Wednesday, February 20, 2013

राजूर (शांताराम काळे)आदिवासी भागात काळी साळ (काळ भात)हि दुर्मिळ तांदळाची जात असून खायला रुचकर व स्वाधीष्ट असलेली साळ आता फारशी दिसत नसली तरी लोक्प्चाय्त हि संस्था तिचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करीत असून शेतकर्यांना बी देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेंत .या तांदळाची गोडी मुबई,पुणे,नाशिक,नगर या शहरी ग्राहकांना लागली आहे.हि काळी साळ इतरत्र मिळत नसल्याने शहरातील ग्राहक खेड्या पाड्यात हिंडताना दिसतात .अकोले तालुक्यातील गुहिरे ,रतनवाडी ,शिगन वाडी ,कुमशेत ,शिरपुंजे ,शेणीत ,केली-कोतूळ ,केळी ओतूर ,अम्बेवांगण ,चिंचोडी या भागात काळ भाताचे उत्पादन घेतले जाते .मात्र या तांदळाची उत्पादकता कमी असल्यानी आदिवाशी शेतकरी या तांदळाचे पिक मोठ्या प्रमाणात घेत नाही त्या एऐवजी सोनम ,इंद्र्यानी ,२४८,गरे,दप्तरी ,या जातीचे लागवड करतात .काळ्या साळीचे उत्पादन दिवसेन दिवस कमी होत आहे .मात्र काही शेतकरी आपल्या पुढील पिढीला या तांदळाच्या जातीचे सवर्धन करण्याचे धडे देत अहेअत तर लोक पंचायत हि संस्था शेतकरी व त्यंच्या हिताच्या अनेक योजना व उपक्रम राबवीत आहे.त्यातून आपल्या संस्कृतीची विविधता टिकावी यासाठी तसेच काळ भात नाम शेष होऊ नये यासाठी आदिवासी भागात प्र्भोधन शिबिरे घेतली जात आहे.मात्र कृषी खाते व आदिवाशी विकास हि शासनाची खाती याबाबीकडे डोळे झाक करीत आहे ,नुकतेच राजूरचे प्रदर्शन संपन्न झाले यावेळी शेती मालाचेही प्रदर्शन भरविण्यात आले मात्र भाताच्या कुठल्याही जाती दिसल्या नाही .याबाबत कृषी खाते अनभिद्न्य का ?असा सवाल हि निर्माण झाला आहे. काळ भाताचे उत्पादन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बांगर यांनी गेली ३ वर्षपासून हे पिक घेऊन आदिवासी शेतकर्यांना मार्गदर्शन केले आहे. हा काळ भात चुलीवर ठेवला तर साधरण परिसरात त्याचा सुगंध दरवळतो तर गाईच्या दुधाबरोबर तो खाल्ला तर मन तृप्त होते असे अदिवशी सांगतात त्यामुळे या भाताला मोठी मागणी आहे.५० रुपये किलो असा भाव या तांदूळ मिळतो .आदिवासी भागात या भाताला काळी साळ म्हणतात मात्र शेतकरी हा तांदूळ करण्यास उदासीन अहेअत .तरी काही शेतकरी उदा.चंद्रकांत बांगर आज हि २२० पोती तांदूळ उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण करतात .पुणे येथे शेती प्रदर्शनात त्यांनी काळ भाताचे वान नेउन आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व केले हे विशेष ....... शांताराम काळे

No comments:

Post a Comment