Thursday, May 19, 2011


थकबाकी भरूनही भंडारदरा धरण अंधारात!Bookmark and SharePrintE-mail
राजूर, १९ मे/वार्ताहर
भंडारदरा धरणाची वीज आज चौथ्या दिवशी पाटबंधारे खात्याने नगर येथे १ लाख १ हजार रूपये थकबाकीचा भरणा करूनही रात्रीपर्यंत पूर्ववत सुरू केली नव्हती. त्यामुळे थकबाकी भरूनही धरण अंधारात असल्याची स्थिती तयार झाली. थकित बिल भरूनही वीज कंपनी या बाबत पुरेशा गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
या संदर्भात वरिष्ठांकडे गोपनीय अहवाल पाठविण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले आहे. भंडारदरा विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी आज दुपारीच १ लाख १ हजार रूपयांचा धनादेश वीज कंपनीकडे पाठविल्याचे सांगितले. नगर येथे या रकमेचा धनादेश देण्यात आला. उत्तर नगर जिल्ह्य़ाची जीवनदायिनी ठरलेल्या या धरणाची वीज थकबाकीच्या कारणामुळे गेले चार दिवस बंद आहे. तांत्रिक कारणामुळे थकित वीजबिल वेळेवर न भरल्याने वीज कंपनीने नियमाची अंमलबजावणी करीत धरणाची वीज खंडित केली. वीज खंडित करण्यात वीज कंपनीने तत्परता दाखविली. परंतु धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र यामुळे ऐरणीवर आला. आतापर्यंत तीन वेळा थकबाकीच्या कारणावरून धरणाची वीज खंडित करण्यात आली, यास सरकारी यंत्रणेचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी गुप्तचर विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, विजेविना तेही चालू शकमार नसतील, तर मग धरणाच्या सुरक्षिततेचे काय, हा खरा प्रश्न आहे. वीज खंडित करण्यात दाखविली तीच तत्परता थकबाकी भरल्यानंतर का दाखविली गेली नाही, असा प्रश्न रात्री धरणावरून विचारला जात होता. वीज कंपनीला या बाबत जाब विचारण्याची गरजही व्यक्त होत आहे.     

Wednesday, May 18, 2011


तिसऱ्या दिवशीही भंडारदरा धरण अंधारातPrint
विजेअभावी विजेऱ्यांच्या मदतीने पहारा सुरू!
राजूर, १८ मे/वार्ताहर

एक लाख रूपये थकबाकीच्या कारणावरून तोडण्यात आलेली वीज आज तिसऱ्या दिवशीही पूर्ववत न केल्याने भंडारदरा धरण आजही अंधारात होते. थकित वीजबिल भरल्याशिवाय धरणाची वीज पूर्ववत केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वीज कंपनीने घेतल्याने या प्रश्नाचा तिढा कायम आहे.
दरम्यान, वीज खंडित केल्याच्या पाश्र्वभूमीवर धरण परिसराची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरल्याने विजेअभावी आता विजेऱ्यांच्या प्रकाशझोतात धरणावर पहारा देण्याची वेळ पाटबंधारे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भात आज धरणस्थळावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, धरणाजवळील कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठाही आज खंडित करण्यात आला. बिल थकल्यामुळेच वसाहतीची वीज खंडित केल्याचे भंडारदरा येथील वीज कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अली यांनी सांगितले. भंडारदरा परिसरात पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता किरण देशमुख, शाखा अभियंता रामनाथ आरोटे आज उपस्थित होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन विजेऱ्यांच्या साह्य़ाने धरण परिसरात गस्त घालण्यास सांगितले. तसेच वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून वीज जोडण्याची विनंती केली.
 मात्र, त्यास वीज कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आधी बिल भरा नंतरच वीज जोडली जाईल असेही त्यांनी या बाबत स्पष्ट केल्याचे समजते. वीज तोडण्याची ही तिसरी घटना असून वरिष्ठ पातळीवर या बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना गोपनीय अहवाल पाठवून व्यक्त केल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए. बी. चकोर यांनी दिली.     

पीरसाहेब उरूसाच्या गतवैभवाची राजूरकरांना ओढPrint
राजूर, १८ मे/वार्ताहर
एकेकाळी आठ दिवस चालणारा येथील पीरसाहेबांचा ऊरूस आता भरणेदेखील अशक्य झाले आहे. तो बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. त्याचा विपरीत परिणाम राजूरच्या बाजारपेठेवर झाला आहे.अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात ११० आदिवासी गावे, वाडय़ा-वस्त्या आहेत. त्यातील ४० गावे मोठी आहेत. त्यांना डांगाणा म्हणतात. या डांगाणाची प्रमुख बाजारपेठ राजूर आहे. येथे दरवर्षी अक्षय्यतृतीयेनंतरच्या शनिवारी पीरसाहेबांचा ऊरूस भरतो. तो पुढे मंगळवापर्यंत म्हणजे चार दिवस चालत असे. परिसरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. गावातील दोन्ही समाजाचे लोक एकत्रितपणे संदल नाचवतात. त्याला आसपासची गावे व वाडय़ा-वस्त्यांमधून मोठी गर्दीही होई. उरूसाचे निमित्त साधून येथे जनावरांचा मोठा बाजारही भरत असे. त्यात गायीसारख्या दुभत्या जनावरांचाही समावेश होता. त्याबरोबरच बैल, कोंबडय़ाचीही मोठी खरेदी-विक्री होत असे. या चार दिवसांचीच असली, तरी त्याची तयारी व तत्सम कामांमुळे आठवडाभर गावात माठी वर्दळ असे. तमाशा, पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रम असा उत्साह या काळात सळसळत होता. या उलाढालीमुळेच राजूरची बाजारपेठ गर्दीने फुलून जात होती.
अलीकडच्या दोन-तीन वर्षांत मात्र यात्रा भरणेही मुश्कील झाले आहे. हा ऊरूसच आता रोडावला आहे. एकीकडे गावोगावच्या यात्रा वाढत असताना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरलेली ही यात्रा मात्र ओस पडू लागली आहे. गावोगावच्या यात्रा वाढविण्यासाठी ग्रामस्थ वैयक्तिक लक्ष देऊन विविध उपक्रम राबवतात. लोकवर्गणी करून मोठय़ा दिमाखात यात्रा पार पाडल्या जातात. राजूरच्या पीरसाहेबांच्या यात्रेचे वैभव मात्र लुप्त होते की काय, अशी चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे.
उरूसाच्या आधी येथेच काठय़ांची यात्रा भरते. त्याला अजूनही २५-३० हजार लोक हजेरी लावतात. मात्र, राजूरच्या यात्रेतील गर्दी वर्षांगणिक  कमी होऊ लागली आहे. येथील ग्रामपंचायतीने त्याकडे लक्ष दिले पाहिजे असे यात्रेचे जुने वैभव पाहिलेल्यांना वाटते. यात्रेसाठी आवश्यक सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यंदा बैलबाजार भरला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केही व्यवहार त्यात झाले नाहीत. नाराज होऊनच बाहेरची मंडळी येथून परतली. हा ऊरूस व यात्रेवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था, तसेच गावची परंपरा टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलावी, निदान पुढच्या वर्षी तरी या कमतरता राहू नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे


पर्यावरणाचा मूलमंत्र जोपासत अधिकाऱ्याची एकसष्टी साजरीPrint
राजूर, १८ मे/वार्ताहर
आदिवासी शेतकऱ्यांना शेतीमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा सुवर्णमध्य साधून सेंद्रीय शेती करण्याचा, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र देऊन एकसष्टी साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोले तालुक्यातील चिचोंडी येथे पार पाडला. आदिवासी सेवक व शेतकऱ्यांना या वेळी रोपांचे वाटप करण्यात आले.
चंद्रकांत बांगर यांच्या सत्काराचे निमित्त साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास भंडारदरा जलाशय पाणलोटक्षेत्रातील ९ गावांमधील रहिवासी, सामाजिक संस्था, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
चिचोंडी गावात प्राथमिक शिक्षक गणपत बांगर गुरूजी यांनी शैक्षणिक कार्य करताना आपल्या मुलांना पोलीस खात्यात भरती करून आदर्श अधिकारी बनविले. त्यामुळेच चंद्रकांत बांगर यांनी पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर गावी येऊन पारंपरिक, परंतु आधुनिकतेची जोड देऊन शेती फुलवली. सेंद्रीय शेती पद्धती वापरून तांदळाचे २०० पोती उत्पादन मिळवून आदिवासी शेतकऱ्यांना दिशा दिली. शेतीतील या कामगिरीमुळेच त्यांच्या सत्कारास मोठी हजेरी होती. पं. स. सदस्य दिलीप भांगरे, सुरेश गभाले, अरूण माळवे, सुनील सारूक्ते, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कैलास शहा, ललित चोथवे, महेश अवसरकर, शांताराम काळे, प्राचार्या मंजूषा काळे, देवीदास शेलार, प्राचार्य दिलीप रोंगटे, सुरेश घाटकर, राजेंद्र जाधव, आदिवासी सेवक गोपाळा गभाले, विजय भांगरे, संजय यादव आदींचा त्यात समावेश होता.
पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब बांगर यांनी या वेळी बोलताना आईची माया, वडिलांचे प्रेम व मार्गदर्शन यामुळेच मी आज उभा आहे. मुंबईत माझी ओळख त्यांचा भाऊ नव्हे, तर मुलगा अशीच आहे, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रकांत बांगर यांनी तुमच्या प्रेमाच्या शिदोरीवर आदिवासी समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रफुल्ल बांगर यांनी आभार मानले.   

Tuesday, May 17, 2011

आर्थिकदृष्टय़ा सधन बनलेल्या श्रीगोंदेकरांसाठी लग्न समारंभात संपत्तीचे प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यातच ‘गुंठा मंत्री’ बनलेल्या पुणेकरांचा नवरदेव जर थेट हेलिकॉप्टरने आला तर मग पैसा असणाऱ्यांचे पित्त खवळणारच. यावर्षी लग्नात कोटय़वधींचा चुराडा होत आहे. एकीकडे नुसता नवरदेव व त्याच्यासोबतच्या करवल्या नेण्या-आणण्यासाठी दोन हेलिकॉप्टरला सात लाखांची बिदागी देण्यात आली. दुसरीकडे घरी लक्ष्मी नांदत असतानाही सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद संभाळणाऱ्या जबाबदार नेत्याने मुलाचे लग्न सगळी हौसमौस बाजूला ठेवून अत्यंत साध्या पध्दतीने करून वेगळा पायंडा पाडला!
लग्न म्हणजे रेशमी बंधनाची गाठ समजली जाते. पूर्वी लग्न समारंभ जास्त दिवस चालायचा, मात्र खर्च कमी होई. पण गेल्या काही वर्षांत कमालीचा बदल झाला. लोकांकडे भरमसाठ पैसा आल्याने लग्नातील पध्दती बदलल्यात. मंडपाची जागा मंगल कार्यालयाने घेतली. जेवणाचे पदार्थ आता पंचपक्वानापर्यंत मर्यादित न राहता सधन व्यक्ती सहज आठ दहा पदार्थ करतात. मिनरल वॉटर ही तर कॉमन बाब झाली आहे.
एका किंवा साध्या बॅन्ड बाजावर हौस होत नसल्याने आता डीजे लागतोच. लग्नात पुढाऱ्यांसाठी हार-तुरे, फेटा हे आलेच. पूर्वी नवरदेव बैलगाडीने लग्नस्थळी जात होता. नंतर घोडय़ाने व जीपगाडी नवरदेवाचे वाहन झाले. पण आता येथील सांगवीदुमाला या गावात झालेल्या एका लग्नाने सगळे उच्चांक मोडले.
पुणे जिल्ह्य़ातील शिक्रापूर येथील नवरदेव घोडा गाडीने नव्हे, तर चक्क हेलिकॉप्टरमध्ये विवाहस्थळी आला, तेही दोन हेलिकॉप्टर घेऊन! नवरीमुलगी तालुक्यातील पेडगाव येथील एका सर्वसाधारण कुटुंबातील आहे. या दोन हेलिकॉप्टरला नवऱ्यामुलाने सात लाख रूपये मोजल्याची चर्चा आहे. लग्नात पुणेकर पैसा उडविण्यात मागे पुढे पाहत नाहीत असा ग्रामीण भागातील श्रीमंतांचा गैरसमज झाल्याने येथेही लग्नात पैसा खर्च करण्याची ओंगळवाणी स्पर्धाच लागली आहे. गेल्या काही वषार्ंपासून उसासह इतर शेतमालातून भरभक्कम पैसा मिळाला. शिवाय इतर मार्गाने पैसा कमविणाऱ्यांची संख्याही चांगलीच आहे. आर्थिक परिस्थिती चांगलीच वधारल्याने दोन्ही हाताने संपत्ती उधळण्याला तथाकथित प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
ज्या दिवशी सांगवीत हेलिकॉप्टरच्या साक्षीने लग्न झाले त्याच दिवशी, पण या सगळया अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घन:शाम शेलार यांच्या मुलाचे लग्न झाले. त्यांचा मुलगा प्रवीण आणि रूईगव्हाण (कर्जत) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय पवार यांची कन्या मेघना साध्या पध्दतीने विवाहबध्द झाले. केवळ सावलीसाठी मंडप व साधे जेवण या दोनच गोष्टी या लग्नात होत्या. ना बँडबाजा-ना बारात, शिवाय पुढाऱ्यांना निमंत्रणच नव्हते. त्यामुळे लग्न वेळेवर लागले. विशेष म्हणजे अक्षदारूपी तांदूळही मोजून सात जोडप्यांच्या हातात होता. त्यामुळे हा तांदूळ जमिनीवर सांडून वाया गेला नाही. या सगळया गोष्टी शेलार व पवार कुटुंबांनी पाळल्या त्या पैसे नव्हते म्हणून नव्हे, तर परिवर्तनाची कुणीतरी सुरूवात करायची म्हणून. कारण आता पैसा व वेळ वाया घालणे म्हणजे थाटामाटात लग्न करणे हाच गैरसमज दृढ झाला आहे. त्याला कृतीतून   फाटा देण्याचे काम या दोन कुटुंबांनी केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘अगोदर समाजकारण मग राजकारण’ या आदेशाचे पालन करण्याचा हा छोटा प्रयत्न होता, असे शेलार म्हणाले. मुलांचे कौतुक करण्यासाठी दोन्हीकडेही सर्व काही असताना समाजाला ज्याची आज खरी गरज आहे ते करण्यात मुलांनी संमती दिल्याने हे सहज शक्य झाले. लग्नातील अनावश्यक खर्च कमी करून त्या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.    

काही वर्षांपूर्वी श्रीगोंदे कारखाना येथील आदिवासी समाजातील दारिद्र्यरेषेखालील एका कुटुंबाने हत्तीवरून वराची मिरवणूक काढून शाही विवाह केला होता. साठवलेला पैसा असा का खर्च करता या प्रश्नाला त्या कुटुंबाने पैसेवालेच असे लग्न करू शकतात काय हे दाखवून द्यायचे होते म्हणून हा खर्च केला असे उत्तर दिले होते. त्यामुळे आता पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याऐवजी साध्या पध्दतीने विवाह लावून कुठेतरी सामाजिक बांधिलकीची सुरूवात स्वत:पासून करण्याचा प्रयत्न होऊ लागलायं, ही पण जमेची बाजू आहे.


भंडारदरा धरण दुसऱ्या दिवशीही अंधारात!Print
राजूर, १७ मे/वार्ताहर
भंडारदरा धरणाची थकबाकीमुळे खंडित केलेली वीज आज दुसऱ्या दिवशीही पूर्ववत न केल्याने धरण अंधारातच आहे. वीजबिल भरल्याशिवाय वीज पूर्ववत देता येणार नाही, असे वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता चाफेकरंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धरणाची वीज तोडण्याआधीच या बाबत तसे बोलायला हवे होते, असे चाफेकरंडे यांनी म्हटले, तर पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता ए. बी. चकोर यांनी यांनी आम्ही अधीक्षक अभियंता यांना विनंती केली. त्यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलावे लागेल असे सांगून फोन बंद केला, याकडे लक्ष वेधले. परंतु अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत धरणाची वीज सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिली.
धरणाच्या पाण्यावर मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती होते.
उत्तर नगर जिल्ह्य़ास सुजलाम सुफलाम करणाऱ्या या धरणाची वीज केवळ एक लाख रूपये बिल थकल्यामुळे काल खंडित करण्यात आली. धरणाची वीज तोडण्याची ही तिसरी वेळ आहे. सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने वीजबिल भरता आले नाही. परंतु आम्ही अधीक्षक अभियंता चाफेकरंडे यांना या बाबत विनंती केली होती. त्यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलावे, असे सांगितले. मात्र, विनंती मान्य न करता वीज खंडित केली. या बाबत गोपनीय अहवाल वीज कंपनीचे सचिव, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभागाचे सचिव, मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे.  धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुप्तवार्ता विभागाकडून गोपनीय अहवाल आल्यामुळेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यासाठी वीजपुरवठा आवश्यक असताना विनंती करूनही अधीक्षक अभियंत्यांनी ती मान्य न केल्याचे चकोर यांनी सांगितले. पाटबंधारेचे ५ लाख वीज कंपनीकडे थकित असूनही या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या साठी आपण तातडीने वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  सहायक अभियंता किरण देशमुख यांनीही थकबाकीबाबत वीज कंपनीला नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. चाफेकरंडे यांनी मात्र धरणाची वीज तोडण्यापूर्वी आम्ही पाटबंधारे विभागाला नोटीस दिली होती, असे सांगून वीज तोडल्यानंतर ती पूर्ववत करणे माझ्या हातात नाही. वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत वाट पाहावी लागते, असे स्पष्ट केले. वीज तोडल्यानंतर पाटबंधारे खात्याने दूरध्वनी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्या वीजबिल भरल्यानंतर वीज जोडून देऊ, असेही ते म्हणाले.
‘त्या’ बिलावरून टोलवाटोलवी!
पाटबंधारे खात्याचे आमच्याकडे कोणतेच बिल पेंडिंग नाही. तशा प्रकारचे आमच्याकडे पत्रही नाही. मात्र, वीज खंडित केल्यावर त्यांना आमच्याकडे बाकी असल्याचे आठवते,
असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या मुद्यावरून पाटबंधारे व वीज कंपनी यांच्यात ‘टोलवाटोलवी’ सुरू असून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर तातडीने बैठक होणे अपरिहार्य ठरले आहे.     




लग्न समारंभातही ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ युतीPrint
राजूर, १७ मे/वार्ताहर
राजकारण गल्लीतील असो नाहीतर दिल्लीतील, त्याचे पडसाद समाजात तातडीने उमटतात. राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार ही गोष्ट निश्चित होताच लग्नसमारंभातही त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येथील एका लग्न समारंभात चक्क भगवे आणि निळे फेटे पाहुण्यांना बांधून वधू व वराकडील मंडळींनी नव्या राजकीय समीकरणाला प्रतिसाद दिला.
दोन दिवसांपूर्वी लग्नाची मोठी तीथ होती. येथील विजय पवार यांची कन्या आणि अनंतराव पराड यांचा मुलगा अशा विवाह सोहळ्यात यजमानांनी पाहुण्यांचे स्वागत जाणीवपूर्वक निळ्या व भगव्या फेटय़ांनी केले. लग्नाला दोन्हीकडची पाहुणे मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती. दोन्ही काँग्रेस, भारिप, शिवसेना, भाजप अशा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता.
मात्र, वधू व वराकडील मंडळी प्रामुख्याने भाजप-शिवसेना युती व भारिपला मानणारी होती. त्याचे प्रतिबिंब या स्वागताच्या फेटय़ांमध्ये उमटले. राज्यातील नव्या राजकीय समीकरणाच्या पाश्र्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाचे स्वागत करीत त्याच रंगाचे फेटे बांधण्याचे औचित्य या मंडळींनी दाखवले. पूर्ण लग्न समारंभात त्याचीच चर्चा सुरू होती. निळे व भगवे फेटेही उठून दिसत होते. विशेष म्हणजे पाहुण्यांनी तळपत्या उन्हातही लग्नसमारंभ संपेपर्यंत हे
फेटे डोईवर ठेवून एकप्रकारे भीमशक्ती-शिवशक्तीला पाठिंबाच दिला.

    Sunday, May 15, 2011

    आज जागतिक कुटुंब दिन .... पण आता किती असे कुटुंब राहिले आहेत ?? प्रश्नच आहे ? पण ह्या अस्थिर कुटुंब व्यवस्थेत मला अभिमान आहे तो माझ्या कुटुंबाचा .. सहा सासू सासरे ...बारा दीर सध्या तरी आम्ही सात जावा ... नऊ आते सासा ....दहा नणंदा ... आणि बच्चे कंपनी .... जवळपास सगळे मिळून आम्ही टाकळकर परिवार जवळपास १०० जन आहोत .... जरी सगळे वेगवेगळे राहत असले तरीही प्रत्येक कार्यक्रम सगळे जन मिळून करतात ... अगदी कुणालाही कुठलीही अडचण असली तरी सगळे धावून येतात ..मग ती कुठलीही असो ... सासू -सून ,जावा- जावा , नंदन -भावजय , सासरा -सून , मुलगा -काका ,,,,,,,,,असे कोणताही नाते असो ते तितक्याच खेळकरपणे जपले जाते .. काही वेळेला मतभेद होतात पण ते तिथेच मिटवून पुढच्या क्षणाला .. सगळे एकरूप होतात ... आणि आज आम्ही एकटे नाहीतर सगळे एकत्र आहोत हि भावनाच जाण्यास बळ देवून जाते .........आणि हेच खरे कुटुंब ..........

    Saturday, May 14, 2011


    रानमेव्यातून कमाई, पर्यटकांवर मोहिनीही!
    राजूर, १३ मे/वार्ताहर
    डोंगरदऱ्यात दडलेला करवंदे, कैऱ्या, गाळवे तसेच जांभळांचा रानमेवा गोळा करून आदिवासी मुलांकडून त्याची विक्री होत आहे. डोंगरची मैना काळी मैना तीन रूपयांना आठवा अशी हाक कानी पडताच हा मेवा खरेदी करण्यासाठी शौकिनांची गर्दी होते.अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात उन्हाळ्यात रोजगारासाठी भटकंती सुरू असते. आदिवासी वाडय़ा-पाडय़ातील लहान मुले सुट्टीत खेळण्याचा आनंद लुटण्याऐवजी काटेरी झुडपांमध्ये दडलेले करवंदांचा खजिना धुंडाळण्यात वेळ घालतात. सकाळी सातलाच हातात छोटय़ा टोपल्या घेऊन करवंदे, जांभळे, कैऱ्या, गाळवे वगैरे गोळा करून रस्त्यावर फिरून मोठय़ा आवाजात ओरडून ही मुले या मेव्याची विक्री करतात. अशा प्रकारे दिवसभरात शंभर रूपये कमाई करतात.

    राजूर, भंडारदरा, कोतूळ, समशेरपूर आदी भागात सध्या हे चित्र पाहावयास मिळते. संतोष झडे, हौसाबाई परते या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलांनी या विक्रीतून होत असलेल्या फायद्याचा विनियोग आम्ही शिक्षण, कपडे, गणवेश, वह्य़ा-पुस्तके, घरखर्चासाठी करीत असल्याचे सांगितले. पर्यटकांचा या मुलांना चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांचे धीट बोलणे व दोन-तीन रूपयांत आठवाभर रानमेवा हे शब्द पर्यटकांना मोहिनी घालतात. सुट्टीतल्या आनंदापेक्षा जीवनाला नवा आकार-उकार देण्याचे हे प्रात्यक्षिक जास्त महत्त्वाचे व मोलाचे, तसेच अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया चौकस पर्यटक आवर्जून व्यक्त करतात. उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावनाही काहीजण बोलून दाखवितात.

    Wednesday, May 11, 2011





    चिचोंडीतील प्रकार : रोहित्राच्या दुर्दशेकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक!Print
    राजूर, १० मे/वार्ताहर
    येथून जवळच असलेल्या चिचोंडी गावात वीज कंपनीचा अजब कारभार सुरू असून, परिसराला वीजपुरवठा करणारे रोहित्र पूर्ण फुटके, तसेच काही वीजखांबही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. राजूरच्या वीज अधिकाऱ्यांचे या बाबत लक्ष वेधले, तसेच भंडारदरा विभागाचे अभियंता अली यांनाही प्रत्यक्ष दाखविले. मात्र, रोहित्र दुरूस्त केले जात नसल्याने चिचोंडीच्या रहिवाशांनी आता भंडारदरा वीज कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देतानाच वीज कंपनीच्या मुख्य अभियंत्यांचे लक्ष वेधण्याचे ठरविले आहे.
    चिचोंडीतील मुख्य रस्त्यावर असणारे रोहित्र पूर्णपणे फुटले असून, तारांवरील प्लास्टिकचे आवरण निघाले आहे. त्यामुळे याचा धोका निर्माण झाला आहे. राजूर वीज कार्यालयातील सहायक अभियंता कुलकर्णी यांचे या कडे लक्ष वेधले. मात्र, त्यांनी कानावर हात ठेवले. भंडारदरा येथील अभियंता अली यांना हे टाऊक असूनही त्यांचे या कडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे कंटाळलेल्या गावकऱ्यांनी आता भंडारदरा येथील वीज कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. चंद्रकांत बांगर, सुरेश गभाले, ललित पवार आदींनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.    

    उच्चस्तरीय कालव्यांना आक्षेप अव्यवहार्यPrint
    ‘दोन्ही धरणांचे संयुक्त व्यवस्थापन हवे’
    प्रकाश टाकळकर ,अकोले, ११ मे

    निळवंडय़ाचे ६१०.४० मीटर तलांकावरून निघणारे मूळ कालवे रद्द करावेत, त्याऐवजी ६३० मीटर तलांकावरून ते काढावेत, भंडारदरा व निळवंडय़ाचे संयुक्त परिचालन करून या उच्चस्तरीय कालव्यांद्वारे निळवंडे प्रकल्पाचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणावे, अशी निळवंडे पाणीहक्क संघर्ष समितीची मुख्य मागणी आहे. कालव्यासाठी संपादित असणारे क्षेत्र बागायती असल्यामुळे ते वाचविणे व तालुक्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करणे हा या मागणीमागील उद्देश आहे.
    मात्र, संघर्ष समितीचा हा प्रस्ताव पूर्णपणे अव्यवहार्य असून तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. उच्चस्तरीय कालव्याची मागणी अव्यवहार्य, अयोग्य ठरविताना जी कारणे जलसंपदा विभागाने दिली, त्यातील काही बाबींमध्ये तथ्य असले तरी बऱ्याच बाबी अवास्तव व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा समितीचा दावा आहे. उच्चस्तरीय कालव्यांसाठी नव्याने ७५० हेक्टर खासगी व ६७९ हेक्टर वन जमिनीसह १ हजार ४२९ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. वनजमिनी संपादित करण्यासाठी बराच कालावधी लागेल. भंडारदरा प्रकल्पातून होणाऱ्या विद्युत निर्मितीत मोठय़ा प्रमाणात घट होऊन त्यापोटी संबंधित कंपनीस ६३७ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागेल. कालव्याच्या किंमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ होईल. २३० बांधकामांची देखभाल करणे व ते सुस्थितीत ठेवणे जवळपास अशक्य होईल, अशा अडचणींचा पाढा जलसंपदा विभागाकडून वाचला जात आहे. मात्र, उच्चस्तरीय कालव्यांबाबत दिशाभूल करण्यात येत असल्याचा आक्षेप आहे.
    निळवंडय़ाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची लांबी अनुक्रमे २७ व १८ किलोमीटर आहे, उच्चस्तरीय डावा कालवा ५४ व उजवा ३४ किलोमीटर होईल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. कालवे दीड ते दोन किलोमीटर वरच्या बाजूला सरकविले, तर त्याची लांबी एकदम दुप्पट होते. निळवंडय़ाचा डावा कालवा ८५ किलोमीटर तर उजवा ९७ किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही कालव्यांसाठी १ हजार ९८१ हेक्टर शेतजमीन लागते, तर फक्त अकोले तालुक्यापुरत्या मर्यादित असणाऱ्या उच्चस्तरीय कालव्यांसाठी मात्र तब्बल १ हजार ४२९ हेक्टर जमीन लागणार. तालुक्यातील ४५ किलोमीटर लांबीच्या मूळ कालव्यांना फक्त १५५ कोटी खर्च येणार आणि उच्चस्तरीय कालव्यांना मात्र ११०० कोटी लागणार. कालव्याची जागा एक-दीड किलोमीटर वरच्या बाजूला सरकवली तर एवढा खर्च वाढण्याचे, एवढी जमीन लागण्याचे कारण काय, असे प्रश्न उच्चस्तरीय कालव्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहेत. वीजनिर्मितीनंतर होणाऱ्या परिणामांबाबतही असाच अवास्तव दावा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. उच्चस्तरीय कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी निळवंडे धरणातील पाणीपातळी ६३० मीटर तलांकापेक्षा जास्त ठेवावी लागेल. त्यामुळे भंडारदरा विद्युतगृह क्रमांक एक व दोनमधून होणाऱ्या वीजनिर्मितीत मोठय़ा प्रमाणात घट होईल. त्यामुळे कंपनीस ६३७ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागेल. तसेच केंद्रीय जलविद्युत प्रवार्थ (नवी दिल्ली) या वीजनिर्मितीच्या नुकसानीस परवानगी देणार नाही, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. त्यात फारच थोडे तथ्य आहे. बारा मेगाव्ॉट क्षमतेच्या भंडारदरा जलविद्युत प्रकल्प क्रमांक एकचा निळवंडय़ाशी कोणताही संबंध नाही. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर या प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. भंडारदऱ्याच्या आवर्तनकाळात ही वीजनिर्मिती होते. निळवंडे धरण भरलेले आहे की रिकामे याचा या वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होण्याचे कारण नाही. सध्या आवर्तनकाळात ७८० क्युसेक पाणी विद्युतगृह क्रमांक एकमधून व उर्वरित पाणी भंडारदरा धरणाच्या मोऱ्यांमधून सोडले जाते. पण निळवंडे व भंडारदरा धरणांचे एकत्रित व्यवस्थापन केल्यास धरणातील सर्वच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येईल आणि अपेक्षित शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करता येईल.
    निळवंडे व भंडारदऱ्याचे एकत्रित व्यवस्थापन केले अथवा न केले तरी ३४ मेगाव्ॉट क्षमतेच्या भंडारदरा जलविद्युत प्रकल्प दोन म्हणजेच कोदणी प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर निळवंडे धरणाचा परिणाम होणारच आहे. निळवंडे प्रकल्पात ते गृहित आहे. कोदणी प्रकल्पाचे खासगीकरण करताना हे वास्तव लक्षात घेतले आहे. कोदणी प्रकल्पाच्या कामास सन १९८६मध्ये सुरूवात झाली. या प्रकल्पासाठी निळवंडे धरणाचा साठवण तलाव म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. तेव्हा धरण चितळवेढे येथे होणार होते. त्याप्रमाणे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, नंतर धरणाची जागा बदलली व धरण ६०० मीटर वर, म्हणजे सध्याच्या जागेवर नेण्यात आले. या बदलामुळे धरणाची पूर्ण संचय पातळी वाढली. आता पाण्याचा फुगवटा थेट कोदणी प्रकल्पाला वेढणार आहे. निळवंडय़ाचा कोदणी प्रक्लपावर परिणाम होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले. त्यामुळे कोदणी प्रकल्पाच्या आराखडय़ात काही बदल करण्यात आले. निळवंडे जलाशयाचे पाणी प्रकल्पात जाऊ नये, या साठी प्रकल्पाभोवती नदीच्या बाजूने ६५२ मीटर तलांकापर्यंत उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली.
    कोदणी प्रकल्पाचा तळ तलांक ६०८ मीटर आहे. याचा अर्थ निळवंडे धरणातील पाण्याची पातणी ६०८ मीटरपेक्षा जसजशी जास्त होईल, तसतशी कोदणी प्रकल्पाची वीजनिर्मिती कमी होत जाईल. धरणातील पाणीपातळी ६३८ मीटर होईल, तेव्हा प्रकल्प पूर्ण बंद ठेवावा लागेल व वीजनिर्मिती बंद होईल. निळवंडय़ाची पूर्ण संचय पातळी आहे ६४८ मीटर. म्हणजे धरणातील पाणीपातळी ६३८ मीटरपासून ६४८ मीटर होईपर्यंत (धरण पूर्ण भरेपर्यंत), तसेच धरण रिकामे होताना पाणीपातळी पुन्हा ६३८ मीटर होईपर्यंत हा वीजप्रकल्प बंद राहणार आहे. याचाच अर्थ सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत तीन-साडेतीन महिने या प्रकल्पातून वीजनिर्मिती होणार नाही, तर त्याच्या आधी व नंतर महिना-दीड महिना त्यातून पूर्ण क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती होणार आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्याप्रमाणे धरमातील पाणीसाठा व तलांक यांच्या आलेखावरून धरणातील पाणीपातळी १५ जानेवारीच्या सुमारास ६३० मीटर तलांकापर्यंत येते. उच्चस्तरीय कालवे काढलेच व त्यासाठी पाणीपातळी ६३० मीटर तलांकापर्यंत ठेवावी लागली, तर १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या काळातही वीजनिर्मितीवर परिणाम होईल. म्हणजेच उच्चस्तरीय कालव्यांमुळे जास्तीत जास्त दीड महिना वीजनिर्मितीवर अंशत: परिणाम होणार आहे. त्यामुळेच वीजनिर्मितीत मोठी घट होईल. मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल, या जलसंपदा विभागाच्या  दाव्यात तथ्य नसल्याचे दिसून येते. उलट भंडारदरा व निळवंडय़ाच्या पाण्याचे संयुक्त व्यवस्थापन केल्यास दोन्ही प्रकल्पांना पहिल्या दोन आवर्तनांतच निळवंडे धरण रिकामे करता येईल व नंतर पुढील प्रत्येक क्लोजरच्या काळात धरण भरून घेताना वीजनिर्मिती करून निळवंडय़ातील पाण्यामुळे वीजनिर्मितीचे होणारे नुकसान भरून काढता येईल.
    निळवंडय़ाचे उच्चस्तरीय कालवे होतील वा होणारही नाहीत. सरकार त्या बाबत योग्य तो निर्णय घेईल. मात्र, अधिकाऱ्यांनी जनतेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या पाण्याबाबतच्या विषयावर निर्णय घेताना वास्तव चित्र मांडणे अपेक्षित आहे. निळवंडय़ाच्या उच्चस्तरीय कालव्यांबाबत मात्र तसे झाल्याचे आढळत नाही.    (समाप्त)
    पत्रकारांमधील जिज्ञासा हरवत चालली आहे. ज्ञान मिळविण्यासाठी जिज्ञासा हवी, संकुचित होऊ नका. मला काय त्याचे ही भावना ठेऊ नका, ग्रामीण पत्रकारावर समाजाची मोठी जबाबदारी आहे. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची आच पत्रकाराला हवी. मुलभुत बाबींकडे दुर्लक्ष नको या शब्दात ‘लोकसत्ता’चे माजी सहायक संपादक अरविंद व्यं.गोखले यांनी दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, वी. रा. उगले, सुकृत खांडेकर, दौंड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष एम. जी. शेलार, आप्पा काळे. यांच्यासह दौंड, इंदापूर, बारामती पुरंदर, शिरूर, हवेली तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. दौंड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार वी. रा. उगले यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्त व पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना गोखले म्हणाले, पत्रकाराने अभ्यास करून मांडणी करणे आवश्यक आहे. बातमी चालत येत नसते. बातमीपर्यंत पोहोचायचे असते. चांगल सोप लिहिण अवघड आहे. त्यासाठी जे जे चांगल ते वाचल पाहिजे.  उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना एस. के. कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांची भाषाशैली समर्पक, सोपी, चपखल, सरळ पाहिजे. तुकारामाची गाथा, मनाचे श्लोक न वाचता लिखाण करणे म्हणजे शब्द सामर्थ व संग्रहाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख एैशा नरा असा केला की त्याचे चारित्र्य व चरित्र उभे राहते. मराठी भाषेची दिशा ठरवण्याच काम पत्रकार करू शकतात. आपल्या परिसराचा चौफेर अभ्यास करा. आजच्या प्रश्नासाठी, वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी लेखणी वापरा. त्यांचा हुंदका, त्यांची वेदना, त्यांचे आश्रू जाणून घ्या, समाजाला भेडसावणारे प्रश्न कवेत घ्या. बातमीसाठी डोळे उघडे ठेवा. भाषा शुद्ध वापरायची, लिहायचा सराव करा. शुद्ध भाषा याचा अर्थ ग्रामीण व बोली भाषेतील व चपखल शब्द वापरायचे नाहीत असे नाही. छोटय़ा छोटय़ा गावात सेंद्रिय खते, पाणी बचत, असे प्रयोग करणारी कर्तबगार माणसे असतात. त्यांची दखल घ्या. एक धागा सापडला तर मोठी बातमी सापडते. त्यासाठी आभ्यासातून दृष्टी तयार करा. त्यामुळे जिथे जाऊ तिथे बातमी दिसेल. या मातीतील प्रश्न व माणूस यांना बातमीचा केंद्र बिंदू करा. वाट चुकलेल्याकडे जा. संवेदनाशिल बना,समरस व्हा.
    यावेळी बोलताना सुकृत खांडेकर म्हणाले, पत्रकार हा सरकार व जनता या मधील दुवा असला पाहिजे. लोकशाही प्रशासन व पत्रकार यांची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. तसे दृश्य आज दिसत नाही. महाराष्ट्रातील ५४ वृत्तपत्रांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत. यांची दखल सुवर्णमहोत्सवी वर्षांत महाराष्ट्र सरकारने घेतली नाही ही खेदाची बाब आहे. सध्याचे चित्र भेसूर आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचार चिड आणणारे आहेत. अश्या परिस्थितीत वृत्तपत्रच सामान्यांना आधार वाटत  आहे.
    पत्रकारांनी मर्यादेतच भान ठेवून वास्तव लपवल जाणार नाही असे लिखाण करणे आवश्यक आहे. वी. रा. उगले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. एम. जी. शेलार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सावता नवले यांनी केले. आभार आप्पा काळे यांनी मानले.   

    Monday, May 9, 2011









    वैशाख महिना सुरू होताच सहयाद्री पर्वतरागांमध्ये विविध रानमेव्यांच्या फळांमध्ये गोडवा येऊ लागतो. या गोडव्यातून करवंद, आवळं, फणस, काजु, जांभुळ, तोरणं, आंबा या डोंगर फळांची चव चाखायला मिळते. करवंदाच्या जाळयांमध्ये घुसून करवंद खाण्याचा आनंद काही औरच असतो.

    तुरट गोड काजूचा आंबा, फिक्कट खोड आवळं, तोंड जांभळी रंगानं रंगून टाकणारी जांभळं, गोड गावठी फणस, मोठया कोईचा आंबा खाण्यासाठी भीमाशंकर, आहुपेकडे यावे लागेल. भीमाशंकरजवळील म्हतारबाचीवाडी येथील एकाच फणसाच्या झाडाला सुमारे तीनशे फणस लागले आहेत. हे फणसाचे झाड अतिशय जुने आहे. रस्त्याने जाताना शाळकरी मुले रानात तोडून आणलेला हा रानमेवा विकताना दिसतात. मिळालेल्या पैशातून शाळेचे साहित्य खरेदी करण्यासाठी
    आदिवासी मुले हे काम करीत असतात.

    बागायत वाचवून जिरायतलाही हवे पाणी ‘निळवंडे लाभक्षेत्राची फेररचनाच व्यवहार्य’Print
    निळवंडय़ाचे पाणी - भाग एक
    प्रकाश टाकळकर ,अकोले, ८ मे

    निळवंडे कालव्याच्या प्रश्नावरून तालुक्यातील वातावरण तापले असून प्रवरेच्या खोऱ्यात निळवंडय़ाच्या पाण्यावरून अस्वस्थता आहे. निळवंडे पाणीहक्क संघर्ष समितीने उच्चस्तरीय कालव्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. तालुक्याच्या बागायत क्षेत्रातून जाणारे निळवंडे धरणाचे कालवे रद्द करावेत व डोंगराच्या कडेने उंचावरून कालवे काढावेत, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. कालव्यात जाणाऱ्या बागायत शेतजमिनी वाचविणे व निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात न येणाऱ्या तालुक्यातील जिरायत भागाला धरणाचे पाणी मिळवून देणे हा या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे.
    उच्चस्तरीय कालव्यांचा प्रश्न तांत्रिक व आर्थिक बाबींशी निगडित आहे. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्यांबाबत तालुक्यात, तसेच प्रशासकीय पातळीवर मतभिन्नता दिसून येते. तथापि नदीपात्रापासून दोन्ही बाजूंच्या डोंगररांगापर्यंत सर्व क्षेत्राला निळवंडय़ाचे पाणी मिळाले पाहिजे, यास कोणाचाच विरोध दिसत नाही. अर्थात, जिरायत भागाला पाणी कशा प्रकारे द्यायचे, या बाबत मात्र एकवाक्यता नाही. निळवंडय़ाच्या मूळ लाभक्षेत्रात न येणाऱ्या या कालव्यापासून डोंगरपायथ्यापर्यंत ३ हजार २२७ हेक्टर नवीन क्षेत्रास पाणी कसे उपलब्ध करणार, हा कळीचा मुद्दा आहे.
    भंडारदऱ्याचे अकोले तालुका वापरत असणारे पाणी निळवंडे प्रकल्पाकडे वर्ग करून जिरायत भागाला देण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव तालुक्याच्या पचनी पडणारा नसून, तो नवीन असंतोषाला आमंत्रण देणारा आहे. दुसरीकडे निळवंडे पाणीसाठय़ातून या भागासाठी निळवंडय़ात अतिरिक्त पाणी शिल्लक नाही. तथापि निळवंडे लाभक्षेत्रात येणारे भंडारदरा, आढळा धरणांचे लाभक्षेत्र निळवंडे लाभक्षेत्रातून वगळले तर अकोल्याच्या जिरायत भागाला निळवंडे धरणातूनच पाणी देणे शक्य आहे. त्यासाठी निळवंडय़ाच्या लाभक्षेत्राचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे.
    निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे अकोले तालुक्यातील लागवडलायक क्षेत्र ७ हजार ४६२ हेक्टर आहे. त्यातील फक्त ४ हजार २३५ क्षेत्र निळवंडय़ाचे सिंचनक्षेत्र आहे. उर्वरित ३ हजार ३३७ हेक्टर क्षेत्र निळवंडे लाभक्षेत्रात येत असूनही त्यास निळवंडय़ातील पाण्याचा थेंबही मिळणार नाही. निळवंडे धरण ही अकोल्याच्या दृष्टीने पाणी मिळविण्याची शेवटची संधी आहे. निळवंडय़ाचे पाणी तालुक्यातील जिरायत भागाला मिळाले नाही तर भविष्यात हा भाग नेहमीच कोरडवाहू राहील, हे वास्तव लक्षात आल्यानंतर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्यापासून ते कालव्यापर्यंत वरील भागात असणारे व त्यामुळे सिंचनापासून वंचित असणारे हे क्षेत्र सिंचनाखाली आणावे, अशी मागणी सुमारे ८-९ वर्षांपूर्वी पुढे आली. त्यातूनच फक्त अकोले तालुक्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय कालवे काढण्याचा पर्याय पुढे आला. निळवंडय़ाचे कालवे ६१०.४० मीटर तलांकावरून निघणार आहेत, तर उच्चस्तरीय कालव्याचा तलांक ६३० मीटर आहे.
    पुढे उच्चस्तरीय कालव्याचा विषय मागे पडला व उपसासिंचनाचा पर्याय पुढे आला. त्या अनुषंगाने निळवंडय़ाचे मूळ कालवे ते डोंगरमाथ्यापर्यंत ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास निळवंडे कालव्यातून उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याचा पर्याय पुढे आला. सध्याच्या चर्चेनुसार या ३ हजार २२७पैकी १ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रास उच्चस्तरीय कालव्याद्वारे व १ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रास उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास पाणी कसे देणार यापेक्षा त्यासाठी पाणी कोठून आणणार, ही बाब महत्त्वाची आहे. तालुक्यातील हे ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
    निळवंडे धरणासाठी एकूण ८ हजार ४०५ द. ल. घ. फू. पाणीवापर प्रस्तावित आहे. अकोले ४ हजार २३५, संगमनेर २५ हजार ४२८, कोपरगाव ५ हजार ६६६, राहाता १७ हजार २३१, श्रीरामपूर ९९९, राहुरी ८ हजार ८९ व सिन्नर २ हजार ६१२ असे एकूण ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र निळवंडय़ाचे सिंचनक्षेत्र आहे. त्यामुळे ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रासाठी निळवंडे धरणात पाणी शिल्लक नाही. हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी जलसंपदा विभागाने भंडारदऱ्याचे पाणी निळवंडय़ाकडे वळविण्याचा जो पर्याय पुढे आणला आहे, तो रोगापेक्षा औषध घातक असा आहे. भंडारदरा धरणातील अकोले तालुक्याच्या वाटय़ापैकी ४६२ द. ल. घ. फू. पाणीसाठा निळवंडे प्रकल्पात वर्ग करण्यात येऊन त्याद्वारे हे क्षेत्र सिंचनाद्वारे निळवंडे प्रकल्पाच्या पीकरचनेनुसार उपसा सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. या पर्यायास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे.
    अकोलेकरांनी तीव्र संघर्ष करून भंडारदऱ्याच्या पाण्यात हिस्सा मिळविला. भंडारदऱ्याच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास असंतोष भडकेल. त्यामुळे जलसंपदा विभागाचा हा पर्याय लोकांना कदापि मान्य होणारा नाही. भंडारदऱ्याचे पाणी वळविता येत नाही. निळवंडय़ातूनच द्यायचे तर कोणाचे तरी पाणी द्यावे लागणार, ते शक्य नाही. निळवंडय़ातून पाणी द्यावे, ही तालुक्यातील जनतेची मागणी आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील ज्या भागास अन्य धरणांचेही पाणी मिळते, ते क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रातून वगळले तरच हे शक्य आहे.
    भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र पूर्वी ओझरच्या खाली होते. पण पाण्याच्या फेरवाटपानंतर     भंडारदरा धरण ते ओझपर्यंतचे क्षेत्रही भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र बनले. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील ३ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रास भंडारदऱ्याचे पाणी मिळते, तर संगमनेरचे ४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्र भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र आहे. शिवाय आढळा धरणाचे सुमारे अकराशे हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येते.
    तालुक्यातील भंडारदऱ्याच्या लाभक्षेत्रापैकी ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असे आहे की जे निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येत नाही. ते वगळता अकोले-संगमनेर तालुक्यांतील जवळपास ९ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ज्याला निळवंडय़ाबरोबरच आढळा किंवा भंडारदरा धरणांचेही पाणी मिळते. आढळा धरण आठमही आहे. त्याचे व     निळवंडय़ाचे सामायिक क्षेत्र गृहित धरले नाही तरी निळवंडे लाभक्षेत्रात येणाऱ्या सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रास आजही भंडारदरा धरणाचे बारमही पाणी मिळत आहे.
    एकाच क्षेत्रासाठी दोन धरणांचे पाणी घेता येत नाही. त्यामुळे हे साडेसात ते आठ हजार हेक्टर क्षेत्र की जे निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात आहे, पण ज्याला निळवंडय़ाच्या पाण्याची गरज नाही. हे क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रातून वगळले तर कोणाचेही पाणी कमी न करता निळवंडे धरणातून साडेसात हजारपेक्षा अधिक नवीन क्षेत्रास पाणी देता येईल. निळवंडे लाभक्षेत्राची फेररचना करून निळवंडे लाभक्षेत्रात येणारे भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र वगळल्यास डोंगरपायथ्यापासून कालव्यापर्यंत अकोले तालुक्यातील ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास निळवंडे धरणातूनच पाणी देता येईल. एवढेच नव्हे, तर संगमनेर तालुक्यातील वंचित भागास अशाच प्रकारे कालव्यावरील उपसासिंचन योजनांद्वारे पाणी देता येणे शक्य आहे.    (क्रमश:)    

    Sunday, May 8, 2011








    chichondi yethil vij samassya.


    राजुर वार्ताहार दि.8/5/11        वीज कंपनीचा अजब कारभार चिचोंडी गावात पहायला मिळाला असून चिचोंडी परिसराला वीज पुरवठा करणारे रोहीम (डी .पी) पूर्णपणे फुटकी असून काही बीजेचे रंबाव पड्ण्याच्यातयारीत असून अंतिम घटका मोजीत आहेत राजुर येथील वीज मंडळाच्या आधिकार्‍यांना कळ्वूनही व भंडारदरा विभागाचे इंजिनिअर श्ची .अली यांना प्रत्यक्ष  दाखवून ते ही डिपी दुरूस्त करीत नसल्याने चिचोंडी ग्रामस्थ आता वीज कंपनीच्या मुख्य अभिमंत्यांनाच निवेदन पाठवीनार असल्याचे समजते.
    चिचोंडी, ता-अकोले येथील गावात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर वीज पुरवठ्यासाठी   असणारी डिपीचे बॉक्स फुटलेले असून तारांवरील प्ल्यास्टीकचे आवरन निघूण गेले आहे.त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजुर वीज कार्यालयाच्या सहायक अभियंता कुलकरर्णी यांना सांगुनही त्यांनी कानावर हात ठेवले आहे.तर भंडारदरा येथील वीज मंडळाचे इंजिनीअर श्ची.अली हे माहित असूनही मटोरिअल नसल्याचे सांगुण याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. यासंर्दभात ग्रामस्थ भंडारदरा येथील वीज मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे. सरपंच ,उप सरपंच,सामाजिक कार्यकर्ते  (चंद्रकांत बांगर , सुरेश गभाले , ललित पवार आदि.)यांनी नाराजी व्यक्त केमी आहे .                                                                                                                                                                              शांताराम काळे         

    डोगरची काळी मैना दोन रुपयाला आठ्वा


    राजुर(वार्ताहर)     दि.8/5/11                                                                                                                            '' डोगरची काळी मैना दोन रुपयाला आठ्वा '' असे ओरडत आदिवासी पाडयातील शाळकरी
    मुले भंडारदरा परिसरात व कोल्ह्रार-घोटी रस्त्यावर दिसू
    लागल्याने त्यामुळे खरया अर्थाने डोंगरची काळी मैना बाजारात आली आहे.
    अकोले तालुक्यतील पश्चिम भागातील आदिवासी पट्टा उन्हाळ्यात रोजगार शोधण्यसाठी भाकरीचा चंद्र  शोधण्यसाठी  गावो-गावी भटकत असताना त्यांची शाळ्करी मुले सुट्टीचा आनंद लुट्ण्याएवजी करवंदाच्या काटेरी झुडपात घुसुन करवंदे ,आवळे ,कैर्‍या गोळा करुण सकाळी सात वाजताच भंडारदरा,राजुर,कोतुळ,समशेरपूर आदि भागात जाऊन हातात टोकरया  घेऊन ''साहेब  घ्या दोन रुपयाला आठवा डोंगरची काळी मैना तीन रुपयाला चार कैर्‍या (राघु)असे म्हणत दिवसभरात पंन्‍नास शंभर रुपयांची कमाई करुन
     समाधानाने घरी परततांना दिसत होते.या संर्दभात ईयत्‍ता आठवीत शिकत असलेल्या संतोष झडे ,हौसाबाई परते या मुलांना विचारले असता तुम्ही या पैसाचे काय करता ? त्यामधून आम्ही कपडे ,वहृया  शालेय साहित्य विकत घेतो व उरलेले पैसे पालकांना देतो त्यामुळे घर खर्चाला हात भार लागतो त्यांचे हे बोलने एकून  पर्यटकही प्रभावीत होतात.त्यामुळे दोन रुपयाचे दहा रुपयेही मुलांना मिळ्तात.भंडारदरा जलाशयातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.वातानूकुलीत गाड्या ऊभ्या राहील्या की मुले डेंगरची काळी मैना असा आवाज देतात व पर्यटकांना आर्कर्षीत  करतात    व त्या ''आहिरेंची मने जिंकून नाहिरेंना मिळालेला आनंद हा स्वर्गीय आनंदच होय असे त्यांच्या चेह्र्‍यावरचे भाव सांगून जातात.   आदिवासी मानसे रोजगारासाठी पायपीट करतात तर त्यांची मूलेही   जंगंलातील करवंदे गोळा करुण त्यांच्या प्रपंचाला हाथभार लावतात
                                                                     -शांताराम काळे.