Monday, June 13, 2011







हेमलता पिचडांसह १० सदस्यांची निवड निश्चित!Bookmark and SharePrintE-mail
राजूर ग्रामपंचायत बिनविरोधच्या मार्गावर
राजूर, १३ जून/वार्ताहर

राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागांवरील बिनविरोध निवडी निश्चित झाल्या आहेत. उर्वरित सात जागांवरील इतर उमेदवारही निर्धारित मुदतीत त्यांचे अर्ज मागे घेण्याची चिन्हे आहेत. प्रभाग चारमधून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पत्नी हेमलताताई यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने सरपंचपदीही त्यांची निवड निश्चित मानली जाते.
राजूरच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. येत्या दि. २६ ला ही निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा परवा (बुधवार) शेवटचा दिवस आहे. दहा प्रभागांमधील बिनविरोध निवडींची आज निश्चिती झाली. त्यात श्रीमती पिचड यांचा समावेश आहे. सरपंचपद आदिवासी महिलेसाठी आरक्षित असल्याने श्रीमती पिचड यांची निवड निश्चित मानली जाते.
आदिवासी भागातील ४० गाव डांगाणाचे मुख्य केंद्र म्हणून राजूरची ओळख आहे. १५ हजार लोकसंख्येच्या मोठय़ा गावात ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक त्यादृष्टीनेच महत्वाची मानली जाते. श्रीमती पिचड यांच्यासह रेश्मा नवाली, अंजली देशमुख, रोहिणी निघळे, गंगुबाई देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणपत देशमुख, दौलत देशमुख, किशोर कोंडार व सखुबाई पवार अशा दहा सदस्यांचा आज बिनविरोध झालेल्यांमध्ये समावेश आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत उर्वरित सात जागाही बिनविरोध व्हाव्यात यादृष्टीने ग्रामसमितीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही ग्रामस्थांना तसे आवाहन केले आहे. सर्वसमावेशक असे मंडळ निवडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. युवा नेते वैभव पिचड यांनी उमेदवार निवडताना गुणवत्तेला प्राधान्य दिल्याने समाधान व्यक्त होते.      

1 comment: