राजूर
(वार्ताहर )प्रत्येकावर निरोप देण्याघेण्याचा प्रसंग येतो. या निरोपाचं
प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. प्रत्येक दिवसाला उगवताना रात्रीला
निरोप द्यावा लागतो व प्रत्येक रात्रीला येताना प्रत्येक दिवसाच्या
सूर्याला टाटा करावा लागतो. निसर्गातील ही प्रक्रिया निरोप देण्याघेण्याचीच
असते, नाही का? निरोप दिल्यावर भेटण्याचं जे सुख असतं ते अवर्णनीय!
म्हणूनच भेटण्याची गोडी वाढवायची असेल तर थोडं दूर जावं. विधार्थी जीवनातही
हि प्रक्रिया असतेच असे प्रतिपादन वीज कंपनीचे सहायक का.अभियंता सचिन पवार
यांनी केले श्रीसमर्थ कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयात १२वीच्या
मुलांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी
स.पो.नि.कासार एम.एम.,आदिवासिसेवक काशिनाथ साबळे ,सचिव शांताराम काळे,कवी
सुभाष सोनवणे उपस्थित होते .प्रास्तविक प्राचार्या सौ.मंजुषा काळे यांनी
केले यावेळी त्या म्हणाल्या विधार्थ्याना
त्याच्या आजपर्यंतच्या अमोल
सहकार्याबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करतो हे खरं म्हणजे, आपल्या संस्कृतीला
जपणारे, उजाळा देणारे कार्य आहे. शिक्षणाचं शेवटचं वर्ष संपलेल्या
विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळा, शाळेच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर
निरोपाचे सोहळे घडवून आणीत असतात. यात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक
प्रवासासाठी शुभेच्छा देण्याचा भाग मुख्य असतो''आता यानंतर तुम्ही आपापल्या
आवडत्या विषयात कामात रममाण व्हाल, आपल्या आकांक्षेचा वेध घ्याल. त्यासाठी
माझ्या सर्व शुभेच्छा आहेत. पण तुमच्या थोर परंपरा असलेल्या कॉलेजला विसरू
नका. त्याला कमीपणा येईल असं काही करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कधी काळी
मी कुठे दिसले तर माझ्या पुढ्यात उडी मारून 'म्याडम , मला ओळखलंत का?' असा
विचारू नका. प्रथम म्हणा, 'म्याडम मी तुमची मुलगी ,तुमचा मुलगा हे नाते
जपून ठेवा व कॉलेज बरोबर आपल्या आई वडलांचे ,कुटुंबाचे नाव मोठे करा
स.पो.नि कासार यांनी अभ्यासाबरोबर सामाजिक जाणीव ठेऊन कार्य करा तर
आदिवासिसेवक काशिनाथ साबळे यांनी परीक्षेला सामोरे जाताना आपण ग्रामीण व
आदिवासी भागातून आलो हा नुयन गंड बाजूला सारा प्रसंगी बोलताना श्री.पवार
म्हणाले
निरोप देण्याचा कार्यक्रम आपण आपल्या परीने भावपूर्ण करतोच,
पण त्याचाच भव्य, दिव्य माहोल कसा असतो हे बघायचं असेल, तर नामदेवांनी
ज्ञानेश्वरांच्या समाधी प्रसंगावर लिहिलेले अभंग वाचावेत. निवृत्तीनाथांनी
ज्ञानेश्वरांना हात धरून समाधीस्थळापर्यंत नेताना या दोन बंधूंनी
एकमेकांबद्दल जी स्वगीर्य कृतज्ञता व्यक्त केली आहे तिला तोड नाही.
आईवडिलांच्या मागे मोठा भाऊ या नात्याने निवृत्तीनाथांनी 'पाळिले, पोसिले,
चालविला लळा' याबद्दल आणि गुरू म्हणून 'स्वामींचिया योगे झालो स्वरूपाकार'
याबद्दल ज्ञानेश्वर कृतज्ञतेने ओथंबून बोलतात, तर निवृत्तीनाथ 'अमर्यादा
कधी केली नाही येणे। शिष्य गुरूपणे' असे उच्चतम प्रमाणपत्र ज्ञानेश्वरांना
देतात.तर कवी सोनवणे यांनी कुसुमाग्रजांची 'कणा 'कविता सादर केली ओळखलत का
सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा! सूत्र संचालन ११विचा विधार्थी विशाल
भूताम्बरे आभार रोहिदास परते यांनी मानले ११वीच्या विध्य्र्थ्यनि १२वीला
नास्था दिला
No comments:
Post a Comment