युवकांमधील
जागृती हाच ग्रामीण विकासाचा आधार -प्रा.डॉ .बी .वाय .देशमुख
राजूर (वार्ताहर )ग्रामीण युवकांमध्ये जागृती झाली तरच राष्ट्र उभारणीची
मोठी चळवळ उभी राहील व हि जागृती हाच विकासाचाच खरा पाया असल्याचे
प्रतिपादन प्रा.डॉ .बी.वाय .देशमुख यांनी मवेशी तालुका अकोले येथे बोलताना
केले. श्री समर्थ कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर यांच्या
वतीने बाही;शाल व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफताना श्री.देशमुख बोलत
होते .अध्यक्ष स्थानी बाबळे साहेब होते.प्रास्तविक प्रा.संतोष भालेराव
यांनी केले .'ग्रामीण विकासातील युवकांची भूमिका "या विषयावर बोलताना ते
म्हणाले ,युवकांनी आपल्या गावाच्या विकासामध्ये सर्वोतोपरी सहकार्य केले
पाहिजे .वृक्षारोपण,व्यसनमुक्ती ,ग्रामस्वछ्त्या ,जल संवर्धन ,अपारंपारिक
उर्जानिर्मितीद्वारा युवक आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतात .अनेक
छोट्या छोट्या गोष्टीतून ते गावाला प्रगती पथावर नेऊ शकतात .जलसंधारणातून
पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम युवकांनी राबवावा मात्र या कामासाठी
युवकांचे संघटन आवश्यक आहे .त्यांनी ग्रामविकासाच्या ओव्यानद्वारे
विध्र्थ्याना व ग्रामस्थांना मंत्र्मुग्ध्य केले तर लोकशाहीर "वामनदादा
कर्डक "यांच्या सांगा आम्हाला टाटा बिर्ला कुठे हाय हो ..."या गीताने
सर्वांनाच अंतर्मुख केले या वेळी श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे सचिव
शांताराम काळे मुख्यध्यापक विलास महाले ,देविदास शेलार बाही:शाल चे केंद्र
समन्वयक प्रा.संतोष भालेराव समर्थ माध्यमिक विध्याल्याचे सिक्षक्व
कर्मचारी उपस्थित होते .सूत्र संचालन सतीश काळे यांनी तर आभार टाकले सर
यांनी ....मानले
| DSCN3202.jpg |
No comments:
Post a Comment