या
आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. हा आलाही नाही की गेलाही नाही. हा
स्थिर आहे- पुरातन आहे. देहाला मारले तरी हा मरत नाही. याला शस्त्रे मारू
शकत नाहीत. त्याला अग्नी जाळू शकत नाही. याला पाणी भिजवू शकत नाही की याला
वारा वाळवू शकत नाही. हा सर्वव्यापी आहे. याला पाहता येत नाही. याची कल्पना
करता येत नाही. हा निविर्कार आहे. आत्म्याचे हे स्वरूप जाणून घ्यायला हवे!
आणि देहाला मारले तरी आत्मा मरेल असा शोक करणे योग्य नाही. या देहात आत्मा
असतो, पण देह मेला तरी आत्मा मरत नाही हे भगवंताचे म्हणणे थोडे बुचकळ्यात
टाकणारे आहे. पूवीर् एक अशी समजूत होती की मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस देह
जिथे मेला तिथे घोटाळत राहतो. आणि तेराव्या दिवशी श्राद्ध केल्यावर तो
निघून जातो. जर देह नसतोच तर तो घोटाळणार कुठे आणि कसा? की हे सारेच एक
थोतांड आहे? देहात आत्मा असेल तर देहानंतर तो राहीलच कसा? जो देहापायी आहे
तो देहांतानंतर देहासह लयालाच जायला हवा. आणि इतके लाखो लोक आहेत जगात तर
त्यांचे लाखो आत्मे त्यांच्या मृत्यूनंतर जगात नांदतात कुठे? की
सर्वांच्याच देहात तो एकच सर्वव्यापी आत्मा भरून राहिला आहे? धड काहीच समजत
नाही. आपण या आत्म्याचा शोध तो जर इतका गूढ आहे तर लावायचा कसा आणि कुठे?
त्यापेक्षा जोवर हा देह जिवंत आहे तोवर आत्म्याला स्मरून चांगले जगवावे आणि
आपल्याला सत्कृत्ये करायला लावणारी एक दिव्य शक्ती आपल्यात आहे- मग तिचेच
नाव आत्माही असेल- ह्यातच समाधान मानावे!

No comments:
Post a Comment