राजूर
(वार्ताहर )युवकांनी सकारात्मक विचार करून आपले काम केल्यास राष्ट्र
उभारणीला मदतच होईल .मात्र हे करत असताना श्रमाचे महत्व व चारित्र्य
संवर्धन असले पाहिजे असे प्रतिपादन संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा
खरात यांनी येथील श्री समर्थ कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्य्लायात
"राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांचा सहभाग"यावर बोलताना केले .डॉ
.बाबासाहेब जयकर बाही;शाल व्याख्यान माला श्री समर्थ कन्या माध्यमिक व उच्च
माध्यमिक विध्य्लायव पुणे विध्य्पीठ यांचे सयुक्त विधेमाने राजूर येथे
आयोजित करण्यात आले होते तिसरे पुष्प गुंफताना बाबा खरात बोलत
होते.प्रास्तविक प्रचार्य .सौ.मंजुषा काळे यांनी केले .प्रसंगी बोलताना
विधार्थ्यानी झाडे लावा झाडे जगवा ,पर्यावरण संरक्षण ,सर्वधर्म
समभाव ,संस्कार ,सकारात्मक विचार करावा ,जसे आपण आपल्या हक्कासाठी लढतो तसे
आपण आपल्या सुखी जीवनासाठी कर्त्यव्य केले पाहिजे ,श्रम,चारित्र्य चांगले
ठेवा ,खूप वाचन करा थोरांचे विचार ऐका .वाचा मंजे वाचाल हुंडा घेणार नाही व
देणार नाही अश्या अनेक गोष्टी हसत खेळत सांगितल्या .तर युवकांनी सकारात्मक
भूमिका ठेऊन कार्य केल्यास खर्या अर्थानी देशाची प्रगती होईल राष्ट्राला
आर्थिक प्रगतीबरोबर सुसंस्कारित मानव संपत्तीची गरज आहे.व ते मानव
तुमच्यातून निर्माण व्हावेत असेही ते म्हणाले सूत्र संचालन किरण भागवत
यांनी तर आभार सौ मीरा नरसाळे यांनी मानले DSCN3228.jpg 242K View Share Download |
No comments:
Post a Comment