच्या वाचनात विविधता होती . निवडक अन् दर्जेदार पुस्तकांच्या वाचनावर अधिक भर आहे . पदवी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजशी आणि पर्यायाने आदरणीय प्रधान मास्तरांशी संपर्क आल्याने पिचडांचे वाचन , अभ्यासू बाणा अधिक दिशादर्शक ठरला . हव्या असलेल्या पुस्तकाचा पाठपुरावा करताना प्रसंगी पिचड यांनी वेळेला अगस्ती अकोले महाविद्यालयातील दुर्मिळ संग्राह्य पुस्तकांसाठी देखील संपर्कात राहून वाचनाची आवड टिकवून ठेवली . एकूणच राजकीय , सामाजिक , सहकार , शिक्षण , शेती क्षेत्रातील कार्यासाठी - निर्णयक्षम वाटचालीत त्यांना वाचन प्रक्रियेतील आवड प्रेरणादायी , उपयुक्त ठरली ही बाब अलग नाही करता येत . वाचनाचा असा हा वेधक पैलू लक्षणीय . राजकीय - सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढला किंवा वेधक कार्य चर्चेत आले की विरोधकांची कमी नसते , तथापि आपल्या चाहत्या - स्नेहांकित परिवाराबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त दबदबा असणे ही बाब सोपी नसते , सहजसाध्य नसते . तरीही यासंदर्भात आदरणीय पिचडांनी आदराची भावना आणि विलक्षण दबदबा टिकवून ठेवला हे विसरून चालणार नाही . शिक्षण , समाजकारण , राजकारण , आदिवासी प्रश्न , जलनीती अशा एकूणच विविध प्रवाही आघाड्यांवरील निर्णायक कामगिरीबरोबरच अकोले ता . एज्युकेशन संस्थेच्या व्यवस्थापनाचा चोख कारभार यथोचित घडीसह पिचड साहेबांनी सुस्थितीत ठेवला ही बाब सदैव संस्मरणीय राहील . 💐👏👏 -------------------------------------------- 📝 $ डॉ . सुनील शिंदे अगस्त्य फीचर्स अकोले / अहमदनगर

Friday, October 10, 2025

पिचड साहेब

अकोले(शांताराम काळे )अकोले तालुक्याची व राजूर गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात ओळख करून देणाऱ्या महामानव वंदनीय मधुकरराव पिचड यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला ,तालुक्यात जलाशयाची निर्मिती करून जलनायक म्हणून आपली ओळख करताना तालुक्यासह उत्तर नगर जिल्हा सुजलाम सुफलाम बनविला.सभापती पदापासून राज्यात मंत्री,प्रदेशाध्यक्ष,विरोधी पक्षनेते,या पदाना न्याय देऊन आदिवासी उपेक्षित समाजाला स्वतंत्र आर्थिक बजेट करून न्याय दिला तर तालुक्याला नवसंजीवनी देणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.त्यांनी तालुक्याचे,राज्याचे नेतृत्व करताना आपले कुटुंब देखील एकत्रित ठेवून आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांनादेखील सामाजिक व राजकीय कामाची गोडी लावली ,नातवंडे ,भाऊ ,मुले,सुना असा त्यांचा परिवार माजी आमदार वैभव पिचड यांचे आपल्या वडीलांबद्दल दैनिक सकाळ ने त्यांच्या विषयी माहिती करून घेतली ' वंदनीय पिचड साहेबांचा संस्काराचा ठेवा .. ' --------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड माजी आमदार वैभव पिचड म्हणाले माझे वडील वंदनीय पिचड साहेबांकडून राजकीय धड्याशिवाय खऱ्या अर्थाने पारिवारिक स्नेह कसा टिकवावा आणि एकत्र कुटुंब पद्धतीतील जिव्हाळा सौहार्द शिकायला मिळाले ही मोठी उपलब्धी . शिस्तप्रियता, कामाचा पाठपुरावा तसेच पूर्ततेबाबत दक्षता या बाबी अधिक शिकायला मिळाल्या . वंदनीय साहेबांचा स्वभाव सडेतोड, स्पष्टवक्तेपणाचा आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्धता तसेच माणूसपण केंद्रिभूत ठेऊन आलेल्या माणसाचा आदर टिकवून वागायचे हा त्यांचा लक्षणीय बाणा तालुक्यासह राज्याला स्मरणात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ही जणू कसोटीची संधी आहे असे समजून साहेब धैर्याने आणि कमालीच्या शांतपणे वागत, निर्णय घेत असल्याचे मी कायम अनुभवले आहे.. पाहिले आहे . प्रभावी निर्णयक्षमता हा तर वंदनीय साहेबांचा विशेष लौकीक ठरला . निर्णय घेताना संबंधित माणसाचा यथोचित सन्मान , आदर राखून मात्र अंतिमतः तडजोड न करता तात्विक भान टिकवून ते निर्णय घेत असत . साहेबांची धार्मिक मते, जाणीव फार म्हणजे फारच सौजन्यशील पद्धतीची, आदराची होती . धार्मिक सलोखा राखण्याबाबत कायम आग्रही भूमिका घेणाऱ्या साहेबांनी सातत्याने सलोखा टिकवला हे त्यांचे वैशिष्ट्य सर्वांना ज्ञात आहे . निवडणूकीचा निकाल अथवा मनाविरुद्ध काही घडले तरी कमालीच्या स्थितप्रज्ञ भावनेतून साहेब संयमी राहिले . आजारपणातील अखेरच्या काळात वंदनीय साहेबांनी तालुक्यातील जनसामान्यांच्या हिताबाबत कळवळ्याने विचारपूस केली हा माझ्या मनावर कोरला गेलेला प्रसंग अविस्मरणीय ठरलाय. एक मुद्दा मला आवर्जून लक्षणीय वाटला साहेबांच्या संदर्भात.. तो म्हणजे त्यांनी निर्णायक प्रसंगी मला एखादा सल्ला दिला आणि माझ्याकडून काही वेगळी भूमिका प्रासंगिक कारणाने घेतली गेली तरीही वंदनीय साहेब कधी संतापले नाहीत अथवा तुसडेपणाने नाराजी कधीच व्यक्त केली नाही .. साहेबांची वाचन क्षेत्रातली रसिकता मात्र व्यासंगी ठरली . त्यांचे वाचन चोखंदळ होते. अफाट होते . राजकीय व्यापात, विलक्षण व्यस्त दिनक्रमातही वेळ राखून कायम साहेबांचे वाचन असायचे. वाचनाची त्यांची अभिरुची फारच संपन्न राहिली . विशेषतः परिवर्तनवादी साहित्य आणि वैचारिक लेखन हा आवडीचा भाग होता . इंग्लिश भाषेतील साहित्याच्या वाचनाबाबत अधिक कल राहिला . त्यांचे पदवीचे शिक्षणच मुळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले . विख्यात स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय प्रा. ग. प्र. प्रधान मास्तरांचे विद्यार्थी होते साहेब . याशिवाय सकाळची पायी फेरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. साहेबांनी घरातील सर्वांचेच भावनिक पर्यावरण खऱ्या अर्थाने समृद्ध ठेवले . नात्यातील भावबंध आणि मायेचा ओलावा कटाक्षाने जपला. माझी भावंडे, आई आणि नातवांना जी मायामतेची पाखर मनापासून धरायची असते त्याबाबत त्यांनी कायमच राजकारण - समाजकारणात व्यग्र असताना देखील आपुलकीची साथ दिली . नातवांचे पुरेसे लाड केले . भावनिक कोमलता , संदर्भ जपले . सुखात असो वा दु:खात कधीही, केंव्हाही वंदनीय साहेबांनी जबाबदारी न टाळता अथवा कुणावरही न विसंबून राहता कौटुंबिक सह्रदयता जाणीवेतून राखली आणि पारिवारिक स्नेह कसोशीने सांभाळला. वृद्धिंगत केला हे त्यांचे ऋण मला कधीच विसरता येणे शक्य नाही . कौटुंबिक जिव्हाळ्याशिवाय वंदनीय साहेबांनी आपला समाज तसेच तालुक्यातील जनसामान्यांचे हित सौहार्द या बाबींना प्राधान्य दिले . घरी भेटीला येणाऱ्या प्रत्येक माणसाची अगत्याने विचारपूस तसेच अडीअडचणींचा निपटारा करणे यासंदर्भात काळजातली नाती सांभाळली. तालुक्यातील , मतदार संघातील अवघ्या माणसांविषयीची फिकीर आणि हितसंबंध जपण्यासाठी वंदनीय साहेबांनी आपपर भेदभाव केला नाही की जबाबदारी टाळली नाही . ' ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती ' या न्यायाने साहेबांनी समाजहिताचा कळवळा सिद्ध केला, हे अवघ्या तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे , ठाऊक आहे . सामाजिक, राजकीय वाटचालीत प्रसंगी प्रतिकूल वातावरणातही समाज हिताचे निर्णय घेताना सातत्याने साहेबांनी जनसामान्यांच्या काळजाची स्पंदने धडधडत ठेवली. तालुक्याचे हक्काचे पाणी असो अथवा अगस्ती साखर कारखान्याची मुहूर्तमेढ आणि पुढील समस्यांतून मार्ग काढणे किंवा शिक्षण संस्थांचे अनुदान तसेच मान्यतेसाठी प्रयत्न आणि जलसंधारण प्रकल्प, समस्यांच्या विळख्यातील लिफ्ट योजना, आश्रम शाळांचे जाळे मार्गी लावले अशा एक ना अनेक कामगिरीबाबत वंदनीय साहेबांनी कायम आणि कायमच जीवाचे अक्षरशः रान करुन समाजहिताचा प्रपंच जपला. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धन, वन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत?  ' घार हिंडते आकाशी , चित्त तिचे पिलापाशी ' या मायाममतेच्या तत्वाने साहेबांनी परिवार आणि समाजातील, तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या , समजून उमजून सदैव काळजी वाहिली. ध्येयवादी राहिले . कर्तव्य निष्ठेने काम केले . दूध व्यवसायातील धवल क्रांती, प्रवरेच्या पाण्याचे नियोजन आणि फेरवाटप , निळवंडे धरण कसोशीने मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच घेतलेली मेहनत अशा अधोरेखित कर्तृत्वाचा लेखाजोखा साहेबांच्या नांवे लखलखीत आहे . वडील म्हणून साहेबांच्या कार्याचा असा हा विशाल पट आम्हाला सदैव दीपस्तंभासारखा प्रेरणादायी ठरेल . दिशादर्शक ठरेल -------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड शब्दांकन , शांताराम काळे

Wednesday, July 20, 2022

पांजरे धबधबा

आपल्या अपंग मुलगी वैशाली हिच्या  नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकऱ्याने आपल्या

Wednesday, June 15, 2022

गाथा विकासाची, द्रष्टया नेतृत्वाच्या कर्तृत्वाची

गाथा विकासाची, द्रष्टया नेतृत्वाच्या कर्तृत्वाची

अकोले :- 

समृध्द वैभवशाली निसर्ग आणि उपेक्षित माणसे हे अकोले तालुक्याचे पूर्वापार दिसणारे चित्र. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा हे येथील बहुसंख्य माणसांचे एकेकाळचे दुर्भाग्य होते. मात्र गेल्या अडीच तीन तपांच्या कालावधीत यात बदल होत गेला आहे. 1980 सालचा अकोले तालुका 2022 साली राहिलेला नाही. उपेक्षितपणाचा काळोख सरला आहे. समृध्द आणि वैभवशाली प्रकाशाची आस तालुक्याला लागली आहे.

अकोले बदलत आहे..

एकेकाळी भात, बाजरी सारखी पिके घेणारा आणि पावसावर पूर्णपणे अवलंबून असणारा येथील शेतकरी आता  तंत्रज्ञानाची कास धरीत शेतीत विविध प्रयोग,विविध विक्रम करीत आहे. येथील शेतकर्‍याने पिकवलेली द्राक्षे आणि डाळींबे परदेशात जात आहेत. डॉक्टर, इंजिनिअर होणे अथवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी होणे येथील तरुणांना आता नविन राहिलेले नाही. एवढेच नाही तर उच्च शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी अथवा ऑस्टे्रलियासारखे देश जवळ करणारया तरुणांची संख्या वाढत आहे. उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या येथील भूमिपूत्रांची आणि त्यांच्या हॉस्पिटलची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील पतसंस्था आणि विविध बँकेच्या शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा होत आहेत. पूर्वी तालुक्यातील अनेक गावांचा पावसाळ्यात तालुक्याशी संपर्क तुटायचा, अनेक गावे दूर्गम होती. मात्र आता वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेल्या डांबरी सडकांमुळे बाराही महिने तालुक्यातील कोणत्याही गावात, कोणत्याही ऋतुत सहजपणे पोहचता येते. अकोले शहरही गेल्या काही वर्षात बदलले आहे. शहरात उभ्या राहत असणार्‍या आधुनिक इमारती,गावाच्या सभोवताली झालेले लहानमोठे बंगले, विविध वस्तुंचे मॉल्स, लहानमोठी दुकाने, जिभेचे चोचले पुरविणारी विविध प्रकारची हॉटेल्स, सोन्या चांदीची दुकाने (अन दारुचीही) यांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील लहानमोठी गावेही कात टाकत आहेत.येथील माणसांची बदलत्या काळानुसार बदलण्याची वृत्ती, नवे काही शिकण्याची उमेद, संघर्षशील पण विकासात्मक दृष्टीकोन, जिद्द, चिकाटी याला या बदलाचे श्रेय असले तरी तालुक्याला लाभलेल्या विकासाभिमुख नेतृत्वाचाही यात मोठा वाटा आहे. 1980 साली मधुकरराव पिचड अकोले तालुक्याचे आमदार झाले. त्यानंतर सलग सात निवडणूका त्यांनी जिंकल्या. राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेता, राज्यातील सत्तारुढ पक्षाचा अध्यक्ष अशी सत्तेच्या राजकारणातील विविध पदे त्यांनी भुषविली. आपल्या लोकप्रतिनिधीच्या या कार्यकाळात त्यांनी तालुक्यात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यात मुलभूत स्वरुपाचे जे काम केले त्यामुळे अकोले तालुक्याच्या विकासाला आणि अर्थकारणाला गती प्राप्त झाली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या या पायाभूत सुविधांची फळे आज तालुका चाखत आहे.त्यांनी तीस पस्तीस वर्षात तालुक्यात केलेल्या मूलभूत स्वरूपाच्या कामांवरच येथील विकासाची इमारत उभी आहे.

पाणीदार आमदार..

मधुकरराव पिचड म्हणजे संघर्षातून पुढे आलेले, सतत धढपडणारे, विकासाचा ध्यास घेतलेले, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी झगडणारे आणि वंचित घटकांबद्दल आस्था बाळगणारे एक संघर्षशील नेतृत्व होय. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना आपल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जी विविध पदे भुषविली आणि राज्याच्या राजकारणात आपली जी ओळख निर्माण केली असे भाग्य क्वचितच कोणाच्या वाट्याला आले असेल. तालुक्यातील जनतेशी जुळलेली नाळ आणि राजकीय फायद्यातोट्याचा विचार न करता जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी घेतलेली लढाऊ भूमिका ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची  वैशिष्ठ्ये होत. 

आमदार झाल्यानंतर अल्पकाळातच ‘पाणीदार आमदार’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्याला निमित्त ठरले भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाचे आंदोलन. भंडारदरा धरण अकोले तालुक्यात असले तरी प्रवरा नदीच्या पाण्यावर तालुक्यातील जनतेचा कायदेशीर हक्क नव्हता. वाहणारे पाणी पाहणे प्रवरा खोर्‍यातील जनतेच्या नशिबी होते. मागील शतकातील 70 च्या दशकात अकोले तालुक्यात वीज आली  नंतर पीव्हीसी पाईपमुळे उपसा जलसिंचन योजनांचे तंत्र सुलभ झाले. बँका, साखर कारखान्यांनी सिंचन योजनांसाठी अर्थपुरवठा द्यायला सुरुवात केली त्यामुळे प्रवरा नदीवर अनेक ठिकाणी लहानमोठ्या उपसा जलसिंचन योजना उभ्या राहू लागल्या. मात्र वर्षानुवर्षे भंडारदर्‍याचे पाणी वापरणार्‍या प्रस्थापितांना हे सहन झाले नाही, त्यातूनच या उपसा जलसिंचन योजनांना बेकायदेशीर ठरवत अनेक योजनांची वीज तोडण्यात आली. त्यामुळे प्रवरा खोर्‍यात मोठा असंतोष निर्माण झाला.त्यातूनच प्रवरेच्या पाण्याच्या न्याय हक्कासाठी अकोले तालुक्यात मोठा संघर्ष उभा राहिला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाण्याच्या न्याय हक्कासाठी चळवळ सुरु केली. सत्तारुढ पक्षाचे आमदार असतानाही स्वत:च्या सरकारशी संघर्ष करण्याचे धाडस दाखवत श्री.पिचड या आंदोलनात सहभागी झाले. भंडारदर्‍याचे चाक बंद करण्याचे आंदोलनात ते अग्रभागी होते. त्यांच्यासह अनेक आंदोलकांवर खटले दाखल झाले. पुढे जनतेच्या रेट्यापुढे सरकारला भंडारदर्‍याच्या पाण्याचे फेरवाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले. मंत्रीमंडळात असणार्‍या श्री.पिचड यांचा या सर्व घडामोडीत महत्वाचा वाटा होता. तेव्हापासून पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख निर्माण झाली.


पाणी अडविण्याचा धडक कार्यक्रम..

प्रवरेच्या पाण्यात हक्क मिळाल्यामुळे प्रवरा खोर्‍यात, शेतशिवारात दूरपर्यंत प्रवरेेचे पाणी फिरले, शेती फुलली. मात्र अकोले तालुक्यातील मुळा खोरे तसेच आढळा पाणलोट क्षेत्र  पाण्यापासूनच वंचित होते.पावसाळा संपताच या नद्या महिनाभरात कोरड्या पडत. तालुक्यातील शेतकर्‍याच्या शेताला पाणी मिळावे यासाठी पाणी अडविण्याचा धडक कार्यक्रम त्यांचे कार्यकाळात राबविला गेला. पाझर तलाव,साठवण तलाव,बंधारे,सिमेंट बंधारे,वनबंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे यांची शेकडो कामे तालुक्यात झाली. मात्र या प्रकारे पाणी अडण्यास मर्यादा असल्यामुळे मुळा तसेच आढळा खोऱ्यात लघुपाटबंधारे प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले.  येथेही  प्रस्थापित आडवे आले. नद्यांच्या खोर्‍यात वर पाणी अडले तर आपल्याला पाणी कमी पडेल अशी भिती खालच्या भागातील पुढार्‍यांना वाटू लागली. अकोले तालुका गोदावरी खोर्‍यात येत असल्यामुळे "वॉटर अकाउंट" चे अडथळे उभे करण्यात आले. मात्र तेव्हा सत्तेत असणार्‍या पिचड यांचेमुळे टिटवी, पाडोशी, कोथळे,अंबित, देवहंडी,बलठन यासारख्या प्रकल्पांना विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळू शकले. अन्यथा हे प्रकल्प कधीच होऊ शकले नसते. काही प्रकल्पातील वनखात्याचे अडथळेही त्यांच्या मुळे दूर झाले. पाणी अडविण्याच्या या कार्यक्रमात मुळा नदीवर शिसवद पासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागापर्यंत कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांची साखळी निर्माण झाली.आढळा नदिवरही अशीच बंधाऱ्यांची साखळी उभी राहिली. मुळा खोर्‍यात  आठ तर इतरत्र सात अशी पंधरा छोटी धरणे त्यांचे कार्यकाळात तयार झाली.  वाकी, सांगवी किंवा कोथळे सारखे प्रकल्प अवघ्या वर्षभरात पूर्ण झाले. मुळा बारमाही करण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न कोल्हापूर बंधार्‍यांची साखळी आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यामुळे अंशत: पूर्ण झाले. पावसाचे कमी प्रमाण असणाऱ्या आढळा खोऱ्यात बिताक्याच्या घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी वळण बंधाऱयाद्वारे वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला.त्या मुळे आढळा धरणासाठी पाण्याची उपलब्धता वाढली.


विजेचे जाळे..

मोठ्या प्रमाणात पाणी अडल्यामुळे ठिकठिकाणची शेती फुलू लागली. शेतकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊ लागला.

तालुक्यात विविध प्रकल्पाद्वारे पाणी उपलब्ध झाल्यानंतर ठिकठिकाणी विहीरी खोदण्यात आल्या. ओढ्यांवर, नद्यांवर शेतकर्‍यांनी वैयक्तिक, सामुदायिक स्वरुपात उपसा जलसिंचन योजना केल्या. नदीच्या दूतर्फा दुरवरपर्यंत पाणी पोहचले. एकेकाळचे ओसाड, उजाड माळराने हिरवीगार झाली मात्र या सर्वांसाठी वीजेची गरज होती. 1966 साली अकोले तालुक्यात शेकेईवाडी येथील एका विहीरीवर पहिला वीज पंप बसविण्यात आला, त्यावेळेला तालुक्यात असणार्‍या विहीरींची संख्या ही मर्यादीतच होती. अनेक ठिकाणी मोटांचा तर काही ठिकाणी डिझेल इंजिनचा मोटा बसविण्यासाठी वापर होत होता. मात्र 90 च्या दशकानंतर शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि वीजेच्या मागणीत वाढ होऊ लागली. वीजेच्या मागणीतील वाढ लक्षात घेऊन श्री.पिचड यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणाचा व्यापक कार्यक्रम तालुक्यात हाती घेण्यात आला. गरजेनुसार वीज उपकेंद्रांची संख्या वाढवत नेण्यात आली. 50 वर्षापुर्वी अकोेले तालुक्यात केवळ अकोले येथेच वीज उपकेंद्र होते आणि तालुक्याच्या काही भागाला संगमनेर तालुक्यातील वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होत होता मात्र आज अकोले तालुक्यात 132 केव्ही क्षमतेची अकोले आणि भोजदरी अशी दोन वीज उपकेंद्रे आहेत तर 33 केव्ही क्षमतेची डझन भरपेक्षा वीज उपकेंद्रे आहेत. वीजेच्या या विस्तृत जाळ्यामुळे शेतीला सर्वदूर वीज उपलब्ध झाली.वड्या वस्त्यांवर वीज पोहचली. छोट्या मोठ्या व्यवसाय, उद्योग धंद्यांनाही वीज मिळू लागली.शहरासह खेडोपाडी विजेवर आधारित शेकडो स्वयंरोजगार निर्माण झाले.


रस्त्यांचे जाळे..

कोणत्याही भागाचा विकास हा तेथील रस्ते किती चांगले आहेत, यावर अवलंबून असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्याचा पश्‍चिम भाग पूर्णत: डोंगराळ आहे. मुळा, प्रवरा, आढळा या तीन खोर्‍यामध्ये तालुक्याची विभागणी झालेली आहे. लहानमोठ्या टेकड्या, डोंगर, पर्वतशिखरे, नद्या, ओढे यामुळे परस्परांशी दळणवळण ही एकेकाळी अकोेले तालुक्यात जिकीरीची गोष्ट होती. 40 वर्षापुर्वी पश्‍चिम भागातील अनेक गावांना बारमाही रस्ते नव्हते तर अनेक गावांना जेमतेम बैलगाडी जाईल अशा वाटा होत्या. भंडारदरा परिसरातील घाटघर, साम्रद, रतनवाडी आदी गावे, मुळा खोर्‍यातील अंबित, पाचनई, कुमशेत, कोहणे, कोथळे, आढळा खोर्‍यातील तिरढे, पाचपट्टा, एकदरा तसेच सातेवाडी, खेतेवाडी फोफसंडी अशा अनेक गावांच्या नशिबी पावसाळ्यात एखाद्या बेटाचे जीणे यायचे. एव्हढेच नव्हे तर अकोल्यापासून 10-12 किलोमीटर असणार्‍या निंब्रळ, निळवंडे सारख्या गावांनाही होडीतून प्रवरा नदी ओलांडून जावे लागायचे. पावसाळ्यात मुळा, प्रवरा, आढळा या नद्यांना लहानमोठे पूर आले की अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटायचा. अकोल्यातील प्रवरा नदीवरील पुलाचा अपवाद वगळता एकही उंच पुल तालुक्यात नव्हता. मात्र श्री.पिचड यांच्या प्रयत्नाने आता हे सर्व चित्र बदलले आहे. तालुक्यातील सर्व 191 गावे बारमाही रस्त्यांनी जोडली गेली आहेत. धो्धो पावसातही तालुक्यात येणार्‍या पर्यटकांच्या गाड्या आता थेट घाटघर, रतनवाडी अथवा हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याशी असणार्‍या पाचनई, कुमशेतपर्यंत जावू शकतात.


पुलांची साखळी..

पुलांमुळे भूभाग आणि माणसे कशी जोडली जातात याची प्रवरेवरील पुल साखळी हे उत्तम उदाहरण आहे. पूर्व  वाहिनी प्रवरेमुळे अकोल्याचे उत्तर - दक्षिण असे दोन भाग झाले आहे. एक काळ असा होता की प्रवरेला पावसाळ्यात पाणी आले की, दोन्ही काठांचा परस्परांशी संपर्क तुटायचा. कारण पुर्वी प्रवरा नदीवर अकोले येथे एकमेव उंच पुल होता. कळस, रंधा, पिंपरकणे आणि भंडारदरा येथे फरशी पुल होते. पावसाळ्यात हे फरशी पुल वारंवार पाण्याखाली जायचे.

अकोल्याहून संगमनेरला जाणार्‍या अनेक प्रवाशांना पावसाळ्यात कळसजवळील प्रवरा नदी नावेतून ओलांडावी लागायची. कारण संगमनेरला जायला पर्यायी मार्ग नव्हता. पण आता ही परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. प्रवरा नदीवर पुलांची एक साखळीच तयार झाली आहे. निळवंडे प्रकल्पामुळे चितळवेढे येथे उंच पुल झाला. भंडारदरा पुलाची उंची वाढविण्यात आली.भंडारदर्‍यापासून कळस पर्यंत प्रवरा नदीवर आता भंडारदरा, रंधा धबधबा, निळवंडे धरण पायथा, चितळवेढे, निंब्रळ, विठा, मेहेंदुरी, अगस्ति सेतूपुल, अकोले, कळस असे दहा पुल झाले आहेत. कळसला झालेल्या मोठ्या पुलामुळे तेथील नाव इतिहासजमा झाली आहे. दोन्हीकाठच्या गावांना आता दुसर्‍या काठावर जाण्यासाठी दोन अडीच किलोमीटरपेक्षा अधिक वळसा घालावा लागत नाही. एकाच तालुक्यात एकाच नदीवर पुलांची अशी साखळी राज्यात अन्यत्र कोठे क्वचितच पहायला मिळते. हे शक्य झाले ते येथील लोकप्रतिनिधींच्या प्रभावी नेतृत्वामुळे. जी गोष्ट प्रवरा नदीची तीच मुळा आणि आढळा या नद्यांची.

 तालुक्यातील मुळा खोरे हा एकेकाळी तालुक्यातील सर्वात दूर्गम भाग होता, त्यामुळे पावसाळ्यात मुळा खोर्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटायचा. मुळा नदीच्या पाण्यामुळे पावसाळ्यात अडीच महिने कोतुळ येथे जाण्यासाठी नावेशिवाय पर्याय नव्हता. काही वर्षापुर्वी कोतुळ, धामणगाव पाटच्या दरम्यान मुळा नदीवर उंच पुल झाला आणि कोतुळची नावही इतिहास जमा झाली. मुळा नदीवरही आता खडकीपासून लहित वाघापूरपर्यंत पुलांची साखळी निर्माण झाली आहे. आढळा नदीवरही देवठाण, सावरगाव पाट, समशेरपूर आदी ठिकाणच्या पुलांची उंची वाढविण्यात आली. अनेक ठिकाणी नविन पुल निर्माण झाले. आढळेचे दोन्ही काठ परस्परांशी जोडले गेले.लहान मोठे ओढे,नाले यांच्यावरही आवश्यक तेथे पूल झाले आहेत.तालुक्यात आज असे शेकडो पूल उभे आहेत.

तालुक्याच्या पश्‍चिम भागात पुर्वी बारमाही रस्ते असणारी गावे  हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी होती.त्यामुळे आदिवासी भागाचे मुख्यकेंद्र असणार्‍या राजूरशी या गावांचा संपर्क तुटायला. तेथील माणसाना अनेक अडचणींचा सामना करायला लागायचा. पण आता पश्‍चिम भागातील प्रत्येक गाव राजूरशी पक्क्या रस्त्याने जोडले गेले आहे. हीच स्थिती मुळा खोर्‍यातील आदिवासी गावांची आहे. कोतुळ, पैठण, कोहणे, कोथळे या रस्त्यामुळे मुळा खोर्‍यातील अनेक आदिवासी गावांचा कोतुळशी आता बाराही महिने संपर्क असतो.भंडारदरा परिसरातील घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे या गावांना जोडणारा रिंगरोड तयार झाला. त्यामुळे या गावांची सोय झालीच पण पावसाळ्यात भंडारदर्‍याला येणार्‍या पर्यटकांनाही आता वैभवी निसर्गाचे दर्शन घडू लागले आहे.

घाटरस्ते..

तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले जात असताना अनेक घाट रस्ते नव्याने अस्तित्वात आले. म्हैसवळण घाटामुळे तालुक्याचा उत्तर भाग इगतपुरीशी जोडला गेला तर चिंचखांड फोडल्यामुळे समशेरपूर परिसर सिन्नरशी जोडला गेला. कोंभाळण्याच्या अवघड घाटामुळे खिरवीरे परिसरातून अकोल्याला यायला नविन मार्ग तयार झाला तर शेरणखेलच्या घाटामुळे अकोल्याहून समशेरपूरला जाणारा नविन मार्ग तयार झाला आहे. मुथाळण्याच्या घाटामुळेही आता समशेरपूर परिसरात पोहचता येते. तर कोतुळला जाणार्‍या चिचखांड घाटामुळे मुळा खोर्‍यातील अनेक गावे अकोल्याच्या जवळ आली आहेत. अशक्य वाटणारा घाटरस्ता तयार झाल्यामुळे फोफसंडी हे अतीदूर्गम गावही तालुक्याशी जोडले गेले आहे.


विकासाच्या वाटा..

तालुक्यात विणल्या गेलेल्या या रस्त्यांच्या जाळ्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. बारमाही रस्ते झाल्यामुळे शेकडो आदिवासी  तसेच ग्रामीण भागातील मुले मुली राजूर, कोतुळ, अकोले, ब्राह्मणवाडा, शेंडी येथे शिक्षणासाठी जा - ये करु शकतात. तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही शेतकर्‍याला शेती माल मुंबई, पुणे, नाशिक अशा बाजारपेठेत सहजतेने पाठविता येतो. शेतशिवारापर्यंत भाजीपाल्याची माल वाहतुक करणार्‍या गाड्या आता येत आहेत. गावातच डेअरी झाल्यामुळे दुध उत्पादकांनाही आता डोक्यावर किटली घेऊन पायपीट करावी लागत नाही. घाटघर भंडारदर्‍यासह तालुक्यातील कोणत्याही पर्यटनस्थळी पर्यटक बाराही महिने पोहचू शकतात त्यामुळे आदिवासी दूर्गम भागात पर्यटन हा उद्योग नव्याने उदयास येत आहे. या रस्त्यांमुळे पर्यटन विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

तालुक्यातून जाणारा कोल्हार - घोटी हा राज्य मार्ग हाच तालुक्यातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. मात्र गेल्या तीन दशकात या रस्त्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली आणि या रस्त्याने कात टाकली.अकोले देवठाण म्हैसवळ,राजूर कोतुळ  ब्राह्मणवाडा बोटा, अकोले सिन्नर या सारख्या अन्य महत्वाच्या रस्त्यांमध्ये वेळोवेळी मोठी सुधारणा होत गेली.त्या मुळे लगतच्या तालुके जिल्ह्यांशी संपर्क सुलभ झाला आहे.


आधुनिक तिर्थक्षेत्रे..

धरणे, वीज निर्मिती केंद्रे यासारखे मोठे प्रकल्प एखाद्या परिसरात उभे राहतात तेव्हा राज्याच्या दृष्टीने ते आधुनिक तीर्थक्षेत्रे ठरत असली तरी त्या परिसराला मात्र त्याचा विशेष लाभ होतोच असे नाही. धरणांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होतो हे खरे असले तरी धरण प्रकल्पांचा परिसर आणि तेथील माणुस मात्र तसाच उपेक्षित राहतो असाच आजवरचा अनेक धरणांचा अनुभव आहे. तालुक्यातील भंडारदरा धरणही त्याचेच जितेजागते उदाहरण ठरावे. दुष्काळी उत्तर नगर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार्‍या या धरणाने त्या परिसरातील आदिवासी माणसांना काहीच दिले नाही. उन्हाळ्यात आजही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अनेक वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण सुरु आहे.जी गोष्ट भंडारदर्‍याची तीच दारणेची, गंगापुरची अन् कोयनेची.

मात्र प्रभावी आणि दुरदृष्टीचे नेतृत्व असेल तर अशा मोठ्या प्रकल्पांचाही स्थानिक परिसर विकासासाठी कसा उपयोग होतो हे तालुक्यात सुरु असणार्‍या निळवंडे आणि घाटघर प्रकल्पांनी दाखवून दिले आहे. किंबहुना मोठ्या प्रकल्पांचा लाभ स्थानिक परिसराला कसा मिळवून द्यावा याचा घाटघर आणि निळवंडेने वस्तुपाठच घालून दिला आहे.हे  राज्याच्या दृष्टीने महत्वाचे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यात श्री पिचड यांचा महत्वाचा वाटा आहे. प्रकल्प खर्चातून प्रकल्प परिसरात सुरु असणारी रस्ते, पुलांची कामे असोत, प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला मिळणारा पाण्याचा लाभ असो, त्यांच्या पाल्यांना मिळणार्‍या नोकर्‍या असोत की त्यांचे पुनर्वसन असो या प्रत्येक बाबीतुन याची प्रचिती येते. 


घाटघर वीज प्रकल्प..

250 मेगावॅट क्षमतेचा घाटघर, उदंचन जलविद्युत प्रकल्प हा भारतातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प. एकेकाळी अतीदूर्गम गणल्या गेलेल्या घाटघरला जाणार्‍या भंडारदरा - घाटघर हा 22 किलोमीटरचा रस्ता बारमाही वाहतुकीसाठी योग्य झाला तो घाटघर प्रकल्पातूनच. आणि जिल्ह्याची चेरापुंजी समजले जाणारे घाटघर आणि साम्रदची सांदण दरी पर्यटन नकाशावर आले.

 घाटघर जलविद्युत प्रकल्पाला लाभक्षेत्र नसल्यामुळे  त्याला पुनर्वसन कायदा लागू होत नव्हता. मात्र श्री.पिचड यांनी आपले राजकीय वजन आणि प्रशासकीय कौशल्य वापरुन या प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू केला.त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे लाभ मिळू शकले. या प्रकल्पाच्या घाटघर येथील धरणात फक्त 24 घरे बुडणार होती. मात्र या धरणाच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गावालाच पडतो म्हणून संपूर्ण गावाचेच पूनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि  सुमारे 181 जणांच्या घरांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी कोकण कड्याजवळ नविन घाटघर गाव वसविण्यात आले. प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना  सरकारी सेवेत सामावून घेण्यात आले.

घाटघर प्रकल्पात पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कोकणकड्याशी पायथ्याशी असणार्‍या धरणातील पाणी रात्रीच्या वेळी उपसा करुन घाटघर धरणात सोडले जाते आणि दिवसा या पाण्याचा उपयोग करुन महत्तम मागणीच्या वेळेला वीज निर्मिती होते. मात्र पावसाळ्यात खालचे धरण वारंवार ओव्हरफ्लो होते आणि पाणी नदीला जाऊन मिळते. मात्र श्री.पिचड यांचेमुळे  वाहून जाणारे हे पाणी आता भंडारदरा धरणात सोडले जाते.त्या मुळे तीनशे साडेतीनशे  दशलक्ष घनफुट  एवढे अतिरिक्त पाणी प्रवरा खोर्‍यासाठी उपलब्ध झाले आहे.


निळवंडे धरण..

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे आणि अनेक वर्षे रेंगाळलेले निळवंडे धरण मार्गी लावण्याचे महत्वाचे काम श्री पिचड यांनी केले.तसेच त्यांच्या

 दुरदृष्टीमुळे निळवंडे प्रकल्पाचा अकोले तालुक्याला मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.

आजपर्यंत आधी पुनर्वसन मग धरण या घोषणा फक्त ऐकल्या जात होत्या. पण निळवंडेच्या बाबतीत ही घोषणा श्री पिचड यांच्यामुळे प्रत्यक्षात आली. निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचा  पॅटर्न राज्यभर गाजला. निळवंडे धरणात दोन गावे पुर्णत: बुडाली तर 11 गावे अंशत: बाधीत झाली आहेत. या बाधीत गावांच्या उर्वरीत क्षेत्राला पाणी मिळावे यासाठी निळवंडे जलाशयातून चार उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे  तालुक्यातील 2 हजार 290 हेक्टर अतिरिक्त क्षेत्रास निळवंडेचा लाभ मिळणार आहे .अकोले तालुक्यातील निळवंडेच्या लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा म्हणून उच्च स्तरीय पाईप कालव्यांची योजना राबविण्यात आली. त्यामुळेही तालुक्यातील 2 हजार 328 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एकाच धरणाला दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर चार कालवे असणे हे राज्यातील एकमेव उदाहरण असेल. 

निळवंडे धरणाचा लाभ मूळ योजनेनुसार तालुक्यातील 4 हजार 235 हेक्टर क्षेत्रास होणार होता. मात्र आता जलाशयातील उपससिंचन योजना व उच्च स्तरीय कालवे या मुळे भिजणारे क्षेत्र विचारात घेता तालुक्यातील 8 हजार 853 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. श्री पिचड यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील 4 हजार 618 हेक्टर जास्त क्षेत्रास लाभ मिळणार आहे.

निळवंडे जलाशयात उभा रहात असलेला उड्डाणपूल हा एखाद्या जलाशयातील अशा प्रकारचा पहिलाच पुल होय. त्याचा लाभ 14 आदिवासी गावांना होणार आहेच. पण पर्यटकांच्या दृष्टीनेही हा पुल भविष्यात आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे जलाशयातील उपसा जलसिंचन योजना, उच्चस्तरीय कालवे अथवा जलाशयातील उड्डाणपूल यांचा मुळ प्रकल्पात समावेश नव्हता. श्री.पिचड यांच्या विशेष प्रयत्नामुळे नंतर प्रकल्पात त्यांचा समावेश करण्यात आला.

तालुक्यात शेकडोंच्या संख्येने झालेले लहानमोठे बंधारे, पाझरतलाव, तळी, वनबंधारे यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले गेले. आढळा, मुळेवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे तालुक्यात निर्माण झालेले पंधरा ल. पा. तलाव आणि निळवंडे धरण यामुळे तालुक्याला सिंचनाचा मोठा लाभ  मिळू लागला. ठिकठिकाणी विहीरींवर ओढे आणि नद्यांवरील उपसा जलसिंचन योजनांवर वीज पंप बसले. वीजेच्या सर्वदूर जाळ्यामुळे वीजेची कमतरता जाणवली नाही. शेतशिवारात पाणी फिरु लागले, जागोजागी समृध्दीची बेटं तयार झाली. आज तालुक्यातून दरवर्षी टोमॅटो, कांदे व भाजीपाल्याच्या हजारो ट्रक शहराच्या बाजारपेठेत जात असतात. चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे दुध धंद्यातही वाढ झाली. काही लाख लिटर दुध तालुक्यात तयार होते. तालुक्यातील शेतकर्‍यांनी यावर्षी सुमारे साडेचार लाख टन उस निर्माण केला. वीज, रस्ते आणि पाण्याच्या बाबतीत झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेती आणि शेतीपुरक उत्पन्नात मोठी वाढ झाली. तालुक्याच्या अर्थकारणाला गती प्राप्त झाली. आज तालुक्याचा जो विकास दिसत आहे, त्यात या पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे.

आरोग्य सेवेचे जाळे..

पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गेल्या 30-40 वर्षात मोठे बदल झाले. पुर्वी दुर्गम भागातील एखादा माणूस आजारी पडला तर त्याला डोली करुन राजूरला आणावे लागायंचे.कारण गाव पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती.रस्ते नव्हते. मात्र श्री.पिचड यांच्या कारकिर्दीत तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. तालुक्यात अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर येथे ग्रामीण रुग्णालये आहेत तर अकरा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शिवाय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक उपकेंद्रे आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा गावपातळीपर्यंत पोहचली आहे. त्याचा मोठा लाभ ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेला होत आहे.

पुर्वी अकोले तालुक्यात शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी होते. जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षर एकेकाळी अकोले तालुक्यात होते. तालुक्याच्या आदिवासी भागात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळांनी मोठी भूमिका बजावली. आज तालुक्यात 14 शासकीय आश्रमशाळा आहेत.शिवाय अनुदानित आश्रम शाळा वेगळ्याच. त्यातून हजारो  आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10 वी व 12 वी नंतर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा, शेंडी या ठिकाणी वसतिगृहे काढण्यात आली आहेत. त्याचा लाभ काही हजार आदिवासी मुलामुलींना होत आहे.  याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी श्री.पिचडांच्या विशेष प्रयत्नामुळे संगमनेर, श्रीरामपूर, नगर याठिकाणीही आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे सुरु करण्यात आली त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.


अगस्ती कारखान्याची निर्मिती..

श्री.पिचड यांच्या प्रयत्नामुळे 30 वर्षापुर्वी अगस्तिसहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली. कारखान्याला पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी  त्यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करुन देऊन त्यांना कारखान्याचे भागधारक बनविले आणि नऊ महिन्यात कारखान्याची उभारणी केली. मध्यंतरीच्या दोन वर्षाचा अपवाद वगळता गेली 30 वर्षे त्यांनी कारखाना सक्षमपणे चालवला. गत वषी कारखान्याचा आसावनी प्रकल्प सुरू झाला.करखाण्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. कारखान्यानेे तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.

दूर्गम भागापर्यंत पोहचलेले रस्त्यांचे जाळे तसेच अभयारण्य क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेर राबवलेल्या विविध पर्यटन विषयक योजना यामुळे पर्यटन विकासाला गती मिळाली. कळसुबाईच्या शिखरावर वीज पोहचली. पट्टा किल्ल्याचे स्वरुप बदलले.रंधा धबधब्याचे आधुनिक पध्दतीने सुशोभिकरण करण्यात आले. अभयारण्य क्षेत्रात ठिकठिकाणी निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे, पॅगोडा, तंबुसाठी ओटे, जागोजागी केलेले रेलिंग, शिखरावर जाण्यासाठी बसवलेल्या शिड्या ,धबधब्या जवळ पूल आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या.यामुळेही पर्यटन विकासाला चालना मिळाली. आदिवासी तरुणांना करण्यात आलेले बोटीचे वाटप, त्यांना दिलेले कॅमेरे, चायनीज स्टॉल, टुरिस्ट गाईड प्रशिक्षण या सर्वांमुळे आज पर्यटन हा तालुक्यात रोजगाराचा महत्वाचा विषय झाला आहे.

पाणी, वीज, रस्ते यात झालेल्या पायाभूत सुविधा, अगस्ति कारखान्याची निर्मिती, पर्यटन विषयक राबवलेल्या योजना, शिक्षण आणि आरोग्यासाठी झालेले प्रयत्न व त्यातुन निर्माण होत गेलेले कुशल मनुष्यबळ या सर्वांमुळे एकेकाळचा उपेक्षित अकोले तालुका बदलत आहे. या बदलाचे श्रेय जसे येथील जनतेच्या निर्मिती क्षमतेला आहे, कष्टाला आहे तसेच हे सर्व करणार्‍या दुरदृष्टीच्या नेतृत्वालाही आहे. 


चौकट :- 

विज वितरणाचे जाळे :- 

विज उपकेंद्र 132 केव्ही - अकोले, भोजदरी
विज उपकेंद्र 33 केव्ही - अकोले, समशेरपूर, केळीसांगवी, रुंभोडी, आंबड, लिंगदेव, विरगाव, कुंभेफळ, राजुर, शेंडी, शेलविहीरे, वाघापूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोहणे.
शासकीय आश्रमशाळा - घाटघर, पिंपरकणे, केळी रुह्मणवाडी, खिरविरे, केळी कोतुळ, मुतखेल, कोहणे, तिरढे, पळसुंदे, पैठण (कन्या), शिरपुंजे, मवेशी, आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी, इंग्रजी माध्यम आश्रमशाळा राजूर कॅम्प मवेशी.
अनुदानित आश्रमशाळा - प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मान्हेरे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेंडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोथळे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा देवठाण, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरे, प्राथमिक आश्रमशाळा शेरणखेल.
आरोग्य विभाग :- ग्रामीण रुग्णालय - अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर
प्राथमिक आरोग्य केंद्र :- ब्राह्मणवाडा (उपकेंद्रे -7) , खिरविरे (उपकेंद्र - 8), कोहणे (उपकेंद्र 7), कोतुळ (उपकेंद्रे 6), लाडगाव (उपकेंद्र 9), मवेशी (उपकेंद्रे 7), म्हाळादेवी (उपकेंद्रे 5), सुगाव (उपकेंद्रे 5), देवठाण (उपकेंद्रे 6), शेंडी (उपकेंद्रे 2), पांजरे (उपकेंद्रे 6), विठा (उपकेंद्रे 3).
शासकीय वसतिगृहे :- राजुर मुले, राजुर मुली, अकोले मुले, अकोले मुली, शेंडी मुले, शेंडी मुली, कोतुळ मुले, समशेरपूर मुले, ब्राह्मणवाडा मुले याशिवाय संगमनेर, घारगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर, राहुरी येथेही शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत.
लघु पाटबंधारे प्रकल्प :- अंबित (193 दलघफू), बलठण (202 दलघफू), देवहंडी (155 दलघफू), कोथळे (182 दलघफू), घोटी शिळवंडी (160 दलघफू), बोरी (47.80 दलघफू), वाकी (112 दलघफू), टिटवी (303 दलघफू), सांगवी (71 दलघफू), पाडोशी (146 दलघफू), बेलापूर (94 दलघफू), पिंपळगाव खांड (600 दलघफू), पळसुंदे (200 दलघफू).

Wednesday, May 18, 2022

काजव्यांचा अद्भुत निसर्गसोहळा* लेखिका-नीलिमा जोरवर

*काजव्यांचा अद्भुत निसर्गसोहळा* 
लेखिका-नीलिमा जोरवर
 *प्रकाशित* - सकाळ अग्रोवन दि.१५.५.२०२२ 
रखरखता उन्हाळा, नाही म्हटलं तरी थोडा असह्य. दिवसा उन्हाने नुसती काहिली होते. जीव पाणी पाणी करतो. अशावेळी कुठे झाडाचा आसरा किंवा सावली शोधून दुपार कशीतरी निभवायची. ही परिस्थिती रानावनात जास्त जाणवते. गावशिवारात ओळीने असलेल्या घरांच्या दारासमोर कुठे फणसाच्या किंवा आंब्याच्या सावलीला पडून आराम करण्याशिवाय गत्यंतर नसते. नसता या आडरानात पिण्याच्या पाण्याची अडचण तेथे शेतीसाठी पाणी कोठून येणार. म्हणून शेतकरी असले तरी गावातील लोक फक्त एकच हंगामात शेती करतात. पावसावर अवलंबून असलेली शेती. पाऊस संपला कि शेतीची कामेही उरकतात. मग नंतरचा वेळ रिकामाच असतो, पुढचा हंगाम येईतो. म्हणूनच टोळक्य-टोळक्याने सावलीत बसून  गप्पा करत असलेले स्त्री-पुरुष दिसतात. अनेकदा गप्पा या विनोदाने भरलेल्या किंवा यंदा ‘बुहाड्यात’ कोणती पात्र नाचवायची त्याची तयारी किंवा फुगडी-कांबड नृत्यासाठी नवीन गाणी रचणे असे. गेल्या काही वर्षांत अजून एका विषयाची भर चर्चेत पडली ती म्हणजे ‘काजवा महोत्सवाची’. 
“यंदा काजवा महोत्सव लांबणार वाटत्ये “
“अजून हवेत गारवा आला नाही” 
“कुढमूढ एखाद-दोन देखायला लागलय”
“एखादा तरी पाऊस व्हायला पाहिजे तेव्हा काजवे झाडांवर चमकू लागतील” 
अशा चर्चा या उन्हाच्या तडाख्यात अजूनच उत्सुकता ताणत जातात. 
काही दिवसांनी उष्णता कमी करण्यासाठी वारे वाहू लागतात. जमिनीतील, घरातील बियाणे ठेवलेल्या कंदाना धुमारे फुटतात. जमिनीच्या वर कोवळे कोंब बाहेर येऊ लागतात. हवा बदलते. तापमन कमी होऊन आद्रता वाढू लागते. मध्येच एखादा वळीव कोसळून जातो. तापलेल्या मातीतून मृद्गंध दरवळू लागतो. आता उन्ह असतात पण गारवाही असतो. शेतीच्या पुढच्या हंगामची पूर्वतयारी, बी-भरण, घर-सप्रांची शाकारणी, जनावरांसाठी पड्व्या बांधण्याची तयारी सुरु होते. पावसापूर्वी ही सर्व कामे आटोपायची असत्तात. यासाठी लागणारा पैसा येणार असतो तो ‘काजवा महोत्सवातून’ त्यामुळे रात्रीच्या वेळी काजवे दिसू लागले कि लोक पर्यटनासाठी येथे येतात आणि त्यातून लोकांना रोजगार मिळतो. वर्षातीन सगळ्यांना कमाई करून देणारा हा काळ. विशेषतः भंडारदरा परिसरातील आदिवासी बहुल गावांतील ही स्थिती, याचे फायदे इतर हॉटेल व्यावसायिकांना देखील होतात. 
मागच्या १० वर्षांत अचानक प्रसिद्धी मिळून इथल्या काजव्यांची ख्याती सर्वदूर पसरली आणि निसर्गाचा हा अद्भुत सोहळा पाहायला लोक गर्दी करू लागले. अभयारण्यातील धरणाच्या कडेकडेने व इतरही जंगल भागांत ठराविक झाडांवर ही काजव्यांची दुनिया अवतरते. म्हणजे १० वर्षांपुर्वी आम्ही सहज म्हणून फिरायला गेलो कि शेंडी गावातच अंधारात रस्त्यावर निवांत बसून समोर काजव्यांनी भरलेली झाडे न्याहाळीत असायचो. हा काजव्यांचा मिलनकाळ. योग्य वातावरण तयार झाले कि आपल्या पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी हा सगळा खटाटोप. बोलणे, हावभाव, वास अशी जी जीवांच्या संवादाची माध्यमे, तसा प्रकाश हा काजव्यांच्या संवादाचे माध्यम. काजव्यांच्या मागील भागातून निघणारा चमकता प्रकाश हे या किटकाचे वैशिष्ट्य. त्यामुळे माणसांचे याकडे विशेष लक्ष गेले असावे.  या मिलनाच्या हंगामात मादी आपला जोडीदार निवडते. त्यासाठी  काजव्यांचे स्वयंवर भरते. हे स्वयंवर भरते ते जंगलातील झाडांवर. ओळीने काजवे आपल्या प्रकाशाने झाडांवर विविध प्रकाशमाळासारखे pattern तयार करतात. हो अगदी दिवाळी-गणपतीत आपण लावतो त्या विजेच्या माळांसारखे. या क्षणाच्या कसरतीतून ज्या नराचा प्रकाश मादीला सर्वोत्तम वाटतो, त्याची निवड मादी आपला जोडीदार म्हणून करते. त्यांचे मिलन झाले कि नर काही दिवसांत मरतो. मादी देखील ठराविक झाडांच्या बेचक्यात अंडी घालून मरते. पुढे ह्या अंड्यातून अळी-कोश-पूर्ण वाढ झालेला काजवा अशी प्रक्रिया असते. म्हणजे काजव्यांचा पूर्ण जीवनकाल जर आपण पाहिला तर तो फारच थोडा म्हणजे अगदी एक-दीड महिन्यांचाच काळ. मेच्या मध्यापासून ते जून-जुलै. जास्त पाऊस येतो तेव्हा या भागात वारे खूप सुटते. त्यामुळे वाऱ्याच्या झोताबरोबर विखुरलेले, उडालेले काजवे पण अनेकदा दिसतात. अतिपाऊस, अतिवारा या परिस्थितीत काजवे आपल्या ठरलेल्या नित्यक्रम पार पडण्यासाठी सज्ज असतात. त्यांना जणू निसर्गाकडून प्रजननासाठी ठराविक वेळेचीच परवानगी मिळालेली असते. 
 *पर्यावरणीय परिसंस्थेतील काजव्यांचे महत्व काय?* 
असा प्रश्न अनेकांना पडला असणार. पूर्वी शेताच्या बांधांवर, नदी-तलावांच्या काठाला इतकेच काय गावातील घरांच्या आजूबाजूला देखील काजवे दिसायचे. काजवे हे जेथे प्रदूषणमुक्त हवा व रसायनमुक्त माती आहे, अशा ठिकाणी आढळतात. त्यामुळे संतुलित पर्यावरणाचे द्योतक (Indicator) म्हणून याला मानले जाते. शेतीसाठी काजव्यांचे विशेष महत्व आहे. मुख्य म्हणजे काजवे परागीकरण करण्यास मदत करतात आणि गोगलगायीसारखे उपद्रवी प्राणी हे काजव्यांचे खाद्य आहे. त्यामुळे आपोआपच गोगलगायींचा उपद्रव कमी होतो. 
 *काजव्यांची संख्या (population) कमी होण्याची कारणे* 
जसजशी रासायनिक शेती विशेषतः तणनाशक, कीटकनाशक यांचा वापर वाढत गेला तसतसे बागायती भागात काजवे दिसेनासे झाले. आदिवासी भागात देखील गेल्या १० वर्षांत रासायनिक शेतीचे प्रमाण वाढत आहे, हे वास्तव आहे. याचा परिणाम म्हणून देखील येथे काजव्यांची संख्या कमी होत आहेच. 
काजव्यांचे अस्तित्व हे ठराविक झाडे, उंच गवत, पाणथळ जागांचे किनारे अशा ठिकाणी असते. जमिनींच्या बदलत्या वापरानुसार गवत कापून शेतीसाठी जागा तयार करणे, झाडे तोडणे व पाणथळ जागांची संख्या कमी होणे किंवा तेथे बांधकाम होणे अशा गोष्टींमुळे त्यांचे वस्तीस्थान नष्ट झाल्यामुळे  काजवे कमी होत आहेत.  
पर्यटकांचा जंगलातील अनियंत्रित वावर, बेजबाबदार वर्तणूक आणि मुख्य म्हणजे प्रकाशाचे प्रदूषण यामुळे गेल्या काही वर्षांत काजव्यांची संख्या कमी होत आहे. आधी शेंडी गावात दिसणारे काजवे आता १५-२० किमी आतल्या गावांत दिसू लागलीत. तेथेही लोक त्यांचा पाठलाग करत पोहचले तर त्यांनी कोठे जावे? माणसांची ही घुसखोरी , काजव्यांना  उपद्रवकारक ठरू नये म्हणून काही उपाययोजना नक्कीच करता येतील. 
 *काजवे संवर्धनासाठी घ्यावयाची खबरदारी* 
माणसाला सृष्टीच्या अद्भुत गोष्टींचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. या काळात चालणाऱ्या काजव्यांच्या नयनरम्य सोहळ्याचे त्याला आकर्षण असतेच. आकाशात जसे तारकांचे नभोमंडळ असते तशा जमिनीवर तारका उतरल्यासारख्या भासतात. निसर्गाच्या या अद्भुत सोहळ्यात आपल्या अस्तित्वाची खाणाखुण कोठेही न ठेवता शांतपणे हे दृश्य अनुभवणे, हे निसर्गप्रेमींचे लक्षण. या माणसांच्या सहजप्रेरणा. पण आजकाल निसर्गाकडून प्रत्येक गोष्ट ओरबाडण्याची सवय माणसाला जास्त लागली आहे. आणि इथेच गडबड होते.  
काजव्यांच्या बाबतीत म्हणायचे तर प्रकाश हा यांचा जोडणारा मुख्य दुवा. आणि जेव्हा अनेक माणसे, रोज-रोज... गाड्यांचे प्रकाशझोत फिरवत काजवे बघायला रात्रभर फिरतात, तेव्हा काय होईल याची कल्पना जाणकारांना यावी. यासाठी सुजाण नागरिकांनी स्वतःसाठी काही नियम बनवूया व ते पाळण्याचा प्रयत्न करूया. 
१. शक्यतो काजवे पाहण्यासाठी रात्री प्रवास ण करता दिवसा एखाद्या आदिवासी गावात पोहचावे. रात्री स्थानिकांच्या संगतीने काजव्यांचा सोहळा शांतपणे अनुभवावा. या काळात जंगलात पिकलेल्या करवंद, आंबे, अळव, फणस अशा रानमेव्याचा आस्वाद घेता येईल. शिवाय यातून स्थानिक संस्कृती समजून घेता येईल व तुमच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्याना रोजगार उपलब्ध होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परतीचा प्रवास करावा. 
२. काजवे पाहताना विजेऱ्यांचा वापर फक्त रस्ता पाहण्यासाठी करावा. झाडावर विजेऱ्यांचा प्रकाशझोत पसरवू नये. 
३. मोबाईल अथवा साध्या कॅमेऱ्यातून फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. हे फोटो व्यवस्थित येत नाहीत पण काजव्यांना याचा त्रास नक्की होतो. 
४. बाटलीत काजवे धरण्याचा अट्टाहास करू नये. तुम्ही पकडलेले काजवे हे काही काळातच मरू शकतात. 
५. स्थानिक वनविभागाने केलेल्या सुचानाचे योग्य पालन करावे. भंडारदरा परिसरातील काजवे महोत्सवासाठी यंदा काही महत्वाचे नियम बनवले आहेत. सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्री. गणेश रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काजवा महोत्सवामध्ये काजवे बघण्यासाठी संध्या. ६ ते रात्री १० पर्यंतचीच वेळ असणार आहे. यानंतर येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश बंदी आहे. पूर्वपरवानगी घेतलेल्या छायाचित्रकारांशिवाय अन्य कुणाला फोटो काढण्यास मनाई आहे. जंगलात प्लास्टिक नेऊ नये, म्हणून चेकपोस्टवर चेकिंग होणार आहे. शिवाय रस्त्यापासून २० मीटरच्या पुढे पर्यटकांना जाता येणार नाही, यासाठी स्थानिक ४० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. या बाबी नक्कीच स्वागतार्ह आहेत मात्र या नियमांचे पालन करून आपणही सुजाण नागरिकाची भूमिका घ्यावी आणि काजव्यांचा हा अद्भुत निसर्गसोहळा अखंड-अबाधित राखण्यास आपापल्या परीने सहभागी व्हावे. 
 *आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.* 
- नीलिमा जोरवर
- ९४२३७८५४३६