Tuesday, March 17, 2020

सांधण व्हॅली नावाच्या या शिल्प कृतीची लांबी १ किलोमीटर व खोली आहे तब्ब्ल ४०० ते ५०० फूट ....

अकोले (शांताराम काळे )काय पाहायचं कुठे भटकायचं वेगळं काय असे प्रश्न अनेकदा पडतात मग आपण त्याच त्याच वर्षनुवर्षे एऐकत आलेल्या नावांपैकी कोणत्या तरी एका नावावर शिक्का मोर्तब करतो आणि मोकळे होतो . प्राचीन तत्वाच्या खुणा गावागावच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसतात महाराष्ट्र म्हणजे राकट , कणखर  दगडांचा देश म्हणूनच तर केवळ या महाराष्ट्राच्या फक्त निसर्गानेच उसंत घेऊन कोरलेले अनोखे राकट निसर्गशिल्प पाहायला मिळत सांधण व्हॅली नावाच्या या शिल्प कृतीची लांबी १ किलोमीटर व खोली आहे तब्ब्ल ४००  ते ५०० फूट .... 
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकताना निसर्गाची इतकी विसम्यकारक रूपं नजरेस पडतात कि , निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची खात्री पटते त्याचे काम नाजूक कलाकुसरीचे नसते जे काही असते ते सारे भव्यदिव्य त्याची छन्नी -हातोडे असतात पंच महाभूते , लाखो - हजार वर्षे तो उंन वारा पावसाचे तडाखे येथील कातळावर , डोंगरदर्यावर पठारावर करत असतो हे तडाखे वर्षा नुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना , कधी कोकणकड्याच्या रौद्र रूप तर कधी साहसाला साद घालणारे सुळके , तर कधी रंजन खळगे एक ना दोन हजारो कलाकृती येथे साकारल्या गेल्या आहेत आणि आजही घडत आहेत निसर्गाची हि अशी अदभते पाहायची असेल तर मात्र थोडी वाकडी वाट करण्यावाचून पर्याय नसतो म्हणजे असे असते कि , त्याची हि शिल्पकला घडतेच मुली डोंगर कोपऱ्यात असेच अनोखे निसर्ग शिल्प आपल्या सह्याद्रीत दडले आहे ते तुम्हाला असे एखाद्या डोंगरकड्याकडे लांबून पाहावे तसे पाहताच येत नाही भंडारदरा धरणाच्या फुगवट्याच्या बाजूने तुम्ही पोहचता ते डोंगरांनी वेढलेल्या एका छोटया सहा गावात साम्रदमध्ये इनमीम शंभरेक घराचे हे गाव एकीकडे रतनगड , लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे  अलंग कुलंग मदन सारखे अभेद्य किल्ले चौकडे जंगल , साम्रद गावी आल्यावर देखीळ आपल्याला काहीच दिसत नाही भलेमोठे पठार मात्र आपल्याला तंबू  देण्याचा मोह आवरत नाही . मात्र हे सगळे मोह बाजूला सारून थेट  पठाराच्या टोकाकडे निघायचे   सोबतीला गावकरी असेल तर उत्तमच येथेच एक गॉर्ज आपली वाट पाहत असतो थोडासा चढ चढ्यानंतर त्या गॉर्जच्या   मुखाशी आपण पोहचतो तो काहीसा झाडांनी व्यापलेला असल्याने आपण काही काळ गोंधळतो परंतु ५ मिनिटानंतर थोडेसे  खाली उतरले कि, समोर  येते ती सांधण दरी ... केवळ पंचवीस फूट रुंद अश्या त्या गॉर्जच्या प्रथम दर्शनीच आपण प्रेमात  पडतो त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते  आपण आपसूकच पुढे जात राहतो    मात्र  जपून पावले टाकावी लागतात कर काही मोठे मोठे दगड धोंडे शिळा पडलेल्या असतात एव्हाना बऱ्यापैकी आत गेलेले असतो नजर उंचावून पहिली कि , लक्षात येते आपण थेट  मधोमध डोंगराच्या पोटात  गेलेले असतो   मोतीच्या मोठी भेग दिसते ५०० फूट खोल ३० फूट रुंद कधी २० फूट तर सुमारे सवा किलोमीटर लांब हीच ती सांधण व्हॅली गॉर्ज एक निसर्गनिर्मित राकट अदभूत मध्येच अरुंद ठिकाणी डोकवणारी उन्हाची तिरीप तर मोठं मोठ्या खड्ड्यात साचलेले थंड पाणी अंगावर ऊन घेत पायात दगडधोंडे तुडवत प्रवास सुरूच ठेव्याचा एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठानेसाम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठीकल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहूनहीघोटीमार्गे पोचता येईल. मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.मुक्कामाची आणि जेवणाची सोय साम्रद गावात होऊ शकते सांदण दरीच्या शेवटच्या टोकाजवळ प्रचंड खोल कडा आहे. तो कडा अर्धगोलाकार आहे. तेथे पावसाळ्यात कधी कधी अचानक ढग किंवा गहिरे धुके दाटून येते आणि चार-पाच फूटांवरील दृश्‍यदेखील दिसेनासे होते. त्‍या परिस्थितीत पाय घसरून दरीत पडण्याची भीती वाटते. त्‍या दिवसांत तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतो. ती दरी कोरड्या ऋतूत पाहणे इष्‍ट. तेथे राहण्याची कोठलीही सुविधा नाही. जाताना खाण्‍याचे सामान आणि पाणी सोबत घेऊन जावे लागते.
पावसाळ्यात कड्यावरून दिसणारे दृश्‍य नयनरम्‍य असते. तेथे कड्याच्‍या एका बाजूने वाहणारा गीरनी/गीरना धबधबा दृष्‍टीस पडतो. त्‍या कड्यावर उभे राहून मोठ्याने बोलल्‍यास आवाजाचा प्रतिध्वनी निर्माण होतो आणि काही वेळाने स्‍वतःचाच आवाज ऐकू येतो. अशा प्रकारे ‘एको साउंड’ची मजा अनुभवता येते. दरी बघून त्याच मार्गाने परत यावे लागते. संपूर्ण दरी फिरण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.
सांदण दरीमध्‍ये एअरटेल कंपनीने ‘फोर जी’ची जाहिरात चित्रित केली होती. सांदण दरीत भर पावसाळ्यात जाणे सुचवण्‍याजोगे नाही.
नाशिक ते सांदण दरी हे अंतर ऐंशी ते पंच्‍याऐंशी किलोमीटर आहे. दरी भंडारद-यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्‍या रस्त्याने जाताना कळसुबाई, अलंग, मलंग, मदन, कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड अशा उंचच उंच, एकापेक्षा एक सरस डोंगररांगा दिसतात. सांदण दरीचा परिसर कळसुबाई आणि हरीश्चंद्रगड अभयारण्याचा आहे.







राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.

अकोले,(शांताराम काळे )महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल शाक्त पंथाचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी तर माहूरगडची रेणुका ही प्राचीन शक्तिस्थाने याची साक्ष देतात. याच प्राचीन मंदीरातील एक मंदीर म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदीर. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात प्राचीन व कलाकुसरयुक्त अनेक मंदिरे आहेत. अगदी प्राचीन काळापासून येथे राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लेण्या, दुर्ग व मंदिरे यांची साखळी निर्माण केली. एकेकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले त्याप्रमाणे या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. यातील अप्रतिम कलाकुसरीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. असेच एक सुंदर कातळशिल्प म्हणजे टाहाकारीचं जगदंबा मंदिर. अकोल्याहून समशेरपूरमार्गे साधारण वीस कि.मी. तर सिन्नरहून ठाणगाव मार्गे तीस कि.मी.वर आढळा नदीच्या काठावर टाहाकारी हे लहानसे गाव आहे. या टाहाकारी गावात हे जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले. तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रगटली. तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले. टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. टाहाकारीचे मंदिर भूमीज पद्धतीचे असुन उत्तराभिमुख आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्पपट्टी आणि पद्मपट्टी कोरलेली आहे. मंदिराचा मुखमंडप १० खांबांवर आधारलेला असुन या मुखमंडपात भिंतीलगत दगडी आसनांची रचना केलेली आहे. मुखमंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली असुन त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुखमंडपातून सभामंडपात आल्यावर मंदिराचा अंतर्गत विस्तार जाणवतो. बारा खांबांवर आधारित हा मंडप असुन समोरच खांबाला टेकवून शंकर-पार्वतीची व गणपतीची मुर्ती आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमीतिक आकृत्या कोरलेल्या असुन खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. सभामंडपाच्या छताला एकात एक गुंफलेली वर्तुळे व मध्यभागातून खाली लोंबणारे दगडी झुंबर अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन दिशेला तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केले असून शीर्षपट्टीवर देवीची संकेतमूर्ती आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासुरमर्दिनी अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी तर पश्चिमेस भद्रकाली देवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजुस कामाक्षी देवीचे शिल्प तर डाव्या बाजुस कुबेराचे शिल्प कोरले आहे. मंदिराचा अंतर्भाग पाहून मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला मंदिराचा बाह्य़भाग दिसतो. मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती असुन भिंतीच्या बाह्य़ भागावर आणि खांबांवर मोठया प्रमाणावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी मंदिराचे हे मुख्य आकर्षण असुन त्यांच्या रचना शैलीतून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका, मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. एका सुंदरीच्या अंगामध्ये विदेशी पद्धतीचा कोट घातलेला स्पष्टपणे दिसतो. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना ही मूर्ती दाखवलेली आहे. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी डमरू वाजवणारा गण तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे एक पडकं मंदिर असुन मंदिराबाहेर समाधीचे दोन फूट उंचीचे अष्टकोनी दगड आहेत. त्यावर पावले शिवलिंग आणि नंदी कोरला आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो. मंदीर नीटपणे पहायचे असल्यास या काळात येथे जाणे टाळावे. येथील स्थानिक जनतेला या कलेचं भान व ज्ञान नसल्याने हजार वर्षे प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळत असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. --------------(टिप—सदर मंदिराच्या मुर्तींची माहीती श्री.अनिल शिरसाट यांनी दिलेली असुन राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक छोटय़ा गावांत प्राचीन कलाकुसर केलेली मंदिरे आहेत. एके काळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी तांडय़ांची, पांथस्थांची विश्रांतीची, राहण्याची सोय या मंदिरांत होत असे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्परपूरक रचना होती. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढब कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधून मंदिराची शोभा घालवायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशीब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजूनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
मंदिर परिसरात भक्तांसाठी बांधलेला नवीन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. या रम्य परिसराला आणि ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतके उभे असलेले हे मंदिराचे दगडी शिल्प पाहण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.
मुंबईकर, नाशिककर स्वत:चं वाहन असल्यास एका दिवसात ‘टाहाकारीचं जगदंबा मंदिर’, ‘टाकेदचं जटायू मंदिर’ पाहू शकतात. जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगडही पाहता येईल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.अकोल्यापासून चे अंतर :
 अकोले , ता . १७:टाहाकारी गावातील जगदंबा मातेचे मंदिर म्हणजे एक प्राचीन वारसा आहे. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून त्याची लांबी २१० फुट व रुंदी १९० फुट तर उंची १५ फुट आहे. मंदिराची रचना अष्टकोनाकृती असून त्याचे अंतराळ, मंडप, गाभारा, या भागात विभाजन केलेले आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील व बाहेरील बाजूस रंभा, मेनका, उर्वशी, तसेच इंद्र देवाच्या दरबारातील प-या नृत्य करताना कोरलेल्या आहेत. मंडपाला असणा-या बारा खांबापैकी आतील बाजूस स्तंभ शिर्षापासून छतापर्यंत दोन अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी देव दानवांच्या मूर्ती तर काही ठिकाणी सैनिक, व्याध, देवतामूर्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत.
अखंड लाकडात कोरलेली जगदंबा मातेची भव्य मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. हे जगदंबेचे मंदिर अकोल्यापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. या जगदंबा मातेच्या दर्शनास छत्रपती शिवाजी महाराज आल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत पहावयास मिळते.
महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते.महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात.टाहाकारीचे जगदंबा मंदिर ,वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव,.
हयहैय, यादव, चालुक्य हे तत्कालीन राजे शिवभक्त आणि देवीचेभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.
टाहाकारी हे गाव अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. येथील जगदंबा मंदिर पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत
टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज आहे.
हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा हे मंदिर बांधले गेले आहे असे मानले जाते .पण पुढे मोगल राजवटीत मंदिरचा कळस तोडले गेला आणि शिवाजी महाराजायांचाया काळात तो पुन्हा बांधला गेला.जेव्हा गरुड रावण युद्धानंतर रावण विश्रांतीसाठी याच मंदिरात थांबला आणि सीतामातेने याच मंदिरात टाहो फोडला म्हणून गावाचे नाव टाहोकारी आसे पडले .पुढे त्याचा अपभ्र्वांश होऊवन टाहाकारी असे नाव पडले .जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा ते साधूच्या वेश्यात मंदिरात राहून गेले.
मंदिरांच्या  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ,
गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात.  ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.तेव्हा असे मानले जाते कि कलियुगात काय घडणार आहे हे तेव्हाच रेखाटून तेवले आहे .
हे मंदिर सायाद्रीच्या रांगेत आहे .आणि सायाद्रीच्या रांगेत प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मंदिराची झीज होत आहे .मंदिर पर्यटकांन स्थळ म्हणून सरकारने घोषित केले आहे झाडीपट्टी म्हणून ओळखण्यात येणारा अकोले तालुक्यात  अनेक निसर्गसौंदर्य आणि पर्यावरणाने नटलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या मंदिर  पर्यटनस्थळे निर्माण केल्यास पर्यटकांना याचा आनंद घेता येऊ शकतो. परंतु, स्थानिक लोक.प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या पर्यटन क्षेत्रांचा विकास होऊ शकला नाही . पर्यटनस्थळांच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिल्याने नजीकच्या काळात मंदिराची  पर्यटनदृष्टीने व्यापक विकास होण्याची शक्‍यता धूसर बनली आहे.मंदिराची झीज रोखण्याचा प्रयत्न गावकरी गाव वर्गणीतून करत आहे ,परंतु तो पुरेसा नाही .पर्यटनस्थळाचा विकास करून मंदिर पडण्यापासून वाचवावा हीच सरकारकडू आशा !!!!!




Friday, March 6, 2020

अकोला तालुकाडोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असेगिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

अकोले,ता . ६: अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमभागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला चिटकून असलेला अकोला तालुकाडोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असेगिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

याच दुर्गाच्यासाखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे.मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.  कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्यालापोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठीअकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेसपाचनई पर्यंत येत असतात.
पुणे जिल्ह्यामधील माळशेजघाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्यापायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांची पायपिट करीत पाचनईगाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्येडोंगर उतरुन पाचनईला येता येते.

पाचनई हे गावहरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालतकालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्गआहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावरपेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे.

कलाडगडाचा डोंगर एकांड्याडोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्‍या मंगळगंगा या नद्याच्याबेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही.गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडाजाणवतो. गडावर जाणारी वाट बर्‍यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमनकरण्यासाठी स्थानिक गावकर्‍यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्‍याची वाटअसल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्याखोबण्याही आहेत. काही पायर्‍या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण४० ते ५० मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेलाआहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुनगडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जातायेते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत.गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेषदिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचाभैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वहीमनाला मोहवून टाकते.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गकसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गावअसून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीचीएक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हेसह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणूनओळखले जाते.
या कळसूबाईशिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते.कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरीसद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातूनखाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचापायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंचअसून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांचीचढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावरपोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठीकुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारीलसुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.

समोर कुलंगचाकातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणाराडोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्‍यावाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्‍याआहेत. या पायर्‍या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्णआहे.

कुलंगगडावरपाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारीपाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुनकळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगडआपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्यालाखुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेणचंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचेभौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.



गडावर अनेकघरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडेमनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एकापुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडेजाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवून     सह्याद्रीचेरांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडालाभेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिमअंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. यागिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. रतनगडाचा किल्लाभंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेलाआहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणूनओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.

भंडारदर्‍याच्यापरिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षीलाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावरमात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूरकरीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकालस्मरणात राहील अशीच आहे.

अहमदनगर आणिनाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्यादक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवरभंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचाफुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडेजातो. भंडारदरा धरणाच्याभिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसेविकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.

मुंबई - आग्रा हामहामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटरअंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढेउजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. यारस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकीगावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.

पुणे-नाशिक याराज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडीअसाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्यापाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसामारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठतायेईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यकआहे.

भंडारदर्‍याच्याखोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघरसाधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटाआहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारीपायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणीभरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडेनिघावे लागते.

साधारण दीड दोनतासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडेखोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालतगेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबकदरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारातपहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍याया सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.

या अनामिककारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो.संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्‍याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते.त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्याउत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचेउत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठेम्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याचकिल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातूनभन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूलापाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.

गडाच्या पश्चिमकडीलकात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशालपर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. यालाराणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणिशिवलींग पहायला मिळते.

इथून जवळच गणेशदरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीनडोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा यापरिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.

याच्या थोडे पुढेप्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथूनसमोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचेपठार उत्तम दिसते.

गडावर मुक्कामाचाबेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजेअंधाराच्या आत खाली पोहोचता येते.

गणेश दरवाजातूनशिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत.अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हेअवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधेरतनवाडी मधे पोहोचतो.

रतनवाडीमधे एकअद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळीलअमृतेश्वर मंदिर.

अमृतेश्वरमंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हेमंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत हीरचना वैशिष्ठ पुर्ण आहे.

येथून साम्रद साधारण७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्‍या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँचचालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवूशकk 

अलंग, मदन व कुलंग भटकंती

कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.

अकोले,ता . ६: अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला चिटकून असलेला अकोला तालुका डोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.  कलाडगड पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेस पाचनई पर्यंत येत असतात.

पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांची पायपिट करीत पाचनई गाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्ये डोंगर उतरुन पाचनईला येता येते.
पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे.
कलाडगडाचा डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्‍या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बर्‍यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकर्‍यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्‍याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पायर्‍या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगडमाळशेज घाटमोरोशीचा भैरवगडनानाचा अंगठासाधल्या घाटाजवळचा नकटा डोंगरकोंबडा डोंगरआजोबाचा भव्य डोंगरकुमशेतची लिंगीघनचक्करचे पठारघनचक्कर भैरवगडकुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.

या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.
समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्‍या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.
कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगडरतनगडकायाबाईभैरवगडहरिश्चंद्रसिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरीमलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगडभिंगलवाडी तसेच कावनाई आडपहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाटमेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.


गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवून     
सह्याद्रीचे रांगड रुपसह्याद्रीचा राकटपणासह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. 
रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.
भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छाशारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो. 

भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.

मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.

पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.

भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.

साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ादरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.

या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्‍याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंगमदनअलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगडमदनगडराजगडकन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.

गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.

इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाईरत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.

याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशयप्रवरा नदीपाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.

गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.

गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.

रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.

अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.

येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्‍या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकk