Saturday, December 6, 2025
अकोले वाहतूक कोंडी
अकोले,ता.५:अकोले शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून जसा लोकसंख्येचा आलेख वाढतोय त्याच रेषेत वाहनांची संख्या वाढत आहे .कोल्हार घोटी रस्ता सकाळपासून वर्दळीचा ठरला असून सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे ,कॉलेज,विधालय सर्व शासकीय कार्यालय कोल्हार घोटी रस्त्याला असल्याने तसेच ऊस वाहतूक व मुंबई कडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते तर ट्राफिक पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होताना दिसत आहे .
अकोले शहरातील वाहतूक समस्यांमध्ये आस्त व्यस्त पार्किंग , रस्त्यांवरती गाड्या उभा करणे, बेशिस्त वाहन चालन यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यावर प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वनवे एकेरी वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अकोले शहरातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नागरिकांना सातत्याने त्रास होताना दिसतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावरती उसाच्या बैलगाड्या चालत असतात. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने व्यवस्थित लावली नसल्याने सातत्याने अपघात होताना दिसतात. बाजारतळ ते महात्मा फुले चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने उसाच्या बैलगाड्यांना अडथळा निर्माण होतो , त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. महात्मा फुले चौक व बाजार तळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस ची संख्या वाढवणे गरजेचे आहे. चुकीच्या पार्किंगसाठी दंड वसूल होताना दिसत नसल्याने लोक कुठेही गाडी लावतात. पार्किंग साठी व्यवस्थित जागा निश्चित करणे गरजेचे आहे. शहरातील शनी मंदिर परिसरात ही बहुतेक वेळा वाहन कोंडी होताना दिसते. या प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे. वाहतूक शाखेने दंड आकारणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. आठवडे बाजार चे दिवशी बहुतेक दुकाने रस्त्यांवर लावली असतात त्यावर ही नगरपंचायत ने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही.
कोट:
कोल्हार घोटी एकच मार्ग असल्याने तसेच कारखाना हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती . अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने बैल वाहतूक गाड्या पर्यायी मार्गाने नेल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. अकोले नगरपंचायत ने ही फेरीवाले तसेच रस्त्यावरती बसणाऱ्या दुकानांना आळा घालावा. आत्तापर्यंत एक जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण तीनहजार केसेस दाखल केल्या आहे. त्यांच्याकडून जवळजवळ तीन लाख रुपये दंड वसुली करण्यात आला आहे.
प्रमोद बोरसे पोलीस निरीक्षक अकोले
Subscribe to:
Post Comments (Atom)





No comments:
Post a Comment