Saturday, July 30, 2011

अन्न ,वस्त्र,निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा पण याच बरोबरीला आता शिक्षण देखील मुलभूत गरजांपैकीच एक मानली जाते.पण बऱ्याच जणांना नियमित व पारंपरिक शिक्षण घेणे परवडत नाही. तसेच दहावी/बारावी परीक्षेत नापास झालेल्या निराश विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट् मुक्त विद्यापीठाने एक नवा पर्याय खुला करुन आशेचा किरण निर्माण केला आहे.

ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमात १० वी / १२ वी (माध्यमिक/उच्चमाध्यमिक) परीक्षा उत्तीर्ण अशी किमान अर्हता विहीत केलेली असेल त्या बाबतीत,महाराष्ट्र राज्य शिक्षण मडंळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होवून पदवी परिक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार हा पात्र समजण्यात येतो.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था,नवी दिल्ली यांच्यामार्फत माध्यमिक शालांत परीक्षेबाबत दिलेले प्रमाणपत्र,माध्यमिक शालांत परीक्षा अशी अर्हता असलेल्या पदांवर नियुक्तीसाठी ग्राहय धरण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था, नवी दिल्ली यांची (मराठी व इंग्रजीसह किमान ५ विषयासंह) शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सदर प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांनी, राज्य शासन सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अशी अर्हता विहीत केली असेल त्या त्या ठिकाणी शासन सेवेसाठी शालांत परीक्षा समकक्ष पात्रता आपोआप धारण केली आहे असे समजण्यात येते. समाजातील अविकसित घटकांपर्यंत पोहचून त्यांना सुशिक्षित करण्याचा वसा घेतलेल्या मुक्त विद्यापीठाने नुकतेच २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. 

प्रचलित शिक्षण पध्दतीने अपात्र ठरविलेल्या विदयार्थ्यांना कला,वाणिज्य, कृषी,आरोग्य,अभियांत्रिकी,संगणक, पत्रकारिता, या शिक्षणक्रमांच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी,पदव्युत्तर पदवीस सुलभतेने प्रवेश घेता येतो. कारण इथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट,मायग्रेशन सर्टिफिकेट इ. कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.केवळ शाळा सोडल्याचा दाखल्याची व गुणपत्रकाची साक्षांकित छायाप्रत या कागदपत्रांवरच विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो.

या विद्यापीठाचा एवढा एक फायदा नसून अन्य विद्यापीठात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला तेथील पदवीसोबत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए./बी.कॉम. पदवीसाठी प्रवेश घेता येऊ शकेल. म्हणजेच विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेवून बाहेर पडतो ते दोन पदव्या घेवूनच! 

थोडक्यात विद्यार्थी तीन वर्षात दोन पदव्या मिळवू शकतो. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना राज्यातील इतर विद्यापीठाच्या पदव्यांप्रमाणेच शासन आणि विद्यापीठ आयोगाची मान्यता आहे. या विद्यापीठाच्या पदव्या इतर विद्यापीठाच्या पदव्यांशी समकक्ष आहेत. आवड व सवड यानुसार शिक्षण घेता येत असल्यामुळे या विद्यापीठांकडे शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

नाशिक विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,अहमदनगर या जिल्हयातील अभ्यासकेंद्रावर शिक्षण घेणाऱ्यांची मागील वर्षाची संख्या ५०,००० पेक्षाही अधिक होती. नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शेतकरी,कामगार,महिला बचत गटाच्या सदस्या,वरिष्ठ पोलिस अधिकारी,सरकारी कर्मचारी व अधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,गृहीणी, व्यापारी यांचेसह तुरुंगातील कैदी,अंधजन,लष्करी जवान, मोलकरीण, नाभिक, चर्मकार,मुंबईतील डबेवाले,राज्य परिवहन महामंडळाचे वाहक व चालक, यशनिर्माण प्रकल्पांतर्गत दत्तक घेतलेल्या खेडयांतील आदिवासी विद्यार्थी तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी असे अनेक घटक या ज्ञानगंगेच्या प्रवाहात मिसळून त्यांनी आपलं कर्तुत्व सिध्द केलं आहे. २०११-१२ या शैक्षणिक वर्षात ज्ञानगंगा घरोघरी येण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

दिंनाक १ जुलै ते ३१ जुलै २०११ या कालावधीत मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु राहतील. या कालावधीत बी.ए./बी.कॉम, एम.कॉम,एम.बी.ए, एम.एस.डब्ल्यू, बी.लिब, एम.लिब, बी.सी.ए.,पत्रकारीता, शालेय व्यवस्थापन पदविका,एम.एड, आर्किटेक्चर, बालसंगोपन,रुग्णसहायक,डोटा, बी.एस्सी , एम.एल.टी.इत्यादी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल. 

अधिक माहितीसाठी ०२५३-२३१७०६३/२५७६७५६ या क्रमांकावर संपर्क साधावा. मुक्त विद्यापीठाच्या या दूरशिक्षण पध्दतीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं लाभ घ्यावा व भविष्यकाळ उज्वल करावा व आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सातासमुद्रापार न्यावा !
युवा पिढीच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीबाबत बरेच बोलले जाते. आजच्या युवकांची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील युवापिढीशीदेखील केली जाते. मात्र शनिवारी सकाळी रत्नागिरीतील कोसळणाऱ्या पावसात लोकमान्य टिळकांच्या नावाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने 'स्मरणयात्रे'त सहभागी झालेल्या युवकांना पाहणाऱ्यांना ही तुलना निरर्थक असल्याचे निश्चितच जाणवले असणार आणि आजच्या युवापिढीबद्दल त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असणार हे नक्की...

...२३ जुलै हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतील गोरे यांच्या वाड्यात झालेला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ते याच वाड्यात रहात होते. त्यानंतर वडिलांना पुणे येथे नोकरीनिमित्त जावे लागले. टिळकांच्या जन्मभूमीचे महात्म्य नवयुवकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून लोकमान्य टिळकांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी साजरी करण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष देव यांच्याकडून लोकराज्य वाचक मेळाव्याचेवेळी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी वर्णन केलेला 'चैतन्याचा सोहळा' अनुभवण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर महाविद्यालयात सहकारी किलजे यांच्यासह दाखल झालो.

पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने 'कॉलेज'चे विद्यार्थी येतील का, अशी सहज शंका मनात आली. महाविद्यालयाच्या मैदानावर पांढऱ्याशुभ्र वेशातील युवक पडत्या पावसात एका रांगेत उभे होते.मात्र फारशी गर्दी नव्हती. मात्र काही वेळातच युवक-युवती पावसाची पर्वा न करता इमारतीच्या बाहेर पडू लागले,तेदखील शिस्तीत..एका रांगेत. प्राचार्य देव यांच्या हस्ते 'स्मरणयात्रे'चा शुभारंभ झाला. टिळकांच्या जयघोषाशिवाय कुठलाही आवाज त्या प्रभातफेरीत नव्हता. पाऊस सुरू असूनही एकाही विद्यार्थ्यी किंवा प्राध्यापकाच्या हातात छत्री दिसली नाही. स्वत: प्राचार्य प्रभातफेरीच्या अग्रभागी होते. येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचे कौतुक वाटत होते. रहदारीला अडथळा न होऊ देता ही फेरी टिळक जन्मस्थानाजवळ पोहोचली.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचा हा वाडा देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडे आहे. वाड्यातील घरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूस टिळकांचा जन्म झालाती खोली आहे. खोलीत टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर समई लावलेली होती आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली होती. याच खोलीच्या भिंतींना टिळकांच्या जन्माच्यावेळी स्वातंत्र्य गर्जनेचा पहिला स्वर ऐकण्याचे भाग्य लाभले होते. खोलीतील एका काचेच्या पेटीत त्याकाळची आठवण असणाऱ्या काही वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. इतर घरातील इतर भागात टिळकांची काही छायाचित्रे आणि हस्ताक्षर पहायला मिळतं. मागील बाजूस विस्तीर्ण वाड्यात बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे...

...एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. वाड्यात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याच्या सभोवती कुठलाही गोंधळ न करता सर्व विद्यार्थी शांततेत उभे राहीले आणि लोकमान्य टिळकांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
'आरती ओवाळू लोकमान्य टिळकांना
घ्याहो जन्म पुन्हा करण्या सुराज्य स्थापना'
आरती टिळकांची असली तरी युवकांच्या मनात दडलेल्या देशभक्तीला केलेले ते आवाहन असल्याचे आरतीचे शब्द ऐकतांना जाणवले. आरतीनंतर प्राचार्य डॉ.देव यांनी कार्यक्रमाची भूमीका विषद करतांना महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टिळक जन्मस्थानाचे महात्म्य कळून त्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. लोकमान्य टिळकांना संस्कृत भाषेविषयी असणारे प्रेम आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाची सांगड घालत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जीजीपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय सादर केला. त्यानंतर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. प्रा.चव्हाण यांनी आदल्या दिवशीच रचलेले टिळकांच्या जीवनावरील सुंदर गीत विद्यार्थ्यांनी एका दिवसात चाल लाऊन सादर केले.
'रत्नभूमी ही पावन सुंदर, देखणी आपल्या जन्माने
गीताईचा अंश मनोहर आला आपल्या रुपाने
देशक्तीचा शेला लेवूनी, लोकमान्य तो जाहला
सरस्वतीचा वरदहस्त हा महाराष्ट्राने गौरवीला'
अशा प्रेरक ओळी सादर होत असताना पावसाच्या सरीदेखील या जन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरीकदेखील भारावून याठिकाणी थांबले. साधारण सात-आठशे युवक-युवती असूनही त्या स्थानाचे पावित्र्य राखत शांत वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमानंतर टिळक आळीतील नानासाहेब भिडे यांनी परंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.('पेढे वाटले' असा मी उल्लेख करताच त्यांनी 'जन्मदिवस आहे, त्यामुळे तोंड गोड करतो आहे' अशी दुरुस्ती केली.) परततानाही विद्यार्थ्यांमधली शिस्त कायम होती. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये या स्थानाला भेट देऊन निर्माण झालेली ऊर्जा उत्साहाच्या रुपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अकरावीच्या विक्रांत पाटीलला कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला संस्कार तरुण पिढीतील टिळक निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे वाटते. तर त्याचा सहकारी असलेला जयंत अवेरे याने या स्थानाला भेट दिल्याने देशासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. स्नेहा जोशी हिला आपल्या युवा सहकाऱ्यांनी दाखविलेली शिस्त आवडली. त्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश गेल्याचे तीने सांगितले.

राम नाक्यापासून जयस्तंभापर्यंत विद्यार्थ्यांची एक सरळ आखलेली रेष दिसत होती. महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची टिळक जन्मस्थानाला असलेली ही पहिलीच भेट त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्याचबरोबर ज्या परिसरात टिळकांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या रुपाने झालेले संस्कार विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा देतील. महाविद्यालयात अनेक उपक्रम होतच असतात. पण रत्नागिरीचं स्थानमहात्म्य लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 'देशभक्तीचा जागर' होता.
कर्तृत्व,वक्तृत्व आणि जनसंपर्क राजकीय व्यासपीठावरील यशस्वी व्यक्तिमत्वाच्या कीर्तीचे तीन मूलभूत अंग असतात...अशी कीर्ती मग चिरकाल टिकते. दरवेळी अशा व्यक्तींच्या इतिहासाला नवी झळाळी मिळते... नव्याने व्यक्तींची ओळख होते. गुरुवारी अशीच ओळख गेल्या पाऊण शतकात अनेक इतिहासाची पाने लिहिणा-या दरबार हॉलला झाली. राष्ट्रपती भवनातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमाचे घटनास्थळ ! आज या ठिकाणी देशाच्या प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांच्या धीरगंभीर आवाजात नव्या पिढीला एका महान गांधीवादी नेत्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळाली. औचित्य होते स्वर्गीय वि.स.पागे अर्थात विठठ्ल सखाराम पागे यांच्यावरील डाक तिकीटाच्या विमोचन कार्यक्रमाचे.

वि.स.पागे यांच्या कर्तृत्वाची ओळख पत्रकार म्हणून काम करताना विधान परिषदेचे सलग १८ वर्षे सभापती या नात्याने होती. मात्र आज त्याच कालखंडात काम करणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्यांची वेगळी ओळख उपस्थितांना करुन दिली. ही केवळ ओळख नव्हती, एका ज्येष्ट नेतृत्वाची त्यावेळेच्या तरुण नेतृत्वावर पडलेली छाप होती. १९६२ च्या सुमारास महाराष्ट्राची निर्मिती आणि राज्य उभारण्याच्या प्रक्रीयेत स्वत:ला झोकून देणा-या पिढीतील समर्पणाच्या आठवणीची कहाणी होती. ही नवी ओळख महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी नवी होती.

दुष्काळी काम,त्यातून रोजगार हमी योजनेचा जन्म, पुढे जलसंधारणाची मोहीम मात्र या दरम्यान वि.स. पागे यांनी नशाबंदी कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार यावर राष्ट्रपती महोदयांनी अधिक प्रकाश टाकला.. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या यशस्वीतेसाठी आणि दुष्काळाची झळ गरीबांना पोहचू नये यासाठी मजूरीचे भाव तिप्पट करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी मजुरांच्या हातात मोठया प्रमाणात पैसा आला होता. मात्र हा पैसा खरोखर कुठे जातो. यामुळे दुष्काळाच्या सावटातून परिवार बाहेर पडतात काय ? याचा अभ्यासही या लोकनेत्याने केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मोठया प्रमाणात संग्रही पैसा नशा करण्यात खर्च होतो. तेव्हा याच काळात वि.स.पागे यांच्या पुढाकाराने शासनाने नशाबंदी कार्यक्रम सुरु केला. रोजगार हमी योजनेसोबत पागे यांचे हे काम अविस्मरणीय असून तत्कालिन व्यवस्थेने त्यांचे कौतुकही केले होते, असे त्यांनी यावेळी वेगळी आठवण म्हणून सांगितले.

पागे यांच्या संत साहित्याचा अभ्यास आणि समाजाच्या विविध घटकांसोबतची त्यांची जवळीक, त्या प्रश्नांची जाण,महात्मा गांधी,विनोबा भावे,साने गुरुजी अशा ऋषितुल्य समाज धुरिणांची त्यांच्यावर पडलेली छाप, यातून वि.स.पागे उभे राहील्याची आठवणही त्यांनी सांगितली. पूर्वीच्या काळात नव्याने निवडून येणा-या आमदारांचे बौध्दीक घेतले जायचे.. तेव्हा पागेंचे मार्गदर्शन प्रत्येकाच्या कायम अनुभवाच्या गाठीशी बांधले असायचे.नवी पिढी हुशार असल्याचे आता सांगितले जाते. परंतू अशा आदरणीय व्यक्तिमत्वातून आम्ही घडलो, हे सांगतांना मला आनंद होतो, असेही त्यांनी सांगितले. 

अशा कितीतरी आठवणींना आज दरबार हॉलमध्ये उजाळा मिळत होता. एरव्ही महाराष्ट्राशी संबंधीत कार्यक्रमातही राष्ट्रपती महोदया राष्ट्रभाषेतच बोलतात. परंतू आजचे संबोधन सुरुवातीपासून मराठीत होते. मनातल्या आठवणी मातृभाषेतच बोलण्याची आमची संस्कृती त्यामुळे दरबार हॉल भारवला होता. पागे यांच्या जन्मशाताब्दी वर्षाला यापेक्षा वेगळी आदरांजली काय असू शकते... .. त्यांच्या उच्च कोटीच्या कर्तृत्वाला ही राष्ट्रपती भवनाची सलामी होती.

बुलडाणा जिल्हयाच्या नांदुरा तालुक्यातील दहिगाव सह विटाळी, तांदुळवाडी, सातपुडी, औरंगपूर या पाच गावांचीही बाल मजूर मुक्त गावाकडे वाटचाल सुरु असून पुढील महिन्यापर्यंत ही गावे बाल मजूर मुक्त होणार आहेत.

नांदुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने व महात्मा फुले समाज सेवा संस्था करमाळा जिल्हा सोलापूरच्या वतीने परिवर्तनसाठी बाल अधिकार हा प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकांना असलेले त्यांचे मुलभूत अधिकार यांची जाणीव बालकांना करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालहक्कासोबतच शासनाच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा कायद्याबाबत जनजागृती, शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती, महिलांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये असलेली २९ गावे डिसेंबर २०१२ पर्यंत बालमजूर मुक्त करण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असून पहिल्या टप्‍प्यात सध्या दहिगाव, विटाळी, तांदुळवाडी, सानपुडी, औरंगपूर या गावांची या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. प्रकल्पातील २९ गावांसह या पाच गावामध्ये १५ जुलै पर्यंत बालमजूर मुक्त गाव व शाळा भरती मोहिम सरु आहे. 

बालमजूर मुक्त गावाच्या निकषाप्रमाणे ० ते ६ वयोगटातील सर्व बालक अंगणवाडीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत जातात, शाळेत १०० टक्के पटनोंदणी तसेच नियमित व पूर्णवेळ शाळेत, शाळा बाह्य विद्यार्थी गावात नसणे, ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुलं कामाला नसणे, पालकांना बालहक्क व बालमजूर कायद्याची जाण असणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार, कर्तव्य व जवाबदारीची जाणीव असणे, बाल संरक्षण समित्यांना कर्तव्य, जवाबदारीची जाण असणे, बाल गटांकडून बालहक्का विषयी जनजागृती,सर्व उपक्रमामध्ये गावातील पालक, बालक, शेतमालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांचा महिलांचा सहभाग असणे आदी सर्व बाबींवर वरील गावांमध्ये जनजागृती सुरु आहे.

ही गावे या महिन्यात बालमजूर मुक्त होणार यात शंका नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील २९ गावे ज्यामध्ये नारखेड, भोटा, निमगाव, अवधा, इसापूर, भोरवंड, पिंपळखुटा, वडी, बेलुरा, नायगाव, मामुलवाडी, पोटडी, लोणवडी, वाडी, तिकोडी, सातपुडी, सिरसोली, कोकलवाडी, माळेगाव, खडगाव, मोमिनाबाद, मेंढळी ही गावे सुध्दा प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजू
बुलडाणा जिल्हयाच्या नांदुरा तालुक्यातील दहिगाव सह विटाळी, तांदुळवाडी, सातपुडी, औरंगपूर या पाच गावांचीही बाल मजूर मुक्त गावाकडे वाटचाल सुरु असून पुढील महिन्यापर्यंत ही गावे बाल मजूर मुक्त होणार आहेत.

नांदुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने व महात्मा फुले समाज सेवा संस्था करमाळा जिल्हा सोलापूरच्या वतीने परिवर्तनसाठी बाल अधिकार हा प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकांना असलेले त्यांचे मुलभूत अधिकार यांची जाणीव बालकांना करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालहक्कासोबतच शासनाच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा कायद्याबाबत जनजागृती, शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती, महिलांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये असलेली २९ गावे डिसेंबर २०१२ पर्यंत बालमजूर मुक्त करण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असून पहिल्या टप्‍प्यात सध्या दहिगाव, विटाळी, तांदुळवाडी, सानपुडी, औरंगपूर या गावांची या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. प्रकल्पातील २९ गावांसह या पाच गावामध्ये १५ जुलै पर्यंत बालमजूर मुक्त गाव व शाळा भरती मोहिम सरु आहे. 

बालमजूर मुक्त गावाच्या निकषाप्रमाणे ० ते ६ वयोगटातील सर्व बालक अंगणवाडीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत जातात, शाळेत १०० टक्के पटनोंदणी तसेच नियमित व पूर्णवेळ शाळेत, शाळा बाह्य विद्यार्थी गावात नसणे, ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुलं कामाला नसणे, पालकांना बालहक्क व बालमजूर कायद्याची जाण असणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार, कर्तव्य व जवाबदारीची जाणीव असणे, बाल संरक्षण समित्यांना कर्तव्य, जवाबदारीची जाण असणे, बाल गटांकडून बालहक्का विषयी जनजागृती,सर्व उपक्रमामध्ये गावातील पालक, बालक, शेतमालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांचा महिलांचा सहभाग असणे आदी सर्व बाबींवर वरील गावांमध्ये जनजागृती सुरु आहे.

ही गावे या महिन्यात बालमजूर मुक्त होणार यात शंका नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील २९ गावे ज्यामध्ये नारखेड, भोटा, निमगाव, अवधा, इसापूर, भोरवंड, पिंपळखुटा, वडी, बेलुरा, नायगाव, मामुलवाडी, पोटडी, लोणवडी, वाडी, तिकोडी, सातपुडी, सिरसोली, कोकलवाडी, माळेगाव, खडगाव, मोमिनाबाद, मेंढळी ही गावे सुध्दा प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजूर मुक्त करण्याचा संस्थेचा मानस आहे.
युवा पिढीच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीबाबत बरेच बोलले जाते. आजच्या युवकांची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील युवापिढीशीदेखील केली जाते. मात्र शनिवारी सकाळी रत्नागिरीतील कोसळणाऱ्या पावसात लोकमान्य टिळकांच्या नावाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने 'स्मरणयात्रे'त सहभागी झालेल्या युवकांना पाहणाऱ्यांना ही तुलना निरर्थक असल्याचे निश्चितच जाणवले असणार आणि आजच्या युवापिढीबद्दल त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असणार हे नक्की...

...२३ जुलै हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतील गोरे यांच्या वाड्यात झालेला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ते याच वाड्यात रहात होते. त्यानंतर वडिलांना पुणे येथे नोकरीनिमित्त जावे लागले. टिळकांच्या जन्मभूमीचे महात्म्य नवयुवकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून लोकमान्य टिळकांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी साजरी करण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष देव यांच्याकडून लोकराज्य वाचक मेळाव्याचेवेळी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी वर्णन केलेला 'चैतन्याचा सोहळा' अनुभवण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर महाविद्यालयात सहकारी किलजे यांच्यासह दाखल झालो.

पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने 'कॉलेज'चे विद्यार्थी येतील का, अशी सहज शंका मनात आली. महाविद्यालयाच्या मैदानावर पांढऱ्याशुभ्र वेशातील युवक पडत्या पावसात एका रांगेत उभे होते.मात्र फारशी गर्दी नव्हती. मात्र काही वेळातच युवक-युवती पावसाची पर्वा न करता इमारतीच्या बाहेर पडू लागले,तेदखील शिस्तीत..एका रांगेत. प्राचार्य देव यांच्या हस्ते 'स्मरणयात्रे'चा शुभारंभ झाला. टिळकांच्या जयघोषाशिवाय कुठलाही आवाज त्या प्रभातफेरीत नव्हता. पाऊस सुरू असूनही एकाही विद्यार्थ्यी किंवा प्राध्यापकाच्या हातात छत्री दिसली नाही. स्वत: प्राचार्य प्रभातफेरीच्या अग्रभागी होते. येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचे कौतुक वाटत होते. रहदारीला अडथळा न होऊ देता ही फेरी टिळक जन्मस्थानाजवळ पोहोचली.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचा हा वाडा देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडे आहे. वाड्यातील घरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूस टिळकांचा जन्म झालाती खोली आहे. खोलीत टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर समई लावलेली होती आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली होती. याच खोलीच्या भिंतींना टिळकांच्या जन्माच्यावेळी स्वातंत्र्य गर्जनेचा पहिला स्वर ऐकण्याचे भाग्य लाभले होते. खोलीतील एका काचेच्या पेटीत त्याकाळची आठवण असणाऱ्या काही वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. इतर घरातील इतर भागात टिळकांची काही छायाचित्रे आणि हस्ताक्षर पहायला मिळतं. मागील बाजूस विस्तीर्ण वाड्यात बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे...

...एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. वाड्यात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याच्या सभोवती कुठलाही गोंधळ न करता सर्व विद्यार्थी शांततेत उभे राहीले आणि लोकमान्य टिळकांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
'आरती ओवाळू लोकमान्य टिळकांना
घ्याहो जन्म पुन्हा करण्या सुराज्य स्थापना'
आरती टिळकांची असली तरी युवकांच्या मनात दडलेल्या देशभक्तीला केलेले ते आवाहन असल्याचे आरतीचे शब्द ऐकतांना जाणवले. आरतीनंतर प्राचार्य डॉ.देव यांनी कार्यक्रमाची भूमीका विषद करतांना महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टिळक जन्मस्थानाचे महात्म्य कळून त्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. लोकमान्य टिळकांना संस्कृत भाषेविषयी असणारे प्रेम आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाची सांगड घालत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जीजीपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय सादर केला. त्यानंतर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. प्रा.चव्हाण यांनी आदल्या दिवशीच रचलेले टिळकांच्या जीवनावरील सुंदर गीत विद्यार्थ्यांनी एका दिवसात चाल लाऊन सादर केले.
'रत्नभूमी ही पावन सुंदर, देखणी आपल्या जन्माने
गीताईचा अंश मनोहर आला आपल्या रुपाने
देशक्तीचा शेला लेवूनी, लोकमान्य तो जाहला
सरस्वतीचा वरदहस्त हा महाराष्ट्राने गौरवीला'
अशा प्रेरक ओळी सादर होत असताना पावसाच्या सरीदेखील या जन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरीकदेखील भारावून याठिकाणी थांबले. साधारण सात-आठशे युवक-युवती असूनही त्या स्थानाचे पावित्र्य राखत शांत वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमानंतर टिळक आळीतील नानासाहेब भिडे यांनी परंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.('पेढे वाटले' असा मी उल्लेख करताच त्यांनी 'जन्मदिवस आहे, त्यामुळे तोंड गोड करतो आहे' अशी दुरुस्ती केली.) परततानाही विद्यार्थ्यांमधली शिस्त कायम होती. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये या स्थानाला भेट देऊन निर्माण झालेली ऊर्जा उत्साहाच्या रुपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अकरावीच्या विक्रांत पाटीलला कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला संस्कार तरुण पिढीतील टिळक निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे वाटते. तर त्याचा सहकारी असलेला जयंत अवेरे याने या स्थानाला भेट दिल्याने देशासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. स्नेहा जोशी हिला आपल्या युवा सहकाऱ्यांनी दाखविलेली शिस्त आवडली. त्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश गेल्याचे तीने सांगितले.

राम नाक्यापासून जयस्तंभापर्यंत विद्यार्थ्यांची एक सरळ आखलेली रेष दिसत होती. महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची टिळक जन्मस्थानाला असलेली ही पहिलीच भेट त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्याचबरोबर ज्या परिसरात टिळकांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या रुपाने झालेले संस्कार विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा देतील. महाविद्यालयात अनेक उपक्रम होतच असतात. पण रत्नागिरीचं स्थानमहात्म्य लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 'देशभक्तीचा जागर' होता.

Tuesday, July 26, 2011

विदर्भ: ना सुरक्षा ना व्यवस्था!Bookmark and SharePrintE-mail
राखी चव्हाण 
पावसाळा सुरू झाला की लगेच कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत आऊटिंगचे बेत सुरू होतात. प्रत्येकजण थोडेसे ऑफबीट, वेगळय़ा पर्यटनस्थळाच्या शोधात असतो, पण पावसाळी पर्यटनात मिळणाऱ्या आनंदासोबतच अलीकडच्या काही काळात वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारा तळीरामांचा हैदोस, याचे गालबोट लागतेय हे निश्चित!
इंदौरमध्ये अलीकडेच पावसाळी पर्यटनाची मजा लुटायला गेलेल्या कुटुंबाचा अतिउत्साहामुळे पाण्याच्या वाहत्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. या घटनेला आठ दिवस लोटत नाही तोच विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सीमाडोह मार्गावर त्याच वेळी दोन युवकांचा आणि अगदी कालपरवाच भीमकुंड धबधब्यात उतरत असताना पाय घसरून पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमधील एका डॉक्टराला जीव गमवावा लागला.
चिखलदऱ्यावर निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण आहे, पण तेवढेच हे पर्यटनस्थळ धोकादायक आहे. भीमकुंडाच्या वरच्या बाजूला कठडे आहेत पण, सुरक्षारक्षकाअभावी पर्यटक हे कठडे तोडून आत जातात आणि जीव गमावून बसतात. प्रवेश करतानाचा एक फलक सोडला तर इतर कोणत्याही ठिकाणी धोक्याचे इशारे देणारे फलक नाहीत. घाटवळणाचा हा रस्ता पावसाळय़ात अधिकच निसरडा होतो आणि पर्यटकांचे अतिउत्साहीपण बरेचदा त्यांचा जीव घेते. चंद्रपूर जिल्हय़ातील ब्रम्हपुरी तालुक्यात ब्रिटिशांनी बांधलेल्या घोडाझरी तलावाला आता १०० वष्रे पूर्ण झाली आहेत. पावसाळय़ात हा तलाव पूर्ण भरल्यानंतर घोडय़ाचा आकार स्पष्टपणे दिसतो आणि हे वेगळेपण बघण्यासाठीच जिल्हय़ातीलच नव्हे तर दुरूनही या ठिकाणी पर्यटक येतात. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ‘सांडव्या’तून वाहणाऱ्या पाण्याची मजा लुटण्यासाठी पर्यटक येतात खरे, मात्र तेवढेच ते जीवघेणेसुद्धा ठरते. तीन वर्षांपूर्वी याच वाहत्या पाण्यात अतिउत्साही दोन पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्यानंतरसुद्धा पर्यटक ‘बोटिंग’ची मजा लुटतात, पण ही मजा कधी जिवावर बेतू शकते, याचे त्यांना भान राहात नाही. मुळातच या ठिकाणी कोणतीही प्रशासकीयव्यवस्था नाही. बुलढाणा जिल्हय़ातील लोणार सरोवराचे निसर्गसौंदर्य अद्याप अबाधित आहे. पण जागतिक स्तरावर नोंद होऊनही या ठिकाणी पर्यटकांसाठी म्हणावी अशा सुविधा नाही. पर्यटन विस्तारासाठी अलीकडेच पर्यटन विभागाने १० कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वीसुद्धा ३५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली होती, पण नवीन भिंत उभारण्याऐवजी ब्रिटिशकालीन भिंतीवरच भिंत चढवण्यात आली. जनतेच्या डोळय़ांतील ही धूळफेक पर्यटकांच्या जिवावर बेतू शकते, याचे भान कदाचित प्रशासनाला नाही. नागपूर जिल्हय़ातील खिंडसी हे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे खास आवडते ठिकाण! वर्षभर पर्यटकांची इथे ये-जा असतेच, पण अलीकडच्या काळात तरुणांची वाढणारी गर्दी या पावसाळी पर्यटनाला गालबोट लावेल की काय, अशी स्थिती सध्या इथे आहे. पर्यटकांना खुणावणाऱ्या या स्थळी तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे एका विकृतीचेच दर्शन घडते. मुळातच यापैकी कुठल्याच पर्यटनस्थळावर ना सुरक्षा यंत्रणा आहे ना प्रशासनाचा वचक. अलीकडे पर्यटनाचा ‘कॉन्सेप्ट’ मुळात बदलत चालला आहे. ‘एन्जॉयमेंट’ ऐवजी ‘पार्टी’ ही पर्यटनाची व्याख्या झाली आहे. खाऊन झाल्यानंतर तिथेच प्लॅस्टिक प्लेट्स फेकणे, दारू पिऊन बाटल्या त्याच ठिकाणी टाकणे हा प्रकार हल्ली सर्वच पर्यटनस्थळाबाबत घडून येतो आहे. चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती जिल्हय़ातील मेळघाट पर्यटकांचे पावसाळय़ातील आवडते ठिकाण, मात्र पर्यटकांनीच येथील निसर्गसौंदर्याला गालबोट लावले आहे. कदाचित यामुळेच कधी नव्हे ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बंद ठेवण्याची वेळ वन विभागावर आली. निसर्गाचा खरा अनुभव येतो तो पावसाळय़ात, पण पर्यटकच या निसर्गाचे सौंदर्य बाधित करतील तर ‘इको टुरिझम’च्या संकल्पनेवर नक्की गदा आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पर्यटन विभाग असो किंवा जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासन या सर्वानी एकत्रित येऊन काही व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.

आंबोली : पर्यटन बदनामीच्या दिशेनेBookmark and SharePrintE-mail
अभिमन्यू लोंढे
 पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नावारुपाला आलेल्या सिंधुदुर्गमध्ये आंबोली आमि अन्यत्र पावसाळी पर्यटन आता भरास आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इथे वाढू लागलेली हुल्लडबाजी आणि बेधुंदपणा यामुळे अपघात आणि विकृतीत वाढ होऊ लागली आहे. या साऱ्यावर प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसल्याने हा सारा व्यवसायच आता बदनामीच्या दिशेने जाण्याची भीती अनेकांना वाटते आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या एका बाजूला अथांग, स्वच्छ, सुंदर सागरकिनारा तर दुसऱ्या बाजूला सह्य़ाद्री तथा पश्चिम घाटाचा पट्टा लाभला आहे. यातील पश्चिम घाट तर पर्यटनासाठी विपूल, विलोभनीय व अचंबित करून टाकणाऱ्या निसर्गाची खाणच आहे. याच परिसरात जिल्ह्य़ात सुमारे दीडशे ते दोनशे इंच पाऊस कोसळतो. यातून अनेक धबधबे जन्म घेतात. हे धबधबे वाहू लागले की स्थानिक जिल्ह्य़ातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातून पर्यटक इकडे येत असतात. यातही आंबोली हा सर्वाधिक प्रसिद्ध!
आंबोलीशिवाय दोडामार्ग तालुक्यातील मांगेली, कणकवली तालुक्यातील नापणे तसेच मालवणनजीक असणारे शिवडाव असे प्रसिद्ध धबधबे आहेत. इथेही पर्यटकांची गर्दी असते. पण आता या भाऊगर्दीचा त्यांच्या गोंधळाचा स्थानिक लोकांना त्रास होऊ लागला आहे. या गर्दीचे नियोजन व्हावे असे सर्वाना वाटते.
आंबोली घाट रस्त्यावरच ठिकठिकाणी धबधबे आहेत. या रस्त्यावरच सर्व पर्यटक थांबतात. शनिवार - रविवारी तर याला जत्रेचे स्वरूप येते. या साऱ्या गर्दीचा येथील वाहतुकीवर परिणाम होतो. आंबोली घाट रस्ता हा गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणारा आंतरराज्य मार्ग आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात हा रस्ता अनेकदा बंद होतो. शिवाय या पर्यटकांमध्ये अनेकजण मद्य प्राशन करून हुल्लडबाजी करत असल्यामुळे त्याचा इथे येणाऱ्या अन्य पर्यटक व प्रवाशांनाही त्रास होतो.
आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित झाल्यानंतर होणारी कायमस्वरूपी गर्दी पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही व्यवस्था करावी अशी नागरिकांमधऊन मागणी होत आहे. सर्वात महत्त्वाचे इथे येणाऱ्या मद्यपींवर कारवाई आणि इथे येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ तातडीने करण्याची गरज आहे.
आंबोली घाटात जागोजागी कोसळणाऱ्या या धबधब्यांमुळे खडकांच्या भेगांत पाणी जाऊन दरड कोसळण्याच्या घटनाही इथे घडत असतात. अशी दरड कोसळल्याने गेल्या वर्षी २६ दिवस तर यंदा १० दिवस घाट बंद होता. घाटातील मुख्य धबधब्यावर पूर्वी दोन वेळा पर्यटकांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे धबधब्यांवरून पर्यटक कोसळून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.
आंबोलीतील कावळेसार पॉईंट हा गर्दी खेचणारा पॉईंट आहे, पण या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. दोन वर्षांपूर्वी या पॉईंटवर जाणाऱ्या पर्यटकांची गाडीच वाहून गेली होती. त्यामुळे कावळेसार पॉईंट रस्ता नदीवर संरक्षक िभत बांधण्याची गरज आहे.एकीकडे पर्यटन जिल्हा म्हणून गोडवे गाताना या स्थळी साधा रस्ता, स्वच्छतागृह, पार्किंग यासारख्या सुविधा नसल्याने येथे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. एकूणच सिंधुदुर्गमधील हे पावसाळी पर्यटन वाढत असताना त्याला प्रशासनाकडून वेळीच एखाद्या शिस्तीचे वळण आणि सुविधांचे पाठबळ मिळत नसल्याने ते धोकादायक दिशेने भरकटू लागले आहे.   

दुगारवाडी धबधबा अपप्रवृत्तींचा वाढता प्रवाहBookmark and SharePrintE-mail
चारुशीला कुलकर्णी
पावसाळी पर्यटन म्हटले की ‘जेथे धबधबा तेथे गर्दी तोबा’ हे आलेच. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वच्छंदपणे, निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पावसाळ्यात तर चिंब झालेला निसर्ग जणू त्याला सादच घालत असतो. पावसाळी पर्यटनासाठी उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे प्रसिध्द असली तरी काही ठिकाणांचे संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याने जुनी ओळख लयास जाऊन त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे. ती अर्थातच पर्यटकांसाठी हितावह नाही. अशा या ठिकाणांमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील दुगारवाडी धबधब्याचा समावेश करावा लागेल. कधीकाळी कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह एक दिवसाच्या पावसाळी पर्यटनासाठी अगदी सुरक्षित असलेली दुगारवाडी आता अपप्रवृत्तीमुळे ‘जुगारवाडी’ झाली आहे.
हिरवळीचा साज ल्यालेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हे ठिकाण तेथील धबधब्यासाठी प्रसिध्द आहे. युवावर्गाची येथे कायम झुंबड असते. त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील दुगारवाडी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते. अर्थात सोबतीला हिरवागार निसर्ग, कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस असल्याने थकवा असा जाणवत नाही. दूरवरून धबधब्याचे दर्शन रोमांचकारी वाटत असले तरी जवळ गेल्यावर त्याचा रौद्रपणा जाणवतो. शहरी जीवनातील कामाचा ताणतणाव घालविण्यासाठी, पावसात मित्र-मैत्रिणींसोबत चिंब भिजण्याची मजा अनुभवयाची असेल तर दुगारवाडीसारखे ठिकाण नाही. ढगांची भरलेली शाळा आणि धरतीचा हिरवागार साज. समोर प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा, सर्व काही पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे! कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रिणींसह येथे येण्यातील मजा काही औरच आहे. परंतु अलीकडे या ठिकाणचा हा सात्त्विकपणा पूर्णपणे हरवला आहे. मद्यपी टोळक्यांचे आवडते ठिकाण म्हणून दुगारवाडी धबधब्याला पसंती देण्यात येत आहे. ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसतात. झाडाच्या आडोशाला काय उद्योग सुरू असेल, याची कल्पना न केलेली बरी. एकटय़ा-दुकटय़ाला लूटमारीचे प्रकार तर कायम घडतात. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी कुठलीही वाहन व्यवस्था नसल्याने किमान दोन किलोमीटर तरी पायी जावे लागते. पायी जातांना मद्यपींकडून युवतींची छेड काढली जाते.
दुगारवाडी धबधबा परिसरास पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील. धबधब्यापर्यंत पर्यटकांना मद्याची बाटली नेता येऊ नये म्हणून रस्त्यावर बचत गटांमार्फत त्यांची तपासणी करण्यात यावी, जेणेकरून बचत गटाच्या सदस्यांनाही काम मिळेल. परिसरातील युवकांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करता येणेही शक्य आहे. ‘दुगारवाडी धबधबा’ अपप्रवृत्तींमुळे चर्चेत असताना धुळे शहराजवळील ‘लळिंग किल्ला’ परिसर आजही पावसाळी पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून गणले जाते. धुळे तालुक्याच्या वेशीवर असलेला लळिंग किल्ला मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौफुलीपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरवर आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस किंवा खासगी वाहनाने महामार्गावर उतरून या किल्ल्यावर जाता येते. हिरवाईचे पांघरूण ल्यालेला हा किल्ला निसर्गप्रेमींसाठी एक आनंददायक ठेवाच आहे. किल्ल्यावरील ‘लांडोर बंगला’ परिसरही बघण्यासारखा. याठिकाणी असलेला धबधबा हेही एक आकर्षण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लांडोर बंगल्यात काही काळ वास्तव्यास असल्यामुळे या बंगल्याचे त्यादृष्टीनेही महत्त्व आहे. गर्द हिरवी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोकळी हवा याचा आस्वाद घेत असताना उंचावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावत राहतो. धबधबा परिसरातील जंगलात हरीण, मोर, माकड हे दर्शन देत असतात. काही वेळा बिबटय़ाची डरकाळीही ऐकायला मिळते. सुटीच्या दिवशी पर्यटकांचा वावर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असतो. एरवीही पर्यटकांचा राबता या ठिकाणी आपल्या पाहायला मिळेल. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरात सतत गस्त घालत असल्यामुळे येथे अजूनपर्यंत अनुचित प्रकार घडलेले नाहीत. अशीच व्यवस्था इतर सर्व पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावरील महत्त्व निश्चितच वाढेल.