Tuesday, June 14, 2011


बिनविरोध निवडणूक ही चांगली सुरूवात - पिचडBookmark and SharePrintE-mail
राजूर, १४ जून/वार्ताहर
राजूरसारख्या मोठय़ा गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक, तीही प्रथमच बिनविरोध होणे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना धन्यवाद व शुभेच्छा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गावची ९६ लाख रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. ती भरण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे. हेमलताताई पिचड यांच्या रूपाने प्रथमच गावचे सरपंचपद एखाद्या आदिवासी महिलेकडे येत असून, राजकीय इच्छाशक्तीने पाणीपट्टीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गावची ग्रामपंचायत ७६ वर्षांत बिनविरोध झाल्याचा आनंद गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला. मात्र, सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने, तसेच आमदार पिचड मुंबईहून परतल्यावर बिनविरोध निवड झालेल्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. आज बिनविरोध निवड झाल्यावर आयोजित छोटेखानी सत्कार कार्यक्रमात बोलताना हेमलताताई पिचड यांनी गगनगिरीमहाराज यांचे आशीर्वाद, आमदार पिचड यांचा पाठिंबा-मार्गदर्शन, वैभव पिचड यांची सामाजिक बांधिलकीतून भूमिका, सर्वसमावेशक धोरण या बाबी गावची निवडणूक बिनविरोध होण्यास साह्य़भूत ठरल्याचे नमूद केले. दिलेल्या संधीचे सोने करून गाव आदर्श करण्यात आम्ही एकजुटीने झटू, असा निर्धार व्यक्त केला. संतोष मुर्तडक यांनी गावची पंचायत बुडते जहाज होते. हेमलताताई पिचड यांच्यामुळे हे जहाज बुडण्यापासून वाचेल, असा विश्वास व्यक्त केला. संतोष बंदसोडे यांनी आभार मानले. पं. स. सभापती मंगल जाधव, अशोक टिभे, राजेंद्र कानकाटे, प्रकाश महाले, शशिकांत ओहरा, सचिन मेहता, बाळासाहेब देशमुख, दौलत देशमुख, सुंदरलाल मेहता, आयूब तांबोळी आदी उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment