Sunday, December 14, 2025

१०८ चित्रपटाच्या शूटिंग भंडारदरा परिसरात

अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात“सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहेसबस्क्राईब करा Sign In Marathi News maharashtra bhandardara dam beauty attracts filmmakers for over 108 shoots akole news amy ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. Written by लोकसत्ता टीम December 13, 2025 18:38 IST  Follow Us ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ ( प्रातिनिधिक छायाचित्र ) अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात. “सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. हेही वाचा Mumbai-Goa Highway Accident: मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; कोलाडजवळ बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. भंडारदरा परिसरातील निसर्ग अतिशय सुंदर आहे. राज्यातील धबधबे फक्त पावसाळ्यात कोसळत असतात. मात्र भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडतात, तेव्हा आंब्रेला फॉल वाहू लागतो. त्यामुळे वर्षभर अगदी उन्हाळ्यातही आवर्तन काळात आंब्रेला फॉल, रंधा फॉल कोसळत असतात. यामुळे तसेच मुंबईहून भंडारदराचे अंतर २०० किमी पेक्षाही कमी असल्यामुळे चित्रीकरणासाठी भंडारदरा परिसराला प्राधान्य मिळत गेले.  होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहे. दुर्गा खोटे शाहू मोडक यांचा भरत मिलाप (१९४२) दिलीपकुमार कामिनी कौशल यांची भूमिका असणारा आरजु (१९५०) राजकपूर नर्गिस यांचा आशियाना (१९५२) दिलीपकुमार नर्गिस यांचा आन (१९५२) औरत (१९५३) प्रेमनाथ बिना रॉय, नागिन (१९५४) प्रदीपकुमार वैजयंतीमाला, नाता (१९५५) मधुबाला अभि भट्टाचार्या, एकसाल (१९५७) अशोककुमार मधुबाला, परवरीष (१९५८) राजकपूर मालासिन्हा, कोहिनुर (१९६०) दिलीपकुमार मीनाकुमारी हे सुरवातीच्या वर्षांमध्ये येथे चित्रीकरण झालेले काही चित्रपट.  काही चित्रपटांच्या दृश्यांसाठी प्रसंगी सेट उभा करीत. महिपाल व श्यामा यांच्या जबक मधील “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर हमे याद राखना” या गाण्यासाठी भंडारदरा धरण पायथ्याशी असणाऱ्या बागेत भव्य सेट उभारण्यात आला होता. तर परिसरातील भाषेत, नदीत, सपाट मैदानातही काही दृश्यांचे गाण्याचे चित्रीकरण करण्यात येत असे. गंगा जमुनामधील वैजयंतीमाला वर चित्रित “होरे होरे जनन घुंगरू बाजे” हे समूह नृत्य असेच शेतातील मैदानात चित्रित झालेले आहे. हिंदीच्या तुलनेत येथे चित्रीकरण झालेले मराठी चित्रपट फारच थोडे असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

पोलीस वसाहत दुर्लक्षित

अकोले,ता.९: अकोले शहर पोलिसांची वसाहत मधील सर्व सदनिका मोडकळीस आल्या असून पोलीस कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून या वसाहतीतील सदनिकाचा ताबा मात्र घुशी,उंदीर, सरपटणारे प्राणी यांनी घेतला आहे .शहराच्या मध्यवस्तीत असणारे पोलीस स्टेशन व स्टेशन शेजारी असणारी व कोल्हार घोटी रस्त्यालगत असणारी पोलीस वसाहत दुर्लक्षित होत असून स्थानिक पोलीस अधिकारी याबाबत उदासीन आहेत . सुमारे सत्तर गावांचे नियोजन करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनची स्थापना झाली असून चाळीस पोलीस कर्मचारी येथे काम करतात त्यांच्या निवासाची सोय होणे आवश्यक असून याबाबीकडे पोलीस खाते लक्ष्य देताना दिसत नाही .शहराच्या रोड लगत असणाऱ्या पोलीस वसाहतीची मोठी पडझड झाली असून स्वच्छताग्रह बंद पडले आहे .एक दोन पोलीस कर्मचारी वगळता उर्वरित कर्मचारी मात्र भाड्याच्या सदनिका घेऊन राहतात पोलीस स्टेशन जवळ असणाऱ्या सदनिका सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केल्या तर या सदनिका चनगल्या स्थितीत येऊन कर्मचारी त्याचा वापर करू शकतात मात्र तसे पाऊल उचलताना कुणीही दिसत नाही . जिल्हा पोलिस अधीक्षक,अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांनी याबाबत लक्ष्य घालणे आवश्यक असून अकोले पोलीस वसाहत ही अहिल्यानागर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने आहेत, जिथे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात; पोलीस सदनिकांच्या अडचणींमध्ये जुन्या आणि दयनीय इमारती, अपुऱ्या सोयीसुविधा, अपुऱ्या जागा, आणि कर्मचाऱ्यांच्या राहणीमानातील समस्यांचा समावेश होतो, ज्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो; परंतु आता अनेक शहरांमध्ये नवीन आणि सुसज्ज इमारती बांधल्या जात आहेत, आणि सरकार या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ज्यात नवीन बांधकाम आणि भाडेतत्त्वावर सदनिका देणे यांचा समावेश आहे.  मुख्य अडचणी: जुने आणि जीर्ण इमारती: अनेक ठिकाणी पोलीस वसाहती खूप जुन्या झाल्या आहेत आणि त्यांची अवस्था खराब आहे, ज्यामुळे राहणे कठीण होते. अपुरे निवासस्थान: पोलिसांना त्यांच्या कुटुंबासाठी पुरेशा मोठ्या आणि चांगल्या सदनिका मिळत नाहीत, विशेषतः ग्रामीण भागात. सोयीसुविधांचा अभाव: आधुनिक सुविधांची कमतरता आणि अपुऱ्या जागेमुळे पोलिसांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कामाचा ताण आणि राहणीमान: कामाचे जास्त तास आणि अनियमित शिफ्टमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो, ज्यामुळे सदनिकांची समस्या आणखी गंभीर वाटते.  कोट - सरकारचे आणि पोलिसांचे प्रयत्न: अकोले शहरात सदनिका खराब झाल्या असून नवीन सदनिकाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठविण्यात आला आहे . नवीन बांधकाम: राज्य सरकार जुन्या वसाहतींच्या जागी नवीन, बहुमजली आणि सुसज्ज इमारती बांधत आहे, सुसज्ज सदनिका: पहिल्यांदाच सुसज्ज सदनिका पुरविल्या जात आहेत, ज्यामुळे पोलिसांचे राहणीमान सुधारत आहे. भाडेतत्त्वावरील पर्याय: काही ठिकाणी पोलीस कर्मचारी भाड्याच्या सदनिकांमध्ये राहू शकतात, ज्यांची पडताळणी पोलीस खात्यामार्फत होते. ऑनलाइन सेवा: भाडेकरूंची माहिती घेण्यासाठी आणि सदनिका देण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत.  थोडक्यात, पोलिसांच्या सदनिकांची समस्या गंभीर असली तरी, सरकार आणि पोलीस विभाग मिळून यावर उपाययोजना करत आहेत. गणेश बोरसे पी आय अकोले पोलीस स्टेशन
दर महिन्याला होणाऱ्या गरोदर , स्तनदा माता यांच्या सर्वे मध्ये अकोले तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि १ अविवाहित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती

Wednesday, December 10, 2025

कहाणी भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!

उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या आयुष्यात हिरवाई, चैतन्य आणि समृद्धीचे रंग भरणारे प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण उद्या शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. या धरणाच्या पाण्याने जिरायत शेती बागायती झाली. सहकारी साखर कारखानदारीला चालना दिली... उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. या धरणाच्या निर्मितीची रोचक कहाणी. ________________________ कहाणी भंडारदरा धरणाच्या निर्मितीची! -भाऊसाहेब चासकर. शेंडी(भंडारदरा) गावाच्या बाजूला असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीने जोडल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यगिरीच्या कुशीत विसावला आणि भंडारदरा धरणाचा जन्म झाला! तेव्हापासून म्हणजे 10 डिसेंबर 1926पासून आजपर्यंत सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात साठवत आहे. निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारदऱ्याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले.... रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत अमृतवाहिनी हे सार्थ विशेषण लाभलेली प्रवरामाई उगम पावते. शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारदऱ्याचा 11 टीएमसीचा भलामोठा जलाशय निर्माण झाला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. धरणाच्या निर्मितीपासून आजवरची कहाणी अत्यंत रोचक आणि रंजक अशीच आहे. दुष्काळी भागास पाणी देण्याच्या हेतूने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२च्या सिंचन आयोगाने प्रवरा खोऱ्यात धरण बांधण्याच्या गरजेवर विशेष भर दिला होता, हे उपलब्ध कागदपत्रं चाळली की आपल्या लक्षात येते. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधाऱ्यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी(ता. अकोले ) येथे मातीचे मोठे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. या धरणाला स्थानिकांचा विरोध होता. पुढे काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. डोंगरदऱ्यातली एकूण २२ हजार ९०० एकर जमीन पाण्याखाली बुडाली. जमिनीच्या संपादनासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने विशेष अधिकारी नेमला होता. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत-चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित केल्या होत्या. धरणाचे बांधकाम जसजसे आकार घेऊ लागले तसा भंडारदऱ्याचा नितांत सुंदर, रमणीय आणि शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, आणि मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत, भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा सोयीसुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे प्रचंड केवढे कुतूहल वाटत असे. भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात केले आहे. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा करून तो वाळू म्हणून वापरला आहे. थोडेथिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करायचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२०मध्ये धरणात २०० फूट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. धरणाच्या भिंतीत एकूण चार मोऱ्या असून, त्या अनुक्रमे ७० फूट, १२० फूट, १७० फूट व २२० फूट अशा अंतरावर आहे. या मोऱ्यांचे पाइप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. भिंतीच्या तळाची रुंदी ७१.२८ मीटर असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे. बांधकाम सुरू असतानाच 1916 मध्ये प्लेगची साथ आली. काळजीचे ढग गोळा झाले. तत्कालीन सरकारने उंदीर मारण्यासाठी खास पथक नेमले होते. जून १९२६मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये खर्च झाला होता. भिंतीच्या दक्षिण बाजूला ६५० फूट रुंदीचा सांडवा ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरू झाला. घाटघर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शिखरस्वामिनी कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, पाबर आणि रतन या गडांच्या माथ्यावर कोसळणाऱ्या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे-नाले कवेत घेऊन धरणाचे पोट हळूहळू भरू लागले. काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे प्रवरामाई पहिल्यांदाच सह्यागिरीच्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावली. १० डिसेंबर १९२६ रोजी मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक लोकार्पण झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले तेव्हाचे कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल यांचे नाव धरणाच्या जलाशयाला दिले. जवळच वसलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. रूढही झाले. कागदोपत्री हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. दुर्गम भागात राहून देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या आर्थर हिलसारख्या अभियंत्याच्या कामाची नोंद घेत त्याचे नाव जलाशयाला देणे ही बाब ब्रिटिश शासकांच्या संवेदनशील कार्यपद्धतीची एका अर्थाने साक्ष देते. अलीकडेच या परिसरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव जलाशयाला देण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी राज्य सरकारकडे ताकदीने पाठपुरावा करायला लागेल. साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. धरणाच्या खाली वाहती प्रवरा नदी म्हणजे कालवाच आहे. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे संपूर्ण चित्रचरित्रच पालटवले. दुष्काळाने गांजलेल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड-उजाड जागेवर, बरड माळरानांवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. कृषी औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. सहकारी साखर कारखाने उभे राहिले. आणखी काही पूरक उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९च्या सप्टेंबर महिन्यात जलाशय काठोकाठ भरलेला असताना धरणाच्या भिंतीला तडे गेले. त्यातून पाणी बाहेर पडू लागले. लाभक्षेत्रात सगळीकडे काळजीचे वातावरण पसरले. अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून, अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले. लोखंडी सळ्या टाकल्या, मुख्य भिंतीला आधारभिंती बांधल्या. आणखी जे जे शक्य होते ते करून मजबुतीकरण केले. भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट. नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने(मेरी) उपहारग्रहाद्वारे साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. या अभ्यासात धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले. धरणात गाळ साचलेला नसल्याने साठवण क्षमता आहे तेवढीच आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा! पूर्वेकडील श्रीरामपूर, लोणी भागात ऊसासारखी बारमाही पिके फुलवणारे प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर-अकोलेकरांच्या नजरांना खुणावू लागले. यातूनच ऐंशीच्या दशकात 'कमिटेड वॉटर' विरुद्धचा लढा संगमनेर-अकोलेकरांनी खांद्याला खांदा लावून लढविला. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. १९८४मध्ये भंडारदऱ्याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर- अकोल्याला धरणातून हक्काचे पाणी मिळाले. त्याआधी प्रवरा कालवा आहे त्यावर पंप बसवता येणार नाहीत असे सांगण्यात येत असे. पाण्याचे फेरवाटप झाल्यानंतर नदीवर पंप बसवून काही किलोमीटर अंतर पाइपलाइन करून शेतकऱ्यांनी शेतात पाणी आणले. प्रवरा परिसर सुजलाम सुफलाम झाला. मात्र १९९०नंतर भंडारदऱ्याचे पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची होणारी उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे, आंदोलने, घेराव यातून काहीजणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात केली. पाटपाणी हाच उत्तर नगर जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. अनेक नेते आणि कार्यकर्ते पाटपाण्याच्या आंदोलनातून पुढे आले आहेत. मराठवाडा भागातील लोकप्रतिनिधी आणि पाटपाण्याच्या क्षेत्रातील अभ्यासकांचे आग्रह यातून वीस वर्षांपूर्वी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण ठरवले गेले. पाऊस कमी पडला की भंडारदरा आणि निळवंडे यांसह नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडणे भाग असते. त्याबद्दल लाभक्षेत्रात नाराजीचा सूर आहे. मात्र त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण बदलण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. दरम्यानच्या काळात भंडारदरा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता जलविद्युत निर्मितीसाठीही होऊ लागला. भंडारदरा आणि कोदणी येथील दोन्ही जलविद्युत प्रकल्पातून ४४ मेगावॉट वीज निर्माण केली जाते. भंडारदऱ्याचा निळाशार, अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी धरणात बुडीत बंधारे बांधण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरण परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने एक आराखडा तयार केला होता. हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मध्यंतरी जलसंपदा विभागाने तयार केला होता. पाणलोट क्षेत्रातील आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजकीय वजन पणाला लावले. प्रस्ताव बारगळला. पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला पूर्णविराम मिळाला. ते बाकी काहीही असो. बारा महिन्यांतील कोणत्याही दिवशी पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी उसळते. येथील भेट आनंद देते, चित्तवृत्ती प्रसन्न करते. भाऊसाहेब चासकर 9422855151 (लेखक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.) #भंडारदरा #धरण #अकोले #इतिहास #शताब्दी

Tuesday, December 9, 2025

अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात

अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे. संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. -------- कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी. - हेरंब कुलकर्णी

अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’

[ अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’ अकोले, ता. ९ : एकेकाळी तोट्याच्या कचाट्यात असलेले अकोले एसटी आगार आज नफ्यात झेपावत आहे. आगारातील कर्मचारीवर्गाची आगाराबद्दलची प्रचंड आत्मीयता, स्वच्छतेवरचा भर आणि पारदर्शक कामकाजामुळे बसस्थानकाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्यामुळे अकोले आगार राज्यातील आदर्श आगार म्हणून पुढे येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. डिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे. एकूण २५२ कर्मचारी कार्यरत असून १५ चालकांची कमतरता रोज भासते. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोलेला किमान ७० बसेसची आवश्यकता आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागात जाणाऱ्या बसेस वारंवार बिघडतात. बलठण गावात तर बस स्मशानभूमीपर्यंतच थांबते, अशी परिस्थिती अजूनही बदलायची आहे. महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली; मात्र उत्पन्न तेवढे वाढत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. अकोले एसटी आगार ऊर्जिता अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता, रंगरंगोटी स्वतःच्या उत्पन्नातून करत आहोत. माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात. प्रवासाची कोणतीही तक्रार नाही. अकोले बसस्थानकाप्रमाणे राजूर बसस्थानक चकाचक होणार आहे. त्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. बसस्थानकाच्या बाहेर खासगी जीप असतात. दुचाकी देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत. नोव्हेंबर अखेर ५९४३ महिला प्रवासीडिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे. अकोले येथे १० मिनीबस येणार आहे. आदिवासी भागासाठी राजूर येथे पाच मिनीबस देणार आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही, अशी माहिती आगारप्रमुख एस. के. दराडे यांनी दिली. चौकट बसेसची टंचाई कायम आगारात सध्या ५१ बसेस • १० नवीन तर • १३ बस स्क्रॅपमध्ये चौकट विद्यार्थी, महिला प्रवाशांमुळे गर्दी ४५०० विद्यार्थी मोफत प्रवास ३२०० अमृत वयोगटातील नागरिक लाभात • ६१८ ज्येष्ठ नागरिक दररोज प्रवास --------- जाचक जीआर रद्द करा शैक्षणिक सहलींसाठी दिलेल्या बसेस उशीर झाल्यास १०० किमीचे अतिरिक्त भाडे आकारले जाते. हे शाळांना व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने हा जाचक जीआर रद्द करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.आदिवासी भागात बसेस नेहमी बंद पडतात, त्याचा फटका विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतो. त्यामुळे या मार्गांवरील बसेस दुरुस्ती व नियमित वाहतूक करण्याची मागणीही जोर धरत आहे. ---- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत आगाराचे आतापर्यंत तीन फेऱ्यांत परीक्षण झाले. पहिल्या फेरीत १०० पैकी ९४. दुसऱ्या फेरीत तब्बल ९८ गुण मिळवत आगाराने राज्याचे लक्ष वेधले आहे. तिसऱ्या फेरीचे गुण येणे बाकी असून, चौथ्या फेरीत ९९ गुण मिळवण्याचे लक्ष आहे. - एस. के. दराडे, आगारप्रमुख, अकोले ----- [09/12, 5:31 pm] Daultrao Zaware Patil: अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे. संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. -------- कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी. - हेरंब कुलकर्णी

Monday, December 8, 2025

अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत

अकोले,ता.९: अकोले एस .टि.आगार आता तोट्याला झुगारत ऊर्जा घेऊन नफ्यात अवतरले असून स्वच्छता ,पारदर्शक कारभार,वृक्ष लागवड करत आगारप्रमुख कर्मचारी वर्ग याची एकी आगाराबद्दल आत्मीयता ,तळमळ यातूनच बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे . हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत अकोले बस स्थानकाचे आत्तापर्यंत तीन वेळा परीक्षण करण्यात आले आहे. पहिल्या परीक्षेमध्ये अकोले आगारास शंभर पैकी ९४ मिळाले तर दुसऱ्या परीक्षेमध्ये शंभर पैकी ९८ गुण मिळाले तिसऱ्या परीक्षणाचे अजून पर्यंत गुण येणे बाकी आहे. परंतु चौथ्या परीक्षांमध्ये अकोले आग्रास शंभर पैकी ९९ गुण मिळतील अशी आशा आगार प्रमुख यांनी एस .के .दराडे यांनी दिली. सध्या अकोली बस स्थानकात ५१ बसेस असून त्यापैकी १०नवीन तर १३ बस स्क्रॅप मध्ये जाणार आहेत. अकोले आगार एकूण कर्मचारी संख्या २५२ असून प्रतिदिन १५ चालकांची कमतरता भासते. अकोले बाजारात नवीन दहा बसेस आलेल्या असून अजूनही नवीन दहा बसेस येणार आहे. ४५०० विद्यार्थी मोफत पास घेऊन प्रवास करत असतात. ६५ वयोगटातील ६१८ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात. ३२०० अमृत वयोगटात मोफत प्रवास करतात.नोव्हेंबर अखेर ५९४३ महिलांनी प्रवास केला आहे . डिसेंबर २०२४ नंतर २७ लाख ७००० इतका नफा झाला आहे. आगार परिसरात नियमितपणे स्वच्छता राबवण्यात येते. रोजंदारीचे कामगार घेऊन स्वच्छता राबवण्यात येते. परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही घेण्यात येतो. अकोले तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १३ बसेस मुक्कामी असतात. परंतु बलठण या गावी गावात जाण्याच्या अडचण असते. त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्येच गाडी लावावी लागते. अकोले आगारात १४ महिला कर्मचारी असून पैकी एक चालक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोले आगारास अजून सत्तर गाडी असणे अपेक्षित आहे. सध्या शाळांच्या वेळा बदलल्या असल्याकारणाने सर्वांना चार वाजता बस देण्यात अडथळे निर्माण होत आहे. या काही दिवसात अकोले बस स्थानकात डिझेल अभावी कोणतीही वाहन उभे राहिलेले नाही. राजूर येथे नवीन बस स्थानक नियोजित आहे. अकोला येथून रोज १३ गाड्या कासार येथे जातात . तर १३बस पुणे येथे सोडण्यात येतात. संभाजीनगर व नाशिक दोन बसेस सोडण्यात येतात. सध्या शैक्षणिक सहलींचे माध्यमातून ३५ लाख रुपये उत्पन्न अकोले एस टी डेपोस मिळाले आहे. चौकट - अकोले ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस कायम बंद पडतात त्यामुळे आदिवासी भागात प्रवास करणाऱ्या आदिवासी ग्रामस्थ ,विध्यार्थी ,रुग्ण,महिला,जेष्ट नागरिक यांचे मात्र हाल होतात तर शाळांना सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसेस उशीर झाल्यास १००किलोमीटर चे भाडे आकारले जाते ते शाळांना व विधार्थयाना न परवडणारे असल्याने या जाचक अटी व जीआर रद्द करावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे .तर महिलांना अर्धे तिकीट असल्याने उत्पन्न तेच मात्र प्रवासी यांची संख्या अधिक झाली आहे . कोट - अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता ,रंगरंगोटी स्वतःच्या उत्पपन्नातून करत आहोत .माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात तर प्रवासाची कोणतीही तक्रार नाही अकोले बसस्थनकाप्रमाणे राजूर बसस्थानक भव्य व चकाचक होणार असून त्यासाठी १८कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे . बस्स्थसनकाच्या बाहेर खाजगी जीप असतात व मोटारसायकली देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत अकोले येथे १०मिनीबस येणार असून आदिवासी भागासाठी राजूर येथे ५मिनीबस देणार आहोत तयामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विध्यार्थी जेष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही एस के दराडे (आगार व्यवस्थापक अकोले डेपो)

अकोले शहरात व तालुक्यात व्यसनांचा फास अडकतोय

अकोले,ता.९:(शांताराम काळे)निवडणुका, राजकारण या सगळ्या झटापटी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष दुर्लक्ष होते आहे. ते दुर्लक्ष आहे तरुणाईच्या भवितव्याबद्दल. तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा मुद्दा अगदी वेगळाच आहे पण तरुण हे तरुण म्हणून राहतील की नाही ? इतकी गंभीर परिस्थिती आज व्यसनांनी अकोले शहरात व तालुक्यात निर्माण केली आहे.... सर्व प्रकारांच्या व्यसनांचा फास अकोले शहर व तालुक्यातील तरुणाई भोवती आणि तालुक्याभोवती आवळला जातो आहे. पूर्वी व्यसन म्हणजे फक्त दारू होती पण आज ग्रामीण भागापर्यंत व्यसन म्हणजे दारू, गुटखा, गांजा आणि ड्रग सुद्धा आले आहेत. मध्यंतरी राजुर येथे ड्रग सापडले ही बातमी होती. अकोल्यातील नदीकाठी तर गांजा पिणारे तरुण नेहमीच बसलेले आढळतात..तितकेच काय कॉलेज परिसरात गांजाच्या पुढे सिगारेट विकल्या जातात.. संगमनेरून ठोक भावाने येतो..त्याचे दलाल निर्माण झाले आहेत..ते महाविद्यालयीन तरुणांभोवती फिरत असतात...तालुक्यात घडलेले काही खून हे व्यसनातून झालेले होते. त्यामुळे आव्हान फक्त दारूचे नाही तर आव्हान हे या सर्व प्रकारच्या प्रश्नांचे आहे.. गुटखाबंदी आहे हे सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही इतका गुटखा सर्रास सर्वत्र मिळतो किराणा दुकानात कोणतीही वस्तू सहजपणे मागितल्यावर मिळावी तसा गुटका आज मिळतो. बंदी असल्याचा फायदा फक्त पोलीस आणि अन्न आणि भेसळ अधिकाऱ्यांना झाला आहे. बाकी तरुणाईचे वाटोळे होत आहे.. दारूबद्दल तरी किमान थोडा फार राग त्या गावात दिसतो पण गुटका आपल्या गावात विकला जातो याबद्दल गावातील प्रमुख व्यक्तींनाही काही वाटत नाही. ते सर्वांनी स्वीकारले आहे अशीच स्थिती आहे पण आज तालुक्यात तोंडाच्या कॅन्सरने मरणाऱ्या तरुणांची संख्या खूप वाढते आहे..पण गुटख्याचे दुष्परिणाम माहीत असूनही कोणताच विरोध दिसत नाही..त्याचप्रमाणे गांजाने ही मरणारी संख्या वाढत असूनही पोलिसांनी गांजा पकडण्याच्या बातम्याही दिसत नाहीत... दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दारूबाबत तर इतक्या वेळा बोलून झाले की आता ते बोलण्याचाही कंटाळा आला आहे.. तालुक्यातल्या कोणत्या गावात कोण दारू विकतो ही माहिती अनेकदा पोलीस उत्पादन शुल्क यांच्या बैठकीमध्ये यादी करून दिली तरी काहीही फरक पडत नाही.. आंदोलनाची भाषा केल्यानंतर कारवाया होतात पण परत त्याच त्याच गावामध्ये तीच तीच माणसे दारू विकतात. पोलिसांनी उत्पादन शुल्क यांनी ठरवले तरी थांबवणे कठीण आहे का ..? संगमनेर, घारगाव, ठाणगाव आणि शेंडी या चार ठिकाणाहून तालुक्यात रोज रात्री दारूच्या गाड्या येतात. त्या गाड्या जरी पकडल्या तरीसुद्धा गावाकडची दारू थांबणे शक्य आहे त्या गाड्या कोणत्या दुकानातून येतात ? त्या गाडीचे नंबर सुद्धा दिले आहेत पण त्या गाड्या पकडण्याच्या बाबतीत काहीही करत नाही.. संगमनेर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. संगमनेर येथेच उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे पण महत्त्वाची कार्यालय तिथे असून सुद्धा, त्यांचा मोठा स्टाफ असून सुद्धा संगमनेर मधून रोज रात्री निघणारी दारू ते थांबवत नाहीत. यातच दोन्ही विभागांचे दारू विकणाऱ्यांची असलेले हितसंबंध लक्षात येतात. विभागीय पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे व उत्पादन शुल्क विभागाचे सहस्रबुद्धे यांना अनेकदा संगमनेर मधून येणारी दारू थांबवा हे सांगूनही काहीच फरक पडला नाही. गावोगावी सरपंच आणि पोलीस पाटील यांचीही उदासीनता दारू न थांबण्याला कारणीभूत आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. अण्णा हजारे यांनी ग्रामरक्षक दलाची कल्पना मांडली त्याप्रमाणे आपण तालुक्यातील ग्रामरक्षक रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना देऊन ते स्थापन करावे म्हणून खूप पाठपुरावा करावा लागला पण आज या गावाने ते स्थापन केले आहे ते गावकरी साधे ओळखपत्र न्यायलासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही.अनेकदा फोन करून झाले,ग्रामसेवक यांना सूचना देऊन झाले... जिथे ओळखपत्र नेण्यासाठी आग्रह करावा लागतो ते गावकरी काय दारू थांबवणार ? असा प्रश्न पडतो आणि जिथे गाव उदासीन होत जाते तिथे दारू कधीही थांबत नाही... दारू, गुटखा, गांजा या तीनही बाबतीत गावाने जर ठरवले त्या गावांमध्ये कधीही विक्री होऊ शकत नाही. पोलीस उत्पादन शुल्क हे दोषी आहेतच पण गावातील प्रमुख लोक आज वाईटपणा घ्यायला तयार नाहीत.. मीच का वाईटपणा घ्यायचा असे प्रश्न जेव्हा सरपंच आणि पोलीस पाटील विचारतात तेव्हा त्यांना वाईटपणा घ्यायचा नाही, त्यांनी सार्वजनिक पदावर बसू नये असेच त्यांना मला सांगावेसे वाटते. तेव्हा गावातील प्रमुख व्यक्तींनी वाईटपणा घेतला पाहिजे...ग्रामपंचायतने गावातील सर्व किराणा दुकाने व पान टपरी यांना नोटीस देऊन गुटखा विक्री केल्यास तुमचे दुकानाचे शॉप ॲक्ट रद्द केले जाईल असे स्पष्टपणे सांगितले पाहिजे व काही ठिकाणी कारवाई सुद्धा केली पाहिजे .दारू सातत्याने पकडून दिली पाहिजे व ज्या गावात दारू सापडेल तेथील बीट अंमलदार निलंबित करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे... ज्या बीट आम्हाला यांच्या विभागात दरू सापडेल त्यांच्यावर कारवाई करा अशी सतत मागणी करणे आज यावरील मार्ग आहे.. पोलीस पाटील या पदाला अकोले पोलिसांनी पत्र देऊन तुमच्या गावात सुरू असलेल्या दारूवर तुम्हाला का जबाबदार धरू नये ? अशी विचारणा केली आहे.. कारण पोलीस पाटील त्या गावातील कायद्याचे रक्षक असल्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे पण ते आक्रमक भूमिका घेत त्यामुळे गावातील दारूबाबत त्यांना जबाबदार करण्याची भूमिका अत्यंत योग्य आहे ... कोट - कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत .शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनांचा विषय काढायला हवा व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्पर्धेमध्ये दारू वाटणार नाही किंबहुना दारू वाटू देणार नाही दारू विकणाऱ्यांना तिकीट देणार नाही अशीच भूमिका घेण्याची गरज आहे दारूला कोणतेही परिस्थितीत प्रतिष्ठा मिळतात कामा नये... हेरंब कुलकर्णी

Saturday, December 6, 2025

नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद

नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद अकोले, संगमनेर, सिन्नर पुन्हा विकासाच्या कडेला? अकोले, ता. ७ : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्र, अकोले, संगमनेर, सिन्नर पट्टा व पुणे महानगराला जोडणारा महत्त्वाचा विकासमार्ग मानला जातो. गेल्या काही वर्षांत नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, पुणे हा सर्वेक्षण पूर्ण झालेला आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असलेला मार्ग निश्चित होता. त्यामुळे या पट्ट्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने झेपावण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र अलीकडेच संसदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, चाकण, पुणे असा पूर्णपणे वेगळा मार्ग ‘तांत्रिक कारणांमुळे’ जाहीर केल्याने नवीन वादळ उठले आहे. नारायणगाव येथील जीओमआरटी केंद्राची अडचण पुढे करून मार्गबदलाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी, हा निर्णय तांत्रिक की राजकीय? असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे. -------- मूळ मार्गच सर्वात उपयुक्त का? देशातील सर्वाधिक गर्दीचा संगमनेर, पुणे मार्ग, ५-७ तासांचा त्रासदायक प्रवास चाकण एमआयडीसीकडे जाणारी प्रचंड औद्योगिक वाहतूक; दररोजची वाहतूक कोंडी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र या दोन औद्योगिक पट्ट्यांना थेट जोडणारा दुवा डीपीआर तयार, सर्वेक्षण पूर्ण, जमीन अधिग्रहण सुरू सरकारी खर्च व श्रम वाया? ---------- विकासाचा प्रवाह मागे पडण्याचा धोक नव्या मार्गाने हा पट्टा पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागे पडण्याचा धोका आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांची आहे. त्यामुळे मार्ग बदल करू नये, अशी मागणी होत आहे. हा प्रश्न फक्त रेल्वेमार्गाचा नाही; येत्या ५० वर्षांच्या विकासदिशेचा आहे. --------- खासदार–आमदारांची ठाम भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्याजित तांबे यांनीदेखील अत्यंत आक्रमक आणि तर्कशुद्ध पद्धतीने भूमिका मांडत मार्गबदलाचा विरोध नोंदवला आहे. ------ जनआंदोलनाची हाक या भागातील नागरिकांना दररोजचा वाहतुकीचा त्रास असह्य झाला आहे. उद्योग, शेती, शिक्षण व आरोग्यसेवांसाठी हा रेल्वेमार्ग जीवनरेषा बनू शकतो. म्हणूनच या मागणीसाठी आता मोठ्या प्रमाणात, सुसंघटित जनआंदोलन अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. ----------- नाशिक-पुणे रेल्वे हा या भागाच्या भवितव्याचा महामार्ग आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग मूळ सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गेच हवा. जनतेचा निर्धार आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आल्यास निर्णय बदलू शकतो; मात्र मोठे, सातत्यपूर्ण जनआंदोलन उभे राहिलेच पाहिजे. - भाऊसाहेब चासकर, आम्ही अकोलेकर. कोट - पुणे नाशिक रेल्वे अकोले तालुक्यातून जाण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पक्ष भेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता असून तसे न घडल्यास हात हलवत बसावे लागेल रेल्वे मार्ग बदलून अकोले तालुक्याच्या विकासावर परिणाम होत असेल व यात राजकारण येत असेल तर भंडारदरा,निळवंडे, आढळा चे पाणी अडवून बंद करावे लागेल बाजीराव दराडे (ओबीसी नेते) कोट - अकोले तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत रेल्वे जर तालुक्यात आली तर तालुक्याचा पर्यटन विकास वेगात होईल येथील शेतकरी सकस अन्न धान्य पिकवतो त्याचा मालाला चांगले मार्केट मिळेल मात्र रेल्वे मार्ग बदलण्याचा घाट कुणी घालत असेल तर उच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवावा लागेल ऍड ,बाळासाहेब वैध (कायदे तज्ञ,अकोले )

निळवंडे वसाहत सुविधांचा अभाव

अकोले,ता.४: निळवंडे जलाशयाची निर्मिती करताना अगोदर पुनर्वसन मग धरण या संकल्पेतून निळवंडे पॅटर्न संपूर्ण राज्यात गाजला या कामी माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे योगदान फार महत्वाचे मात्र खनाला खन,फनाला फन या प्रमाणे निळवंडे धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यात आले ,ज्यांची घरे पाण्यात गेली त्यांना अकोले शहरात कृषी पणन विभागाची भूखंडावर प्रकल्प वसाहत स्थापन करून प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केले .मात्र सुविधांचा अभाव नगरपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे येथे साध्या नागरीसुविधा देखील मिळत नसल्याने स्थानिक रहिवासी यांनी खंत व्यक्त केली आहे ३५वर्षे होऊनही सोयी सुविधा नसल्याने घरपट्टी व पाणी पट्टी का भरावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हा वार्ड नंबर तीन असून निळवंडे प्रकल्प स्तरीय वसाहत असून या वसाहतीला कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्याचे स्थानिक रहिवाशी यांचे मत आहे .तर वसाहती शेजारी असणाऱ्या कॉलनीतील यापेक्षा वेगळी अवस्था नाही. आरोग्य,शिक्षण,नावखाली कर आकारला जातो मात्र हा कर जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे . वार्ड तीन मध्ये १६००लोक राहतात यापूर्वी स्थानिकांनी नगरपंचायत वर मोर्चा काढला होता मात्र नगरसेवक पतीने पावसाळ्यानंतर सर्व कामे होतील असे आश्वासन देऊनही दोन महिने उलटूनही कोणत्याही नगरसेवक अथवा अधिकारी पदाधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही .वसाहतीच्या रस्त्यावर तुंबलेल्या गटारीतील दुर्गंन्धयुक्त पाणी आल्याने त्यातून डास व सरपटणारे प्राणी बाहेर पडत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे .निळवंडे जलाशयात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना अकोले शहरात मोक्याच्या ठिकाणी भूखंड देऊन त्यांचे आदर्श पुनर्वसन करण्याचा शासनाचा बहुउद्देशीय प्रकल्प आज मात्र अडचणीत सापडला आहे .प्लॅन काढताना अंतर्गत रस्ते,गटारी,गार्डन यासाठी जागा सोडण्यात आली मात्र त्यावर कोणतीही सुविधा योग्य पद्धतीने दिली नसल्याने येथील रहिवासी यांची मोठी अडचण होत आहे .वसाहतीत बहू उद्देशीय हॉल देण्यात आला त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तत्कालीन आदिवासी विकास मंत्रीमधुकरराव पिचड यानी मोठा निधी दिला असून भव्य इमारत उभारण्यात आली मात्र आज ही इमारत झाडा झुडपात अडकली आहे .चारही बाजूने झाडे काँग्रेस गवत गटारीचे तुंबलेले पाणी त्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य असून या इमारतीत वारकरी संस्थेचे १३विध्यार्थी राहतात मात्र त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले .पावसाळ्यात पावसाचे मोठ्या प्रमाणात गाळ मिश्रीत पाणी रहिवासी यांच्या घरात घुसते तर कधी गुढगाभर पाण्यातून तर कधी जाणेच मुश्किल होत असल्याने रहिवासी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे स्थानिकांनी दैनिक सकाळ प्रतिनिधींशी बोलताना सांगितले अकोले शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून भूखंडचे भाव देखील गगनाला भिडले आहे ,तर काहींनी ९९वर्षाच्या करारावर जागा घेऊन भव्य इमारती बांधून आपले व्यवसाय सुरू केले आहेत ,। कोट - निळवंडे जलाशयात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना आदर्श पुनर्वसन नावाखाली अकोले कृषी पणन महामंडळाची जागा देऊन तिथे वसाहत स्थापन करण्यात आली मात्र या वसाहतीतील नागरिकांना नागरी सुविधा मिळत नसल्याने मोठे हाल होत आहे .आपण याबाबत नगरपंचायत ला वेळोवेळी कळवूनही ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहे ,त्यामुळे आपण लवकरच नगरपंचायत समोर उपोषण करणार असून त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल मोठा निधी येऊनही रस्ते गटारी,नाले करण्याची मानसिकता नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकांची दिसत नाही याबाबत लवकरच आपण आवाज उठविणार असून नगरविकास मंत्री यांना निवेदन पाठवले आहे . भाऊसाहेब आभाळे (धरणग्रस्त शेतकरी व नागरिक ) कोट - निळवंडे वसाहतीचा गटारीचा ले औट नसल्याने गटारीचे पाणी सोडायचे कुठे असा यक्ष प्रश्न असून मागील वर्षात गटारीसाठी आलेले एक कोटी रुपये परत गेले असून ले औट क्लेयर झाल्यास अंतर्गत गटारीचे कामे करता येईल तर गटारी मुले रस्ते करणेही अडचणीचे ठरत आहे .लवकरच याबाबत नगरपंचायत बैठकीत निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा लागेल बाळासाहेब वडजे (नगराध्यक्ष अकोले नगर पंचायत ) कोट - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत प्रकल्प वसाहतीतील सांस्कृतिक भवन दुरुस्ती व गटार पाईप लाईनसाठी १५लाख ७५हजाराचा निधी वर्ग केला आहे .त्यातून सांस्कृतिक भवनाचे पत्रे बदलणे व इतर कामे झाली आहेत ,नगरपंचायतीच्या माध्यमातून ही कामे होणे आवश्यक आहे . डॉ किरण लहामटे (विधानसभा सदस्य )

नागरी समस्या

अकोले शहरातील नागरी समस्या : अकोले,ता.६: वाढती आणि स्थिरावलेली बेसुमार अतिक्रमणे ही महत्त्वाची समस्या आहे . मुख्य बाजारपेठेसह जुन्या गल्ल्या तसेच रस्त्यांवरील नागरी आणि दुकानदारी स्वरुपातील अतिक्रमणांच्या विळख्यात अकोले गाव सापडले आहे . कोल्हार घोटी या प्रमुख वाहतूकीच्या रोडवरदेखील छोटेमोठे दुकानदार , फेरीवाले आणि हातगाडीवाले यांनी बिनदिक्कत अतिक्रमणे थाटली आहेत . दुचाकी, चारचाकी वाहनांना कोणतीही पार्किंगची शिस्त नाही. रस्त्याने पायी चालणे मुश्कील . तर स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणाऱ्या, जुलमी तहसीलदार यांना जाळणाऱ्या मुख्य आरोपी सेनानी गणेश जोशी यांचे समूर्ति स्मारक पडीक असून याकडे लक्ष देण्यास स्थानिक प्रशासनास वेळ नाही ,जुन्या आठवणींना उजाळा देणारी स्मारके धूळखात पडून आहेत . महात्मा फुले चौक ते अकोले अगस्ती महाविद्यालय या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरुन दुसऱ्या बाजूच्या पलीकडे रस्ता ओलांडून जाणे अक्षरशः जीवावर बेतण्यासारखी भीषण वास्तव आहे . त्यातच साखर कारखान्याकडे जाणाऱ्या बैलगाड्यांना नियंत्रण नसल्याने वेगात जाणाऱ्या या गाड्यांमुळे हमखास अपघाताची शक्यता आहे. पुरातन शनी हनुमान मंदिर परिसरातील पारंपरिक ओढ्यातील मोकळ्या जागेत प्रतिष्ठित म्हणून मिरवणाऱ्या खोट्या समाजसुधारकांच्या इमारतींनी सार्वजनिक जागा हडप केलेल्या आहेत ! पुरातन गढीवरील छोट्या अगस्ती पुलाकडे जाणाऱ्या जुन्या सरकारी दवाखान्याची पडकी जागा, आगर गल्ली कमान वेस परिसरातील जुनी मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पडकी जागा, जी स्वातंत्र्य संग्रामात तसेच जुना अत्याचारी मामलेदार जाळल्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले तत्कालीन सेनानी गणेश जगन्नाथ जोशी यांची स्मृती आहे ती मोडकळीस आलेली जागा मोठा यक्षप्रश्न आहे ! यासंदर्भात अधिक माहिती देताना साहित्यिक, संशोधक डॉ. सुनील शिंदे म्हणाले, " जुन्या मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेला सक्षम सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक संपन्न वारसा आहे, विख्यात प्रादेशिक कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर या परिसरात रहिवासले. स्वातंत्र्य सेनानी गणेश जगन्नाथ जोशी बाबा यांचे हे स्मृती स्थळ आता मोडकळीस आलेले अन् अक्षरशः झाडोरा उकीरडा बनला आहे , येथील जागेत नगरपंचायत प्रशासनाने गणेश जोशी तसेच गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे नावे वाचनालय स्मृती स्थळ म्हणून निर्माण करणे शहाणपणाचे ठरेल . मुळात जुनी ग्रामपंचायत आणि विद्यमान नगरपंचायतने पूर्वीचे ७०-८० वर्षांपूर्वी असलेले समृद्ध वाचनालयच बंद केले ही मोठी शोकांतिका आणि सांस्कृतिक अपमान आहे ! " नगरपंचायत परिसरातील गढी असलेल्या जागेतील जुन्या शासकीय भूखंडावरील जागेत अथवा सुस्थितीतल्या सार्वजनिक जागी वरिष्ठ नागरिकांसाठी तसेच लहान मुलांकरिता ' नानानानी पार्क ' च्या धर्तीवर बगिचा विश्रांती स्थान नगरपंचायत करु शकते ! सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत कडून प्राधान्याने अतिक्रमण असणाऱ्या जागा तसेच मुख्य कोल्हार घोटी राजमार्गावरील अतिक्रमित जागा, वाहनांची पार्किंग याबाबत कार्यवाही करणे आवश्यक . "कोट - गणेश जोशी यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करून त्या जागेवर सुसज्ज वाचनालय विध्यार्थी जेष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी अभ्यासिका मनशांती केंद्राची स्थापना करावी ही नगरपंचायत कडून माफक अपेक्षा प्रा .सुनील शिंदे जेष्ठ अभ्यासक

वाहतूक कोंडी

अकोले,ता.५:अकोले शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून जसा लोकसंख्येचा आलेख वाढतोय त्याच रेषेत वाहनांची संख्या वाढत आहे .कोल्हार घोटी रस्ता सकाळपासून वर्दळीचा ठरला असून सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे ,कॉलेज,विधालय सर्व शासकीय कार्यालय कोल्हार घोटी रस्त्याला असल्याने तसेच ऊस वाहतूक व मुंबई कडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते तर ट्राफिक पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होताना दिसत आहे . अकोले शहरातील वाहतूक समस्यांमध्ये आस्त व्यस्त पार्किंग , रस्त्यांवरती गाड्या उभा करणे, बेशिस्त वाहन चालन यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यावर प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वनवे एकेरी वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अकोले शहरातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नागरिकांना सातत्याने त्रास होताना दिसतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावरती उसाच्या बैलगाड्या चालत असतात. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने व्यवस्थित लावली नसल्याने सातत्याने अपघात होताना दिसतात. बाजारतळ ते महात्मा फुले चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने उसाच्या बैलगाड्यांना अडथळा निर्माण होतो , त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. महात्मा फुले चौक व बाजार तळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस ची संख्या वाढवणे गरजेचे आहे. चुकीच्या पार्किंगसाठी दंड वसूल होताना दिसत नसल्याने लोक कुठेही गाडी लावतात. पार्किंग साठी व्यवस्थित जागा निश्चित करणे गरजेचे आहे. शहरातील शनी मंदिर परिसरात ही बहुतेक वेळा वाहन कोंडी होताना दिसते. या प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे. वाहतूक शाखेने दंड आकारणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. आठवडे बाजार चे दिवशी बहुतेक दुकाने रस्त्यांवर लावली असतात त्यावर ही नगरपंचायत ने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही. कोट: कोल्हार घोटी एकच मार्ग असल्याने तसेच कारखाना हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती . अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने बैल वाहतूक गाड्या पर्यायी मार्गाने नेल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. अकोले नगरपंचायत ने ही फेरीवाले तसेच रस्त्यावरती बसणाऱ्या दुकानांना आळा घालावा. आत्तापर्यंत एक जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण तीनहजार केसेस दाखल केल्या आहे. त्यांच्याकडून जवळजवळ तीन लाख रुपये दंड वसुली करण्यात आला आहे. प्रमोद बोरसे पोलीस निरीक्षक अकोले

अकोले वाहतूक कोंडी

अकोले,ता.५:अकोले शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून जसा लोकसंख्येचा आलेख वाढतोय त्याच रेषेत वाहनांची संख्या वाढत आहे .कोल्हार घोटी रस्ता सकाळपासून वर्दळीचा ठरला असून सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे ,कॉलेज,विधालय सर्व शासकीय कार्यालय कोल्हार घोटी रस्त्याला असल्याने तसेच ऊस वाहतूक व मुंबई कडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते तर ट्राफिक पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होताना दिसत आहे . अकोले शहरातील वाहतूक समस्यांमध्ये आस्त व्यस्त पार्किंग , रस्त्यांवरती गाड्या उभा करणे, बेशिस्त वाहन चालन यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यावर प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वनवे एकेरी वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अकोले शहरातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नागरिकांना सातत्याने त्रास होताना दिसतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावरती उसाच्या बैलगाड्या चालत असतात. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने व्यवस्थित लावली नसल्याने सातत्याने अपघात होताना दिसतात. बाजारतळ ते महात्मा फुले चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने उसाच्या बैलगाड्यांना अडथळा निर्माण होतो , त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. महात्मा फुले चौक व बाजार तळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस ची संख्या वाढवणे गरजेचे आहे. चुकीच्या पार्किंगसाठी दंड वसूल होताना दिसत नसल्याने लोक कुठेही गाडी लावतात. पार्किंग साठी व्यवस्थित जागा निश्चित करणे गरजेचे आहे. शहरातील शनी मंदिर परिसरात ही बहुतेक वेळा वाहन कोंडी होताना दिसते. या प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे. वाहतूक शाखेने दंड आकारणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. आठवडे बाजार चे दिवशी बहुतेक दुकाने रस्त्यांवर लावली असतात त्यावर ही नगरपंचायत ने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही. कोट: कोल्हार घोटी एकच मार्ग असल्याने तसेच कारखाना हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती . अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने बैल वाहतूक गाड्या पर्यायी मार्गाने नेल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. अकोले नगरपंचायत ने ही फेरीवाले तसेच रस्त्यावरती बसणाऱ्या दुकानांना आळा घालावा. आत्तापर्यंत एक जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण तीनहजार केसेस दाखल केल्या आहे. त्यांच्याकडून जवळजवळ तीन लाख रुपये दंड वसुली करण्यात आला आहे. प्रमोद बोरसे पोलीस निरीक्षक अकोले

आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य ) प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य : लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .

( आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य ) प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य : लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .
--------------------------------------------- ( $ डॉ . सुनील शिंदे : अगस्त्य फीचर्स , अकोले ) दुर्दम्य आस , इच्छाशक्ती ही फार फार मोलाची गोष्ट आहे . मन:शक्ती - मनाचे सामर्थ्य लाख मोलाचे . काही माणसं विजीगीषु वृत्तीची असतात .. म्हणजे सातत्याने विजयी असण्याची - होण्याची ती आस . आयुष्यातील लहानमोठ्या कोणत्याही प्रसंगात , संघर्षात - संकटात अथवा अडथळ्यात अजिबात खचून न जाता - न डगमगता उभं राहण्यासाठी मनाचा खंबीरपणा असावा लागतो . सर्वांनाच नसते ही देण . सर्वांनाच नाही साध्य होत ही बाब .. लोकनायक - लोकनेते सन्मा . पिचड साहेब अशाच दुर्मिळ देण असणाऱ्या मोजक्या लढाऊ बाण्याच्या माणसांप्रमाणे होते . त्यांच्या या वैशिष्ट्याचा पुरेपूर प्रत्यय मी दोन तीन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांक संपादन काळात अनुभवला ! त्यावेळी सलग दोन - तीन महिन्यांच्या काळात त्यांची आणि माझी प्राचार्य डॉ . भास्कर शेळकेंसमवेत अन् प्रसंगी स्वतंत्रपणे वारंवार बैठक व्हायची तेंव्हा हा अनुभव आला . अथकपणे पिचड साहेब कधी पक्ष कार्यालयात , तर कधी संस्था कार्यालयात , तर कधी कॉलेज च्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यालयात ठाण मांडून फीडबॅक घ्यायचे .. माझ्याशी चर्चा करताना अपडेट घेत .. तर कधी ' काय वाटते सर या मुद्द्यावर तुम्हाला ? ..' असे मोठ्या मनाने विचारत ! तर कधी अकोल्यात यायला नाही शक्य झाले तर थेट राजूरला मला आणि प्राचार्य डॉ . शेळके सरांना अंदाज घेत आवर्जून आस्था - आपुलकीने बोलावून घेऊन बातचीत करीत असत . एवढेच नाही तर अकोलेत , कधी नाशिकमध्ये सकाळीच नियोजित वेळेत सुवर्ण महोत्सवी कामानिमित्त उत्साहाने वयाचा विचार बाजूला ठेवून भेटीगाठीसाठी निघायचे आम्हाला घेऊन ! सक्रीय चैतन्याचा हा झपाटा थक्क करणारा .. सातत्याने समाजकारण - राजकारणात समन्वयवादी भूमिका घ्यायची हा त्यांचा कटाक्ष असे . समजूतदारपणामुळेच त्यांनी तालुक्यासह राज्यात माणसे जोडली , जनसंपर्क टिकविला . महाराष्ट्रातील विख्यात समाजवादी विचारवंत , ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि विख्यात वक्ते तसेच प्राध्यापक आदरणीय कै . ग . प्र . प्रधान तथा महाराष्ट्राचे ' प्रधान मास्तर ' यांचे विद्यार्थी म्हणजे आदरणीय लोकनेते , माजीमंत्री मधुकरराव पिचड ! या ओळखीत आणि निर्देशातच सारे काही आले . पिचड साहेब पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चे विद्यार्थी . आदरणीय पिचड साहेबांना ते प्रधान मास्तरांचे शिष्य होते ही बाब कायमच अभिमानास्पद - भूषणावह वाटत आली . प्रभावी वक्तृत्व , वैचारिक मांडणीची वेधक शैली अन् विद्यार्थी प्रश्नांसंदर्भातील तत्कालीन स्थितीत केलेले नेतृत्व यांमुळे मधुकरराव पिचड हे आदरणीय प्रधान मास्तरांचे लाडके ठरले . अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त तसेच कार्यकारी विश्वस्त म्हणून आदरणीय दादासाहेब रुपवतेंच्या प्रभावी संघटन कौशल्याप्रमाणेच दादासाहेबांच्या पश्चात आदरणीय पिचड साहेबांनी आपल्या विलक्षण कार्यशैलीत तसेच मुत्सद्देगिरीने सर्वपक्षीय मोट कार्यकारिणीच्या सातत्यपूर्ण मांडणीत बांधली ही बाब ध्यानी घ्यावी लागेल . १९७४ साली महाविद्यालय सुरु होताना विडी कामगार , रोजगार हमी मजूर , शेतकरी , तालुक्यातील शिक्षक यांच्यासह शिक्षण प्रेमी आणि राजकीय धुरिणांनी जसे अनमोल योगदान नोंदविले त्यास तोड नाही . पिचड साहेब राजूरच्या तत्कालीन दूध डेअरीचे चेअरमन होते . दूध उत्पादकांकडून डेअरीच्या माध्यमातून एक दिवसाच्या दूधाची रक्कम मा . पिचड साहेबांनी महाविद्यालय उभारणी कामात मिळवून दिली . विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ( यु . जी . सी . : नवी दिल्ली ) ग्रँट मंजूर व्हावी यासाठी तत्कालीन राज्य मंत्री मंडळातील मा . पतंगराव कदमांकडे निर्वाणीचा पाठपुरावा करुन महाविद्यालयास अनुदान मिळवून देण्यात मोलाची भूमिका पिचड साहेबांनी पार पाडली . लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक विकास कामांच्या प्रगतीपर वाटचालीत अकोले तालुका एज्युकेशन संस्था आणि अगस्ती महाविद्यालयाची गुणवत्तेची पताका दिमाखात फडकत राहिली आहे . याच परंपरेत सुरु झालेला स्रोत अखंडपणे प्रवाही राहिला असून या ओघात आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या कुशल नेतृत्वाखाली रस्त्यांचे जाळे , सहकारी संस्थाची गती , साखर कारखाना , दुग्ध विकास यंत्रणा , जलक्रांती , बाजार समित्या , धरणे , कालवे , बंधारे , जलविद्युत प्रकल्प अशा अनेकविध स्तरावर विकास गंगा प्रवाहित राहिली आहे . पिचड यांच्या आजवरच्या वाटचालीत आणि कारकिर्दीत : निळवंडे धरणाची गती - निर्मिती , अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती , दूध व्यावसायिक संघ , आदिवासींच्या न्याय्य हक्कांचा संघर्ष , आदिवासी योजनांसंदर्भातील कायदे , भंडारदरा धरण पाण्यावरील हक्काचा लढा - फेरवाटपाची मागणी , चाकबंद आंदोलन , तालुक्यातील अन्य धरणे , बंधारे , कालवे , पिंपळगाव खांड धरण , प्रभावी जलक्रांतीची यशोगाथा , सहकारी संस्थांचे जाळे , शासकीय आश्रमशाळांची प्रभावी मंजुरी , दुर्गम ग्रामीण - आदिवासी वाड्यापाड्यांतील , भागातील रस्ते अशी विविध कामांची साखळीच मजबूत स्वरुपात निर्माण झाली . राजकारण , समाजकारण , सहकार या महत्वपूर्ण क्षेत्रातील कर्तबगारीपलीकडे आणखी एक वेगळा पैलू माजी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या संदर्भात वेधक आणि लक्षणीय आहे , हा पैलू वाचनाचा ! अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि मांडणी स्वीकृत कामकाजाच्या बाबतीत करणे ही पिचड साहेबांची खासियत . अकोले तालुक्यातील शेती , पाणीप्रश्न , धरणे - बंधारे , सहकारी संस्था , मूळ आदिवासींच्या सत्यतेविषयी शासकीय अन् न्यायालयीन संघर्ष यासंदर्भातील पिचड यांनी सातत्याने दिलेला लढा तसेच राज्यातील एकूणच राजकारणात सत्तेत असताना आणि विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना त्यांनी दाखविलेले नैपुण्य राजकीय पटलावर आहे . तथापि सर्वस्वी निराळा असा प्रभावी वाचन वैशिष्ट्याचा पैलू लक्षणीय राहिला . ऐतिहासिक वाङ्गमय तसेच सामाजिक क्षेत्रातील धुरिणांवरील चरित्र - आत्मचरित्रपर पुस्तकांच्या वाचनावर पिचड यांचा अधिक भर आहे . विशेषतः शहाजी राजे , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शंभूराजे ( संभाजी राजे ) , महात्मा जोतीराव फुले , बाळ गंगाधर टिळक , गोपाळ गणेश आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन यासंदर्भातले वाचन मा . पिचड यांनी सातत्याने केले आहे . बाबासाहेबांची घटनेची प्रत अधिक वेधक असल्याचे पिचड यांचे मत होते . आदरणीय डॉ . गोविंद गारे यांनी अथक संशोधनाधारित केलेल्या ग्रंथ लेखनाचे वाचन हे पिचड यांचे लक्षवेधी वैशिष्ट्य . ' स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक ' ' महाराष्ट्रातील आदिवासी जमाती ' आदिवासी वीर पुरुष ' ' सातपुड्यातील भिल्ल ' ' आदिवासी लोककथा ' ही डॉ . गोविंद गारे यांची ग्रंथसंपदा पिचड यांनी वाचलेली . " जगाला माहीत नसलेला क्रांतिकारी वीर राघोजी भांगरेच्या इतिहासाचा संशोधकीय मागोवा गोविंद गारेंनी परिश्रमपूर्वक घेतला आणि मांडला . या ऐतिहासिक संदर्भासह आदिवासी विश्वाच्या एकूणच ऐतिहासिक अभ्यासाच्या वाचनाचा उपयोग मूळ आदिवासी अन् खोट्या आदिवासींच्या प्रश्नावरील लढा देताना झाला .. " ही मधुकरराव पिचड यांची भावना होती . वाचनाने माणूस घडतो , दृष्टी व्यापक होते हे तर सत्यच . सर्वांगीण विकासासाठी वाचन ठरते पूरक . वैचारिक प्रगल्भता बाणते ही बाब लक्षात घ्यावी लागेल . स्वतंत्र विचारशैली विकसित होते . वैचारिक भूमिका डोळसपणे मांडता येणे सुलभ ठरते . कोणताही सामाजिक लढा - संघर्ष हाती घेताना चौफेर वाचनाचा उपयोग - लाभ अथवा दूरगामी यथोचित परिणाम होतो हा पिचड यांचा दखलपात्र अनुभव राहिला . ' आगरकर लेखसंग्रह ' , ' इंडियाज फ्रीडम स्ट्रगल : एपिक ऑफ् सँक्रिफाईस अँड सफरिंग ' , ' परस्यूट ऑफ् आयडियल्स ' , ' लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी ' ( इंग्लिश ) , ' साता उत्तरांची कहाणी ' , ' सत्याग्रही गांधीजी ' ही ग . प्र . प्रधानांची प्रमुख पुस्तके पिचड यांना भावलेली . आवडत्या पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह त्यांच्याकडे होता . अकोले तालुक्यातील लेखकांची आणि संत - साधुचरित व्यक्तिंवर आधारित चरित्रपर पुस्तके देखील पिचड यांच्या वाचनात आवर्जून असतात . उंचखडकचे विख्यात संत यशवंतबाबांवरील साहित्य त्यांना आवडले . गो . नी . दांडेकर , दया पवार यांच्यापासून तर अण्णासाहेब देशमुख यांच्या पुस्तकांपर्यंतचे वाचनही निर्देशिता येईल . सवडीनुसार वाचन करणे नव्हे तर वाचनासाठी सवड काढणे हे पिचड यांचे वैशिष्ट्य ! त्यांच्या वाचनात विविधता होती . निवडक अन् दर्जेदार पुस्तकांच्या वाचनावर अधिक भर आहे . पदवी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजशी आणि पर्यायाने आदरणीय प्रधान मास्तरांशी संपर्क आल्याने पिचडांचे वाचन , अभ्यासू बाणा अधिक दिशादर्शक ठरला . हव्या असलेल्या पुस्तकाचा पाठपुरावा करताना प्रसंगी पिचड यांनी वेळेला अगस्ती अकोले महाविद्यालयातील दुर्मिळ संग्राह्य पुस्तकांसाठी देखील संपर्कात राहून वाचनाची आवड टिकवून ठेवली . एकूणच राजकीय , सामाजिक , सहकार , शिक्षण , शेती क्षेत्रातील कार्यासाठी - निर्णयक्षम वाटचालीत त्यांना वाचन प्रक्रियेतील आवड प्रेरणादायी , उपयुक्त ठरली ही बाब अलग नाही करता येत . वाचनाचा असा हा वेधक पैलू लक्षणीय . राजकीय - सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढला किंवा वेधक कार्य चर्चेत आले की विरोधकांची कमी नसते , तथापि आपल्या चाहत्या - स्नेहांकित परिवाराबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त दबदबा असणे ही बाब सोपी नसते , सहजसाध्य नसते . तरीही यासंदर्भात आदरणीय पिचडांनी आदराची भावना आणि विलक्षण दबदबा टिकवून ठेवला हे विसरून चालणार नाही . शिक्षण , समाजकारण , राजकारण , आदिवासी प्रश्न , जलनीती अशा एकूणच विविध प्रवाही आघाड्यांवरील निर्णायक कामगिरीबरोबरच अकोले ता . एज्युकेशन संस्थेच्या व्यवस्थापनाचा चोख कारभार यथोचित घडीसह पिचड साहेबांनी सुस्थितीत ठेवला ही बाब सदैव संस्मरणीय राहील . 💐👏👏 -------------------------------------------- 📝 $ डॉ . सुनील शिंदे अगस्त्य फीचर्स अकोले / अहमदनगर

Friday, October 10, 2025

पिचड साहेब

अकोले(शांताराम काळे )अकोले तालुक्याची व राजूर गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात ओळख करून देणाऱ्या महामानव वंदनीय मधुकरराव पिचड यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला ,तालुक्यात जलाशयाची निर्मिती करून जलनायक म्हणून आपली ओळख करताना तालुक्यासह उत्तर नगर जिल्हा सुजलाम सुफलाम बनविला.सभापती पदापासून राज्यात मंत्री,प्रदेशाध्यक्ष,विरोधी पक्षनेते,या पदाना न्याय देऊन आदिवासी उपेक्षित समाजाला स्वतंत्र आर्थिक बजेट करून न्याय दिला तर तालुक्याला नवसंजीवनी देणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.त्यांनी तालुक्याचे,राज्याचे नेतृत्व करताना आपले कुटुंब देखील एकत्रित ठेवून आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांनादेखील सामाजिक व राजकीय कामाची गोडी लावली ,नातवंडे ,भाऊ ,मुले,सुना असा त्यांचा परिवार माजी आमदार वैभव पिचड यांचे आपल्या वडीलांबद्दल दैनिक सकाळ ने त्यांच्या विषयी माहिती करून घेतली ' वंदनीय पिचड साहेबांचा संस्काराचा ठेवा .. ' --------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड माजी आमदार वैभव पिचड म्हणाले माझे वडील वंदनीय पिचड साहेबांकडून राजकीय धड्याशिवाय खऱ्या अर्थाने पारिवारिक स्नेह कसा टिकवावा आणि एकत्र कुटुंब पद्धतीतील जिव्हाळा सौहार्द शिकायला मिळाले ही मोठी उपलब्धी . शिस्तप्रियता, कामाचा पाठपुरावा तसेच पूर्ततेबाबत दक्षता या बाबी अधिक शिकायला मिळाल्या . वंदनीय साहेबांचा स्वभाव सडेतोड, स्पष्टवक्तेपणाचा आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्धता तसेच माणूसपण केंद्रिभूत ठेऊन आलेल्या माणसाचा आदर टिकवून वागायचे हा त्यांचा लक्षणीय बाणा तालुक्यासह राज्याला स्मरणात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ही जणू कसोटीची संधी आहे असे समजून साहेब धैर्याने आणि कमालीच्या शांतपणे वागत, निर्णय घेत असल्याचे मी कायम अनुभवले आहे.. पाहिले आहे . प्रभावी निर्णयक्षमता हा तर वंदनीय साहेबांचा विशेष लौकीक ठरला . निर्णय घेताना संबंधित माणसाचा यथोचित सन्मान , आदर राखून मात्र अंतिमतः तडजोड न करता तात्विक भान टिकवून ते निर्णय घेत असत . साहेबांची धार्मिक मते, जाणीव फार म्हणजे फारच सौजन्यशील पद्धतीची, आदराची होती . धार्मिक सलोखा राखण्याबाबत कायम आग्रही भूमिका घेणाऱ्या साहेबांनी सातत्याने सलोखा टिकवला हे त्यांचे वैशिष्ट्य सर्वांना ज्ञात आहे . निवडणूकीचा निकाल अथवा मनाविरुद्ध काही घडले तरी कमालीच्या स्थितप्रज्ञ भावनेतून साहेब संयमी राहिले . आजारपणातील अखेरच्या काळात वंदनीय साहेबांनी तालुक्यातील जनसामान्यांच्या हिताबाबत कळवळ्याने विचारपूस केली हा माझ्या मनावर कोरला गेलेला प्रसंग अविस्मरणीय ठरलाय. एक मुद्दा मला आवर्जून लक्षणीय वाटला साहेबांच्या संदर्भात.. तो म्हणजे त्यांनी निर्णायक प्रसंगी मला एखादा सल्ला दिला आणि माझ्याकडून काही वेगळी भूमिका प्रासंगिक कारणाने घेतली गेली तरीही वंदनीय साहेब कधी संतापले नाहीत अथवा तुसडेपणाने नाराजी कधीच व्यक्त केली नाही .. साहेबांची वाचन क्षेत्रातली रसिकता मात्र व्यासंगी ठरली . त्यांचे वाचन चोखंदळ होते. अफाट होते . राजकीय व्यापात, विलक्षण व्यस्त दिनक्रमातही वेळ राखून कायम साहेबांचे वाचन असायचे. वाचनाची त्यांची अभिरुची फारच संपन्न राहिली . विशेषतः परिवर्तनवादी साहित्य आणि वैचारिक लेखन हा आवडीचा भाग होता . इंग्लिश भाषेतील साहित्याच्या वाचनाबाबत अधिक कल राहिला . त्यांचे पदवीचे शिक्षणच मुळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले . विख्यात स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय प्रा. ग. प्र. प्रधान मास्तरांचे विद्यार्थी होते साहेब . याशिवाय सकाळची पायी फेरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. साहेबांनी घरातील सर्वांचेच भावनिक पर्यावरण खऱ्या अर्थाने समृद्ध ठेवले . नात्यातील भावबंध आणि मायेचा ओलावा कटाक्षाने जपला. माझी भावंडे, आई आणि नातवांना जी मायामतेची पाखर मनापासून धरायची असते त्याबाबत त्यांनी कायमच राजकारण - समाजकारणात व्यग्र असताना देखील आपुलकीची साथ दिली . नातवांचे पुरेसे लाड केले . भावनिक कोमलता , संदर्भ जपले . सुखात असो वा दु:खात कधीही, केंव्हाही वंदनीय साहेबांनी जबाबदारी न टाळता अथवा कुणावरही न विसंबून राहता कौटुंबिक सह्रदयता जाणीवेतून राखली आणि पारिवारिक स्नेह कसोशीने सांभाळला. वृद्धिंगत केला हे त्यांचे ऋण मला कधीच विसरता येणे शक्य नाही . कौटुंबिक जिव्हाळ्याशिवाय वंदनीय साहेबांनी आपला समाज तसेच तालुक्यातील जनसामान्यांचे हित सौहार्द या बाबींना प्राधान्य दिले . घरी भेटीला येणाऱ्या प्रत्येक माणसाची अगत्याने विचारपूस तसेच अडीअडचणींचा निपटारा करणे यासंदर्भात काळजातली नाती सांभाळली. तालुक्यातील , मतदार संघातील अवघ्या माणसांविषयीची फिकीर आणि हितसंबंध जपण्यासाठी वंदनीय साहेबांनी आपपर भेदभाव केला नाही की जबाबदारी टाळली नाही . ' ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती ' या न्यायाने साहेबांनी समाजहिताचा कळवळा सिद्ध केला, हे अवघ्या तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे , ठाऊक आहे . सामाजिक, राजकीय वाटचालीत प्रसंगी प्रतिकूल वातावरणातही समाज हिताचे निर्णय घेताना सातत्याने साहेबांनी जनसामान्यांच्या काळजाची स्पंदने धडधडत ठेवली. तालुक्याचे हक्काचे पाणी असो अथवा अगस्ती साखर कारखान्याची मुहूर्तमेढ आणि पुढील समस्यांतून मार्ग काढणे किंवा शिक्षण संस्थांचे अनुदान तसेच मान्यतेसाठी प्रयत्न आणि जलसंधारण प्रकल्प, समस्यांच्या विळख्यातील लिफ्ट योजना, आश्रम शाळांचे जाळे मार्गी लावले अशा एक ना अनेक कामगिरीबाबत वंदनीय साहेबांनी कायम आणि कायमच जीवाचे अक्षरशः रान करुन समाजहिताचा प्रपंच जपला. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धन, वन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत?  ' घार हिंडते आकाशी , चित्त तिचे पिलापाशी ' या मायाममतेच्या तत्वाने साहेबांनी परिवार आणि समाजातील, तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या , समजून उमजून सदैव काळजी वाहिली. ध्येयवादी राहिले . कर्तव्य निष्ठेने काम केले . दूध व्यवसायातील धवल क्रांती, प्रवरेच्या पाण्याचे नियोजन आणि फेरवाटप , निळवंडे धरण कसोशीने मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच घेतलेली मेहनत अशा अधोरेखित कर्तृत्वाचा लेखाजोखा साहेबांच्या नांवे लखलखीत आहे . वडील म्हणून साहेबांच्या कार्याचा असा हा विशाल पट आम्हाला सदैव दीपस्तंभासारखा प्रेरणादायी ठरेल . दिशादर्शक ठरेल -------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड शब्दांकन , शांताराम काळे