कोणत्याही वस्तूची खरेदी करताना तशी जाणीवपूर्वकच करायला हवी. अन्यथा ती वस्तू खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप करण्यात अर्थ नसतो. भाजी खरेदी करतानाही तिची किंमत किती, नावडती भाजी की आवडती भाजी, टिकेल की नाही, मला भाजीवाला फसवत तर नाही ना, असे एक ना दोन अनेक प्रश्न मनात येतात. अगदी मग भाव करण्यापर्यंत मजल जाते. भाव केल्याशिवाय मनाला स्वस्थताही मिळत नाही, अशी माणसेही कमी नाहीत. असो. सांगण्याचा मथितार्थ इतकाच की खरेदी करताना पैसे खिशात आहेत, ते खर्च करायचे आहेत म्हणून मोटार खरेदी करतो असे कोणी म्हणत नाही. लाखाची गोष्ट चित्रपटात नायकाला त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी एक लाख रुपये खर्च करण्यास दिले. ते खर्च करण्यासाठी मागेपुढे न कुचरता त्याने पाहिजे तसे ते खर्च केले, पण पैसे कमी झाले नाहीत. उलट वाढले. अर्थात अशी स्थिती सर्वानाच लाभते असे नाही! ती योग्यही नाही. पैशाची, वेळेची किंमत जाणायला हवी. वस्तूची गरज, उपयुक्तता ओळखायला हवी तरच खर्च केलेले पैसे कारणी लावले असे म्हणता येते.
मला मोटार घ्यायची आहे. कोणती घ्यावी? असा प्रश्न पहिल्यांदाच मोटारीची खरेदी करणाऱ्याला पडतो. तुमचे उत्पन्न चांगले आहे. मोटार घेणे आर्थिकदृष्टय़ा मला परवडते म्हणून मोटार घेऊ शकतो. पण इतकेच पुरेसे नाही. मुळात मोटार कशासाठी हवी आहे? तुम्ही ती कुठे वापरणार आहात. मुंबई-पुण्यासारख्या गर्दीच्या व वाहतुकीची कोंडी होणाऱ्या शहरात नेहमी वापरणार आहात का शहराबाहेर जायला वापरणार आहात हे स्पष्ट ठरवायला हवे. त्यानंतर तुमची गरज किती आहे. किती वेळा मोटारीचा वापर करणार आहात. शहराबाहेरच्या प्रवासासाठी शोफर ठेवणार की स्वत: तुम्ही मोटार चालविणार आहात. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत त्यामुळे तुमच्या कपाळाला आठय़ा पडणार आहेत का, तसे असेल तर मोटार खरेदी केवळ पैसे आहेत म्हणून करू नये. याचे कारण मोटार ही मुळात तशी चैनीचे वा आरामदायी साधन आहे. तो आराम तुम्हाला मिळत असेल तर मोटारीसाठी खर्च करणे मनाला पटेल. अन्यथा ती मोटार घेऊन तुम्हाला आनंदापेक्षा दु:ख होणार असेल, चिंता वाटणार असेल, कपाळाला आठय़ा पडणार असतील तर मोटार खरेदी करू नये, असेच स्पष्ट मत मांडावे लागेल. वाढत्या महागाईचा आलेख इतिहासातही वाढत असलेला दिसतो म्हणून कोणी चैनी थांबविल्या नाहीत त्या करत आहेत. फक्त आपण मोटार ही अनाठायी वापरण्याचे साधन करू नये. तर ती तुमच्या जीवनशैलीची गरज वाटत असेल तर परवडणारी वस्तू म्हणून स्वीकारायला नक्कीच हरकत नाही. त्याचप्रमाणे त्याने ते मॉडेल घेतले म्हणून मी मोटारीचे त्यापेक्षा अधिक झकास मॉडेल घेणार, या स्पर्धेतही उतरू नये.
वास्तविक मोटार म्हणा वा दुचाकी म्हणा ही वाहने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची साधने आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतासारख्या विकसनशील देशाला आजही मोटार ही चैन आहे. पेट्रोलपेक्षा स्वस्त असणाऱ्या डिझेलचा पर्याय निवडला तरी अजूनही पेट्रोल इंजिनापेक्षा डिझेल इंजिनावरील मोटारीवर अधिक देखभाल खर्च करावा लागतो ही मानसिकता बदललेली नाही. एलपीजी वा सीएनजी या इंधनांवर चालणाऱ्या मोटारी या इंजिनाला फायदेशीर आहेत, असेही म्हणता येत नाही. वाढती वाहतूक आणि त्यामुळे होणारी रस्त्यावरील मोटारींची-वाहनांची कोंडी ही शहरातील समस्या तर गावांमध्ये अजूही अनेक ठिकाणी नीट रस्ते नाहीत, सेवाकेंद्रे वा दुरुस्तीची नीट सोय नाही किंवा सुटेभाग मिळत नाहीत ही समस्या लक्षात घेतली पाहिजे. या स्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच उत्पन्नाचा व त्यानुसार मोटार घेणे कसे परवडेल याचा विचार केल्यानंतर मोटार हॅचबॅक, एसयूव्ही की सेदान घ्यावी हे तुम्ही मोटार किती व कुठे वापरणार यावर व वाहतुकीसंबंधातील स्थितीवर गांभीर्याने विचार करून मगच निर्णय घेणे उत्तम होईल. अनेकदा शहरात मोटार वापरायची असेल तर हॅचबॅक चालविणे सोयीस्कर. त्या मोटारी लांबीला कमी त्यामुळे पार्किंगसाठी उपयुक्त ठरतात. तर इंधनही कमी लागते. सामानही ठेवण्यासाठी जागा बऱ्यापैकी असते. इतकेच नव्हे तर सेदानमधील आरामदायी आसनव्यवस्थेसारखी आसने या मोटारीमध्येही मिळतात. सेदान मोटारीच्या मालकीतून कदाचित एक पॉश व उच्चभ्रू असल्याचा भास होत असला, प्रेस्टिज वाटत असले तरी भारतीय शहरातील रस्ते युरोपमध्ये असतात तसे मोठे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ती चालविणे तसे शहरी वाहतुकीत कटकटीचे वाटते. शोफर असेल तर उत्तम तरीही वाहतूक कोंडीला तोंड देताना मोटारीत बसून आराम मिळतो की नाही ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.
गेल्या महिन्याभरामध्ये मोटारींच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम फार झाला आहे वा होईल असे नाही. मुळात मोटारींच्या किमतीपेक्षा पेट्रोल, डिझेलची किंमत वाढते ती परवडत नसल्याचे दु:ख अनेकांना जाणवते. पण तरीही मोटार वापरण्याची सवय लागल्याने सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहाता येत नाही. अनेकांना ते आवडत नाही, रुचत नाही कोणाला ते कमीपणाचे वाटते तर कोणाला त्रासदायक वा अडचणीचेही असते. खरे म्हणजे मोटारींचा वापर व्यवस्थितपणे करू शकतो, इंधनाच्या किमतीपेक्षा आपल्याला आराम मिळेल, दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको असा विचार मोटार खरेदीमागे असेल व निश्चितपणे मोटार वापरायची व विनाकारण घेऊन नुसती उभी करायची नाही हे ज्याला पटेल व परवडेल त्याने मोटार घ्यायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मोटार ही गरज बनू लागली आहे. विशेष करून मध्यमवर्गीयांनाही परवडणाऱ्या मोटारी बाजारात येत असल्याने त्या घ्याव्यात असे मनात वाटते. कोणाला मोटार नको आहे? असा प्रश्न केला तर फार कमी लोक सांगतील की, नाही मला मोटार घेणे परवडत असले तरी मी सार्वजनिक वाहनच वापरेन. मोटार हे एक स्वप्न आहे. केवळ श्रीमंताचे नाही तर गरीबाचेही ते स्वप्न आहे. कधी काळी आपण स्वत:ची मोटार घेऊ व त्यातून सहकुटुंब हिंडू. ते स्वप्न प्रत्यक्षात किती येते, तुम्ही ते कसे उतरविता हे तुमच्या उत्पन्नावर, विचारांवर आणि वाहतुकीच्या स्थितीवर अवलंबून आहे. अद्याप भारतात स्क्रॅप पॉलिसी लागू झालेली नसल्याने १५ वर्षे झालेल्या मोटारीही वापरता येतात. सेकंडहॅण्ड मोटारींचीही स्वतंत्र बाजारपेठच आहे. सध्या १५ वर्षे जुनी मोटार असेल तर त्यावर वेगळी आकरणी आरटीओमध्ये भरावी लागते. काही असले तरी अशा मोटारींची संख्या काही कमी होत नाही आणि नवीन मोटारी घेण्याचे स्वप्नही बघायचे बंद होत नाही. मोटारींची बाजारपेठ वाढत आहे. पण त्याला मर्यादा आहे ती रस्त्यांची, अडथळे आहेत ते वाहतूक कोंडीचे आणि मोटार उभी करायची म्हटली तरी व्याप व संशोधन करावे लागते ते योग्य जागेचे! तेव्हा मोटारीच्या खरेदीचे स्वप्न पाहा, पण या साऱ्या अडचणींचा, मानसिकतेचा, पायाभूत सुविधांचा विचार करूनच स्वप्न सत्यात उतरवा.

No comments:
Post a Comment