Wednesday, February 27, 2013

आहे ते असे आहे, आहे ते माझे आहे, पटले तर घ्या...चल हट...हा तर सवालच नाही, तुमच्यासाठी बदलायला... मी काही पाटीवरची अक्षरे नाही! वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत! "ध" चा "मा" करायला मला नाही सवड! आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे! पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही! आधी मारुन मग सॉरी म्हणायला मी काही इंग्रजांची जात नाही! उगा लाळ घोटायला मला नाही झेपत! खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत! स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे! मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते! यारी-दोस्ती माझी काही अप्पलपोटी नाहि तुमच्यासारखे छुपे स्वार्थ साधायला मी नामर्दाची अवलाद नाही!

No comments:

Post a Comment