Sunday, December 14, 2025
१०८ चित्रपटाच्या शूटिंग भंडारदरा परिसरात
अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे.
भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे.
भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे.
मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात“सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर),
सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे.
तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी), “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर देशमुख यांनी शोधली आहेत.
या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत.
शतक महोत्सवात प्रदर्शन
आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे.
होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहेसबस्क्राईब करा
Sign In
Marathi News
maharashtra
bhandardara dam beauty attracts filmmakers for over 108 shoots akole news amy
‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ
अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली आहे.
Written by लोकसत्ता टीम
December 13, 2025 18:38 IST
Follow Us
‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ ( प्रातिनिधिक छायाचित्र )
अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे.
भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे.
भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे.
मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात.
“सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर),
सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे.
तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी), “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर देशमुख यांनी शोधली आहेत.
हेही वाचा
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; कोलाडजवळ बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू
या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत.
शतक महोत्सवात प्रदर्शन
आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे.
भंडारदरा परिसरातील निसर्ग अतिशय सुंदर आहे. राज्यातील धबधबे फक्त पावसाळ्यात कोसळत असतात. मात्र भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडतात, तेव्हा आंब्रेला फॉल वाहू लागतो. त्यामुळे वर्षभर अगदी उन्हाळ्यातही आवर्तन काळात आंब्रेला फॉल, रंधा फॉल कोसळत असतात. यामुळे तसेच मुंबईहून भंडारदराचे अंतर २०० किमी पेक्षाही कमी असल्यामुळे चित्रीकरणासाठी भंडारदरा परिसराला प्राधान्य मिळत गेले.
होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहे.
दुर्गा खोटे शाहू मोडक यांचा भरत मिलाप (१९४२) दिलीपकुमार कामिनी कौशल यांची भूमिका असणारा आरजु (१९५०) राजकपूर नर्गिस यांचा आशियाना (१९५२) दिलीपकुमार नर्गिस यांचा आन (१९५२) औरत (१९५३) प्रेमनाथ बिना रॉय, नागिन (१९५४) प्रदीपकुमार वैजयंतीमाला, नाता (१९५५) मधुबाला अभि भट्टाचार्या, एकसाल (१९५७) अशोककुमार मधुबाला, परवरीष (१९५८) राजकपूर मालासिन्हा, कोहिनुर (१९६०) दिलीपकुमार मीनाकुमारी हे सुरवातीच्या वर्षांमध्ये येथे चित्रीकरण झालेले काही चित्रपट.
काही चित्रपटांच्या दृश्यांसाठी प्रसंगी सेट उभा करीत. महिपाल व श्यामा यांच्या जबक मधील “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर हमे याद राखना” या गाण्यासाठी भंडारदरा धरण पायथ्याशी असणाऱ्या बागेत भव्य सेट उभारण्यात आला होता. तर परिसरातील भाषेत, नदीत, सपाट मैदानातही काही दृश्यांचे गाण्याचे चित्रीकरण करण्यात येत असे. गंगा जमुनामधील वैजयंतीमाला वर चित्रित “होरे होरे जनन घुंगरू बाजे” हे समूह नृत्य असेच शेतातील मैदानात चित्रित झालेले आहे. हिंदीच्या तुलनेत येथे चित्रीकरण झालेले मराठी चित्रपट फारच थोडे असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment