राजूर
(वार्ताहर )१४ फेबुर्वारी हा दिवस वेलेन टाइन डे म्हणून साजरा केला जातो
परंतु राजूर येथील विधार्थ्यानी हा दिवस 'मातृ-पितृ पूजन दिवस 'म्हणून
साजरा केला .यावेळी मोठ्या संख्येनी विधार्थी शिक्षक ,पालक ,ग्रामस्थ व
मान्यवर उपस्थित होते .आसाराम बापूचे शिष्य संजय अवसरकर ,श्रीराम पन्हाळे
,उपस्थित होते .यावेळी मातृ-पितृ सेवा कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन
करण्यात आले .अनादिकालापासून महापुरुष्यानी आपल्या जीवनात आई,वडील व
सदगुरुंचा आदर सन्मान केला आहे आपणही आपल्या आई वडलांचा आदर सन्मान करावा
अशी भावना श्रीराम पन्हाळे यांनी व्यक्त केली .यावेळी पुस्तकांचे हि वाटप
करण्यात आले श्रीसमर्थ इंग्लिश मेडियम मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला
.महिलांना सन्मान देण्यासाठी विविध उपक्रम विध्य्लाय राबवत असून वेलेन टिन
दे हि आगळा वेगळा राबवण्यात आला ......सूत्र संचालन संजय वाघ तर आभार
शिवाजी फाफले यांनी मानले
No comments:
Post a Comment