Sunday, December 14, 2025
दर महिन्याला होणाऱ्या गरोदर , स्तनदा माता यांच्या सर्वे मध्ये अकोले तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि १ अविवाहित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती
Wednesday, December 10, 2025
कहाणी भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!
उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या आयुष्यात हिरवाई, चैतन्य आणि समृद्धीचे रंग भरणारे प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण उद्या शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. या धरणाच्या पाण्याने जिरायत शेती बागायती झाली. सहकारी साखर कारखानदारीला चालना दिली... उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. या धरणाच्या निर्मितीची रोचक कहाणी.
________________________
कहाणी भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!
-भाऊसाहेब चासकर.
शेंडी(भंडारदरा) गावाच्या बाजूला असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीने जोडल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यगिरीच्या कुशीत विसावला आणि भंडारदरा धरणाचा जन्म झाला! तेव्हापासून म्हणजे 10 डिसेंबर 1926पासून आजपर्यंत सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात साठवत आहे. निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारदऱ्याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले....
रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत अमृतवाहिनी हे सार्थ विशेषण लाभलेली प्रवरामाई उगम पावते. शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारदऱ्याचा 11 टीएमसीचा भलामोठा जलाशय निर्माण झाला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. धरणाच्या निर्मितीपासून आजवरची कहाणी अत्यंत रोचक आणि रंजक अशीच आहे.
दुष्काळी भागास पाणी देण्याच्या हेतूने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२च्या सिंचन आयोगाने प्रवरा खोऱ्यात धरण बांधण्याच्या गरजेवर विशेष भर दिला होता, हे उपलब्ध कागदपत्रं चाळली की आपल्या लक्षात येते. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधाऱ्यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी(ता. अकोले ) येथे मातीचे मोठे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. या धरणाला स्थानिकांचा विरोध होता. पुढे काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला.
सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. डोंगरदऱ्यातली एकूण २२ हजार ९०० एकर जमीन पाण्याखाली बुडाली. जमिनीच्या संपादनासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने विशेष अधिकारी नेमला होता. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत-चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला.
धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित केल्या होत्या. धरणाचे बांधकाम जसजसे आकार घेऊ लागले तसा भंडारदऱ्याचा नितांत सुंदर, रमणीय आणि शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, आणि मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत, भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा सोयीसुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे प्रचंड केवढे कुतूहल वाटत असे.
भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात केले आहे. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा करून तो वाळू म्हणून वापरला आहे. थोडेथिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करायचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२०मध्ये धरणात २०० फूट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता.
नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. धरणाच्या भिंतीत एकूण चार मोऱ्या असून, त्या अनुक्रमे ७० फूट, १२० फूट, १७० फूट व २२० फूट अशा अंतरावर आहे. या मोऱ्यांचे पाइप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. भिंतीच्या तळाची रुंदी ७१.२८ मीटर असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे. बांधकाम सुरू असतानाच 1916 मध्ये प्लेगची साथ आली. काळजीचे ढग गोळा झाले. तत्कालीन सरकारने उंदीर मारण्यासाठी खास पथक नेमले होते.
जून १९२६मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये खर्च झाला होता. भिंतीच्या दक्षिण बाजूला ६५० फूट रुंदीचा सांडवा ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरू झाला. घाटघर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शिखरस्वामिनी कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, पाबर आणि रतन या गडांच्या माथ्यावर कोसळणाऱ्या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे-नाले कवेत घेऊन धरणाचे पोट हळूहळू भरू लागले.
काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे प्रवरामाई पहिल्यांदाच सह्यागिरीच्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावली. १० डिसेंबर १९२६ रोजी मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक लोकार्पण झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले तेव्हाचे कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल यांचे नाव धरणाच्या जलाशयाला दिले. जवळच वसलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. रूढही झाले. कागदोपत्री हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते.
दुर्गम भागात राहून देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या आर्थर हिलसारख्या अभियंत्याच्या कामाची नोंद घेत त्याचे नाव जलाशयाला देणे ही बाब ब्रिटिश शासकांच्या संवेदनशील कार्यपद्धतीची एका अर्थाने साक्ष देते. अलीकडेच या परिसरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव जलाशयाला देण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी राज्य सरकारकडे ताकदीने पाठपुरावा करायला लागेल.
साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. धरणाच्या खाली वाहती प्रवरा नदी म्हणजे कालवाच आहे. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे संपूर्ण चित्रचरित्रच पालटवले. दुष्काळाने गांजलेल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड-उजाड जागेवर, बरड माळरानांवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. कृषी औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. सहकारी साखर कारखाने उभे राहिले. आणखी काही पूरक उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला.
सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९च्या सप्टेंबर महिन्यात जलाशय काठोकाठ भरलेला असताना धरणाच्या भिंतीला तडे गेले. त्यातून पाणी बाहेर पडू लागले. लाभक्षेत्रात सगळीकडे काळजीचे वातावरण पसरले. अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून, अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले. लोखंडी सळ्या टाकल्या, मुख्य भिंतीला आधारभिंती बांधल्या. आणखी जे जे शक्य होते ते करून मजबुतीकरण केले.
भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट. नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने(मेरी) उपहारग्रहाद्वारे साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. या अभ्यासात धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले. धरणात गाळ साचलेला नसल्याने साठवण क्षमता आहे तेवढीच आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा!
पूर्वेकडील श्रीरामपूर, लोणी भागात ऊसासारखी बारमाही पिके फुलवणारे प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर-अकोलेकरांच्या नजरांना खुणावू लागले. यातूनच ऐंशीच्या दशकात 'कमिटेड वॉटर' विरुद्धचा लढा संगमनेर-अकोलेकरांनी खांद्याला खांदा लावून लढविला. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. १९८४मध्ये भंडारदऱ्याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर- अकोल्याला धरणातून हक्काचे पाणी मिळाले. त्याआधी प्रवरा कालवा आहे त्यावर पंप बसवता येणार नाहीत असे सांगण्यात येत असे.
पाण्याचे फेरवाटप झाल्यानंतर नदीवर पंप बसवून काही किलोमीटर अंतर पाइपलाइन करून शेतकऱ्यांनी शेतात पाणी आणले. प्रवरा परिसर सुजलाम सुफलाम झाला. मात्र १९९०नंतर भंडारदऱ्याचे पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची होणारी उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे, आंदोलने, घेराव यातून काहीजणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात केली. पाटपाणी हाच उत्तर नगर जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. अनेक नेते आणि कार्यकर्ते पाटपाण्याच्या आंदोलनातून पुढे आले आहेत. मराठवाडा भागातील लोकप्रतिनिधी आणि पाटपाण्याच्या क्षेत्रातील अभ्यासकांचे आग्रह यातून वीस वर्षांपूर्वी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण ठरवले गेले. पाऊस कमी पडला की भंडारदरा आणि निळवंडे यांसह नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडणे भाग असते. त्याबद्दल लाभक्षेत्रात नाराजीचा सूर आहे. मात्र त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण बदलण्यासाठी प्रयत्न करायला लागतील.
दरम्यानच्या काळात भंडारदरा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता जलविद्युत निर्मितीसाठीही होऊ लागला. भंडारदरा आणि कोदणी येथील दोन्ही जलविद्युत प्रकल्पातून ४४ मेगावॉट वीज निर्माण केली जाते. भंडारदऱ्याचा निळाशार, अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी धरणात बुडीत बंधारे बांधण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरण परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने एक आराखडा तयार केला होता. हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मध्यंतरी जलसंपदा विभागाने तयार केला होता. पाणलोट क्षेत्रातील आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजकीय वजन पणाला लावले. प्रस्ताव बारगळला. पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला पूर्णविराम मिळाला. ते बाकी काहीही असो. बारा महिन्यांतील कोणत्याही दिवशी पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी उसळते. येथील भेट आनंद देते, चित्तवृत्ती प्रसन्न करते.
भाऊसाहेब चासकर
9422855151
(लेखक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)
#भंडारदरा #धरण #अकोले #इतिहास #शताब्दी
Tuesday, December 9, 2025
अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका
अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे.
पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे.
संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
--------
कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी.
- हेरंब कुलकर्णी
अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’
[ अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता
शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’
अकोले, ता. ९ : एकेकाळी तोट्याच्या कचाट्यात असलेले अकोले एसटी आगार आज नफ्यात झेपावत आहे. आगारातील कर्मचारीवर्गाची आगाराबद्दलची प्रचंड आत्मीयता, स्वच्छतेवरचा भर आणि पारदर्शक कामकाजामुळे बसस्थानकाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्यामुळे अकोले आगार राज्यातील आदर्श आगार म्हणून पुढे येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे. एकूण २५२ कर्मचारी कार्यरत असून १५ चालकांची कमतरता रोज भासते. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोलेला किमान ७० बसेसची आवश्यकता आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागात जाणाऱ्या बसेस वारंवार बिघडतात. बलठण गावात तर बस स्मशानभूमीपर्यंतच थांबते, अशी परिस्थिती अजूनही बदलायची आहे. महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली; मात्र उत्पन्न तेवढे वाढत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे.
अकोले एसटी आगार ऊर्जिता अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता, रंगरंगोटी स्वतःच्या उत्पन्नातून करत आहोत. माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात. प्रवासाची कोणतीही तक्रार नाही. अकोले बसस्थानकाप्रमाणे राजूर बसस्थानक चकाचक होणार आहे. त्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. बसस्थानकाच्या बाहेर खासगी जीप असतात. दुचाकी देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत.
नोव्हेंबर अखेर ५९४३ महिला प्रवासीडिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे.
अकोले येथे १० मिनीबस येणार आहे. आदिवासी भागासाठी राजूर येथे पाच मिनीबस देणार आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही, अशी माहिती आगारप्रमुख एस. के. दराडे यांनी दिली.
चौकट
बसेसची टंचाई कायम
आगारात सध्या ५१ बसेस
• १० नवीन तर
• १३ बस स्क्रॅपमध्ये
चौकट
विद्यार्थी, महिला प्रवाशांमुळे गर्दी
४५०० विद्यार्थी मोफत प्रवास
३२०० अमृत वयोगटातील नागरिक लाभात
• ६१८ ज्येष्ठ नागरिक दररोज प्रवास
---------
जाचक जीआर रद्द करा
शैक्षणिक सहलींसाठी दिलेल्या बसेस उशीर झाल्यास १०० किमीचे अतिरिक्त भाडे आकारले जाते. हे शाळांना व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने हा जाचक जीआर रद्द करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.आदिवासी भागात बसेस नेहमी बंद पडतात, त्याचा फटका विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतो. त्यामुळे या मार्गांवरील बसेस दुरुस्ती व नियमित वाहतूक करण्याची मागणीही जोर धरत आहे.
----
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत आगाराचे आतापर्यंत तीन फेऱ्यांत परीक्षण झाले. पहिल्या फेरीत १०० पैकी ९४. दुसऱ्या फेरीत तब्बल ९८ गुण मिळवत आगाराने राज्याचे लक्ष वेधले आहे. तिसऱ्या फेरीचे गुण येणे बाकी असून, चौथ्या फेरीत ९९ गुण मिळवण्याचे लक्ष आहे.
- एस. के. दराडे, आगारप्रमुख, अकोले
-----
[09/12, 5:31 pm] Daultrao Zaware Patil: अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका
अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे.
पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे.
संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
--------
कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी.
- हेरंब कुलकर्णी
Monday, December 8, 2025
अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत
अकोले,ता.९: अकोले एस .टि.आगार आता तोट्याला झुगारत ऊर्जा घेऊन नफ्यात अवतरले असून स्वच्छता ,पारदर्शक कारभार,वृक्ष लागवड करत आगारप्रमुख कर्मचारी वर्ग याची एकी आगाराबद्दल आत्मीयता ,तळमळ यातूनच बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे .
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत अकोले बस स्थानकाचे आत्तापर्यंत तीन वेळा परीक्षण करण्यात आले आहे. पहिल्या परीक्षेमध्ये अकोले आगारास शंभर पैकी ९४ मिळाले तर दुसऱ्या परीक्षेमध्ये शंभर पैकी ९८ गुण मिळाले तिसऱ्या परीक्षणाचे अजून पर्यंत गुण येणे बाकी आहे. परंतु चौथ्या परीक्षांमध्ये अकोले आग्रास शंभर पैकी ९९ गुण मिळतील अशी आशा आगार प्रमुख यांनी एस .के .दराडे यांनी दिली. सध्या अकोली बस स्थानकात ५१ बसेस असून त्यापैकी १०नवीन तर १३ बस स्क्रॅप मध्ये जाणार आहेत. अकोले आगार एकूण कर्मचारी संख्या २५२ असून प्रतिदिन १५ चालकांची कमतरता भासते. अकोले बाजारात नवीन दहा बसेस आलेल्या असून अजूनही नवीन दहा बसेस येणार आहे. ४५०० विद्यार्थी मोफत पास घेऊन प्रवास करत असतात. ६५ वयोगटातील ६१८ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात. ३२०० अमृत वयोगटात मोफत प्रवास करतात.नोव्हेंबर अखेर
५९४३ महिलांनी प्रवास केला आहे . डिसेंबर २०२४ नंतर २७ लाख ७००० इतका नफा झाला आहे. आगार परिसरात नियमितपणे स्वच्छता राबवण्यात येते. रोजंदारीचे कामगार घेऊन स्वच्छता राबवण्यात येते. परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही घेण्यात येतो. अकोले तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १३ बसेस मुक्कामी असतात. परंतु बलठण या गावी गावात जाण्याच्या अडचण असते. त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्येच गाडी लावावी लागते. अकोले आगारात १४ महिला कर्मचारी असून पैकी एक चालक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोले आगारास अजून सत्तर गाडी असणे अपेक्षित आहे. सध्या शाळांच्या वेळा बदलल्या असल्याकारणाने सर्वांना चार वाजता बस देण्यात अडथळे निर्माण होत आहे. या काही दिवसात अकोले बस स्थानकात डिझेल अभावी कोणतीही वाहन उभे राहिलेले नाही. राजूर येथे नवीन बस स्थानक नियोजित आहे. अकोला येथून रोज १३ गाड्या कासार येथे जातात . तर १३बस पुणे येथे सोडण्यात येतात. संभाजीनगर व नाशिक दोन बसेस सोडण्यात येतात. सध्या शैक्षणिक सहलींचे माध्यमातून ३५ लाख रुपये उत्पन्न अकोले एस टी डेपोस मिळाले आहे.
चौकट - अकोले ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस कायम बंद पडतात त्यामुळे आदिवासी भागात प्रवास करणाऱ्या आदिवासी ग्रामस्थ ,विध्यार्थी ,रुग्ण,महिला,जेष्ट नागरिक यांचे मात्र हाल होतात तर शाळांना सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसेस उशीर झाल्यास १००किलोमीटर चे भाडे आकारले जाते ते शाळांना व विधार्थयाना न परवडणारे असल्याने या जाचक अटी व जीआर रद्द करावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे .तर महिलांना अर्धे तिकीट असल्याने उत्पन्न तेच मात्र प्रवासी यांची संख्या अधिक झाली आहे .
कोट - अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता ,रंगरंगोटी स्वतःच्या उत्पपन्नातून करत आहोत .माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात तर प्रवासाची कोणतीही तक्रार नाही अकोले बसस्थनकाप्रमाणे राजूर बसस्थानक भव्य व चकाचक होणार असून त्यासाठी १८कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे . बस्स्थसनकाच्या बाहेर खाजगी जीप असतात व मोटारसायकली देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत अकोले येथे १०मिनीबस येणार असून आदिवासी भागासाठी राजूर येथे ५मिनीबस देणार आहोत तयामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विध्यार्थी जेष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही
एस के दराडे (आगार व्यवस्थापक अकोले डेपो)
अकोले शहरात व तालुक्यात व्यसनांचा फास अडकतोय
अकोले,ता.९:(शांताराम काळे)निवडणुका, राजकारण या सगळ्या झटापटी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष दुर्लक्ष होते आहे. ते दुर्लक्ष आहे तरुणाईच्या भवितव्याबद्दल. तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा मुद्दा अगदी वेगळाच आहे पण तरुण हे तरुण म्हणून राहतील की नाही ? इतकी गंभीर परिस्थिती आज व्यसनांनी अकोले शहरात व तालुक्यात निर्माण केली आहे....
सर्व प्रकारांच्या व्यसनांचा फास अकोले शहर व तालुक्यातील तरुणाई भोवती आणि तालुक्याभोवती आवळला जातो आहे.
पूर्वी व्यसन म्हणजे फक्त दारू होती पण आज ग्रामीण भागापर्यंत व्यसन म्हणजे दारू, गुटखा, गांजा आणि ड्रग सुद्धा आले आहेत. मध्यंतरी राजुर येथे ड्रग सापडले ही बातमी होती. अकोल्यातील नदीकाठी तर गांजा पिणारे तरुण नेहमीच बसलेले आढळतात..तितकेच काय कॉलेज परिसरात गांजाच्या पुढे सिगारेट विकल्या जातात.. संगमनेरून ठोक भावाने येतो..त्याचे दलाल निर्माण झाले आहेत..ते महाविद्यालयीन तरुणांभोवती फिरत असतात...तालुक्यात घडलेले काही खून हे व्यसनातून झालेले होते.
त्यामुळे आव्हान फक्त दारूचे नाही तर आव्हान हे या सर्व प्रकारच्या प्रश्नांचे आहे.. गुटखाबंदी आहे हे सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही इतका गुटखा सर्रास सर्वत्र मिळतो किराणा दुकानात कोणतीही वस्तू सहजपणे मागितल्यावर मिळावी तसा गुटका आज मिळतो. बंदी असल्याचा फायदा फक्त पोलीस आणि अन्न आणि भेसळ अधिकाऱ्यांना झाला आहे. बाकी तरुणाईचे वाटोळे होत आहे.. दारूबद्दल तरी किमान थोडा फार राग त्या गावात दिसतो पण गुटका आपल्या गावात विकला जातो याबद्दल गावातील प्रमुख व्यक्तींनाही काही वाटत नाही. ते सर्वांनी स्वीकारले आहे अशीच स्थिती आहे पण आज तालुक्यात तोंडाच्या कॅन्सरने मरणाऱ्या तरुणांची संख्या खूप वाढते आहे..पण गुटख्याचे दुष्परिणाम माहीत असूनही कोणताच विरोध दिसत नाही..त्याचप्रमाणे गांजाने ही मरणारी संख्या वाढत असूनही पोलिसांनी गांजा पकडण्याच्या बातम्याही दिसत नाहीत...
दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दारूबाबत तर इतक्या वेळा बोलून झाले की आता ते बोलण्याचाही कंटाळा आला आहे.. तालुक्यातल्या कोणत्या गावात कोण दारू विकतो ही माहिती अनेकदा पोलीस उत्पादन शुल्क यांच्या बैठकीमध्ये यादी करून दिली तरी काहीही फरक पडत नाही..
आंदोलनाची भाषा केल्यानंतर कारवाया होतात पण परत त्याच त्याच गावामध्ये तीच तीच माणसे दारू विकतात. पोलिसांनी उत्पादन शुल्क यांनी ठरवले तरी थांबवणे कठीण आहे का ..?
संगमनेर, घारगाव, ठाणगाव आणि शेंडी या चार ठिकाणाहून तालुक्यात रोज रात्री दारूच्या गाड्या येतात. त्या गाड्या जरी पकडल्या तरीसुद्धा गावाकडची दारू थांबणे शक्य आहे त्या गाड्या कोणत्या दुकानातून येतात ? त्या गाडीचे नंबर सुद्धा दिले आहेत पण त्या गाड्या पकडण्याच्या बाबतीत काहीही करत नाही..
संगमनेर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. संगमनेर येथेच उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे पण महत्त्वाची कार्यालय तिथे असून सुद्धा, त्यांचा मोठा स्टाफ असून सुद्धा संगमनेर मधून रोज रात्री निघणारी दारू ते थांबवत नाहीत. यातच दोन्ही विभागांचे दारू विकणाऱ्यांची असलेले हितसंबंध लक्षात येतात.
विभागीय पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे व उत्पादन शुल्क विभागाचे सहस्रबुद्धे यांना अनेकदा संगमनेर मधून येणारी दारू थांबवा हे सांगूनही काहीच फरक पडला नाही.
गावोगावी सरपंच आणि पोलीस पाटील यांचीही उदासीनता दारू न थांबण्याला कारणीभूत आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. अण्णा हजारे यांनी ग्रामरक्षक दलाची कल्पना मांडली त्याप्रमाणे आपण तालुक्यातील ग्रामरक्षक रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना देऊन ते स्थापन करावे म्हणून खूप पाठपुरावा करावा लागला पण आज या गावाने ते स्थापन केले आहे ते गावकरी साधे ओळखपत्र न्यायलासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही.अनेकदा फोन करून झाले,ग्रामसेवक यांना सूचना देऊन झाले... जिथे ओळखपत्र नेण्यासाठी आग्रह करावा लागतो ते गावकरी काय दारू थांबवणार ? असा प्रश्न पडतो आणि जिथे गाव उदासीन होत जाते तिथे दारू कधीही थांबत नाही...
दारू, गुटखा, गांजा या तीनही बाबतीत गावाने जर ठरवले त्या गावांमध्ये कधीही विक्री होऊ शकत नाही. पोलीस उत्पादन शुल्क हे दोषी आहेतच पण गावातील प्रमुख लोक आज वाईटपणा घ्यायला तयार नाहीत.. मीच का वाईटपणा घ्यायचा असे प्रश्न जेव्हा सरपंच आणि पोलीस पाटील विचारतात तेव्हा त्यांना वाईटपणा घ्यायचा नाही, त्यांनी सार्वजनिक पदावर बसू नये असेच त्यांना मला सांगावेसे वाटते. तेव्हा गावातील प्रमुख व्यक्तींनी वाईटपणा घेतला पाहिजे...ग्रामपंचायतने गावातील सर्व किराणा दुकाने व पान टपरी यांना नोटीस देऊन गुटखा विक्री केल्यास तुमचे दुकानाचे शॉप ॲक्ट रद्द केले जाईल असे स्पष्टपणे सांगितले पाहिजे व काही ठिकाणी कारवाई सुद्धा केली पाहिजे .दारू सातत्याने पकडून दिली पाहिजे व ज्या गावात दारू सापडेल तेथील बीट अंमलदार निलंबित करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे...
ज्या बीट आम्हाला यांच्या विभागात दरू सापडेल त्यांच्यावर कारवाई करा अशी सतत मागणी करणे आज यावरील मार्ग आहे.. पोलीस पाटील या पदाला अकोले पोलिसांनी पत्र देऊन तुमच्या गावात सुरू असलेल्या दारूवर तुम्हाला का जबाबदार धरू नये ? अशी विचारणा केली आहे.. कारण पोलीस पाटील त्या गावातील कायद्याचे रक्षक असल्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे पण ते आक्रमक भूमिका घेत त्यामुळे गावातील दारूबाबत त्यांना जबाबदार करण्याची भूमिका अत्यंत योग्य आहे ...
कोट -
कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत .शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनांचा विषय काढायला हवा व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्पर्धेमध्ये दारू वाटणार नाही किंबहुना दारू वाटू देणार नाही दारू विकणाऱ्यांना तिकीट देणार नाही अशीच भूमिका घेण्याची गरज आहे दारूला कोणतेही परिस्थितीत प्रतिष्ठा मिळतात कामा नये...
हेरंब कुलकर्णी
Saturday, December 6, 2025
नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद
नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद
अकोले, संगमनेर, सिन्नर पुन्हा विकासाच्या कडेला?
अकोले, ता. ७ : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्र, अकोले, संगमनेर, सिन्नर पट्टा व पुणे महानगराला जोडणारा महत्त्वाचा विकासमार्ग मानला जातो. गेल्या काही वर्षांत नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, पुणे हा सर्वेक्षण पूर्ण झालेला आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असलेला मार्ग निश्चित होता. त्यामुळे या पट्ट्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने झेपावण्याची आशा निर्माण झाली होती.
मात्र अलीकडेच संसदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, चाकण, पुणे असा पूर्णपणे वेगळा मार्ग ‘तांत्रिक कारणांमुळे’ जाहीर केल्याने नवीन वादळ उठले आहे. नारायणगाव येथील जीओमआरटी केंद्राची अडचण पुढे करून मार्गबदलाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी, हा निर्णय तांत्रिक की राजकीय? असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.
--------
मूळ मार्गच सर्वात उपयुक्त का?
देशातील सर्वाधिक गर्दीचा संगमनेर, पुणे मार्ग, ५-७ तासांचा त्रासदायक प्रवास
चाकण एमआयडीसीकडे जाणारी प्रचंड औद्योगिक वाहतूक;
दररोजची वाहतूक कोंडी
उत्तर व पश्चिम महाराष्ट्र या दोन औद्योगिक पट्ट्यांना थेट जोडणारा दुवा
डीपीआर तयार, सर्वेक्षण पूर्ण, जमीन अधिग्रहण सुरू
सरकारी खर्च व श्रम वाया?
----------
विकासाचा प्रवाह मागे पडण्याचा धोक
नव्या मार्गाने हा पट्टा पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागे पडण्याचा धोका आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांची आहे. त्यामुळे मार्ग बदल करू नये, अशी मागणी होत आहे. हा प्रश्न फक्त रेल्वेमार्गाचा नाही; येत्या ५० वर्षांच्या विकासदिशेचा आहे.
---------
खासदार–आमदारांची ठाम भूमिका
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्याजित तांबे यांनीदेखील अत्यंत आक्रमक आणि तर्कशुद्ध पद्धतीने भूमिका मांडत मार्गबदलाचा विरोध नोंदवला आहे.
------
जनआंदोलनाची हाक
या भागातील नागरिकांना दररोजचा वाहतुकीचा त्रास असह्य झाला आहे. उद्योग, शेती, शिक्षण व आरोग्यसेवांसाठी हा रेल्वेमार्ग जीवनरेषा बनू शकतो. म्हणूनच या मागणीसाठी आता मोठ्या प्रमाणात, सुसंघटित जनआंदोलन अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे मत आहे.
-----------
नाशिक-पुणे रेल्वे हा या भागाच्या भवितव्याचा महामार्ग आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग मूळ सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गेच हवा. जनतेचा निर्धार आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आल्यास निर्णय बदलू शकतो; मात्र मोठे, सातत्यपूर्ण जनआंदोलन उभे राहिलेच पाहिजे.
- भाऊसाहेब चासकर, आम्ही अकोलेकर.
कोट - पुणे नाशिक रेल्वे अकोले तालुक्यातून जाण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पक्ष भेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता असून तसे न घडल्यास हात हलवत बसावे लागेल रेल्वे मार्ग बदलून अकोले तालुक्याच्या विकासावर परिणाम होत असेल व यात राजकारण येत असेल तर भंडारदरा,निळवंडे, आढळा चे पाणी अडवून बंद करावे लागेल बाजीराव दराडे (ओबीसी नेते)
कोट - अकोले तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत रेल्वे जर तालुक्यात आली तर तालुक्याचा पर्यटन विकास वेगात होईल येथील शेतकरी सकस अन्न धान्य पिकवतो त्याचा मालाला चांगले मार्केट मिळेल मात्र रेल्वे मार्ग बदलण्याचा घाट कुणी घालत असेल तर उच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवावा लागेल ऍड ,बाळासाहेब वैध (कायदे तज्ञ,अकोले )
Subscribe to:
Posts (Atom)
